Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी नुकताच इनाल्साचाच हँड
मी नुकताच इनाल्साचाच हँड ब्लेंडर घेतलाय. छान आहे.(परवा पुरणपोळीसाठी डाळ मस्त वाटून घेतली).
बजाजचा फुप्रो चांगला आहे.
बजाजचा फुप्रो चांगला आहे. मटार वगैरे फुप्रो मध्ये सोलू नये कारण जर अळी असेल तर कळणार नाही.
मला पण घ्यायचाय फुप्रो.
मला पण घ्यायचाय फुप्रो. माझ्याकडे पूर्वी महाराजा व्हाइटलाइन होता. १० वर्ष झाली, आता त्याची मोटर जळलिये. मी त्याच्या कणिक मळणे आणि कांदा-टॉमेटो बारिक चिरणे याशिवाय कश्याही साठी उपयोग केला नाही. मी वापरायला सुरवात करेपर्यंत त्याच्या बाकीच्या अॅटॅचमेंट्स अडगळीत पडल्या होत्या.
१० वर्षात कधीच काहीही प्रॉब्लेम आला नाही.
आता नविन घेताना तोच परत घ्यावा (गेल्या वर्षी तोच फुप्रो गावाकडे घेतला, तर ३-४ महिन्यात त्याच्या अॅटॅचमेंट / भांडे खराब झालेय) की दुसरा काही कळत नाहीये.
फुप्रो ऐवजी नुसता मिक्सी घ्यावा की काय असेही डोक्यात येतेय.
बजाजचा फुप्रो मी पण गेली ५
बजाजचा फुप्रो मी पण गेली ५ वर्ष वापरते आहे. काहीच त्रास नाही.
फुप्रो+मिक्सर असंही कॉम्बो
फुप्रो+मिक्सर असंही कॉम्बो मिळतं का?? कि मिक्सर वेगळा घेतलेला बरा??
साफ-सफाईच्या दृष्टीने फुप्रो बरा पडतो का?? कि खुप किचाट होतं साफ करताना?
वेळेची, एलेक्ट्रीसिटीची बचत कशात जास्त होते? फुप्रो कि मिक्सर??
माझ्याकडे रेनोल्ड चा आहे
माझ्याकडे रेनोल्ड चा आहे mixer cum food processor. बरीच वर्श वापरत आहे. चांगला आहे.
माझा अनुभव : लग्नात रिकोचा
माझा अनुभव : लग्नात रिकोचा मिक्सर दिला होता आईने. मस्त होता एकदम. ८ वर्षे वापरल्यावर फुपो हवाच असे डोक्यात शिरले. मग kenstar चा मिक्सर+फुपो घेतला. आणी मिक्सर गावी साबांना दिला.
पण किती मोठा आवाज या नविन मिक्सर ( + फुपो ) चा.. अरे देवा.. पण टाकुन देणे पण शक्य नव्हते. कसाबसा ४ वर्षे वापरला आणी सारखे ब्लेड बदला, अलाइनमेंट करा.. असा खर्च
मग त्याचा फक्त फुपो म्हणुन वापर करायचे ठरवले. आणि बिग बाझार मधे स्किम मधे Maharaja चा मिक्सर घेतला.. पण या नविन महाराजांचा पण गळा तसलाच.. खुप आवाज येतो
माझे मत.. फुपो आणी मिक्सर एकत्र नसावे. एक्तर फुपो तेव्हडा वापरला जात नाही. आणी मिक्सरबरोबरच असल्यामुळे सारखा स्वच्छ करावा लागतो. दुसरे एकाच मोटारवर दोन्ही चालत असल्यामुळे मिक्सर वापरताना फुपोचे झाकण लावावेच लागते. मोटारचा काही प्रॉबलेम झाला की दोन्ही बंद पडते
अल्पना, तुला महाराजा
अल्पना, तुला महाराजा व्हाईटलाईन ची फक्त मोटर बदलून हवी असेल तर मिळेल, माझ्याकडे पण तोच आहे आणि मागच्या वर्षी १०००/- रु. ला मोटर बदलून मिळाली. अर्थात जुना झालाय म्हणून नवीनच घ्यायचा असेल तर ठीक आहे.
मलाही वाटतंय फुप्रो अन मिक्सर वेगळंच असावं.
