Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<< दुर्दैवानं मला साधे
<< दुर्दैवानं मला साधे खरचटलेही नाही. >>
निळूभौ, आमच्या ऑफिसमध्ये सेम केसमध्ये एक माणूस शहीद झालावता. गळा कापला गेला.
चिंगुडी... टेडी बेअर.....
चिंगुडी... टेडी बेअर.....
अरे हा वेंधळेपणात येतो अंदाजच नव्हता......
मी सकाळच्या ऑफिसला जायच्या घाईत अजूनही कितीतरी वेळा चूकून आरश्यासमोर उभा राहून नमस्कार करतो आणि लक्षात येतं अरे, समोर आपणच आहोत......
(एकदम देव आनंद झाल्यासारकं वाटत..
)
देवाला नमस्कार आणि बाकीची तयारी यात गल्लत झाली की देव्हार्यासमोरची कृती आरश्यासमोरच होते.......
१८ कोटी मधे आणखी एका टेडी
१८ कोटी मधे आणखी एका टेडी बीअरची भर
१८ कोटी मधे आणखी एका टेडी
१८ कोटी मधे आणखी एका टेडी बीअरची भर >> आणि भुंग्याची पण.
भुंग्याभाऊ देव आनंद नाही नाना
भुंग्याभाऊ देव आनंद नाही नाना पाटेकर झाल्यासारखं वाटु द्या!!!
ब्लफमास्टर मधला नाना!!!
काल म्ह्या शीट बेसीस रीक्सा
काल म्ह्या शीट बेसीस रीक्सा मधुन एकी कड निघालो, त्यात म्हा आधी आणी ३ जण व्हते, म्हाया ईस्टॉप आले वर म्ह्या ऊतरलो अन दा रुपयाची नोट रीक्सा वाल्याला दिली तर तो म्हणाला "५ सुट्ट द्या, दहा नग" आता म्हाया बरुबर माझ्या आधी बसलेल्या ३ पैकी २ माणस पण ऊतरलीत अन त्यांई सुदीक १० ची नोट पुढ केली कि, ती रीक्स्स वाल्याने गुमान घेतली न खीशात टाकली!!! ती माणस तडक निघुन बी गेली
म्ह्या बघतच राहिलो नि "त्यांच्या कडुन १० ची नोट घेतली आणी माझी घेणार नाही म्हणता" अस म्हणत फॉर्मात रागात ५ च नाण रीक्सा वाल्याला देऊन पुढ निघालो तर तो वरडला "ठीक आहे मंग तुम्ही बी १० रुपये द्या" तोवर माझी ट्युब बी पेटली व्हती मंग काय फिदी-फिदी निघालो गुमान 
नव्या घरात सामान हलवण सुरु
नव्या घरात सामान हलवण सुरु आहे, सध्या ते नव्या घराच्या एकाच खोलीत जमा करतेय. परवा नव्या घरी गेलेले तीथे बाथरुम च्या बाहेर बाथरुम स्वच्छ करायला लागणार्या हार्पीक वै. वस्तु ठेवल्या.
छोट रीफील बर्नर सीलेंडर पण नेऊन ठेवलय घरात (गॅस कनेकशन मीळत नाही तोवर घरी गेल की मॅगी वै करायच्या कामी येईल म्हणुन) मग मस्त फुडल्स केले त्याच भांड्यात खाल्ले आणी ते भांड धुण्यासाठी म्हणुन Vim Dish Liquid ची बॉटल आणायला सामान जमा केलेल्या खोलीत गेले आनी Vim समजुन बाथरुम बाहेर ठेवलेल "हार्पीक" घेऊन भांड धुवायला बसले तर!!!!!!!!!
"हार्पीक" आया भागो ...
"हार्पीक" आया भागो ...
रिक्शामे मै बैठी... और
रिक्शामे मै बैठी... और बोली... "दादा.. सेनादत्त चोलिस पोकी चला!!"
