Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चे म्हणजे काय रंगासेठ?
चे म्हणजे काय रंगासेठ?
चे म्हणजे कोण?
चे म्हणजे कोण?
चे म्हणजे चे गव्हेरा. चे आणि
चे म्हणजे चे गव्हेरा. चे आणि फिडेल, दोघे क्युबन क्रांतीचे जनक.
अरुण साधूंचे एक हे एक उत्तम पुस्तक.
थोडक्यात आणि सुटसुटीत लेखन.
.
.
http://loksatta.com/index.php
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=130937:...
दशकातली दहा! -सुरेश सोनटक्के -
या दशकात गाजलेली वा न गाजलेली, परंतु प्रभावशाली अशा निवडक दहा मराठी पुस्तकांचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न..
भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू’ , कविता महाजन ‘भिन्न’.अरुण कोलटकर भिजकी वही ,संदेश भंडारे ‘तमाशा’ हे छायाचित्रांचं पुस्तक,
हेरंब कुलकर्णी ‘शाळा आहे, शिक्षण नाही’! ,‘घडता.. घडविता’ हा रोहिणी गवाणकर आणि उषा शेठ यांनी संपादित केलेल्या लेखसंग्रह,
अनंत देशमुख यांनी सिद्ध केलेले र. धों. कर्वे यांच्याविषयीचे आठ खंड ,अंबरीश मिश्र यांचं ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ ,भास्कर चंदनशिव ‘लाल चिखल’,संजय पवार ‘चोख्याच्या पायरीवरून’ .
लोकसत्ताने वाचकांकडूनही त्यांना मह्त्त्वाच्या वाटलेल्या गेल्या शतकातल्या दहा पुस्तकांची नावे (लेखक, पुस्तक, प्रकाशक ) मागवली आहेत. लिंकमध्ये अधिक माहिती मिळेल.
मयेकर, किनारे मनाचे बाबत
मयेकर, किनारे मनाचे बाबत सहमत.
मागच्या काही दिवसामधे वाचलेली
मागच्या काही दिवसामधे वाचलेली पुस्तके,
आयदानः- उर्मिला पवार. ठिक ठाक आहे. इतके कहि विशेष नाही वाटले. या आधी दलित साहित्य भर्पुर वाचले आहे म्हणून असेल कदाचित.
नेगलः- विलास मनोहर. छान वाट्ले. इथे मायबोली वर परिक्षण आहेच म्हणा.
banker to poorer :- महंमद युनुस. खुप दिवसांपासुन इछ्छा होती यांच्या बद्दल वाचायची. हे खरं तर बांग्लादेश मधील नोबेल पारितोषिक विजेते. कार्य निर्विवाद थोर आहे. पण पुस्तक फार रटाळवाणं वाटलं वाचायला.
सध्या अमुल वाले वर्गिस कुरिअन यांचं आत्मचरित्र घेतले आहे.
मी आजच सौ. ईन्द्रयणि सावरकर
मी आजच सौ. ईन्द्रयणि सावरकर ह्यांचे "गोवा" हे पुस्तक वाचले. चार दिवसांसाठी गोवा फिरून येणे व तिथला रहिवासी म्हनुन गोव्याकडे पाहणे ह्यात किती फरक आहे. तिथल्या लोकांचे राहणीमानाचे, मनोवृत्तीचे इतके विविध पैलू सहजगत्या ऊल्गडून दाखवले आहेत की बस!मला तर हे पुस्तक फार आवडले.
गेल्या दशकातील दहा मध्ये
गेल्या दशकातील दहा मध्ये हिंदूचे नाव? सर्वाधिक गाजलेलं म्हणण्यापेक्षा सर्वात चांगली मार्केटींग केलेले, चर्चेत ठेवलेले पुस्तक म्हणजे हिंदू!
भिन्न नक्कीचं छान आहे.