मला पण हँड ब्लेंडर घ्यायचाय. इनाल्सा चा पाहीला होता परवा. काही टीप्स ?
आईकडे फुप्रो अन मिक्सर दोन्ही
आईकडे फुप्रो अन मिक्सर दोन्ही वेगवेगळे आहे. मला पण दोन्ही वेगवेगळं असावं असं वाटतं. पण स्वैपाकघरात दोन्ही वस्तू ठेवण्याएवढी जागा नाहीये.
जर स्वैपाकात वरकामाला मदतीला कोणी नसेल तर फुप्रो रोजच वापरला जातो असा माझा अनुभव आहे.
फुप्रो आणि मिक्सर दोन्हीची मोटर फुप्रोमध्ये एकच असते, तसेच फुप्रो चे झाकण लावल्याखेरीज मिक्सर चालत नाही. याव्यतिरिक्त अजून कोणत्या कारणांमूळे दोन्ही एकत्र नसावं?
मी लिहायचे विसरले, माझ्या महाराजाच्या फुप्रो + मिक्सरची मोटर २ वर्षांपूर्वीपण एकदा बदलली होती. त्यावेळी त्या माणसाने सांगितले होते, की हल्ली मिळणार्या मोटर्सची क्वालिटी चांगली नाहिये. ही जुनी मोटर चांगली होती. जर परत खराब झाला तर नविन घेतलेला चांगला.
दुसरं त्याच्या मिक्सरचा आवाजपण खूप येत होता. मसाले वैगरे क्वचित कधी केले तरी आवाज जास्त यायचा आणि भरडच वाटले जायचे.
आज संध्याकाळी जावून मिक्सर /फुप्रो +मिक्सर यापैकी काहीएक घेवून येणार आहे. पण माझं कन्फ्युजन दुर होत नाहीये.
मवा, पूनम
हँड मिक्सी घेताना, त्याला वेगवेगळे ब्लेड्स आहेत का? किती आहेत आणि ते सहज बदलणे शक्य आहे का हे नक्की बघा.
मी लग्नाआधी फिलिप्सचा आणि नंतर जयपानचा असे दोन हँडमिक्सी वापरलेत. आधी जो वापरायचे त्याला चटणीसाठी भांडं होतं आणि वेगवेगळे ब्लेड्स होते. मी एकटी रहात असताना भाज्यांसाठीचे मसाल्यांचे वाटण, कोरड्या आणि ओल्या चटण्या, ताक असं सगळं त्यानेच करायचे.
आत्ताच्या ब्लेंडरला वेगवेगळे ब्लेडस आहेत, पण मला किंवा नवर्याला ते अजूनही (४ वर्षात) बदलता आले नाहीत. चटणीचं भांडपण नाहीये. त्यामूळे प्रत्येक छोट्या वाटणासाठी खलबत्ता किंवा फुप्रोचे चटणीचे भांडे वापरणे हे करावे लागते. या ब्लेंडरचा उपयोग ताक करणे, लोणी काढणे, कढी करताना बेसन ताकात मिक्स करणे आणि केक साठी, बनाना ब्रेडसाठी सामान फेटणे, सार, सुप बनवणे, पावभाजीची भाजी मॅश करणे येवढ्याच करता केला जातोय.
फुप्रो+मिक्सर मिळतो. तोच
फुप्रो+मिक्सर मिळतो. तोच घ्यावा. फुप्रोचे काही फायदे भयंकर चांगले आहेत, उदा. कांदे/टोमॅटो/सिमला मिरची/काकडी छान बारीक चिरले जातात. (ह्या भाज्यांना पाणी न सुटता चिरल्या जाण्याची टॅक्ट अनुभवाअंती समजते) पालेभाज्या एका झटक्यात बारीक चिरल्या जातात. गाजर, मुळा, कच्चं बीट, दुधी वगैरे छान किसले जातात.
मटार फुप्रोवर सोलू नयेत, सालं आणि दाणे वेगळे करताना मटार सोलण्याइतकाच वेळ जातो.
