जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपले
तोची ड्युआय ओळखावा
भाव तेथेची जाणावा ||
वरील पंक्तीत वर्णन केल्याप्रमाणे अनेक ड्युआयडी सांप्रतकाळी मायबोलीवर कार्यरत आहेत.
अवचिता परिमळू
ड्युआयड्यांचा सुकाळू
मी म्हणे गोपाळू
झाला गे माये ||
कोणा ओरीजिनल कर्त्याकरवित्याच्या हातात या ड्युंच्या दोर्या पक्षी पासवर्ड असल्याने ते नाचवतील तेथे जाऊन हवा तसा प्रतिसाद देणे हेच ड्युंचे जिवीतकार्य.
तुच घडवीशी तुच मोडीशी
कार्य करवीशी तू, तूच मारीशी
हित तुझे तू यात साधिशी
मुखी कुणाच्या देशी लोणी
कुणा मुखी अंगार ||
ड्युआयड्यांचा जन्मच याकरता झालेला असतो. किंबहुना,
बिना हेतुने जे उले त्याले ड्युआय म्हनू नही
प्रतिसादाइना बोले त्याले ड्युआय म्हनू नही
पण या सर्व ड्युंची एक ठराविक लक्षणे असतात. ती चाणाक्ष वाचकांच्या सहज लक्षात येतात. ती लक्षणे खालीलप्रमाणे :
१. ड्युंचे सर्वांत महत्वाचे लक्षण म्हणजे त्यांचे वय. हे ड्यु माबोवर ताजे ताजे जन्माला येतात आणि येताच तडक नेमक्या बाफावर जाऊन नेमकी प्रतिक्रीया देतात.
उडाला उडाला ड्युआय तो उडाला
अधलेमधले ओलांडुनी नेमक्याशी गेला
नेमक्याशी जाऊनी प्रतिसाद दिला
नमस्कार माझा त्या ड्युआयडीला
याचाच एक फायनर-पॉईंट म्हणजे अशा ड्युआयडींचं वय त्यांच्या जन्मदात्यांपेक्षा लहान किंवा फार्फार तर बरोबरीचं असतं.
२. ड्युआयडींना विधिवत जन्माला घालणारे, पुढे डीएनए चाचणीत आपले स्वत:चे पालकत्च सिध्द होऊ नये म्हणून त्यांना वेगळं व्यक्तीमत्त्व बहाल करण्याचा खटाटोप करतात. यात भाषेकडे विशेष लक्ष पुरवले जातच पण त्याचबरोबर अवतरण चिन्हे वगळणे, लिखाणात मुद्दाम शुध्दलेखनाच्या चुका करणे, थोडक्यात प्रतिक्रीया देणे असे प्रकार असतात. पण होतं काय की नेमक्या याच प्रयत्नांमुळे असे ड्युआयडी ठळकपणे उठून दिसतात.
ड्युआय डोंगा परि, मेंबर नाही डोंगा
काय भुललासी वरलीया अंगा ||
३.एकदा का संशय आला तर ड्युआयड्यांच्या पावलांचे ठसे अभ्यासावेत. ते आपल्याला नेमक्या गुहेकडे घेऊन जातात. कारण ड्यु काही ठराविक व्यक्तींच्या बाफांनाच भेट देतात. अनुकुल प्रतिसाद देणारे आपल्या जन्मदात्याच्या बाफावर रेंगाळतात तर प्रतिकूल प्रतिसादाकरता जन्माला घातलेले शत्रुपक्षात घुसलेले दिसतात. जुन्या-जाणत्या मेंब्रांना ह्या खुणा चटकन ओळखता येतात. ड्युआयडींच्या पाऊलखुणाचा मागोवा ही जरा कष्टसाध्य आणि तपस्येनंतर प्राप्त होणारी गोष्ट आहे.
तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे |
४. जसे बाटगे जास्त कट्टर असतात तसे हे ड्युआय (विशेषतः अनुकूल प्रतिसादवाले) जन्मदात्याची अफाट स्तुती करतात. ही खरंतर आत्मस्तुती असते.
मन ड्युले मेरा तन ड्युले मेरे दिल का गया करार रे
जोर से बजाये बासुरीया ||
तर शिव्याशाप देणारे ड्यु, मनातील मळमळ पूर्णपणे बाहेर काढतात.
