बदाम-मलाई कुल्फी विथ मँगो सॉस (फोटोसहित)

Submitted by लाजो on 4 March, 2010 - 22:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कुल्फी साठी:
१ टिन स्विटंड कंडेन्स्ड मिल्क - ३९५ग्रॅम टिन
१ टिन इव्हापोरेटेड मिल्क - ३७५ml टिन
३०० ml थिकन्ड (हेवी) क्रिम
१ कप बदाम चुरा
१ चमचा पीठीसाखर
केशर आणि वेलची पावडर आवडीनुसार

मँगो सॉसः
१ कप मँगो पल्प,
१ कप क्रिम
पिठी साखर चवीनुसार
थोडे केशर आणि वेलची पुड

सजावटीसाठी:
टोस्टेड बदाम
पिस्त्याचे तुकडे

क्रमवार पाककृती: 

IMG_1458.JPG

ही कुल्फी सोप्पी आणि झटपट होणारी आहे. पण तरीही तितकीच चविष्ट! Happy

- सर्वप्रथम फ्रिझर चे टेम्परेचर 'कोल्डेस्ट' वर सेट करावे.

कुल्फी बनवण्याची कृती:

- एका काचेच्या बोल मधे इव्हापोरेटेड मिल्क आणि कंडेंस्ड मिल्क एकत्र करावे.
- हँड ब्लेंडर स्टिक/हँड मिक्सर ने चांगले नीट घुसळुन घ्यावे. थोडे घट्टसर मिश्रण होईल.
- यात थोड्याश्या कोमट दुधात भिजवलले केशर आणि वेलचीची बारिक पुड घालावी.
- १ कप बदामाचा चुरा घालावा आणि नीट मिक्स करुन घ्यावे.
- दुसर्‍या मोठ्या काचेच्या बोल मधे क्रिम आणि १ चमचा साखर फेटुन घ्यावी. क्रिम चांगले डबल फुगले पाहिजे (फेटताना क्रिम फाटणार नाही याची काळजी घ्यावी)
- आता या ब्लेंड केलेल्या क्रिम मधे वरचे मिश्रण हळु हळु ओतावे. एकीकडे स्पॅट्युलाने हलके हलके मिक्स करावे.
- सगळे आता हलकेच नीट मिसळुन घ्यावे.
- ह्या बोल ला क्लिंग फिल्म लावुन फ्रिझर मधे ठेववा.
- साधारण दीड ते २ तासांनी मिश्रण बाहेर काढुन लाकडी चमच्याने फेटुन घ्यावे.
- मग हे मिश्रण कुल्फी मोल्ड किंवा लोफ टीन मधे ओतावे आणि फ्रीझ करावे.

मँगो सॉसः

- १ कप क्रीम पातेल्यात ओतुन मंद आचेवर गरम करायला ठेवावे.
- यातच केशर आणि वेलची पुड टाकावी.
- क्रिमवर थोडे बुडबुडे दिसायला लागले की गॅस बंद करावा. क्रिम गार होऊ द्यावे.
- गार झालेल्या क्रिम मधे मँगो पल्प आणि साखर घालुन हँड ब्लेंडर ने ब्लेंड करावे. सॉस तय्यार.
- सॉस डिस्पेन्सर बॉटल मधे भरुन हा सॉस गार करायला फ्रिज मधे ठेवावा.

सर्व्ह करताना:
पद्धत १: प्लेटमधे खाली मँगो सॉस पसरावा. त्यावर कुल्फी ठेवावी आणि वरतुन टोस्टेड बदाम्/पिस्ते पेरावे.

पद्धत २: कुल्फी मोल्ड मधुन काढुन प्लेट मधे ठेवावी. वरतुन टोस्टेड बदाम काप आणि पिस्ते पेरावे. शेजारी सॉस ची बाटली ठेवावी आणि हवा तेव्हढा सॉस घालुन कुल्फी मटकवावी.

IMG_1461.JPG

वाढणी/प्रमाण: 
एव्हढ्या मिश्रणात ६-८ लोकांना पुरेल इतकी कुल्फी होते. पण खरतर २-३ लोकच फस्त करतात :)
अधिक टिपा: 

१. कुल्फी मधे बदाम पुड घातली नाही तरी चालेल.
२. बदाम पुड च्या ऐवजी मँगो पल्प घातला तरी चालेल - मँगो कुल्फी करायची असेल तर.
३. मँगो सॉस नसला तरी काहिही हरकत नाही. नुसती कुल्फी पण झक्कास लागते.
४. वेळ असेल तर कुल्फी बनवायच्या आधी इव्हेपोरेटेड मिल्क एकदा उकळुन घ्यावे. मस्त खमंग टेस्ट येते कुल्फीला.
५. ही बेसिक रेसिपी आहे. तुम्हाला हवे तसे त्यात वेगवेगळे स्वाद घालता येतिल जसे रोज, स्ट्रॉबेरी इ. इ.
६. स्वादानुसार सॉस पण बदलता येतिल.
७. कंडेन्स्ड मिल्क, इव्हॅपोरेतेड मिल्क आणि क्रिम लो फॅट वापरुन बघु शकता. पण अस्सल मलई तेस्ट येइल की नाही माहित नाही.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव, मस्त आहे फोटो!
यातले काही व ईतर काही घटक पदार्थ वापरून मँगो आईसक्रीम पण मस्त होते.

माझे बावळट प्रश्ण - "क्लिंग - फिल्म" का काय ते.. म्हणजे काय? भारतात कुठे मिळेल? एव्हापरेटेड दूध = आटीव दूध? (१ ली. चे ४०० मिली करू का?) इथे भारतात अमूलचे थिक क्रिम मिळते.. सॉससाठी घेताना त्यात थोडेसे दुध घालून फेटू का? की घरची साय फ्रिझ करून फेटून घेऊ?)