पूनम, मवा, ब्लेंडरसाठी टिप्स
पूनम, मवा, ब्लेंडरसाठी टिप्स काही नाहीत. चटणी अॅटॅचमेंट वगैरे घ्यायच्या भानगडीत पडू नका. मिक्सर असताना ती वापरली जात नाही आणि भांड्यांची अडगळ वाढते. गेली दहा वर्ष तरी मी Boss चा ब्लेंडर विनातक्रार वापरते आहे. त्याचा मुख्य उपयोग सायीचं ताक करणे, सूप्स - ज्यूस - लस्सी करणेसाठी भरपूर होतो.
मंजू, फुप्रो + मिक्सी साठी
मंजू, फुप्रो + मिक्सी साठी ब्रँड सांग ना.
तसेच फुप्रो चे झाकण
तसेच फुप्रो चे झाकण लावल्याखेरीज मिक्सर चालत नाही.>>>
अल्पना, माझ्याकडे जो फुप्रो आहे, त्याचं फुप्रोचं भांडं नसेल (धुवायला गेलं असेल) तर एक नॉब दिला आहे, तो लावला की मिक्सर चालतो.
माझ्याकडे जो आहे त्याचं नाव मला आठवत नाहिये
उद्या सांगितलं तर चालेल का? नाहीतर मला संपर्कातून तुझा नंबर पाठव, घरी गेल्यावर बघून फोन करते.
पालेभाज्या एका झटक्यात बारीक
पालेभाज्या एका झटक्यात बारीक चिरल्या जातात. >>>>>>> हे काही मला मनासारख जमत नाही फुप्रो मधे. काही टिप्स??
ह्या भाज्यांना पाणी न सुटता
ह्या भाज्यांना पाणी न सुटता चिरल्या जाण्याची टॅक्ट अनुभवाअंती समजते>>>> हे नक्की कस जमते ते सांगाल काय?? मी कांदा-टोमॅटो चिरुन घेतला तर त्याला पाणी सुटत...
ओके मंजूडी. . मी पाहीला त्यात
ओके मंजूडी. :). मी पाहीला त्यात एकच प्लॅस्टिकचे भांडे आणि एकच ब्लेड होते, तसाच घ्यावा का मग ?
मंजूडी, माझं आज फुप्रो
मंजूडी, माझं आज फुप्रो घ्यायला जाण कँसल झालंय, तू उद्या नाव लिहिलंस तरी चालेल.
मवा, हो चालेल. कारण ब्लेंडरची
मवा, हो चालेल. कारण ब्लेंडरची ब्लेडस् बदलणं वगैरे फारसं होत नाही. त्याचा मुख्य उपयोग लिक्विडायझर म्हणूनच होतो.
ओके धन्स गं.
ओके धन्स गं.
मला वेट ग्राइन्डर घ्यायचा आहे
मला वेट ग्राइन्डर घ्यायचा आहे पण कुथला घ्यावा ते कुणी सुचवेल का? मद्रासी लोक सान्गतात की वेट ग्राइन्डर नेहमी दगड असणारा चान्गला. आणी मह्त्वाचे म्हणजे यात अओली चट्णी वाटता येइल का ?
मला आता एका लॉटरीमध्ये
मला आता एका लॉटरीमध्ये पहिल्या क्रमांकाचा केनस्टारचा फु.प्रो मिळाला.चांगला आहे.ज्युसर अॅटेचमेंट्पण आहे,ते वापरले नाही.
माझ्याकडे पण बजाज फूप्रो+
माझ्याकडे पण बजाज फूप्रो+ मिक्सर आहे. ५ वर्षे झाली. मस्त चाललाय.
माझ्याकडे इथे आहे तसला हँड
माझ्याकडे इथे आहे तसला हँड ब्लेन्डर १५ वर्षे आहे . वाटली डाळ, भाज्या, कांदे, टॉमेटॉ चिरणे , दाण्याचं कूट या करता सगळ्यात डावी कडचं भांडं . यातच फिश किंवा श्रिंप पण मस्त ब्लेंड होतात, - याचा वापर आठवड्यात ३-४ वेळा होतो.
त्याला लागून जे इमर्शन ब्लेंडर आहे त्याने पालक, टोमेटो प्युरे, सूप ब्लेंड करणे , चक्का फेटणे, दही वड्याचं दही फेटणे इत्यादी .
त्या मोटरला लागलेल्या अॅटचमेंट केक्स, कप केक्स, मफिन्स साठी , अंडी फेटायला वगैरे. मोटर चांगली पावरफुल असली तरच याचा उपयोग होतो.
