मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम

Submitted by रैना on 5 January, 2011 - 23:48
ठिकाण/पत्ता: 
लोकमान्य साहित्य सेवा संघ. विलेपार्ले पूर्व

मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शन- पार्ले

लेखिका कविता महाजन यांच्या मुलाखतीने कार्यक्रमांचे उद्घाटन होणार असून स्नेहा अवसरीकर आणि पत्रकार मुकुंद कुळे त्यांची मुलाखत घेतील. ८ जानेवारी रोजी विजय केंकरे हे ‘रंगभूमी, छोटा पडदा ते मोठा पडदा’ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांची मुलाखत घेणार आहेत. ९ जानेवारी रोजी द्वारकानाथ संझगिरी हे उद्योजक किशोर अवर्सेकर आणि रवींद्र प्रभुदेसाई यांची मुलाखत घेतील, तर १० जानेवारी मुकुंद टाकसाळे हे गीतकार स्वानंद किरकिरे यांची मुलाखत घेणार आहेत. ११ जानेवारी रोजी ‘गे आणि लिव्ह इन रिलेशनशिप’ या विषयावर परिसंवाद होणार असून चिन्मय केळकर, उज्ज्वला कद्रेकर आणि अनिल कदम हे त्यात सहभागी होणार आहेत. १२ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’चे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेमार आहेत. तर १३ जानेवारी रोजी ‘भाषा बदलते आहे’ या परिसंवादात प्रवीण दवणे, ‘लोकसत्ता’च्या वरिष्ठ सहसंपादक शुभदा चौकर, प्रदीप भिडे, मनस्विनी लता रवींद्र आपले विचार मांडतील. १४ जानेवारी रोजी ‘बदलती जीवनशैली आणि आरोग्य’ या विषयावर मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांची सुचित्रा इनामदार या मुलाखत घेणार आहेत. १५ जानेवारी रोजी ‘क्रिकेट, वल्र्डकप आणि भारत’ या चर्चासत्रात द्वारकानाथ संझगिरी, प्रवीण आमरे आणि विनोद कांबळी सहभागी होणार आहेत. १६ जानेवारी रोजी आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या मुलाखतीने ‘मॅजेस्टिक’ गप्पांची सांगता होणार आहे. याशिवाय सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

लोकसत्तेतील बातमी.

माहितीचा स्रोत: 
वर्तमानपत्र, इतर
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Thursday, January 6, 2011 - 21:00 to शनिवार, January 15, 2011 - 21:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही खूप खूप यायचंय. शनिवारच्या फ्लाईटने रात्री मुंबईत पोचेन, रविवारी तुमच्याबरोबर शॉपिंग उरकून रात्रीचीच फ्लाईट घेऊन घरी परत येईन. अशाने शॉपिंग कितीला पडेल ह्याचा विचार करतेय Biggrin

शेवटी काहीच ठरलं नाही. Happy
तुम्ही वेळ ठरवा. मी जमलं तर भेटेन. सकाळी ११.३० नाही जमणार. पण सगळ्यांना जमत असेल तर जरुर ठरवा.

मी सकाळी ११:३०-१२:०० पर्यंत म्हणत होतो, तसं संध्याकाळी म्हणत असतील येणारे तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त संध्याकाळी अमाप गर्दी असते.

आशुतोष, तुमचे नक्की आहे तर मग मी आलोच तर तुम्हाला फोन करतो.
सकाळी मी मोकळा आहे, पण भाची यायचं म्हणतेय. सकाळी तिची शाळा असेल.

मी उद्या दुपारी तिथे भटकत असेन.. गर्दी असेलच.. एक कार्निवल फिल असेल उद्या नि परवा.. पण तिच्याशी आपलं देणंघेणं नाही.. सो असेनच मी

.

काल दिली गुलाब प्रदर्शनाला भेट.
मेन हॉल मधला एसी बंद आणि प्रखर दिवे असल्यामुळे उकडलेल्या बटाट्यासारखी अवस्था झाली. गुलाबाच्या फुलांवर पण त्यामुळे सारखे पाणी स्प्रे करावे लागत होते.

आईशप्पथ अश्विनी! तुला माहित नव्हतं?
माबोवर येणं कमी झालं ह्याचा अर्थच हा की मी मुंबईत आहे. वुई आर बॅक फॉर गुड. Happy

अगं तू इकडे आली आहे हे माहित आहे पण मला आत्तापर्यंत वाटत होतं की तू पुण्यात आहेस. आता रोज एकदा तरी माबो चेक करत जा म्हणजे कुठे जमायचं, भटकायचं असेल आणि आपापली व्यवधानं सांभाळून जायला जमत असेल तर आवर्जून जायचं Happy

अमृता, अगं नक्की काहीही ठरलं नव्हतं म्हणून मी तुला कळवलं नव्हतं. इथे ठरवून आयत्यावेळी कॅन्सलच झालं. मग शेवटी आम्ही सात जण कोणाला काही न कळवता रविवारी अचानक शिवडीला जाऊन फ्लेमिंगो बघून आलो. Happy

Pages