निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभा, छान माहिती.
मला पिकलेले बेलफळ खायला आवडते, पण आपल्याकडे ते मोठे मिळतच नाही. बिनिवालेनी लोकसत्तामधे लिहिले आहे कि, पूर्वेकडील राज्यात न्याहारीसाठी बेलफळ खातात.
मला वाटतय, कि ते दोन्ही फोटो बहुतेक मीच काढलेले आहेत. मायबोलीवर झळकले होते असे वाटतय.
पण माहिती नवीन आहे.

झाडांना जखमा झाल्यास त्यातून राळ / डिंक स्त्रवतो. तो झाडांचा डिफेन्स असतो. लाडूचा डींक, रबर, मेपल सिरप हे सगळे असेच जखमा करुन मिळवले जातात. अर्थात त्यांने झाडांना फार धोका नसतो. ताडी / माडी सारखे प्रकार काढल्यास मात्र त्या झाडाला फलधारणा होत नाही. अर्थात म्हणून आपण जखमा करायच्या, हे कधीच योग्य नाही.

काही पक्षी मात्र मुद्दाम काही झाडांना जखमा करतात आणि त्यावर आपले घरटे बांधतात. त्या जखमांतून स्त्रवणार्‍या डिंकामूळे साप झाडावर चढू शकत नाही, आणि त्यांच्या घरट्याचे संरक्षण होते.

शोभा,दिनेशदा,
बेलाच्या झाडाबद्दल छान माहिती (आता) मिळाली !
Happy

लहानपणी पाहिलेलं एक मोठ्ठ झाड शेताच्या बांधावर फळांनी भरलेले पाहिलय,ही पिकलेली फळ फोडुन डिंकासारखा वापर ह्यायचा ...
पण नंतर एकही झाड कस उगवून आलं नाही ?
ही झाड जमिनीवर्,माणसांवर रागावली तर नसतील ना ?

Angry

अनिल पुण्याला असतोस ना ? तो फळाचा फोटो मी डेक्कनला, कामत च्या मागे जे हॉटेल आहे, त्याच्या रुममधून काढला होता. ते तरी तिथे असावे अजून हि अपेक्षा !

हो तिवराचेच. तिथल्या जलाशयाच्या (?) काठावर आहे ते.
पण तिवराचे जंगल म्हणतात, तो ग्रूप वेगळा. त्या सगळ्या झाडांना मिळून तिवरांची झाडे म्हणतात. मानखुर्द हून वाशीला जाताना, रेल्वेलाईनच्या आजूबाजूला दिसतात ती. किंवा इष्टर्न एक्स्प्रेस हायवेवरुन विक्रोळीच्या आजूबाजूला दिसतात ती झाडे. वांद्रा भागात पण आहेत हि झाडे. त्यात पण काही खास झाडे असतात.

साधना हे तिवराचे झाड डोंबिवलिला आहे. मी सकाळी ७.३० वाजता गेलॉ तो पर्यंत सगळी फूले गळून गेली होती.
हे आफ्रीकन ट्यूलीप. हे झाड देखील खूप सुंदर दिसते. याला मराठी नाव माहीत नाही. हिंदीत याला रगतूरा म्हणतात.
rsz_rsz_1african_tulip.jpg

दिनेशदा, कळ्यांना मस्तपैकी पक्ष्यांचा आकार (डोळे-बिळे काढून हं) देऊन आम्हाला चकवता काय? Happy
या कळ्या गळून पडतात का? नेहेमीच्या पहाण्यातल्या आहेत का? खूप छोट्या असतात का? त्यांच्याखाली जे पापुद्रे आहेत ते खुप ओळखीचे वाटतायत पण लक्षात येत नाहीये. लिलीवर्गातल्या असाव्यात...

दिनेशदा म्हणताहेत्,ती वाशीहून ट्रेनने जाताना पुलाच्या आजूबाजूस दिसतात ती खाडीतील तिवरे... आगरी भाषेत ह्या झाडास ''खोटी'' चे झाड असे म्हणतात. मी लहान असताना प्रत्येक घरात खोटीची तोडून आणलेली झाडे असायची,सरपण म्हणून वापरायला. आता तिवरांचे जंगल तोडण्यावर बंदी आहे.

हे आफ्रीकन ट्यूलीप. हे झाड देखील खूप सुंदर दिसते. याला मराठी नाव माहीत नाही. हिंदीत याला रगतूरा म्हणतात.>>>>>>याचे झाड आमच्या ऑफिसजवळ आहे. सध्या मस्तपैकी बहरलंय, पण सगळी फुले खुप उंचावर आहे. झूम लेन्स घेऊन फोटो काढायचा विचार आहे पण बाजुलाच सेक्युरीटीचे ऑफिस आहे :(, त्या भागात फोटोग्राफि (बहुतेक) अलाउड नाहीये. Sad

काल खिडकाळेश्वर ला जाताना रस्त्यात फुललेल्या ह्या काटेसावरी टिपल्याहेत.

सर्व दिशांना ह्या लालेलाल काटेसावरी लगेच लक्ष वेधून घेत होत्या.