भिन्न नक्कीचं छान आहे. हिंदूबद्दल फार वाईट ऐकल आहे. मला वाटतं गेल्या दशकाचा विचार करण्यापेक्षा गेल्या वर्षीचा विचार केला तर बरे होईल.
भैरप्पा यांचं कुणी 'आवरण' वाचलय का? छान आहे असे ऐकले आहे. प्रवीण बांदेकर यांच 'चाळेगत' हेही छान आहे.
चिन्मय, मला मिहिर पुस्तकालयात नानासाहेबांचे 'माझा रशियन प्रवास' हे पुस्तक मिळाले. चुकून अकोल्यालाचं राहून गेले. फक्त चारचं पाने तिथे वाचलित त्यावरुन पुढे पुस्तक कसे असेल याचा अंदाज आला नाही. तू टिळक पार्काजवळ अशोक वझे यांच्या दुकानात कधी गेलास का? त्यांच्याकडेही खूप छान मराठी पुस्तके मिळतात. मिहिर छान आहे पण तिथ पुस्तक विकणार्या मुलामुलींना पुस्तकांबद्दल फार माहिती आहे असे वाटले नाही. त्यामुळे बहुतेक वेळ पुस्तक शोधण्यातचं गेला.
मंगला नारळीकरांचे "पाहिलेले
मंगला नारळीकरांचे "पाहिलेले देश आणि भेटलेली माणसे" कुणी वाचलंय का? क्रॉसवर्डमधे विचारलं तर संपलेलं होतं.
मी नुकतचं "तांबड्फुटी" वाचलं
मी नुकतचं "तांबड्फुटी" वाचलं गो. नी. दांडेकरांचं. मला शेवट नीट नाही कळला , सुमन माधवशी लग्नाला तयार होते ? का त्याला माणसात आणायला मदत करायला तयार होते ?
"आवरण" भैरप्पांची सुरेख
"आवरण"
भैरप्पांची सुरेख कादंबरी.......
कथेचा आवाका पाहुनच लेखकाची प्रतिभा कळते
वर्तमान काळ आणि भूतकाळाची अशी सरमिसळ आणि सांगड क्वचितच कुणाला जमली असेल.....
मी त्यांची "सार्थ" आणि "आवरण" लागोपाठ वाचल्या.......
दोन्ही कादंबर्याच्या प्लॉट मधून सार्वकालिक सत्ये वाचकांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी झाले आहेत...
रच्याकने
"हिंदू" दोन्हीच्या जवळपास ही जात नाही.........
कोणी ऋजुता दिवेकरचं नवीन
कोणी ऋजुता दिवेकरचं नवीन पुस्तक 'वेटलॉस तमाशा' वाचलं आहे का? कसं आहे?
पुण्यात आता पुस्तकांचे मॉल...
पुण्यात आता पुस्तकांचे मॉल... http://www.esakal.com/esakal/20110204/4987703137739794598.htm
ड्वार्फ नावाच्या कोरियन
ड्वार्फ नावाच्या कोरियन पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद वाचला.
त्याची रिक्षा इथे.
http://rbk137.blogspot.com/2011/01/blog-post_25.html
अरुण साधू यांनी लिहिलेले
अरुण साधू यांनी लिहिलेले 'फिडेल, चे आणि क्रांती' हे क्युबन क्रांतीवर आधारित पुस्तक आणि 'तिसरी क्रांती' हे रशियन क्रांतीचा गेल्या शतकभराचा प्रवास दर्शवणारे पुस्तक वाचले.