आडव्या पडलेल्या दोन अॅटचमेंट आहेत त्या मिल्क शेक वगैरे साठी असाव्यात. १५ वर्षात एकदाही वापरल्या गेल्या नाहीत
माझ्याकडचा २८० वॉट पावरचा आहे. आता असलं मॉडेल मिळत नाही, पण मॅक्स पावर, व हे सगळे अॅटचमेंट असतील तो हॅन्डमिक्सर घ्यावा.
http://www.braun.com/global/household/food-preparation/hand-mixers/multi...
मी crompton greeves चा
मी crompton greeves चा फुप्रो २ वर्शापासुन वापरते. त्याच बेल्त दर ३ महीन्यानी खराब होतोय. फार वाईट अनुभव आहे
पालेभाज्या एका झटक्यात बारीक
पालेभाज्या एका झटक्यात बारीक चिरल्या जातात. >>>>>>> हे काही मला मनासारख जमत नाही फुप्रो मधे. काही टिप्स??>>> मलापण हव्या या टिप्स.
तसेच फुप्रो चे झाकण लावल्याखेरीज मिक्सर चालत नाही.>>> पण रिपेअर करणारे, तो नॉब लॉक करुन देतात. मी घेतला आहे. नो प्रोब्लेम.
शेवटी एकदाचा घेतला मी फुप्रो.
शेवटी एकदाचा घेतला मी फुप्रो. बजाज चा घेतला. माझ्या डोक्यात मॉर्फी रिचर्डस चा किंवा महाराजा व्हाइटलाइअनचा घ्यायचा होतं. पण मला जवळपासच्या कोणत्याच दुकानात ही दोन्ही मॉडेल्स मिळाली नाहीत. शेवटी आज जरा लांबच्या मॉल्समध्ये आणि क्रोमा मध्ये जावून आले, तिथे पण या दोन्ही कंपन्यांच्चे फुप्रो दिसले नाहीत, मग शेवटी अजून थांबायला नको म्हणून बजाजचा घेवून आले. मोटर वर ५ वर्षांची आणि फुप्रोवर ३ वर्षांची गॅरंटी मिळाली.

मेधानी दिलेल्या लिंकमधल्यासारखे मॉडेल मला तिथे दिसले, अर्थात पॉवर कमी होती, कंपनी पण वेगळी होती. मला उगिचच ते पण घेवून यायची इच्छा झाली, पण स्वैपाकघरात जागा नसल्याने मी त्या इच्छेवर कसाबसा ताबा मिळवला.
आणि हो, मी मागे गावाला गेलेले असताना नवर्याकडून बोरीसिलची ४ मोठी भांडी फुटली होती. तर आज ३ बोरोसिलची भांडी पण घेवून आले. (क्रोकरीच्या दुकानात गेलं की आख्खं दुकानच उचलून आणावं वाटतं. पण मग ठेवणार कुठे हा नेहेमीचा प्रश्न समोर आल्याने आधीचे कॉफीचे मग आणि काचेचे ग्लास फुटल्याशिवाय नविन घ्यायचे नाही असं म्हणून तशीच बाहेर आले.
).
अल्पना, माझा केन्स्टारचा आहे.
अल्पना, माझा केन्स्टारचा आहे. आता काही उपयोग नाही म्हणा... पण तुझी ही पोस्ट पाहिल्यावर माझी ट्यूब पेटली.
फुटल्याशिवाय>> तुझे (उत्तर)
फुटल्याशिवाय>> तुझे (उत्तर) आहे तुजपाशी.

बजाजचा एफ एक्स १० घेतलास की ११? ११ मध्ये नारळ खवायची अटॅचमेंट आहे. तिचा तू रिपोर्ट दिलास की मी घेणार.
अगं एफ एक्स १० च घेतलाय.
अगं एफ एक्स १० च घेतलाय.
मंजू तू सांगितलेलंस मला केनस्टारचा आहे हे, पण इथे दिसला नाही कुठेच.
आशू,
माझी आशाकिरण होतीस तू
माझी आशाकिरण होतीस तू अल्पना..
फिलिप्सचा एकदम हाय रेंजमध्ये आहे. म्हणजे बाकीचे ४ ह तर हा ७ ह. कोणी वापरलाय? आहे का खरंच स्पेशल?
Pages