बदाम-मलाई कुल्फी विथ मँगो सॉस (फोटोसहित)

Submitted by लाजो on 4 March, 2010 - 22:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कुल्फी साठी:
१ टिन स्विटंड कंडेन्स्ड मिल्क - ३९५ग्रॅम टिन
१ टिन इव्हापोरेटेड मिल्क - ३७५ml टिन
३०० ml थिकन्ड (हेवी) क्रिम
१ कप बदाम चुरा
१ चमचा पीठीसाखर
केशर आणि वेलची पावडर आवडीनुसार

मँगो सॉसः
१ कप मँगो पल्प,
१ कप क्रिम
पिठी साखर चवीनुसार
थोडे केशर आणि वेलची पुड

सजावटीसाठी:
टोस्टेड बदाम
पिस्त्याचे तुकडे

क्रमवार पाककृती: 

IMG_1458.JPG

ही कुल्फी सोप्पी आणि झटपट होणारी आहे. पण तरीही तितकीच चविष्ट! Happy

- सर्वप्रथम फ्रिझर चे टेम्परेचर 'कोल्डेस्ट' वर सेट करावे.

कुल्फी बनवण्याची कृती:

- एका काचेच्या बोल मधे इव्हापोरेटेड मिल्क आणि कंडेंस्ड मिल्क एकत्र करावे.
- हँड ब्लेंडर स्टिक/हँड मिक्सर ने चांगले नीट घुसळुन घ्यावे. थोडे घट्टसर मिश्रण होईल.
- यात थोड्याश्या कोमट दुधात भिजवलले केशर आणि वेलचीची बारिक पुड घालावी.
- १ कप बदामाचा चुरा घालावा आणि नीट मिक्स करुन घ्यावे.
- दुसर्‍या मोठ्या काचेच्या बोल मधे क्रिम आणि १ चमचा साखर फेटुन घ्यावी. क्रिम चांगले डबल फुगले पाहिजे (फेटताना क्रिम फाटणार नाही याची काळजी घ्यावी)
- आता या ब्लेंड केलेल्या क्रिम मधे वरचे मिश्रण हळु हळु ओतावे. एकीकडे स्पॅट्युलाने हलके हलके मिक्स करावे.
- सगळे आता हलकेच नीट मिसळुन घ्यावे.
- ह्या बोल ला क्लिंग फिल्म लावुन फ्रिझर मधे ठेववा.
- साधारण दीड ते २ तासांनी मिश्रण बाहेर काढुन लाकडी चमच्याने फेटुन घ्यावे.
- मग हे मिश्रण कुल्फी मोल्ड किंवा लोफ टीन मधे ओतावे आणि फ्रीझ करावे.

मँगो सॉसः

- १ कप क्रीम पातेल्यात ओतुन मंद आचेवर गरम करायला ठेवावे.
- यातच केशर आणि वेलची पुड टाकावी.
- क्रिमवर थोडे बुडबुडे दिसायला लागले की गॅस बंद करावा. क्रिम गार होऊ द्यावे.
- गार झालेल्या क्रिम मधे मँगो पल्प आणि साखर घालुन हँड ब्लेंडर ने ब्लेंड करावे. सॉस तय्यार.
- सॉस डिस्पेन्सर बॉटल मधे भरुन हा सॉस गार करायला फ्रिज मधे ठेवावा.

सर्व्ह करताना:
पद्धत १: प्लेटमधे खाली मँगो सॉस पसरावा. त्यावर कुल्फी ठेवावी आणि वरतुन टोस्टेड बदाम्/पिस्ते पेरावे.

पद्धत २: कुल्फी मोल्ड मधुन काढुन प्लेट मधे ठेवावी. वरतुन टोस्टेड बदाम काप आणि पिस्ते पेरावे. शेजारी सॉस ची बाटली ठेवावी आणि हवा तेव्हढा सॉस घालुन कुल्फी मटकवावी.

IMG_1461.JPG

वाढणी/प्रमाण: 
एव्हढ्या मिश्रणात ६-८ लोकांना पुरेल इतकी कुल्फी होते. पण खरतर २-३ लोकच फस्त करतात :)
अधिक टिपा: 

१. कुल्फी मधे बदाम पुड घातली नाही तरी चालेल.
२. बदाम पुड च्या ऐवजी मँगो पल्प घातला तरी चालेल - मँगो कुल्फी करायची असेल तर.
३. मँगो सॉस नसला तरी काहिही हरकत नाही. नुसती कुल्फी पण झक्कास लागते.
४. वेळ असेल तर कुल्फी बनवायच्या आधी इव्हेपोरेटेड मिल्क एकदा उकळुन घ्यावे. मस्त खमंग टेस्ट येते कुल्फीला.
५. ही बेसिक रेसिपी आहे. तुम्हाला हवे तसे त्यात वेगवेगळे स्वाद घालता येतिल जसे रोज, स्ट्रॉबेरी इ. इ.
६. स्वादानुसार सॉस पण बदलता येतिल.
७. कंडेन्स्ड मिल्क, इव्हॅपोरेतेड मिल्क आणि क्रिम लो फॅट वापरुन बघु शकता. पण अस्सल मलई तेस्ट येइल की नाही माहित नाही.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो कुल्फी मस्त दिसतेय. आणि कृति पण सोपी सुटसुटीत.