माझी ताई एकदा म्हणाली होती.. "पोली गेट पेरु स्टेशन" (पेरु गेट पोलीस स्टेशन ):हहगलो:
सकाळी झोपेतच ब्रश करायला गेलो
सकाळी झोपेतच ब्रश करायला गेलो आणि गडबडीत ब्रशवर शेव्हिंग क्रीम घेतले. पण वास वेगळा आला नाहीतर जिभेचीच दाढी करायला लागली असती????
रिक्शामे मै बैठी... और
रिक्शामे मै बैठी... और बोली... "दादा.. सेनादत्त चोलिस पोकी चला!!" माझी ताई एकदा म्हणाली होती.. "पोली गेट पेरु स्टेशन" (पेरु गेट पोलीस स्टेशन )
>>>>

सगळा आमचा ईंजिनिअरिंगचा ग्रूप एकदा एका मैत्रीणीच्या घरी गेलो होत...... हुल्लडबाजी करून घरी जाताना रितसर त्या मैत्रीणीच्या आजी, आई, बाबा यांना टाटा करत होतो....
अतिउत्साहात एक मैत्रीण त्या मैत्रीणीच्या आईला (ज्यांना आम्ही काकू म्हणतो) जोरात ओरडून म्हणाली


"काका टाटू"
तेच पुढे त्या मैत्रीणीचं टोपण नाव ठरले......
कधी कधी काम करत असताना
कधी कधी काम करत असताना लॅप्टॉप स्क्रिन वर माशी बसलेली असली तर तीला माउस च्या बाणाने उडवायचा प्रयत्न केला आहे आणी का ऊडुन जात नाहीए म्हणुन वैतागलो पण आहे.
इतकं मस्त वाटतंय ना... सगळ्या
इतकं मस्त वाटतंय ना... सगळ्या पोस्टींची प्रिंट काढून घरी नेणारेय... नवर्याला दाखवायला... माझ्या कॅटेगरीचे कित्ती लोकं आहेत ते!!!
माझी रासच मीन त्यामुळे वेंधळेपणा बावळटपणाकडेच झुकणारा!
माबो स्टाईल टायपिंग, मेल विदाऊट अॅटॅचमेंट हे तर नेहमीचे किस्से!!
स्वयंपाकखोली तर माझे वेंधळेपणाचे आगर आहे. एकदा कढईत पापड तळायला तेलाच्या बाटलीतून तेल काढलं, थोडं गरम झाल्यावर वाटलं जास्त आहे... मग पुन्हा तेच तेल तेलाच्या प्लास्टीकच्या बाट्लीत परत ओतलं!!
नवर्याने त्याच संध्याकाळी तेलाची मोठ्ठी किटली, बुधला आणि ५ लिटरचा कॅन आणला... एवढेच करून न थांबता, किटलीत नी बुधल्यात स्वत: तेल भरलं! बरेच दिवस तोच करायचा हे काम!
हॉस्टेलला दाराच्या हँडलला कुलूप लावून चावी शेजारी देऊन गेलेले, कडी तशीच!
ताजा ताजा किस्सा!! नेहमी इयरफोनचं छोटूलं पांढरं कव्ह्रर इकडे तिकडे पडतं आणि मी आमच्या ऑफीसातल्या केर काढणार्या बाईला ते शोधायला लावते. आजही असंच हरवलं पण ते खूप शोधूनही मिळालं नाही... आता एका कलिगने विचारलं कानात काय घातलंयस? कॉटन? थंडी वाज्तेय? तेव्हा समजलं सकाळपासून ते कव्हर कानातच अडकून राहीलेलं
रस्ता विसरणं तर नेहमीचंच! एकदा माझ्या मैत्रीणीने मला माझ्या बर्थडेला विश करायला फोन केलेला. थोडं इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर मी तिलाच विचारलं मग काग आजचा प्रोग्रॅम तुझा वाढदिवसाबद्दल! ती आवाक!
सर्वांहून कडी म्हणजे एखाद्या व्यक्तीशी बोलताना त्याच्यासमोर त्याच्याबद्दलच शिव्या द्यायच्या आपण त्याचाविषयी त्याच्याशीच बोलतोय हे विसरून!
