इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा
ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.
आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx
पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड
पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका
पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या
पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी
पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी
पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु
पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)
पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद
पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल
पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा
पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.
पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण
पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण
पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/
पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3
पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड
पान १९:
चर्चा - डोंबिवली, अॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय
पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस
पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर
पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी
पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने
पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल
पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी
पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0
पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,
पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा
पान ३०:
चर्चा - पांगार्याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले
वेल, माझ्याकडे झाडावरच्या
वेल, माझ्याकडे झाडावरच्या आंबा, फणस, काजू, सफरचंद, किवी, द्राक्ष, प्लम, आवळा, अंजीर, केळे, बेलफळ, कवठ, डाळिंब, जांभळे, करवंदे आदीचे फोटो आहेत बहुतेक.
बाकी कोणकोण काय देऊ शकेल बोला.
मला हे एक संयुक्त प्रोजेक्ट करायचे आहे. (हवा तर सगळ्यांचा मिळून एकच डु आय घेऊ !!)
दिनेशदा माझ्या शेतावर आता
दिनेशदा माझ्या शेतावर आता चिकू भरला आहे. त्याचा फोटो मी रविवारी देईन. माझ जांभळाच झाड देखील एप्रील मधे फूलेल हे दोन फोटो मी देईन.
हो गेल्या वर्शी भोकर देखील आल
हो गेल्या वर्शी भोकर देखील आल होता. तो फोटो मी टाकू शकतो.
हेहेहेहे.. दिनेशदा, माझ्याकडे
हेहेहेहे.. दिनेशदा, माझ्याकडे असलेली फळे तुम्ही आधीच घेतली.
सुरेख कल्पना दिनेशदा. मी
सुरेख कल्पना दिनेशदा. मी तय्यार.
मी जी इंपोर्टेड फळे हल्ली इथे मिळू लागली आहेत त्यांचे फोटो खास ब्रीच कँडीला जाऊन घेईन. राम्बुतान, रायआवळे, रासबेरीज, गोड चिंच, विविध प्रकारची सफरचंद, आता आंबे येतीलच त्याचे प्रकार, मँगोस्टीन वगैरे वगैरे. तिथे ही सगळी फळं मस्त आणि एकाजागी मिळतात.
मी पण मी फक्त फोटोच देऊ
मी पण
मी फक्त फोटोच देऊ शकतो. 
माझ्याकडेही चिकुच्या झाडाचे आहेत फोटो. अजुन बघुन सांगतो.
मामी, दिनेशदा ना झाडासकट
मामी, दिनेशदा ना झाडासकट फळांचा फोटो हवाय.
हात्तिचा ..... लै गडबड बिकेम.
हात्तिचा ..... लै गडबड बिकेम.
मग मी वाचायचं काम करीन - एकदम मन लावून.
दिनेशदा छान कल्पना.
दिनेशदा छान कल्पना.
माझ्याकडे संत्र, चिकु, काजू, फणस, अननस, सफरचंद, गुजबेरी हि फळे आहेत. सफरचंदाचा तर पुर्ण लगडलेल्या झाडाचा फोटो आहे. अजुन काही असेल ते आठवते / शोधते.
मामी, ती फळे वापरुन काहि
मामी, ती फळे वापरुन काहि पाककृति मिळाल्या तर त्या पण गोळा करु या. हि फळे महात्मा फूले मंडईत पण मिळतील (ब्रीच कँडीला लिची मेल्बा आईस्क्रीम मस्त मिळते.)
हा आहे कालचा फोटो मूळ रूपात
हि फूले इथे या दिवसात सगळीकडे दिसतात. पूर्ण उमलत नाहीत. पण यांचा रंग हा अशा भडक पोपटी असतो. अंधारातही हि फूले नीट दिसतात.
अगदी छोटे झुडुप असते. तीन चार फूट वाढते. नाव वगैरे माहित नाही. आपल्याकडे हि नाही दिसत पण कोकणात आता सगळीकडे हिरवी उक्षी ची फूले दिसू लागतील.
मस्त आयडीया दिनेश..
मस्त आयडीया दिनेश..
माझ्याकडे काय आहे माहित नाही... काही नसावे बहुतेक. पण गोळा करायला लागते आता.
दिनेशदा, भन्नाट फोटो आहे. खुप
दिनेशदा, भन्नाट फोटो आहे. खुप आवडला.
दिनेश प्रोजेक्ट्ची कल्पना
दिनेश प्रोजेक्ट्ची कल्पना मस्त आहे. कधी सुरु करताय? मला पण खारीचा वाटा उचलायला आवडेल. तसे माझ्याकडे देण्यासारखे कमीच आहे म्हणा!