'फिडेल, चे आणि क्रांती' मध्ये फिडेल कॅस्ट्रो व त्याच्या सहकार्यांनी ज्या हाल-अपेष्टा सोसत क्रांती केली याचे उत्तम वर्णन आहे. जास्त पाल्हाळ न लावता फिडेलचे क्रांतीकार्य , त्याला आलेल्या अडचणी यांचे वर्णन केले आहे. जर क्युबन क्रांती व फिडेल बद्द्ल वाचायची उत्सुकता असेल तर हे पुस्तक नक्की वाचा.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीस रशियात क्रांती सुरु झाली , पहिल्यांदा १९०५ ला कामगार व शेतकर्यांनी मिळून केलेली अयशस्वी क्रांती, नंतर १९१७ ची लेनीन प्रणित कम्युनिस्ट क्रांती. त्यानंतर रशिया ज्या स्थित्यंतरातून गेला, स्टॅलीनने रशियाची वाट कशी लावली त्याचबरोबर दुसर्या महायुद्धानंतर सुरु झालेले शीतयुद्ध व शेवटी १९८९ साली गोर्बाचेव यांनी खुली केलेली कवाडे असा १०० वर्षांचा कालावधी या पुस्तकात येतो. रशियन क्रांती आधी झालेल्या क्रांत्या जसे की फ्रेंच, अमेरिकन इ., मार्क्सचा व मार्क्सवादाचा उदय, आणि या १००-१२५ वर्षात रशियन जनतेने भोगलेला अन्याय, पिळवणुक, दडपशाही या सार्यांचा अरुण साधू यांनी मस्त वेध घेतलाय. मध्यंतरात पुस्तकातील वर्णने विस्कळीत वाटतात, पण पूर्ण पुस्तक मनाची पकड घेते. स्टॅलीनने केलेली क्रूरकर्मे पाहता त्याची किळसच वाटते. सत्ता टिकवण्यासाठी मार्क्सवाद व कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणाची कशी चिरफाड केली गेली, लोकांना नरक म्हणजे काय याचा जिवंतपणी अनुभव देणारी निष्ठुर राजकारणी यांची वर्णने वाचताना त्या काळातील राज्यकर्त्यांचा राग येतो.
रशियन कम्युनिस्ट क्रांतीवर आधारीत हे मराठीतील एक उत्तम पुस्तक आहे.
तिसरी क्रांतीच्या तोडीचे
तिसरी क्रांतीच्या तोडीचे विसाव्या शतकातील अतिशय महत्वाच्या अश्या ह्या कालखंडाचे सदरीकरण करणारे पुस्तक मराठीत दुसरे नाही.. बहुतेक माझ्या आई-वडिलांच्या तरुणपणीपण 'फिडेल, चे आणि क्युबा' हे एकच क्युबन क्रांतीवर भाष्य करणारे पुस्तक होते आणि अजुनही
अर्थात 'चे' बद्दल बरेच उलट-सुलट वाद-प्रतिवाद-मते-घटना आहेत. त्यामुळे चे बद्दलचे काहिही थोडे सांशकतेनेच वाचावे लागते..
गेल्या दोन महिन्यात वाचलेली पुस्तके:
धग: उद्धव शेळके - ह्या पुस्तकाबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. नेमाडपंथीयांचे लाडके पुस्तक म्हणुन हेटाळणा होण्याची शक्यता देखील खूप जास्त इथे. पण एखादी जमून आलेली कादंबरी काय असते ह्याचे हे फार उत्तम उदाहरण आहे.
द पिआनिस्ट - वादिस्लाव स्पिल्झ्मन - ह्या पुस्तकावर आधारीत पोलन्स्कीचा सिनेमा अनेकांनी बघितला असेल. पण इतकं भयानक काही सहन करुन, अनुभवून, एव्हड्या प्रचंड मॅटर ऑफ फॅक्टली, एक प्रकारच्या तटस्थतेने व एव्हडुसादेखील कडवटपण न येऊ देता नाझी छळाची ही कहाणी लिहिणे केवळ अशक्य. 'वैर्याची एक रात्र' काय किंवा स्पिल्बर्गपद्धतीचे जर्मन चित्रण काय - नाझींबद्दलची एक तीव्र चीड ह्या सर्व कलाकृतींमधून दिसून येते. पिआनिस्टमध्ये तिचा प्रकर्षाने अभाव आहे. हॅट्स ऑफ टू धिस गाय!