सोड झणी वाग्बाणा, चला जोरात हाणा
ठोक हा बाफ रे ड्युआयड्या ||
५. काही असतात हेरगिरी करणारे ड्यु. हे मुद्दाम शत्रुपक्षात मित्र म्हणून घुसतात आणि जमेल तसे नेम धरून वार करतात.
सत्रांदा उड्डाणे मित्रांच्या सदनी
करी डळमळ मित्रमंडळ, वंगाळ बोलूनी |
६. काही ड्यु मिश्किल असतात. आपल्याच नेहमीच्या दोस्तांना वेगळ्या रुपात भेटून ते मजा करतात. अर्थात दोस्त लोकही ओरिजनल डॉक्युमेंटचा अभ्यास केलेले असल्याने अशा ड्युंचे पितळ लवकरच उघडे पडते.
You can cheat some people all the time
You can cheat all people some time ...but
You cannot cheat all people all time!
७. ड्युआयडी बरेचदा थोड्याच काळाकरता येतात. धुमकेतूसारखे उगवतात आणि अचानकच मावळतातही.
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती
बाफांसी टाकिली मागे, गतीसी तुळणा नसे
८. जर एखादा कोणी बरेच आयडी मॅनेज करत असेल तर पासवर्डच काय पण सदस्यनाव देखिल लक्षात ठेवणे, त्या आयडीची लिहिण्याची पध्दत लक्षात ठेवणे आणि वर याची आपल्या स्वत्:च्या आयडीशी गल्लत होऊ न देणे ..... हे सगळं वाटतं तसं सोपं नाही.
कुणी म्हणे ही असेल चोरी
कुणा वाटते असे माजोरी
जन्मभरीच्या श्वासाइतुके आठवले कळीनाम* (कळीनाम=पासवर्ड)
फुक्कट वाढले काम, देवा माझे फुक्कट वाढले काम!
९. अनुकूल-प्रतिकूल प्रतिसादाशिवाय आणखी एक अतिशय खुबीचे कार्य ड्यु करतात. बाफ वर आणण्याचे. लोकांनी दिलेल्या सग्गळ्या सग्गळ्या प्रतिसादांना धन्यवाद देऊन झाल्यानंतर तिसर्या-चौथ्या पानावर गेलेला बाफ वर कसा आणणार? तर ड्युआयकरवी प्रतिसाद देऊन.
तुच माय बाप बंधु तुच प्राणसखा
खाली गेलेल्या बाफाचा तर, तुच पाठीराखा
१०. कधी कधी चर्चेला/कथेला वेगळे किंवा मनाजोगते वळण ड्युआय देऊ शकतात. अशा परिस्थितीत केवळ लोकाग्रहास्तव ही कथा असे असे वळण घेत आहे असे म्हणता येते.
अग अग म्हशी अन मला कुठे नेशी |
तर हे असे ड्युआय्डी. कोणी घेतात, कोणी बरे-वाईटपणे वापरतात तर कोणी ओळखतात.
तुम्हा तो ड्युआय सुखकर हो!!!
त.टी. : इथे कोणीतरी खराच 'डुआय' आहे त्यांना ड्युली आणि सन्मानपूर्वक वगळण्यात यावे. 'डुआय' सॉरी हं.
आवडलं. श्लोक परत एकदा
आवडलं. श्लोक परत एकदा सावकाशीने वाचते. पण काही काही ठिकाणी डुआय खूपच दिसतात नी नेमक्या 'त्याच' ठिकाणी प्रतिक्रिया द्यायला आल्यासारखे टपलेले असतात हे खरंय अगदी.
मामी मस्त लिहिलय . मी तुमचा
मामी मस्त लिहिलय :). मी तुमचा ड्यु आय नाही तरिही अनुकूल प्रतिसाद देतेय. प्लीज नोटा बर
क्या बात है मामी! वा! भन्नाट
क्या बात है मामी! वा!
भन्नाट लिहीलयं तूम्ही!
हा हा हा... जबरी!!
हा हा हा... जबरी!!
मी पण नव्हे पण एकदम करेक्ट
मी पण नव्हे पण एकदम करेक्ट लिहिलंय!!
काय मस्त लिहिलय ! आता डु आयडी
काय मस्त लिहिलय ! आता डु आयडी काढून पुन्हा प्रतिसाद देतो !
लै भारी हो मामी! आणखी एक
लै भारी हो मामी!