माझी रासच मीन त्यामुळे
माझी रासच मीन त्यामुळे वेंधळेपणा बावळटपणाकडेच झुकणारा!
>>>
सेम पिंच.....
वाढदिवसाचं भारीच
आणि तोंडावर शिव्या घालतेस
काय ते करेज.... 
सर्वांहून कडी म्हणजे एखाद्या
सर्वांहून कडी म्हणजे एखाद्या व्यक्तीशी बोलताना त्याच्यासमोर त्याच्याबद्दलच शिव्या द्यायच्या आपण त्याचाविषयी त्याच्याशीच बोलतोय हे विसरून! >>> हे अल्टिमेट आहे.
सर्वांहून कडी म्हणजे एखाद्या
सर्वांहून कडी म्हणजे एखाद्या व्यक्तीशी बोलताना त्याच्यासमोर त्याच्याबद्दलच शिव्या द्यायच्या आपण त्याचाविषयी त्याच्याशीच बोलतोय हे विसरून! >>>
माझ्या आजीने केलं होतं असं, पण वय झाल्यामुळे वाढलेल्या विस्मरणामुळे घडलं होतं ते.
आजीचं माझ्या काकूआजीबरोबर भांडण झालं होतं. नंतर आजीने गावी जाणं कमीच केलं. एकदा खूप खूप वर्षांनी गेली होती. विस्मरण वाढलेलं. तेव्हा खळ्यात बसून काकूआजीशी (तिच्याबद्दलच) बोलताना, "तुम्हाला म्हणून सांगते, ती फार जहांबाज आहे हो!!" म्हणून जे सुरू केलन...इस्टेट, जमीन...सगळं सांगून झालं. शेवटी म्हणते, "बोलू नका हो कुठे..मी आपलं असंच बोलले तुम्हाला. तसा माझा मुलगा खूप चांगलाय हो! आणि सूनपण चांगली आहे. काऽऽऽही कमी नाही आता..."
काकूआजीच्या सुनांची हसून हसून मुरकुंडी वळली होती!
एकापेक्षा एक वेप वाचुन मजा
एकापेक्षा एक वेप वाचुन मजा आली ...

>> काकूआजीच्या सुनांची हसून
>> काकूआजीच्या सुनांची हसून हसून मुरकुंडी वळली होती!
>>
त्या सुनांनी आज्जीला धन्यवाद वगैरे म्हटले नाही का?
कधी कधी काम करत असताना
कधी कधी काम करत असताना लॅप्टॉप स्क्रिन वर माशी बसलेली असली तर तीला माउस च्या बाणाने उडवायचा प्रयत्न केला आहे आणी का ऊडुन जात नाहीए म्हणुन वैतागलो पण आहे.
आनि वर लॅपटॉप नि डेस्कटॉप वायरयचा नेहमीच घोळ होतो. माउस पॅड वर बोटाने गिरवत, स्क्रीनवरचा माऊस का हालत नाही म्हणुन नेहमीच वैतागतो..
मग नंतर लक्षात येते की आपण डेस्क्टॉप वापरतोय, त्याला टच माउस नाहीय.
माझंही होतं असं नेहमी..
मल्ली ... लेका लकी आहेस बारीक
मल्ली ... लेका लकी आहेस बारीक आहेस ते ...
मी अशाच पद्धतीने एक आईस्क्रीम शॉपचा दरवाजा फोडला होता ...
दुर्दैवानं मला साधे खरचटलेही नाही. दरवाजा पूर्ण शहीद झाला.
तु धडकलायस म्हंजे शहीदच होनार ना... अजुन काय अपेक्शीत होतं..
लॅप्टॉप स्क्रिन वर माशी
लॅप्टॉप स्क्रिन वर माशी बसलेली असली तर तीला माउस च्या बाणाने उडवायचा प्रयत्न केला आहे आणी का ऊडुन जात नाहीए म्हणुन वैतागलो पण आहे.>>>> पल्ली च्या फ्रॉकच्या किस्यानंतरचा परफेक्ट किस्सा :हहपुवा:
माझा वेंधळेपणा... टॅक्सीत
माझा वेंधळेपणा...