या विकांतला करतो सुरवात. पण
या विकांतला करतो सुरवात. पण याचे श्रेय मी घेणार नाही, सगळ्यांच्या सहभागाने हे करायचे आहे.
समजा आपण सुरवात श्रीफळ, म्हणजे नारळाच्या झाडापासून केली, तर त्या संदर्भात सगळ्यांनी लिहायचे.
झाडाचा/फळाचा फोटो, त्यातली पोषणमूल्ये, लागवडीसंबंधी माहिती, झाडाबद्दलच्या आठवणी, पाककृति सगळेच लिहायचे.
आपण सगळ्यांनी एक रुपरेषा ठरवू, आणि त्या त्या विभागात ज्याला/जिला लिहिता येईल त्याने/तिने ते लिहायचे. मला वाटते. एका आठवड्याला एक फळ पूर्ण करता येईल.
दिनेशदा, तुम्ही आमचे गाईड.
दिनेशदा, तुम्ही आमचे गाईड. तुम्ही सांगा काय करायचे.
आपण सगळ्यांनी एक रुपरेषा
आपण सगळ्यांनी एक रुपरेषा ठरवू, आणि त्या त्या विभागात ज्याला/जिला लिहिता येईल त्याने/तिने ते लिहायचे. मला वाटते. एका आठवड्याला एक फळ पूर्ण करता येईल.
हे बरे पडेल. इथे ठरवायचे आठवड्याचे फळ कुठले ते. मग ज्यांना शक्य आहे ते लोक फोटो गोळा करतील, पाकृवाले पाकृ करुन त्याचे फोटो घेतील (:) ) व.व. एकुणच त्या फळाची शक्य तितकी माहिती गोळा होईल.
काही काही फळांबाबत खुप गैरसमज आहेत. मी एपिएम्सी मार्केटात गेले होते तेव्हा एकाने हे बघा ग्रेपफ्रूट म्हणुन पपनस उचलले. मी लगेच म्हटले की अहो हे तर पपनस.. तो म्हणाला, नाही, हे पपनस नाही, हे ग्रेपफ्रुट. तेवढ्यात अजुन एकजण आला आणि म्हणाला, आज ग्रेपफ्रूट आले नाहीत. हे पपनसच आहेत. आता ग्रेपफ्रुट कसे दिसते याबद्दल मला उत्सुकता निर्माण झालीय. कारण मी इतके दिवस पपनसाला इंग्रजीत ग्रेपफ्रुट म्हणतात असे समजत होते. पण तसे नसावे. बहुतेक मोसंब्याच्या आकाराचे पपनस म्हणजे ग्रेपफ्रुट आणि फुटबॉलपेक्षा जरा लहान ते पपनस असावेत.
बोलविता धनी कोण हे ओळखतील सगळे. 
पण याचे श्रेय मी घेणार नाही
तुम्ही तज्ज्ञ आहात हे अखखी मायबोली जाणते. फुकटचे श्रेय आम्ही लाटले तरी कोणी विश्वास ठेवणार नाही आमच्यावर
.....
.....
साधना ग्रेप फ्रुट चा फोटो
साधना ग्रेप फ्रुट चा फोटो काढुन टाकते चार पाच दिवसात. पण आत ते संत्र्यासारखेच दिसते, फक्त मोठे असते.
ग्रेपफ्रूट म्हणजे पपनसच.
ग्रेपफ्रूट म्हणजे पपनसच. म्हणजे मी अमेरि़केत जे ग्रेपफ्रूट म्हणून खाल्ले ते पपनसच होते. मला प्रचंड आवडते. पण सावंतवाडीसारखी पपनसं मुंबइला मिळत नाहीत. इकडे घेतलेली कायम कडूच निघतात.
सावंतवाडीसारखी पपनसं मुंबइला
सावंतवाडीसारखी पपनसं मुंबइला मिळत नाहीत
माधव तुम्हाला टोपली भरुन वाडीची पपनसं या वाक्याबद्दल....
(आधी ती टोपली माझ्या हाती लागुदे, माझे पोट भरले की मग वाटप सुरू करते.. रच्याकने, वाडीला तोरंजने म्हणतात पपनसांना)
मी गणपतीसाठी नेहमी पपनसे विकत घेते. पण ती अर्धीकच्चीच झाडावरुन काढलेली भयाण आंबट असतात.. आणि आंबट नसली तर नुसते पपनस म्हणुन खायची, गोडही नसतात.. कसलीच चव नसते. पण काय करणार???
