अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिल Sad

मतकरींचीच एक गोष्ट आठवली... द्रष्टा या नावाची. टिवीवर याचे नाट्यरुपांतरही आलेले.

अनिल Sad

तिला पाहून पाहून पण माझे मनोरंजन होतेय >> माझे पण! कुठनं शोधल्यान सगळ्या स्मायली भूत जाणे!!!
ती खुर्चीवरची झुलती हडळ बघितली?? पेप्सी न पिताच मला बर्रर्रर्रर्र झालंय...

पेप्सी न पिताच मला बर्रर्रर्रर्र झालंय...
>>>>>>

ड्रिमू, आणखी एक वेंधळेपणा...... "कोकाकोला" पिऊन बर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र असं होतं Biggrin
तू धन्यच आहेस.... !!!!!

आमच्या विषयाचा 'विरंगुळा'
आजकाल 'माणसं' माणसं राहीली नाहीत
"हे रामsss..
अरे हे काय बोल्लो मी..... > 0403.gif

***
कळवळीची सुचना:- "भुत-पिशाच्चां कडुन मनोरंजन करुन घेणे" हा ही एक 'अघोरी' खेळ आहे. हा 'भुतांवर' घोर अन्याय आहे.

-सर्व प्रचि आं.जा.हुनसाभार.

अर्रर्रर्रर्र असंय का ते... वेंपमध्ये परतणेच उत्तम!! काय म्हणतो?? इथे वेंप केला तर भूतं सोडायची नाहीत.. तसापण राशीसारखा गणाच्या बाबतीत पण घोटाळा आहे माझ्या! Sad

सर्वांना एक विनंती:
इथे विनोद किंवा निरनिराळ्या स्मायली टाकण्यापेक्षा ज्या गोष्टींसाठी ते पान आहे - भुताखेतांच्या गोष्टी शेअर करणे किंवा त्यावर वैचारिक उहापोह करणे - तदनुषंगाने पोस्टी टाकाव्यात.

अरे मला मंदार जोशींची पोस्ट दिसतच नाहिये.......... Uhoh

काय लिहिलय काय त्यांनी????? अरे असं कसं शक्य आहे???? अरे... अरे...... मला लिहिलेलं सगळं ब्लँक दिसतेय........ Uhoh

अमानवीय...... अमानवीय........ अमानवीय........ !!!!!!!

.

चला मी पुन्हा मुळ विषयाकडे नेतो

आमच्या इथे पारनाक्यावर कधी कधी रात्री साधारण दोन अडीच च्या सुमारास परावरचे कावळे अचानक ओरडत उडतात आणि तेव्हाच कुत्रेही जोरात भुंकतात आणि सगळे शांत होतात.
कुत्र्याच ठिक पण मला वाटत कावळे रातांधळे असतात.

एकदा अशीच आमच्या बिल्डींग खाली बरीच कुत्री अभद्र रीतीने रडत होती. दुस-या दिवशी बातमी आली समोरच्या खंडेलवाल मिठाईवाल्याची तिन मुल अपघातात दगावली.

कावळे रातांधळे असतात.
>>>

अरे काय रे आधी घुबड आता कावळे....... किती ते मौन जातींबद्दल गैरसमज........ Sad

कावळे रातांधळे नसतात.

भुताखेतांच्या गोष्टी शेअर करणे किंवा त्यावर वैचारिक उहापोह करणे - तदनुषंगाने पोस्टी टाकाव्यात.>>> किती हा "अट्टहास"..! भुतांच्या गोष्टी जणु 'परीकथा'च वाटु लागल्यात मंद्याला आता. स्मित

मंद्या तुझ्यावर 'भुतांची' तमाम जात आज खुश असेल, तेव्हा आज 'अंगारकी' बरोबर 'अमोश्या' तर नाही ना. हे तपासुन घे.बहुतेक आज 'सुकादिवस' असेल.
स्मित

****
मंदार्_जोशि यांच्या हयात नसलेल्या पोष्टीचा मान ठेवुन ही पोष्ट 'विनास्माईली'.

ताडदेवला, फिल्म सेंटरची इमारत होती. त्या ठिकाणी माझे अनेकदा जाणे व्हायचे लहानपणी (तिथले रंगतज्ञ श्री अच्यूत गुप्ते, आमचे शेजारी होते.) ती इमारत पण अशीच भारलेली होती अशा गप्पा असत. रात्री तिथे कुणी थांबत नसे.

लॉजिकली बघता, हॉस्पिटल म्हणजे भूतांचा अड्डा पाहिजे. बरेचसे मृत्यू तिथे होतात. पण तिथे सहसा अशा गप्पा कानावर येत नाहीत. रामनराघवने पहिला खून ज्या परिसरात केला, तिथेच माझी शाळा होती, पण तिथेही काही भिती वाटायची नाही. एकंदर भूतमंडळींनी माझा धसका घेतलेला दिसतोय.

ग्रेट
धन्यवाद माझा गैरसमज दूर केल्याबद्दल.

फक्त दिवसाच उडणारे हे पक्षी रात्री असे अचानक का उठत असावेत.

चला आता इतर पक्षी वर्गा बद्दलही बोलू

तसच टिटवीच ओरडणही अभद्र मानतात. का ते मला माहीत नाही?

