सॅलड, कोशिंबिरी, रायते फॅन क्लब

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 9 February, 2011 - 07:29

येथे सॅलड/ सलाद, रायते, कोशिंबिरीच्या समस्त फॅन्सचे स्वागत आहे! Happy

आपल्या आवडत्या सॅलड्स, वेगवेगळ्या कोशिंबिरी, चवदार रायत्यांची रसभरीत वर्णने करायला ही जागा खास तुमच्यासाठी! आहारातील हा प्रकार आरोग्यासाठी चांगला आणि चव, रंग, स्वाद ह्यांचीही मेजवानीच!

तुमची आवडती, हमखास किंवा जरा हटके सॅलड्स, त्यांना वापरता ती ड्रेसिंग्ज, रायते-कोशिंबिरींची माहिती इथे शेअर करा. काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा. कोणकोणत्या भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये इत्यादीचे कॉम्बिनेशन वापरून तुम्ही ते पदार्थ बनवता तेही सांगा.

सॅलडच्या माबोवरच्या काही पाकृ इथे आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाजारात स्कूपर म्हणून एक छोटा चमचा मिळतो. त्याने फळाचे सुबक गोलाकार कापता येतात.
लाल व पिवळे कलिंगड. टरबूज, मस्क मेलन, पपई अशी मिळतील ती सर्व फळे घ्यावीत. तिचे गोलाकार काढावेत. त्यात लाल व हिरवी द्राक्षे पण वापरता येतात. आणि या सर्वावर अगदी थोडेसे केशर सिरप शिंपडायचे.
माझ्या एका फ्रेंच मित्राने, या सलादमधे एक खास वाईन वापरायला सांगितली होती. नाव विसरलो.

पालक बारीक चिरुन घ्यायचा. तेलावर हिंग , हळद, मोहरी, जिरं ह्यांची फोडणी करुन त्यावर लाल सुक्या मिरच्या टाकायच्या. त्यावर एक दोनच मिनिटं पालक परतायचा आणि बीट केलेल्या दह्यात घालायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं.

सिमला मिरची भाजून सलाद करतात ते वेगळं, हा आपला भारतीय प्रकार.
उडदाची डाळ तेलावर लालसर परतून घ्यायची. सिमला मिरची बारीक चिरायची. तिच्यात मीठ, ओले खोबरे, थोडाचा हिंग आणि हि डाळ घालायची. आणि भरपूर दही घालायचे. उडदाची डाळ दाताखाली आलेली चालत असेल तर ठिक, पण हा प्रकार थोडा मूरल्यावर खायला चांगला लागतो. डाळ दह्यातील पाणी शोषून घेते, व मस्त खमंग लागते.

डाळींबाचे दाणे सॅलडमध्ये दिसतात चांगले पण खाताना दातात येतात/अडकतात त्यामुळे घालायला नको वाटतं. पेरूच्या बियांबाबतीतही तसच होत.

मिनोती, कसला भारी आहे बुके!!!

छान बाफ. घरगुती सॅलड ड्रेसिंगच्या बर्‍याच कल्पना मिळाल्या. सर्वांना धन्यवाद !

मिनोती, मी एकटाच संपवू शकेन हा !!

इथे पूर्व कोशिंबीरीला, कचुमरी असा शब्द आहे. पण तो जरा तिखट करतात. टोमॅटो हा मुख्य घटक. कोबी, मिरच्या वगैरे घटक असतात.

वरती काबूली चण्याचा प्रकार दिलाय तो गल्फ मधे बराच लोकप्रिय आहे. पण तो गरमागरम खातात. त्यावर कधी कधी कच्चे अंडे फोडून टाकतात (पण अंडे लगेच शिजेल, एवढा तो प्रकार गरम असतो.)