आणखी एक लक्षण : 'वरिजिनल आयडीमुळे(च) डुआयला लिखाण करायला प्रोत्साहन मिळतं' असाही दावा असतो. (त्यात तथ्य आहेच म्हणा! )
मामी, बराच अभ्यास केलाय हो.
मामी, बराच अभ्यास केलाय हो. एकेकाळी तुंबळ युद्ध झालं होतं हो इथे. त्यात अनेक ड्यू आयड्यांनी आत्महत्या केल्या (मीच लावली होती ती आग. आता उत्साह नाही उरला ) अजूनही त्यापैकी काहि परत दिसतात. त्या कुणाच्या आहेत ते पण माहीत आहे मला. पण विचार करतो, असूदे.. (नाही नाही असूदे तसा नाही .. )
(No subject)
(No subject)
(No subject)
धमाल मामी.. माझा एकही डुआय
धमाल मामी..
माझा एकही डुआय नाही.
मॄण्मयी, छान मुद्दा! दिनेशदा,
मॄण्मयी, छान मुद्दा!
दिनेशदा, आत्महत्येचा किस्सा डिटेलमध्ये ऐकायला आवडेल.
त्याच ड्युआयड्या परत दिसतायेत म्हणजे काय चिवट आणि गेंच्याकाची लोकं आहेत.
अनिलभाई, हे म्हणजे 'आमची कुठेही शाखा नाही' सारखं वाटतयं.
सही मामी >>माझा एकही डुआय
सही मामी
>>माझा एकही डुआय नाही.
अनिलभाई म्हणजे तुमचे ते सगळे खरे आयडी आणि आमचे ते (सगळे-१) डु-आयडी??
ह्या डु आयडींना पाच
ह्या डु आयडींना पाच वर्षांपुर्वी कोण काय बोलले ते सुद्धा लक्षात असते.
त्यात काय सिंडे, ते सगळं कॉपी
त्यात काय सिंडे, ते सगळं कॉपी पेस्ट करुन ठेवत असतील ग.
सिंडे, तसले आय्डी नागराज
सिंडे, तसले आय्डी नागराज असतात डुख धरुन बसतात...
हो पण असे काही कॉपी पेस्ट
हो पण असे काही कॉपी पेस्ट केले आहे ते तर लक्षात ठेवावं लागत असेल ना
काही ठराविक आयडींना टार्गेट करणारे पण डु आयडी दिसतात. बदले की आग
मामी भारी , माझाही एकही डुआय
मामी भारी ,
माझाही एकही डुआय नाही.
सिंडे, तसले आय्डी नागराज
सिंडे, तसले आय्डी नागराज असतात डुख धरुन बसतात>>>
सही है मामु आपले मामी.
काही ठराविक आयडींना टार्गेट
काही ठराविक आयडींना टार्गेट करणारे पण डु आयडी दिसतात. बदले की आग>>> हो, हल्लीच बघितलाय की इथे
छान. १ -डु आयडी - दुतोंडी ५
छान.
१ -डु आयडी - दुतोंडी
५ - डु आयडी - पंचमुखी
असं वर्गीकरण करायला हरकत नाही.
आर्च काही काही आयडी / डु आयडी
आर्च काही काही आयडी / डु आयडी गटारतोंडी पण असतात.
अनिलभाई म्हणजे तुमचे ते सगळे
अनिलभाई म्हणजे तुमचे ते सगळे खरे आयडी आणि आमचे ते (सगळे-१) डु-आयडी?? >> पांच वर्ष एक महीन्यापुर्वी तु तुझ्या डु आयडीने भांडला होतास आठवत कां?
आर्च,
तु किती तोंडी?
भन्नाट!
भन्नाट!
अनिलभाई मला आता कार्तिक
अनिलभाई
मला आता कार्तिक कॉलिंग कार्तिक आठवतोय काही काही आयड्यांचं पण तसच असावं...
अनिलभाई, मी एकच. एकाच तोंडाने
अनिलभाई, मी एकच. एकाच तोंडाने बोलते त्यामुळे कुठल्याही पॉलीटिक्स्मध्ये भाग घेऊ शकत नाही.
आर्च, मी पण.
आर्च,
मी पण.
मालातै पण दिसत नाहीत ना हल्ली
मालातै पण दिसत नाहीत ना हल्ली कुठे!
भन्नाssssssट, मामी! पुन्हा
भन्नाssssssट, मामी!
पुन्हा एकदा वाचला...
Pages