From Drop Box

सावरीच्या या कळ्यांना लहानपणी खराट्या ची काडी घुसवून भोवरा बनवाय चो ते आठवलं.. Happy

फूल.

तो रहस्यभेद आता रात्रीच करीन !!!
मामी, आपल्याकडे नाही बहुतेक हे झाड. असाच भडक पोपटी रंग असतो त्याचा.

डॉ त्या तिवरात एक ब्लांइंडीग ट्री पण असते. डोळ्यांसाठी वाईट असते ते. पण सरपण म्हणून छान.

विजय मराठीत त्याला पचोडीया असा शब्द आहे. तो स्पॅथोडीया चा अपभ्रंश आहे. आमच्याकडे पण भरभरुन फूलले आहे ते झाड आता. त्याच्या कळ्या पाणीदार असतात आणि त्यातून कारंजे उडवता येते तसेच त्याला युगाण्डा फ्लेम ट्री असा पण शब्द आहे.

या कूळातलाच वारस नावाचा एक वृक्ष आपल्याकडे असतो. गुच्छाने फूले, संयुक्त पाने आणि तलवारीसारख्या शेंगा हि या कूळाची खासियत. या वारसाला पण मस्त गुलाबी फूले येतात.
http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/93440.html

या लिंकवर वारसाच्या फूलाचा फोटो आहे.

स्पॅथेडीया आता भरभरुन फुलला आहे सगळीकडे. जिप्य्सा माझ्याकडे ये. इकडे हवा तितका आहे. झाडांची माथी भगवी झालीत अगदी. Happy हे झाड बहुतेक बाहेरुन आलेय आपल्याकडे त्यामुळे अगदी शास्त्रसंमत मराठी नाव नसावे, ज्याला जे नाव योग्य वाटले त्याने ते दिले Happy

दिनेश वरचे barringtonia acutangula ज्याला आपण तिवर म्हणतो त्याचे खरे नाव निवर आहे/असावे. मी आसमंतमध्ये निवर असाच उल्लेख वाचलेला. गो ग्रिन नर्सरीत याचे रोपटे होते. त्यावरही निवर/barringtonia acutangula असाच उल्लेख होता. अर्थात मला रोपटे ओळखता आलेच नसते, पण barringtonia लक्षात होते त्यामुळे ओळखले. हे झाड गावी लावायची खुप इच्छा आहे मला. फुललेले झाड काय सुंदर दिसते... अगदी मोहक, जमिनीकडे झुकलेले लांब गुलाबी झोके अतिशय सुंदर दिसतात...

आणि तिवर म्हणजे खाडीच्या बाजुचे मदतनीस. इंग्रजीत mangrove.

निवराचा बरेच ठिकाणी तिवर असा उल्लेख मी वाचलाय. पण मला तरी वाटत नाही की प्रचंड फरक असलेल्या दोन फॅमिलीतल्या झाडांची नावे एकच असतील. बहुतेक नामसाधर्म्यामुळे आपण निवराचे तिवर केलेय.... Happy तिवरांना मात्र तिवर म्हणुनच ओळखतो, नाहीतर खारफुटी.

मागे कोणीतरी पोपटासारखी दिसणारी इंडोनेशियन फुले मेलमधुन पाठवलेली. तुमच्या फोटोतल्या कळ्या त्याच्या तर नाहीत ना????

लहानपणि माझ्या गावी थेट बदकांसारखी दिसणारी रानटी फुले खुप असायची. झाडाला तुरा यायला आणि त्याच्या दोन्ही बाजुला पोहत असलेले बदक जसे दिसेल तशा कळ्या यायच्या, फुलल्यावर अगदी बदके दिसायची. साधारण गुलाबी, पांढरा, कोनफळी या दोनतीन रंगातले बारीक पट्टे असायचे फुलावर. फुलाचा उभा आकार साधारण अर्धा सेमी, आडवा एक-सवा सेमी असे असायचे. हल्ली दिसत नाहीत ही फुले. Sad

साधना अग आमच्याकडे पण दिसतात स्पॅथेडीया. मी ऑफिसला येताना मला रोज फुललेली काटेसावर, पारिंगा दिसतो. खुप छान वाटत.

गेल्या आठवड्यात अलिबागला गेले होते. रस्त्यावर दोन ठिकाणी तरी मला फुललेला पळस दिसला. याआधी मला तुझा पारिंगा म्हणजे आमचा पंगेरा आणि पळस यातला फरक कळायचाच नाही. पण निसर्गाच्या गप्पा मारमारुन नजर तयार झाली आता Happy केशरी पळस सुंदरच होता. फक्त माझ्याकडे कॅमेरा नव्हता त्यामुळे फोटो घेता आले नाहीत Sad