मिनोति,
एडिबल अरेन्जमेन्ट्स पाहिल्या आहेत का ? मस्तं असतात त्यांच्या अरेन्जमेन्ट्स .

http://www.ediblearrangements.com/Default.aspx

फ्रिमॉन्ट ला भारत बाजार कॉम्प्लेक्स च्या समोर सेफवे शॉपिंग काँप्लेक्स मधे आहे .
यु. एस मधे ऑलमोस्ट सगळीकडे आहेत , छान बनवतात ते फ्रुट अरेन्जम्न्ट्स.
ed1.jpged11.jpged12.jpg

आर्च आता डाळींबाच्या काही सुधारीत जाति आल्या आहेत, त्याचे दाणे मोठे असतात आणि बिया अगदीच मऊ असतात. चावाव्या लागत नाहीत.

या थंड सलादमधे आस्पिक हा प्रकार मला फार आवडतो. आस्पिक साठी अनफ्लेवर्ड जिलेटीन किंवा चायना ग्रास घ्यावे. पाण्यात लिंबाचा वा संत्राच्या रस वा सिरप घालून त्यात जिलेटीन घालून शिजवावे. मग ते रिंग मोल्ड मधे सेट करत ठेवावे. अर्धवट सेट झाली कि आवडते ग्रीन सलाद त्यात टाकावे. व पूर्ण सेट होऊ द्यावे. मग रिंग मोल्ड डिशमधे पालथा करावा व त्यामधे व आजूबाजूला आवडते सलाद रचावे. यात टोमॅटो प्यूरे वापरुन मस्त चव आणता येते. रंगाच्या बाबतीत तर कल्पनाशक्तीचाच काय तो लगाम.
पोर्ट वगैरे फ्लेवरच्या जेली मिळाल्या तर आणखी छान. आपल्याकडे मिळणारे, काला खट्टा, मसाला सोडा, जिरा मसाला या फ्लेवर्सचीपण सरबते वापरता येतात. अगदी कोकम सरबतही वापरता येते.

सायो, डीजे हो माहिती आहे ते दुकान Happy

मी बरेच प्रकार करते पण प्रत्येकवेळी फोटो काढले जातातच असे नाही. आता पुन्हा केली की काढेन फोटो Happy

माझ्या घरी आठवड्यातून एकदा तरी होणारे सोप्पे कॉर्न सॅलड- अगदी मुलंपण दुसर्‍यांदा मागून घेऊन खातात.
ही कृती सगळ्यांना माहीत असेलच. तरी देतेय.

लो सोडियम कॅन्ड ब्लॅक बीन्स
मक्याचे दाणे (फ्रोजन उत्तम. शक्यतो स्वीट कॉर्न नको. व्हाईट कॉर्न घ्यावा.)
याचे प्रमाण २:१ घ्यावे. आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करावे.
मायक्रोमधे एखाद दोन मिनिटे गरम करावे. आवडीप्रमाणे मीठ घालावे. त्यातच हवा तो साल्सा मिक्स करावा. बोलमधे घेऊन त्यावर टॉर्टिया चिप्स चे तुकडे जरा जाडसर चुरा करून पसरावे.

या मिश्रणावर बारीक चिरलेला लाल कांदा- पांढरा मुळीच नको, टोमॅटो- (हो साल्सा असला तरी ताजा टोमॅटो हवाच) आणि भरपूर म्हणजे भरपूरच कोथिंबीर टाकावी.

कॅलरीज गेल्या उडत असा विचार करू शकणार्‍या भाग्यवंतांनी मस्त मेक्सिकन चीझ घालून खावे. पण त्याशिवायही छान चटपटीत लागते.

अजुन एक लो कॅल सॅलेडः
बारीक चिरलेली कोबी, ग्रीन अ‍ॅपल च्या चकत्या, काकडीचे काप, डाळिंबाचे दाणे, सिमला मिर्चीच्या बारीक लांब फोडी, बारीक चिरलेला पुदिना, कोथिंबीर, लिंबु, फ्रेश फ्रश्ड मिरपुड, चाट मसाला , चवी पुरतं लाल तिखट आणि मीठ घालून मिक्स करायचं, लिंबु पिळून खायचं :).

..