पपनस आत गुलाबी असते ना? मी
पपनस आत गुलाबी असते ना? मी एकदाच बघितलय.
हो पपनस / तोरंजन आत गुलाबी
हो पपनस / तोरंजन आत गुलाबी असते. पाकळ्या मोठ्या असतात. ग्रेपफ्रूट पिवळे असते.
खरे तर हा वर्ग खुप मोठा आहे. आपल्याकडे पण या वर्गातली महाळुंग, ईडलिंबू हि फळे आता दुर्मिळ झालित. तामिळ लोक, आणखी एक प्रकारचे लिम्बू खातात. त्याची साल मिठ लावून सु़कवून दहिभाताबरोबर खातात (अशी सूकवलेली साल चेंबूरला मिळते). आमचे कूर्गी शेजारी, आणखी एक प्रकारचे फळ खात. मोसंबीसारखेच दिसत असे, पण ते गॅसवर अख्खेच भाजून त्याचा गर काढत आणि मग त्यात खोबरे मिर्ची वाटून, लावून कढी करत असत. मस्त चव यायची. पण ही दोन्ही फळे एकच का ते मला माहित नाही.
(No subject)
मामी, आता गुढीपाडवा कधी आहे.
मामी, आता गुढीपाडवा कधी आहे. त्या दिवशी पहिला लेख प्रसिद्ध करु या.
वरच्या रुपरेषेत आणखी काही मुद्दे हवेत का, ते सांगा सगळ्यांनी.
योगेश, धीर धर रे. ज्या आठवड्यात या फळांचा नंबर लागेल, त्या आठवड्यात दे हे फोटो.
साधना आंबट पपनस सोलून
साधना आंबट पपनस सोलून फ्रिजमध्ये ठेवा. खाताना ऐनवेळी त्यात साखर, मीठ आणि थोडी मिरपूड घाल आणि रस सुटायच्या आतच खाऊन टाका. मस्त लागते. गोड रसाळ पपनसाची सर त्याला नाहि येत पण तुका म्हणे त्यातल्या त्यात.
ज्या आठवड्यात या फळांचा नंबर
ज्या आठवड्यात या फळांचा नंबर लागेल, त्या आठवड्यात दे हे फोटो.>>>>>विसरलोच

पपनस आत गुलाबी असते ना? मी
पपनस आत गुलाबी असते ना? मी एकदाच बघितलय.
हो गुलाबी... पण गुलाबीची काहीतरी वेगळीच पाणीदार छटा असते. अतिशय सुंदर दिसते आतुन. त्याच्या त्या मोठ्या फोडी आणि आतला मोठ्ठा दाणा.... आहाहा... गोड रसदार पपनस मिळाले तर मी एकटीच खाईन अख्खे.. (तसे ते बेचवही मी खाते अख्खे
) सायट्रस वर्गातले हे एकमेव फळ आहे जे माझी लेक खाते. बाकी संत्रे मोसंबे व्.व. तिला अजिबात आवडत नाहीत.
माधव पुढच्या वेळी तुमची युक्ती वापरते.
अरे नुस्त्या झाडांच्याच गप्पा
अरे नुस्त्या झाडांच्याच गप्पा चालल्यात ? हा घ्या उतारा
दिनेशदा,भारी कल्पना आहे.
दिनेशदा,भारी कल्पना आहे. ह्यामुळे खूपच वेगवेगळी माहिती गोळा होईल.मी हा धागा सुरवातीपासून परत एकदा वाचला;तेव्हा तुम्ही पान नं ३ वर निळ्या गुलाबी फुलाचा फोटो दिला आहे;खूपच सुंदर फूल आहे. त्याचे नाव blue eyes fuchsia असे असावे. आणि फ्लॉवर्स ऑफ सह्याद्रीच्या मुखपॄष्ठावरचा फोटो जास्वंद कुळातलाच आहे.पण याचे नाव मदाम असे आहे abutilon persicum;आणि सोनघंटा म्हणजे abutilon ranadei.बहुधा खूप सूक्ष्म फरक असावा.धारिष्ट्या बद्दल क्षमा करावी.आणि तुम्ही आज जो फोटो टाकलाय त्या फुलांचे नाव-गाव सांगाना.उत्सुकता खूप वाढलीये.
शांकली, सगळ्यांकडून माहिती
शांकली, सगळ्यांकडून माहिती हवीच आहे.
इथे नैरोबीमधे खूप वेगवेगळी फूले आणि झाडे दिसतात. आपल्याकडे मी कधी बघितली नाहीत हि. नावाचे संदर्भ शोधतोय. एखादे पुस्तक वगैरे मिळतेय का ते बघतोय.
Pages