(जेवण बनवणे म्हणजे "आनंदच आहे" असा प्रकार असल्याने विचारून घेतेय.. नाहीतर काही तरी भलतच व्हायचं आणि "चेहेर्‍यावरचे भाव" सोसायची वेळ यायची :()

सगळ्यांना परत एकदा धन्यवाद!

नानबा, कुल्फी बनवुन प्रतिसाद दिलास त्याबद्दल स्पेशल ठांकु Happy

जाईजुई, अग क्लिंग फिल्म म्हणजे प्लॅस्टिक रॅप गं Happy
इव्हॅपोरेटेड मिल्क नाही मिळाले तर दुध आटवुन केलेस तरी हरकत नाही.
अमुल चे थिकन्ड क्रिम चालेल.
सॉस साठी फेटलेली साय चालेल पण चोथा नको होऊ देऊस.

वह फोटू मस्तच आहे .. मी पण हि कुल्फी करते .. एकदम झकास होते .. पण एवढे कष्ट घेत नाही (अगदी खरा सांगू का खरच वेळ नसतो ग बायानो) .. सरळ condensed मिल्क , evaporated मिल्क आणि whipped creme सारक्या प्रमाणात घेवून .बाकी अगदीं असाच बदाम आणि केसर .. वेलची पूड घालून सरळ मिक्सर मध्येच टाकायचा सगळा .. मांगो कुल्फी करणार असाल तर मांगो पल्प घालायचा आणि condesned मिल्क १४ ओझ चा अर्धा दाबा टाकायचा .. छ्हान ५-१० वेळा सगळ्या सेत्तिंग वर फिरवायचा .. झाली कुल्फी तयार.. इथे कोणी तरी मागे पिस्त्यांचा काय करायचा विचारला होता न .. तर .. ते पिस्ते भिजवून साल जेवढा जमेल तेव्हढा काढायचा भिज्वायच्व्ह्या आधी .. मग थोडा पाणी घालून मिक्सर मध्ये काढून घ्याचा .. आणि बदाम सोडून सगळा टाकायचा छान ग्रीन कुल्फी होते ती पण छान लागते..

calorie म्हणत असाल तर.. मी सगळा fat फ्री आणते .. (म्हणजे जास्त क्यलरिएस) पण साखर तर असतेच म्हणून अर्धा डब्बा खूप गोड होत नाही आणि छान लागते.. आणि खरच तुम्ही जर जेवणाच्या आधी खाल्ली आणि मग अर्धे जेवण केले तर काही हि होणार नाही .. असा आयुर्वेद तरी सांगता.. आपण डेझर्ट नेहमी नंतर खातो आधी खाल्ली तर अजिबात अपायकारक नाही .. आणि जेवण पण कमी जाता.. मी आता हा प्रयत्न स्वतः करते .. वजन तर अजिबात वाढत नाही .. पोट वाढत नाही हे अजून तरी म्हणू शकत नाही ... साला त्याला काही उपाय नाही व्यायाम करण्याशिवाय..

कोणी तरी आपले खायची विड्याची पण असतात न ती आणि गुलकंद टाकून हि कुल्फी केलेले मी ऐकलेला आहे .. मी नेहमी विचार करते पण धाडस होत नाही..

ही सगळी मजा विकतच्या पदार्थांमध्ये कुठुन येणार?????? >>>>तुला मोदक ग साधना हवे तेव्हढे स्मित

आणि बिघडलाच असेल तरी पण दिसत ना लगेच चेहर्‍यावर डोळा मारा त्यांना असे विविध भाव व्यक्त करता यावेत म्हणुन पण करायच ग कधी मधी घरी फिदीफिदी>>> अगदी अगदी अनुमोदन

वेळ असेल तर कुल्फी बनवायच्या आधी इव्हेपोरेटेड मिल्क एकदा उकळुन घ्यावे. मस्त खमंग टेस्ट येते कुल्फीला>>
हे खरच मला हि करायचा आहे .. ती खमंग टेस्ट नक्कीच मिसिंग असते..

लाजो, परत एकदा धन्यवाद ही लिंक पाठवल्याबद्दल!

एक प्रश्न, मँगो पल्प कोल्स्/वुलवर्थ मध्ये मिळतो का की इंडीयन ग्रोसरी शॉप मध्येच? मध्यंतरी मी आम्रखंड करण्यासठी देसाई बंधु या ब्रँडचा इंडियन ग्रो मधुन आणला होता पण घराजवळ इं ग्रो नाहीये. (नाहीतर बदाम पिस्ता केशर कुल्फी करीन)

फोटू एकदम एकदम भारी...
आत्त्त्त्त्त्ता खावीशी वाट्टेय!! Happy

इथे लिहायचे राहिले, या आठवड्यात ही कुल्फी करुन पाहिली, खाल्ली Happy ऑस्स्म लागते. आता विकतचे आईसक्रीम घरी आणणे नक्की कमी होणार.
लाजो, थॅन्क्स गं Happy

काल केली ही कुल्फी. मी इवॅपोरेटेड मिल्क एवजी दुध आठवुन घातले. मस्त झालीय अगदी. पण बदाम साल न काढता मिक्सरमधुन काढल्यामुळे रंग वेगळा आलाय. आणी लेकाचे म्हणणे केशर जरा जास्त झाले. पण टेस्ट अगदीच छान Happy

एकदम भारी रेसिपी. लाजो, मी तुझी पंखा झाले.

आज सकाळीच केली कुल्फी. लेकीने पूर्ण सेट व्हायच्या आतच दोन वेळा खाल्ली सुद्धा.

Pages