टॅक्सीत बसून ड्रायव्हर ला म्हंटले "घर चलो" (हे विसरून कि ती टॅक्सी आहे, माझी कार नाही)..त्याने पण तितक्याच शांतपणे विचारलं "किसके घर जाना चाहेंगी मॅडम, आपके या मेरे घर?"
(No subject)
कालचा अफलातून किस्सा: आरेत
कालचा अफलातून किस्सा:
आरेत फिरायला गेलो होतो संध्याकाळी. आरे मार्केटच्या स्टॉपवर नेहमीच्या हॉटेलात चहा प्यायला घुसलो. बरोबर मित्र होते. मी फोनवर बोलत होतो. सगळे खुर्च्या घेऊन बसले. मी रस्त्याकडे बघत बोलत उभा होतो. एक व्हाईट कलर फॉर्च्युनर समोर पार्क झाली. मी तसाच बोलत मित्रांकडे तोंड करून बोलत बोलत आत गेलो. खुर्च्या सगळ्या आधीच पटकावलेल्या. थोडा वेळ बोलून मोबाईल खिशात ठेवला आणि बाजुच्या टेबलवरची खुर्ची खेचली. समोरच्या मित्राची प्रतिक्रिया पाहून लक्षात आलं की काहीतरी मेजर झोल झालाय.
मागे वळून बघतो तर एक पंजाबी युवती ऑलमोस्ट आपल्या गुढग्यात वाकलेल्या अवस्थेत वाकली होती, पडलीच होती... आणि एका सहा फुटी सरदारने तिचा खांदा धरून तिला सावरली होती.
"अबे ओये *****, औरत को देख नही सकता??? " सरदार माझ्यावर बरसला.. सगळा प्रकार बघणार्या मित्रांना हसू का रडू असं झालेलं......... मला तर रिअॅक्शन देणं शक्यच नव्हते...... मुळात काही सेकंदं लागली नक्की काय झालय ते कळायला. आता ह्या सांडाचा एक हात जरी पडला तरी काही खरं नाही, अशी धास्तीच वाटत होती...... एक मित्र पटकन उठला आणि आम्ही दोघे सॉरी सॉरी म्हणत होतो......... एव्हाना ती युवती सावरली होती आणि रागाने बघत होती माझ्याकडे......
खुद को क्या सैफ अली समझता है???? असे काहीतरी पुटपुटली आणि सगळ्या मित्रांच्या डोळ्यासमोर दिल चाहता है चा सीन आला.... आता तर मलाही हसू आवरता येणं शक्य नव्हतं.....
कसं बसं हसू आवरलं, पुन्हा एकदा सॉरी म्हटलं आणि चहाचा घोट घेत बसलो.....
त्यांच्या बरोबरच्या वयस्क बाईचं, "ये आजकल के लौंढे" पुराण चालू झालं.
ते सरदार कुटुंब त्या फॉर्च्युनरमधूनच आले होते. पण सरदाराने हात उचलला असता तर माझ्या जोडीच्या मित्रांना खांदा देऊनच मला घरी न्यावे लागले असते.
आता लिहिताना हसू येतेय पण तिथे मात्र बोबडी वळली होती क्षणभर......... राहून राहून मित्रांना हेच वाटत होतं....... " तुला सांगता नाही येत, असला सीन होणारं... आम्ही निदान मोबाईलमधे शूट केलं असतं"....... त्यांनी तर सगळा प्रसंग, सगळ्या एक्स्प्रेशन्स समोर पाहिल्या होत्या. मी पाठमोरा होतो.
नंतर रस्ताभर हसून हसून पुरेवाट झाली.......

एक मित्र म्हणतो, अरे तो सरदार एवढं जर सांगत होता" औरत को देख नही सकता??" तर सांगायचं ना "बघतो म्हणून"...