पुर्वी गिधाडे दिसायची की कोणी तरी गेलाय अस समजायच पण हल्ली ही जमात गायब आहे

कावळे जिथे विश्रांती घेत असतात, तिथे कुणी दगड मारला, तर का नाही उठणार ते ? कधी कधी वटवाघळांची आणि त्यांची जुंपते.
टिटवीचे ओरडणे कर्कश असते, आणि ती तशी ओरडत, डोक्यावरुन उडत जाते. खेडेगावातील शांततेत तिचा आवाज आणखीनच कर्कश वाटतो. अशा गोष्टींमुळे असे समज पसरतात.

बरोब्बर दोन अडीचच्या सुमारास कोण दगड मारत ते बघायला जायला हव.

माझ्या शाळेजवळ होती वटवाघूळांची मोठी कॉलनी . बिचारे शांतपणे लटकत असायचे.
उगाच एखाद आत शिरल तर समस्त स्त्रीवर्ग व्हिलनने धरलेल्या हीरवीणींसारख्या किंकाळ्या मारायला लागायच्या. तेच जास्त भितीदायक वाटायच.

कल्याणात आमच्या घराजवळील पोखरणही भारलेली आहे अस म्हणतात. ती खुपच खोल आहे तळ लागत नाही त्यात एक मुलगी खेचली गेली वगैरे कथा आमच्या लहानपणी प्रसिद्ध होती.

आता कोरडी ठाक पडली त्यामुळे तिचा गूढ चार्म पार नाहीसा झाला.

दिनेशदा तू कल्याणातही आलेलास का??? का???

आमच्या शेजारच्या आजोबांनी सांगितलेले एक किस्सा.

आजोबांचे गाव होतं पुणं. (४० - ५० वर्षा पुर्वी पुणं गाव होत Light 1 ). ते आणि त्यांचे एक मित्र रात्र रात्र भर फिरत असत आणि आपल्या निडरपणाचे फुशारक्या मारत. एकदा त्यांच्या ग्रुप मध्ये पैज लागली कि अमावस्ये च्या रातला जो कोण रात्री चे २ वाजता वैकुंठधाम मध्ये जाऊन वडा च्या झाडापाशी खिळ्ळा ठोकुन येणार ते निडर, झालं, ते दोघे मित्रांनी लागलीच पैज कबुल केली आणि सज्ज झालेत.

दोघेही ठरल्या वेळी वैकुंठधाम मध्ये जाऊन पोहचलेत. मिट्ट काळोख पसरला होता सगळीकडे. कुत्रे भुंकत होते. दोघेही आत मध्ये शिरले तेच त्यांच्या पाठुन काही तर्री सर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र करुन काही तरी गेल्या सारखे वाटले, दोघेही घाबरले होते, टॉर्च मारुन बघितलेत तर सुकलेल्या पानांवरुन एक घुस (मोठी ऊंदीर) गेली होती, त्याचंच आवाज होतं.

दोघेही वडाच्या झाडाजवळ आलेत एका आजोबांनी खिळ्ळा जमीनीवर रुतवली आणि पकडली आणि दुसरे आजोबा ती खिळ्ळा ठोकत होते, खिळ्ळा ठोकुन झाल्यावर दोघेही उठले आणि निघाले तेव्हा एका आजोबा चे धोतर कोणितरी सोडत नव्हते, ते त्यांनी दुसर्‍या आजोबांना सांगितले, दोघेही खुप घाबरलेत, पाठीमागे न बघता दोघे जे धुम पळाले त्यात ज्या आजोबाचे धोतर सोडत नाहिये असे वाटत होते ते धोतर सोडुन धावलेत. नंतर बाहेर आल्यावर एका आजोबांनी शक्याता सांगितली कि चुकुन तुझ्या धोतरावर तर खिळ्ळा मारली नसेल. Proud

ही ईश्टोरी मी खुप जणांकडुन ऐकली आहे, पण ते आजोबा फार रंगवुन सांगायचे, आम्ही लहान होतो, फार मजा यायची. आम्ही सर्व त्यांच्या कडे गलका करायचो आणि म्हणायचो "आजोबा आजोबा भुताची स्टोरी सांगा ना"
Proud

अरे म्हमईकरा, हीच गोष्ट "हर्‍या नार्‍या जिंदाबाद" (अशोक सराफ, निळू फुले). ह्या सिनेमात दाखवली होती.

"आजोबा आजोबा भुताची स्टोरी सांगा ना" >> त्या 'आजोबाबांची' भेट 'मंद्या' ला घडवुन द्या की, लई उपकार होतील बघा तुमचे.

(पण त्या गोष्टीही याला आधिच माहीत असतात.,असो)
**
सुचना: श्री.जोशि यांनी ही पोस्ट पाहील्यास ही पोस्ट इथे नसल्याचे ग्रुहीत धरावे.

आता पुढे क्रुपया भुताच्या पोष्टी (गोष्टी) येउ द्या.

या भुतांमधे अनेक सब-प्रकार असतात अस ऐकुन आहे. त्यातील झुटींग म्हणजे नक्की काय असतं?

जाणकारांनी प्रकाश टाकावा Wink Proud

अशोक थोरे किंवा नारायण धारप यांच्या कादंबर्या वाचतांना मजा येते, त्यात वेगवेगळ्या भुतांचे प्रकार आणि वर्णन केलेले आहेत.
सु. शि. चीं ' अंमल' वाचा, दिवसा ढवळ्या भीती वाट्ते.

Pages