हल्ली दुकानामुळे बाकी सगळ्या अ‍ॅक्टीविटीज बंद झाल्यात. खारघरच्या रस्त्यावर रॉयल ग्रँडिफ्लोरा फुललेत, पारसिक हिलवर ढिगानी वाघुळफुलांची झाडे आहेत हा शोध गेल्या आठवड्यात झाडे फुलांवर आली तेव्हा लागला, इतके दिवस ही फालतु कसलीही फुले न येणारी झाडे सरकार का लावते असे प्रश्न स्वतःला विचारत होते, रिलायंस धाकट्या पातीच्या ऑफिसकडे पिवळा ट्यबेबुला फुललाय, त्याच्या विरुद्ध बाजुच्या गणपतराव कदम नर्सरीत फुललेली ऑर्किड्स रोज पाहते...... इतके सगळे फुलुन वाट पाहताहेत आणि आम्ही मात्र तिकडे न पाहता कामात गुंतलोय... श्या.. आता एके दिवशी कॅमेरा घेऊन बाहेर पडायलाच हवे.

ती बदकाची फूले मला वसईला दिसली होती. मी मागच्या पानावर जी लिंक दिलीय तिथे आहे त्याचा फोटो.
ते थाई झाड, आपल्या कांचनाच्या कूळातले !

साधना या विकेंडला फोटो काढच. आपण उगाचच हळहळतोय, झाडे नाहीत म्हणून !

आपण उगाचच हळहळतोय, झाडे नाहीत म्हणून

आहेत, झाडे भरपुर आहेत. मानवाने त्यांचा नाश करायचा इरादा पक्का केलाय तरी त्यांना जिथुन जशी जागा मिळते तशी ती उगवत राहतात, फुलत राहतात, पुढची पिढी तयार करत राहतात. मुंबईत धुळीने भरलेली झाडे बघवत नाहीत (खरे तर फोटो काढायची इच्छाच होत नाही धुळ बघितल्यावर, पावसाळ्यात जरा बरे असते, पण तेव्हा पुरेसा प्रकाश नसतो) पण झाडांना फरक पडत नाही. त्यांचे निसर्गचक्र फिरतच असते.

क्स्टर्ड अ‍ॅपल म्हणजे सिताफळ असं मला वाटतय. ते पिकल्यावर लाल कसं होईल!

अगं ते रामफळ असेल.. Happy रामफळ पिकल्यावर बाहेरुन लाल होते. इंग्रजीत दोघांनाही कस्टर्ड अ‍ॅपल म्हणत असतील कारण दोघांचाही आतला पिकलेला गर अगदी कस्टर्डसारखा गिचगिचीत आणि रवाळ असतो. पण मला मात्र आवडतात हा दोन्ही Happy

दिनेश तुमचे रंगिबेरंगी मी कधीही कंटाळा आला की वाचायला घेते... मग किती वेळ गेला ते कळतही नाही. तरी अजुन बरेच वाचायचे आहे. सुरवातीचे वाचले नाहीय. झाडांपासुन सुरवात करते, आधीचे नंतर वाचु असे म्हणते पण झाडे वाचतानाच एवढी गढुन जाते की शेवटी घरचे उठवतात काँपवरुन Happy

साधना, त्या काळात भारावल्यासारखे लिहित होतो मी.

कष्टर्ड अ‍ॅपल म्हणून आणखीन एक फळ असते. सिताफळासारखेच, पण वरुन गुळगुळीत असते. मुंबईत पण असते विकायला. महाशिवरात्रीच्या दरम्यान आपल्याकडे रामफळे येतात ना ? ते मात्र कुठे परदेशी बघितले नाही.

जागूकडच्या मोरा बंदराच्या आसपास त्याची बरीच झाडे आहेत.

अशीच धूळ, गोव्यातल्या खाणींच्या परिसरातील झाडांवर पसरलीय. मुंबईतलू धुळ बरी, कारण ती सुपीक असते, पण तिथली लाल माती, खोल खाणीतली असल्याने झाडाला अपायकारक असते. तामडी सूर्ला कडे जाताना, रस्त्यात नूसता थर असतो या मातीचा.

काल फळे घ्यायला एपिएम्सीत गेले होते. तिथे होती रामफळे बरीच.. आता पुढच्या वेळेला फळांचे फोटो घेत जाईन. अशी ढिगानी फळे बाहेर दिसत नाहीत.

(पण तिथला क्राऊड बेकार आहे ..... )

मी मागे फलेषु सर्वदा, नावाचा लेख लिहिला होता. आता एकेक फळ घेऊन त्यावर लेख लिहायचा असा प्लान आहे. शक्यतो झाडावरच्या फळाचा (झाडासकट) फोटो मिळाला, तर लिहिन.
फळाचे झाड कसे असते, फळाचे गुणधर्म, मग ते फळ वापरुन केलेला एखादा पदार्थ असे करायचे. पण मला वाटते हि मालिका सगळ्यांनी मिळून करुया.
असे कधी झाले नाही मायबोलीवर. करु या का ? ज्याच्याकडे जे असेल ते त्याने द्यायचे. कुणाकडे फोटो असेल, तर कुणाकडे रेसिपी.

अरे माझ्या घरी भरपुर आली ह्यावर्षी रामफळ. कालच फोटो काढता काढता राहीले.

Pages