ड्युआयड्यांची व्यवच्छेदक लक्षणे आणि मीमांसा

Submitted by मामी on 2 February, 2011 - 13:03

जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपले
तोची ड्युआय ओळखावा
भाव तेथेची जाणावा ||

वरील पंक्तीत वर्णन केल्याप्रमाणे अनेक ड्युआयडी सांप्रतकाळी मायबोलीवर कार्यरत आहेत.

अवचिता परिमळू
ड्युआयड्यांचा सुकाळू
मी म्हणे गोपाळू
झाला गे माये ||

कोणा ओरीजिनल कर्त्याकरवित्याच्या हातात या ड्युंच्या दोर्‍या पक्षी पासवर्ड असल्याने ते नाचवतील तेथे जाऊन हवा तसा प्रतिसाद देणे हेच ड्युंचे जिवीतकार्य.

तुच घडवीशी तुच मोडीशी
कार्य करवीशी तू, तूच मारीशी
हित तुझे तू यात साधिशी
मुखी कुणाच्या देशी लोणी
कुणा मुखी अंगार ||

ड्युआयड्यांचा जन्मच याकरता झालेला असतो. किंबहुना,

बिना हेतुने जे उले त्याले ड्युआय म्हनू नही
प्रतिसादाइना बोले त्याले ड्युआय म्हनू नही

पण या सर्व ड्युंची एक ठराविक लक्षणे असतात. ती चाणाक्ष वाचकांच्या सहज लक्षात येतात. ती लक्षणे खालीलप्रमाणे :

१. ड्युंचे सर्वांत महत्वाचे लक्षण म्हणजे त्यांचे वय. हे ड्यु माबोवर ताजे ताजे जन्माला येतात आणि येताच तडक नेमक्या बाफावर जाऊन नेमकी प्रतिक्रीया देतात.

उडाला उडाला ड्युआय तो उडाला
अधलेमधले ओलांडुनी नेमक्याशी गेला
नेमक्याशी जाऊनी प्रतिसाद दिला
नमस्कार माझा त्या ड्युआयडीला

याचाच एक फायनर-पॉईंट म्हणजे अशा ड्युआयडींचं वय त्यांच्या जन्मदात्यांपेक्षा लहान किंवा फार्फार तर बरोबरीचं असतं.

२. ड्युआयडींना विधिवत जन्माला घालणारे, पुढे डीएनए चाचणीत आपले स्वत:चे पालकत्च सिध्द होऊ नये म्हणून त्यांना वेगळं व्यक्तीमत्त्व बहाल करण्याचा खटाटोप करतात. यात भाषेकडे विशेष लक्ष पुरवले जातच पण त्याचबरोबर अवतरण चिन्हे वगळणे, लिखाणात मुद्दाम शुध्दलेखनाच्या चुका करणे, थोडक्यात प्रतिक्रीया देणे असे प्रकार असतात. पण होतं काय की नेमक्या याच प्रयत्नांमुळे असे ड्युआयडी ठळकपणे उठून दिसतात.

ड्युआय डोंगा परि, मेंबर नाही डोंगा
काय भुललासी वरलीया अंगा ||

३.एकदा का संशय आला तर ड्युआयड्यांच्या पावलांचे ठसे अभ्यासावेत. ते आपल्याला नेमक्या गुहेकडे घेऊन जातात. कारण ड्यु काही ठराविक व्यक्तींच्या बाफांनाच भेट देतात. अनुकुल प्रतिसाद देणारे आपल्या जन्मदात्याच्या बाफावर रेंगाळतात तर प्रतिकूल प्रतिसादाकरता जन्माला घातलेले शत्रुपक्षात घुसलेले दिसतात. जुन्या-जाणत्या मेंब्रांना ह्या खुणा चटकन ओळखता येतात. ड्युआयडींच्या पाऊलखुणाचा मागोवा ही जरा कष्टसाध्य आणि तपस्येनंतर प्राप्त होणारी गोष्ट आहे.

तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे |

४. जसे बाटगे जास्त कट्टर असतात तसे हे ड्युआय (विशेषतः अनुकूल प्रतिसादवाले) जन्मदात्याची अफाट स्तुती करतात. ही खरंतर आत्मस्तुती असते.

मन ड्युले मेरा तन ड्युले मेरे दिल का गया करार रे
जोर से बजाये बासुरीया ||

तर शिव्याशाप देणारे ड्यु, मनातील मळमळ पूर्णपणे बाहेर काढतात.