ट्रॅव्हल्स वुइथ चार्ली - स्टाइनबेकचे पहिले पुस्तक सुरू केले होते Grapes of wrath.. पण ते काय संपेना.. म्हणुन मग हे उचलले आणि प्रेमात पडलो.. ६१-६२ साली ६००० मैलाच्या प्रवास करत केलेले हे चित्रण.. चार्ली नामक त्याच्या कुत्र्याबरोबर कँपरप्रमाणे बनवलेल्या आपल्या ट्रकमधून त्याने हा प्रवास केला.. त्यात वाटेत भेटलेली लोकं, लँडस्केप वगैरे वगैरे आहेच.. पण ज्या पद्धतीने तो हे लिहितो ते फार भारी आहे.. अर्थात उतारवयाला लागलेल्या लेखकाच्या प्रकृतीनुसार ह्यातली बरेचशी वर्णने स्वांतसुखाय आहेत.. उत्कृष्ट कादंबरीकार हे बहुतकरुन अति-उत्कृष्ट प्रवासवर्णनकार असतात असे माझे मत.. त्यानुसार आता स्टाइनबेक - कादंबरीकार वाचायची मला उत्सुकता आहे..
जंकी - हे वाचून मला नेमके काय वाटले ते सांगता येणार नाही.. जंकींबद्दल असलेली 'नफरत' - मुख्यत्वेकरून सुखवस्तू जंकींबद्दल (भिकारी पोरं, वेश्या वगैरे धंद्यासाठी जंकी बनवण्यात आलेली लोकं सोडून देउ) असलेली नफरत मला हे पुस्तक तितकेसे भिडवू शकली नाही. पण तरीही ज्या पद्धतीने हे लिहिले आहे ते मानले पाहिजे. मला सारखी वासूनाकाची आठवण येत राहिली.
उत्कृष्ट कादंबरीकार हे
उत्कृष्ट कादंबरीकार हे बहुतकरुन अति-उत्कृष्ट प्रवासवर्णनकार असतात असे माझे मत.. >> इंटरेस्टींग ऑब्झर्वेशन. मी मराठीतले कादंबरीकार-प्रवासवर्णनकार (उत्कृष्ट) असं कॉम्बो आठवायचा प्रयत्न करतेय. एकही आठवत नाहीय.
शर्मिला, मीही! (कसं आठवणार?
शर्मिला, मीही!
(कसं आठवणार? मराठीत प्रवासवर्णनं लिहीलीच गेली नाहीयेत ना! :P)
हे माझं मत (मर्यादीत) इंग्रजी
हे माझं मत (मर्यादीत) इंग्रजी वाचनावरून आहे. इंग्रजीत पॉल थेरॉ, विदिया नायपॉल आणि विक्रम सेठ ही तीन नावे माझ्या डोळ्यासमोर मुख्यत्वेकरून होती हे वाक्य लिहिताना. अर्थात उत्तम कादंबरीलेखकाची भाषेवरची पकड मोठी असते, त्याचे/तिचे माणसे जोखण्याचे, माणसांना उभे करण्याचे कसब मोठे असते. त्यामुळे बहुतकरून ते उत्तम प्रवासवर्णने लिहितात. मराठी प्रवासवर्णने मी मुळातच खूप कमी वाचली आहेत. पुलंची तीन प्रवासवर्णने सोडल्यास कुठलेही नाव डोळ्यासमोर येत नाहिये. गोनीदांनी प्रवासवर्णने व कादंबर्या दोन्ही प्रकार समर्थपणे हाताळल्याचे संदर्भ बर्याच ठिकाणी वाचले आहेत. गोनीदांचे एकही पुस्तक न वाचल्याने मत देऊ शकणार नाही.
>उत्कृष्ट कादंबरीकार हे
>उत्कृष्ट कादंबरीकार हे बहुतकरुन अति-उत्कृष्ट प्रवासवर्णनकार असतात असे माझे मत..