भुंग्या, अफलातुन
भुंग्या, अफलातुन
भुंग्या एकंदरीत मीन राशीचाच
भुंग्या एकंदरीत मीन राशीचाच आहेस तर
आमच्या बॉसचं नाव चंदन आणि एक गुज्जु सिनियर प्रोग्रॅमर होता त्याचं नाव चेतन! दोघांच्या नावांची मस्त सरमिसळ व्हायची!
तो गुज्जु प्रोग्रॅमर टेक्नीकली स्ट्राँग असला तरी बोलायला मिळमिळीत होता. कोणालाही अनेकवचनं लावणे (प्रत्येकाला 's लावून बोलणे), श ला स आणि vice versa... तर त्याच्याशी बोलताना सगळेच वैतागून आणि चिडून बोलायचे. शक्यतो नेटवर्कींग ची कामे पण तोच करायचा. एकदा इंटर्नल सर्वरमध्ये प्रॉब्लेम असल्याने नेटचा भयंकर प्रॉब्लेम चालू होता. क्लायंट बोंबलत होता. साईट अर्जंट अप करायची होती. डिझायनर जाम वैतागलेली. आणि अचानक जोरात ओरडली, "ए चंदन ये नेट का काम कर दे ना... सारा दिन तो कुर्सी पे बैठके इधर उधर देखता रहता है, क्या काम क्या करता है...!"
आम्ही सगळे आव्वाक! आमचा बॉस गालावर हात ठेऊन शांतपणे तिच्याकडे बघत होता... (त्याला पटलं असावं तिचं म्हणणं
बॉसला माहीत होतं स्टाफ अवलिया आहे, त्याचाही उद्धार करायला मागेपुढे पाहणार नाही :फिदी:)
आम्ही सगळे वळून बघतोय म्हटल्यावर बाईसाहेब भानावर आल्या. जीभ चावून निर्लज्जासारखी बॉसकडे बघून हसतेय!!
अक्षरी तुस्सी ग्रेट हो... !!!
अक्षरी तुस्सी ग्रेट हो... :D!!! फोटो बिटो नाय ना दाखवले घराचे, इधर चलो करून?? ह. घे. !
आम्ही तेव्हा प्रामाणिक सारीज
आम्ही तेव्हा प्रामाणिक सारीज (दादर) चं काम करायचो. चेतन प्रोग्रॅमर आणि त्यातून गुज्जू त्यामुळे या साईटच्या मालकाशी व गुज्जू गिर्हाईकांशी हाच फॉलोअप ठेवायचा!
याची अनेकवचनं करायची सवय!
एक दिवस तो फोनवर गिर्हाईकाला म्हणत होता, "नही मॅडम मै आपको एप्रिल फूल्स नही बना रहा, आपके हजबंड्स ने आपके लिये शरप्राईज लेंगा चोली गिफ्ट दिया है!"
नशीब त्या "आधुनिक द्रौपदीने" याचं टाळकं फोडलं नाही!
रच्याकने: हा चेतन पण मीन राशीचाच अवलिया आहे
खोटं बोलल्यावर काय खोटं बोलले
खोटं बोलल्यावर काय खोटं बोलले तेच विसरणं हे तर नेहमीच होतं
शक्यतो टाळतेच खोटं बोलायचं
माझ्या सगळ्या वस्तूंना मोबाईलने रिंग द्यायची सोय हवी होती असं मनापासून वाटतं, स्पेशली छोटं वॉलेट आणि पेन!!!
टेक्नीकल सपोर्ट देताना एख्याद्या सराला हमखास मॅडम करते
मेल ची डिफॉल्ट बॉडी सेट
मेल ची डिफॉल्ट बॉडी सेट केलेली डियर सर्/मॅडम म्हणून. सराला मेल पाठवायचं तर मॅडम काढून टाकायचे... एकदा विसरले. आणि टाईपलं
Dear Sir/Madam,
We have checked our mail server. Mails are working seamlessly fine. Please confirm at your end.
त्या भोचक सराचा रिप्लाय आला.

Dear Sir/Madam,
I have confirmed about myself. Confirm about You!!!
Pages