व्वा! काय तोंपासु रेसिपीज् आणि फोटो आहेत एकेक! मिनोती, दिनेशदा, फारच देखणी आणि चविष्ट आयडिया आहे ही! मी कॉलेजात असताना सॅलड डेकोरेशन स्पर्धेत असे फळांचे साळिंदर तयार केले होते. संत्रे/ मोसंबे/ सफरचंदाला बेस म्हणून वापरायचे; टूथपिक्सना पपई/ आंब्याच्या चौकोनी फोडी, चीझचे क्यूब्ज, अननसाच्या फोडी, काळी द्राक्षे, लाल पाकवलेल्या चेरीज किंवा ऑलिव्ह्ज लावून त्या सर्व बाजूंनी त्या बेसमध्ये खोचायच्या. किंवा कलिंगडाच्या अर्ध्या भागाला डिशमध्ये पालथे करून त्याला ह्या टूथपिक्स लावायच्या.
फ्रूट स्कूप्सही मस्तच दिसतात. Happy

कोशिंबिरीसाठी कोवळी तोंडली/ कोवळी भेंडी असतील तर ती बारीक चिरून त्यांचे दही + सैंधव + तिखट/ मिरपूड + चाट मसाला ह्यात घालून केलेले रायतेही छान लागते. वरून हवी तर फोडणी. कोथिंबीर.

कोबी किसून साधारण त्याच्या एवढ्याच किंवा थोड्या कमी खोवलेल्या खोबर्‍यासोबत हलक्या हाताने मिसळायचा. त्यात मीठ, साखर, लिंबू रस घालायचे. वरून कोथिंबीर.(हवी असली तर!) कोबीचा हा प्रकार झकास लागतो. हवं तर वरून हिरव्या मिरच्यांची फोडणी. वन डिश मील सारखेही खाता येते.

आस्पिक.... हम्म... मी कधी खाल्ला नाहीए हा प्रकार. वसुमती धुरूंच्या पुस्तकात वाचलंय फक्त त्याविषयी. आता खास उन्हाळा स्पेशल म्हणून करून बघायला हवा. Happy

मिनोती, नेत्र निवले!!! Happy

ही एकदम झकास आयडीया आहे. लहान मुलांच्य बड्डे पार्टीसाठी तर अगदी खासच डिश आहे ही.. हे स्कूप्स कुठल्या कुठल्या फळांचे काढता येतात?पपई, कलिंगड, केळं(?), आंबा... अजून कुठली? आणि त्या स्क्यूअर्सवर लावताना काही सिरप वगैरे लावायचे का त्या स्कूप्सना?

मधुरिमा, असंच उकडलेल्या चवळीचं किंवा राजम्याचंही सॅलड मस्त लागतं. कच्च्या कांद्याच्या रिंग्ज, टोमॅटोच्या फोडी, तिखट, मीठ, हवा असला तर चाट मसाला किंवा आमचूर पावडर, वरून भाजलेला पापड चुरडून घालायचा. कोथिंबीर भ र पू र घालायची. (काही जण ओले खोबरेही घालतात.) टेस्टी आणि टेम्प्टिंग प्रकार आहे. Happy

मुळ्याचा चटका-

अर्धी वाटी हरबरा डाळ- भिजवलेली.
२ मोठे मुळे- किसलेले
दही
मिरच्या
फोडणीचे साहित्य, जिरं
कोथिंबीर

डाळ अर्धीबोबडी वाटून घ्यायची, अगदी लगदा नको. मिरच्या एरवीपेक्षा जास्त घेऊन ठेचून घ्यायच्या. तिखटपणा आला पाहिजे. मुळ्याचा कीस आणि वाटलेली डाळ एकत्र करायची. मीठ, साखर, मिरच्या घालायचे. थोड्या जास्त तेलाची खमंग फोडणी करून ह्यावर ओतायची. सढळ हाताने दही, कोथिंबीर घालून सर्व्ह करायचे. भाकरीबरोबर खाल्ले, तर ऑलमोस्ट स्वर्ग Proud

पोर्णिमाच्या पोस्ट वरुन आपली आंबाडाळ आठवली. चैत्र आलाच ना, कदाचित वेळेच्या आधीच येईल, यावर्षी.
गुढीपाडव्याला श्रीखंडपूरीचे जेवण झाले, तरी दुपारी परत ती डाळ घेऊन खात असू आम्ही. कैरीची सर लिंबू पिळून येत नाही.