सहमत आहे. विक्रम सेठ आणि पॉल थेरॉ यांना तोड नाही. मात्र उत्कृष्ट कादंबरीकार आणि प्रवासवर्णने लिहीलेली नाहीत अशीही उदाहरणे सापडतात. (त्यांनी प्रवासवर्णने लिहीली असती तर चांगली झाली असती असे मानायला अर्थातच जागा आहे.)
पियानिस्टबद्दल उत्सुकता आहे.
टण्या अठरा लक्ष पाऊले नाहीयेस
टण्या अठरा लक्ष पाऊले नाहीयेस का वाचल? (नसशील तर वाचच नक्की).
गोनीदांचे एकही पुस्तक न
गोनीदांचे एकही पुस्तक न वाचल्याने मत देऊ शकणार नाही
>> हे धक्कादायक आहे !
टण्या, तू 'कुणा एकाची
टण्या, तू 'कुणा एकाची भ्रमणगाथा' नक्कीच वाच.
विक्रम सेठबद्द्ल अनुमोदन.
A Painted House by John
A Painted House by John Grisham
अर्केनसामधल्या शेतकरी जीवनाबद्दल. Very easy read. जॉन ग्रिशमची पुस्तकं वाचली असतील तर हे एकदम वेगळं. मला आवडलं. त्याचच असच वेगळं पुस्तक म्हणजे Skipping Christmas पण ते नाही विशेष आवडलं.
जॉन ग्रिशमची पुस्तकं वाचली
जॉन ग्रिशमची पुस्तकं वाचली असतील तर हे एकदम वेगळं. >>>> अगदी अगदी. ग्रिशमच्या इतर पुस्तकांपेक्षा खूप वेगळं, वेगळ्या धाटणीचं आहे.
Skipping Christmas >>> बघायला पाहिजे इकडे मिळालं तर
खेकसत म्हणणे आय लव्ह यू -
खेकसत म्हणणे आय लव्ह यू - श्याम मनोहर.
वाचले. कळ नंतरचे हे मला आवडलेले. श्याम मनोहरांची शैली मात्र यात कळ पेक्षा बरीच बदललेली जाणवते.
कुबेर आणि अच्युत गोडबोले ही
कुबेर आणि अच्युत गोडबोले ही सध्या तरी मराठी लेखनातली आश्चर्ये आहेत
>> कुबेराम्चे माहीत नाही पण गोदबोलेंनी लोकसत्ता मधे corporate world(याचे संपादन होउन बोर्डरुम नावाचे पुस्तकही बाजारात आले),शास्त्रीय संगीत आणि वेगवेगळे इंग्रजी साहित्यिक अशा ३ पुर्णपणे वेगळ्या विषयांवर अत्यंत ओघवत्या आणि रंजक भाषेत केलेले स्तंभ लेखन वाचले की हा माणुस परग्रहावरचा आहे की काय असे वाटायला लागले होते.आताही वैद्यक शास्त्र या भलत्याच विषयात त्यांचे स्तंभलेखन सुरु आहे. IIT मधुन passed out असलेला हा माणुस IT sector मधे अत्यंत जबादारीच्या पदावर काम करतो असे त्यांच्या लेखातच वाचलेले आठवते,तेव्हा दांडी गुल झाली होती
पण खरेच त्यांना मराठी लेखनातले आश्चर्यच म्हंटले पाहिजे.
>जॉन ग्रिशमची पुस्तकं वाचली
>जॉन ग्रिशमची पुस्तकं वाचली असतील तर हे एकदम वेगळं. मला आवडलं.
वाचायला हवे. ग्रिशम म्हटले की लीगल थ्रिलर हे समीकरण झाले आहे. नुकतेच त्याचे द अपील वाचले. सो-सो, सत्य घटनेवर आधारित आहे म्हणून थोडे जास्त इंटरेस्टींग वाटले.
Pages