इव्हॅपोरेटेड मिल्क भारतात का मिळत नाही कुणास ठाऊक ? ज्यानि ते चाखलय त्याना त्याची चव विसरता येत नाही. त्याला पर्याय नाहीच. कुणी परदेशातून येणार असेल तर काहि टिन्स मागवावे, हाच पर्याय आहे.

मस्त दिसतेय कुल्फी. खूप कॅलरीज असल्याने बहुदा मी स्वतः अगदी थोडीच चाखेन पण पाहूण्यांना मात्र आवर्जून आग्रह करुन खाऊ घालेन. Happy

काय तों पा सु कुल्फी आहे! कृती पण फार कठीण नाही. नक्की करून बघेन. (कॅलर्‍यांचं तेवढं बघायला हवं. रुनीची आयडिया चांगली आहे! :P)

कसला जबरा फोटो आहे!!!!!!!!
ऑफिसमध्ये बसल्या बसल्या तोंडाला... (असो! ग्राफिक्स नकोत!)

फोटो प्रचंड टेम्प्टींग आहे,तो. पा. सु!
मी नक्कि करणार!! आमच्याकडे नवरा,मुलगी जबरी पंखे आहेत कुल्फिचे..

सगळ्यांना खुप खुप धन्यवाद Happy जरुर करुन बघा आणि इथे फोटो टाका Happy

सायो, रुनी, मृण्मयी आणि बाकी कॅलरी कॉन्शस लोक्स... टीप क्र. ७ प्रमाणे लो फॅट पदार्थ वापरुन कुल्फी करता येइल की. तेव्हढ्याच कॅलरीज कमी होतिल. आणि मँगो सॉस नाही खायचा किंवा अगदी एकच ठिपका घ्यायचा Happy बदाम तर चांगलेच असतात आरोग्याला Wink

नाहीतर साधना ने लिहील्याप्रमाणे बाकी काही खायचे नाही फक्त कुल्फीच जेवायची Happy

असे फोटो नाही टाकायचे लाजो Uhoh एकतर एवढी मस्त बनवलियेस आणि आम्हाला नुसता फोटो ?
इथे पाठवून द्यायची काहितरी व्यवस्था करा ना... बनवायला पेशन्स नको ? Happy

लाजोबेन्,घरी गेल्यावर करुन बघतोच आता Happy
अजुन रेसिपीज येऊ देत म्हणजे तुझ्या घरी आल्यावर माझी खादाडीची लिस्ट रेडीच असेल Proud

मस्त आहे कृती अन फोटो सुद्धा . लवकरच करून पहावी लागेल.
कुल्फी मोल्ड नसले तर साध्या वाट्या वापरुन पण करता येईल का ?

लाजो सुन्दर कुल्फी. तुमची चाट पार्टी झाली का?

साधना अनुमोदन.

मला वाट्ते करून ठेवावी व आपण दमून हपिसातून येतो व घरची कामे करतो ना, तो सर्व पसारा आट्पल्यावर दोन चमचे आरामात बसून खावी. अगदी अंतरात्मा त्रुप्त होइल. नंतर कुल्फी आहे या नादाने कामे आटोपतील लवकर.

केशर-पिस्ता/ बदाम, मिल्क मसाला हे फ्लेवरही घालता येतील हवे असल्यास. जस्ट टू एन्हान्स. डिजाइन मस्त जमले आहे.

आईग !!!!!!!!!!! कसली मस्त आहे ग कुल्फी ...
फोटो टाकायला बंदी करा हो अ‍ॅडमीन Wink Proud

परत एकदा धन्यवाद Happy

मेधा, कुल्फी मोल्ड्स माझ्याकडे पण नाहित. मी एक बॅच कुल्फी छोट्या पाणी प्यायच्या पेल्यांमधे सेट केली होती. आणि एक बॅच लोफ टिन मधे. टिन ला आधी क्लिन्ग फिल्म लावायची आणि मग मिश्रण ओतायचे. म्हणजे सेट झाल्यावर काढायला सोपे पडते. लहान मुलांसाठी मी छोट्या मफिन ट्रे मधे सेट केली होती. यात पण क्लिन्ग फिल्म चे तुकडे ठेऊन मग मिश्रण ओतायचे. वाट्या सुद्धा चालतिल. काढताना वाटी, थोड्या गरम पाण्यात क्षणभर धरायची की कुल्फी मोकळी व्हायला सोप पडत. तुझ्याकडे चौकोनी किंवा डिझाईन्च्या वाट्या असतिल तर छान दिसतिल छोटे मोल्ड्स.

ज्याना मोठा तुकडा खायचा नसेल त्यांनी आइस क्युब्ज च्या ट्रे मधे सेट करावी. एका तुकड्यात खुप कमी कॅलरीज जातिल आणि खल्ल्याचे पण समाधान Happy

मेधा! पॉप्सिकल बनवायचे stand असतात्,त्यात करुन बघ(वॉलमार्ट्,ग्रॉसरी स्टो. मधे मिळतील.)लाजोच्या टिप्स पण छान आहेत.

Pages