आंबाडाळ, मुळ्याचा चटका..... अहाहा! काय मस्त पाणी सुटलंय तोंडाला नुसत्या आठवणीनं! स्लर्रप!!!

बरं, इथं कोणाला थायी पध्दतीची सॅलड ड्रेसिंग्ज माहित आहेत का? किंवा थायी सॅलड्स कशी करायची ती?
मला फक्त त्या पध्दतीचं नारळाचं दूध + लिंबाचा रस + सोया सॉस + मीठ + ठेचलेला लसूण + ब्राऊन शुगर हे सॅलड ड्रेसिंग माहित आहे. त्यात काकडी, पातीचा कांदा, लेट्यूसची पानं घालून सॅलड करतात. गारच सर्व्ह करायचं.
पण इतरही ड्रेसिंग्ज असतील ना? माहित असली तर सांगा प्लीज. Happy

मंजूडी
त्या छोट्या स्कुपने कलींगड, खरबुज, पपई, आंबा अशी फळे काढता येतात, सफरचंद, अननस पण काढता येते थोडा प्रयत्न केला तर, चिकु, किवी पण काढता येतील. त्यात द्राक्ष, वेगवेगळ्या बेरीज् मिसळल्या की खूप फळे होतात.

सुनिधी, रोज वरच्या इतक्या तोंपासु रेसिपीज् पैकी एक प्रकार करून बघायचा (आणि खादडायचा) माझा संकल्प आहे! ह्या उन्हाळ्यात जीवाचं सॅलड करणार आहे!!! Lol ठरव तू पण, जमेल आपोआप! Happy

धन्यवाद Happy

अग मंजू यात काळी न पडणारी कोणतीही फळे घ्यायची. कलिंगड, खरबूजाचे गोल काढायचे.
पपई, आंबा यांच्या साली काढून तुकडे करायचे.
चिकूच्या फोडी करायच्या.
काळी, हिरवी द्राक्षे टोकाला लावायची.

कबाबसाठी ज्या बांबूच्या स्टिक्स मिळतात त्यात पॅटर्नप्रमाणे खोचायचे.

कलिंगडाच्या साली किंवा फ्लॉवर स्पंज एका डेकोरेटिव्ह डिशमधे घ्यायचा त्यात ह्या स्टिक्स खोचायच्या.

संपूर्ण अ‍ॅरेंजमेंट फ्रीजमधे ठेवून गार करायची.
हिरवा रंग हवाच असेल यात तर कोथिंबीर किंवा बेझिलचे तुरे खोचायचे. अगदी आंब्याची पाने, लिंबाची पाने पण चालतील. कोणतीही खाण्यायोग्य पाने लावायची.

माझ्याकडे रोझमेरी खुप आहे म्हणुन मी तीच खोचली आहे.

मिनोती, हा फळांच्या स्कूप्सच्या गुच्छाचा प्रकार खूपच मस्त आहे. बच्चापार्टीसाठी तर स्वर्गच आहे! Proud

काल माझी एक जुनी वही चाळताना कोठूनतरी उतरवून घेतलेली स्वीट कॉर्न सॅलडची अतिशय सोप्पी कृती मिळाली.
स्वीट कॉर्न आणि खोवलेला नारळ असे समसमान किंवा ३:१ प्रमाणात घ्यायचे. थोडीशी साखर, चिमटीभर मीठ. झाले सॅलड रेडी! हे सॅलड चवीला गोडच लागते. मीठ सोडले तर बाकीचे सर्व पदार्थ गोडच.

Pages