सोड झणी वाग्बाणा, चला जोरात हाणा
ठोक हा बाफ रे ड्युआयड्या ||

५. काही असतात हेरगिरी करणारे ड्यु. हे मुद्दाम शत्रुपक्षात मित्र म्हणून घुसतात आणि जमेल तसे नेम धरून वार करतात.

सत्रांदा उड्डाणे मित्रांच्या सदनी
करी डळमळ मित्रमंडळ, वंगाळ बोलूनी |

६. काही ड्यु मिश्किल असतात. आपल्याच नेहमीच्या दोस्तांना वेगळ्या रुपात भेटून ते मजा करतात. अर्थात दोस्त लोकही ओरिजनल डॉक्युमेंटचा अभ्यास केलेले असल्याने अशा ड्युंचे पितळ लवकरच उघडे पडते.

You can cheat some people all the time
You can cheat all people some time ...but
You cannot cheat all people all time!

७. ड्युआयडी बरेचदा थोड्याच काळाकरता येतात. धुमकेतूसारखे उगवतात आणि अचानकच मावळतातही.

आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती
बाफांसी टाकिली मागे, गतीसी तुळणा नसे

८. जर एखादा कोणी बरेच आयडी मॅनेज करत असेल तर पासवर्डच काय पण सदस्यनाव देखिल लक्षात ठेवणे, त्या आयडीची लिहिण्याची पध्दत लक्षात ठेवणे आणि वर याची आपल्या स्वत्:च्या आयडीशी गल्लत होऊ न देणे ..... हे सगळं वाटतं तसं सोपं नाही.

कुणी म्हणे ही असेल चोरी
कुणा वाटते असे माजोरी
जन्मभरीच्या श्वासाइतुके आठवले कळीनाम* (कळीनाम=पासवर्ड)
फुक्कट वाढले काम, देवा माझे फुक्कट वाढले काम!

९. अनुकूल-प्रतिकूल प्रतिसादाशिवाय आणखी एक अतिशय खुबीचे कार्य ड्यु करतात. बाफ वर आणण्याचे. लोकांनी दिलेल्या सग्गळ्या सग्गळ्या प्रतिसादांना धन्यवाद देऊन झाल्यानंतर तिसर्‍या-चौथ्या पानावर गेलेला बाफ वर कसा आणणार? तर ड्युआयकरवी प्रतिसाद देऊन.

तुच माय बाप बंधु तुच प्राणसखा
खाली गेलेल्या बाफाचा तर, तुच पाठीराखा

१०. कधी कधी चर्चेला/कथेला वेगळे किंवा मनाजोगते वळण ड्युआय देऊ शकतात. अशा परिस्थितीत केवळ लोकाग्रहास्तव ही कथा असे असे वळण घेत आहे असे म्हणता येते.

अग अग म्हशी अन मला कुठे नेशी |

तर हे असे ड्युआय्डी. कोणी घेतात, कोणी बरे-वाईटपणे वापरतात तर कोणी ओळखतात.

तुम्हा तो ड्युआय सुखकर हो!!!

त.टी. : इथे कोणीतरी खराच 'डुआय' आहे त्यांना ड्युली आणि सन्मानपूर्वक वगळण्यात यावे. 'डुआय' सॉरी हं.

गुलमोहर: 

"अनुल्लेख करणारे ते ओरिजनल, अन बाकी अनुल्लेख करत नाहीत ते सगळे ड्युआय"<<<<
कुठे फेडशील हे पाप लिंब्या....
एकतर तुझा कधी अनुल्लेख करत नाही त्याचे उपकार मानायचे सोडून तू हे असले आरोप करतोस....

दिनेशदा, आता जरा इथल्या "बांडगुळांची" शास्त्रीय, उपशस्त्रीय नावं बाहेर काढा....... Proud

तूम कुदळसे खणोच...... मै फावडा लेके पीछे पीछे आताय......... Biggrin
मामी, ठमे जरा घमेली घेऊन या ग जोडीला... Rofl Lol Proud

१)एका व्यक्तीला स्वतःच्या काही कविता पोस्ट करायच्या होत्या इथे, त्याला भेटलेले बरेच लोक इथे आहेत तिथे त्यांच्याशी बोलताना आणी इथल्या काही कवितांवर प्रतिसाद देताना तो मायबोलीच्या काही अचाट आणी अफाट कविना नावे ठेवण्यात पुढे असायचा... त्याला भिती होती की त्याने एखादी चांगली कविता पोस्ट केली तरी त्याने नावे ठेवलेले लोक त्याच्या कवितेवर तुटुन पडतील... त्याने एक डुय आयडी घेतला आणी गेल्या ४ वर्षापासुन तो माबोवर ड्यु आयडी ने कविता प्रकाशीत करतो आहे... सांगा बरे कोण तो???????
२)एका मुलाला माबोवर आल्या आल्या इथल्या एका सतत वाहत्या बीबीवर अनुल्लेख करुन हुट आउट केले गेले.. त्याने एक महिन्यानंतर लिंगबदल करुन कोतबो वर एका काल्पनीक दुखा:चा टाहो फोडला आणी भरपुर सहानभुतीच्या आणी उपाय सांगणार्‍या प्रतिक्रिया मिळाल्या... दोन्ही आयडी नंतर गायब झाले... सांगा बरे कोण तो/ती????
क्रमशः

दिनेशदा. Proud

Rofl : Rofl Rofl Rofl

बाडगुळाचा दाखला अगदि सही. या टोल्याने गोरा (?)राम काळाठिक्कर पडला नि सारवासारव करायला आला. Biggrin

@मामी

-----------------------^--------------------- Lol

मामी खूपच छान!
ड्युअल आय डी बद्दल मला जास्त माहीत नाही
पण लिहिलेले फार रन्जक आहे.

करमणूकीबद्दल धन्यवाद!

बाप रे... मामी..
एकदम सहीच बरं का..!
माझाही डुआयडी वाटायला लागल्याने मी फोटो अप्लोड केला हो.. Happy

छान! काही म्हणी

एक ना लॉगिन भराभार डुआय

नाकापेक्षा डुआय जड

झाकली मुठ दीड्शहाण्या डुआयची

आपला तो चाहता दुसर्याचा डुआय

लेखकामागुन डुआय!

ठकु | 3 February, 2011 - 08:22
बाप रे... मामी..
एकदम सहीच बरं का..!
माझाही डुआयडी वाटायला लागल्याने मी फोटो अप्लोड केला हो..

>>>>

ठके तुझ्या फोटुत तु कमी आणि समुद्र जास्त दिसतोय!
दिवे घे!

मामी, कहा है आपके चरण? ग्रेट. काही बद्धकोष्ठ झालेले डू आयडी महिनो महिने समाधी लावून बसलेले असतात. जरा चळले किंवा जळले की एखाद्या विशिष्ट आय डी च्या लिखाणावर दाबून धरलेले व तुंबलेले पोट मोकळे करतात.
डू आयडी चा दुसराही एक प्रकार आहे. तो म्हणजे खर्‍या आयडींचे काही भक्तगण एकदम पिल्ले दिल्यासारखी भरपूर आयडी प्रसवतात व आपल्या 'अहो' किंवा 'अगं' च्या लिखाणावर तोंड फाटेपर्यंत लिहितात. निवडक १० मधे मुद्दाम वर आणतात. मात्र त्याच वेळी बाकीच्यांचे लिखाण कसे भिकार हे पण सोबत चाणाक्षपणे मुद्दाम सांगतात. स्वतःच्याच वि पू मधे स्वतःच वेगवेगळ्या आयडीने केलेल्या संवादाचा केविलवाणा प्रयत्न बघण्यासारखा असतो.

ठकु | 3 February, 2011 - 08:39
अगं बाई..!
परत नवीन फोटो लाऊ की काय आता..?
>>
नको असुदे !
असुदे पण आयडी आहे काय म्हणावे आता?

आई गं..

छातीत एक कळ हल्कीशी उठली
मीच का हो तो ही भीती वाटली
घाबरूनी अति गात्रे गळाली
कुठे गेली ती अर्धी बाटली

छातीत एक कळ हल्कीशी उठली
मीच का हो तो ही भीती वाटली
घाबरूनी अति गात्रे गळाली
कुठे गेली ती अर्धी बाटली


अग्ग आईगं.
५० बुडवले का कौंन्सिलरसारख्या दिसणार्‍या माणसाने. Rofl
घाबरु नकोस. परत वाट पहा.......
सोहळ्याची Lol

Rofl
कुछ कुछ मालूम है ..:फिदी:

सॉरी ड्युआय :फिदी:.. तुमच्याबद्दल नाही हो.. ते ते दुसरे आहेत ना त्यांच्याबद्दल. तुमचं माहीत नव्हतं हो खरच... Lol

मामी, खरच लाजवाब लिहिलंय.
मला ड्युआयचा इतिहास माहित नाही. पण तुम्ही लेखनात वापरलेले श्लोक, काव्यपंक्ती, म्हणी सर्वच झकास आहे. फार फार आवडले.

Pages