ड्युआयड्यांची व्यवच्छेदक लक्षणे आणि मीमांसा

Submitted by मामी on 2 February, 2011 - 13:03

जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपले
तोची ड्युआय ओळखावा
भाव तेथेची जाणावा ||

वरील पंक्तीत वर्णन केल्याप्रमाणे अनेक ड्युआयडी सांप्रतकाळी मायबोलीवर कार्यरत आहेत.

अवचिता परिमळू
ड्युआयड्यांचा सुकाळू
मी म्हणे गोपाळू
झाला गे माये ||

कोणा ओरीजिनल कर्त्याकरवित्याच्या हातात या ड्युंच्या दोर्‍या पक्षी पासवर्ड असल्याने ते नाचवतील तेथे जाऊन हवा तसा प्रतिसाद देणे हेच ड्युंचे जिवीतकार्य.

तुच घडवीशी तुच मोडीशी
कार्य करवीशी तू, तूच मारीशी
हित तुझे तू यात साधिशी
मुखी कुणाच्या देशी लोणी
कुणा मुखी अंगार ||

ड्युआयड्यांचा जन्मच याकरता झालेला असतो. किंबहुना,

बिना हेतुने जे उले त्याले ड्युआय म्हनू नही
प्रतिसादाइना बोले त्याले ड्युआय म्हनू नही

पण या सर्व ड्युंची एक ठराविक लक्षणे असतात. ती चाणाक्ष वाचकांच्या सहज लक्षात येतात. ती लक्षणे खालीलप्रमाणे :

१. ड्युंचे सर्वांत महत्वाचे लक्षण म्हणजे त्यांचे वय. हे ड्यु माबोवर ताजे ताजे जन्माला येतात आणि येताच तडक नेमक्या बाफावर जाऊन नेमकी प्रतिक्रीया देतात.

उडाला उडाला ड्युआय तो उडाला
अधलेमधले ओलांडुनी नेमक्याशी गेला
नेमक्याशी जाऊनी प्रतिसाद दिला
नमस्कार माझा त्या ड्युआयडीला

याचाच एक फायनर-पॉईंट म्हणजे अशा ड्युआयडींचं वय त्यांच्या जन्मदात्यांपेक्षा लहान किंवा फार्फार तर बरोबरीचं असतं.

२. ड्युआयडींना विधिवत जन्माला घालणारे, पुढे डीएनए चाचणीत आपले स्वत:चे पालकत्च सिध्द होऊ नये म्हणून त्यांना वेगळं व्यक्तीमत्त्व बहाल करण्याचा खटाटोप करतात. यात भाषेकडे विशेष लक्ष पुरवले जातच पण त्याचबरोबर अवतरण चिन्हे वगळणे, लिखाणात मुद्दाम शुध्दलेखनाच्या चुका करणे, थोडक्यात प्रतिक्रीया देणे असे प्रकार असतात. पण होतं काय की नेमक्या याच प्रयत्नांमुळे असे ड्युआयडी ठळकपणे उठून दिसतात.

ड्युआय डोंगा परि, मेंबर नाही डोंगा
काय भुललासी वरलीया अंगा ||

३.एकदा का संशय आला तर ड्युआयड्यांच्या पावलांचे ठसे अभ्यासावेत. ते आपल्याला नेमक्या गुहेकडे घेऊन जातात. कारण ड्यु काही ठराविक व्यक्तींच्या बाफांनाच भेट देतात. अनुकुल प्रतिसाद देणारे आपल्या जन्मदात्याच्या बाफावर रेंगाळतात तर प्रतिकूल प्रतिसादाकरता जन्माला घातलेले शत्रुपक्षात घुसलेले दिसतात. जुन्या-जाणत्या मेंब्रांना ह्या खुणा चटकन ओळखता येतात. ड्युआयडींच्या पाऊलखुणाचा मागोवा ही जरा कष्टसाध्य आणि तपस्येनंतर प्राप्त होणारी गोष्ट आहे.

तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे |

४. जसे बाटगे जास्त कट्टर असतात तसे हे ड्युआय (विशेषतः अनुकूल प्रतिसादवाले) जन्मदात्याची अफाट स्तुती करतात. ही खरंतर आत्मस्तुती असते.

मन ड्युले मेरा तन ड्युले मेरे दिल का गया करार रे
जोर से बजाये बासुरीया ||

तर शिव्याशाप देणारे ड्यु, मनातील मळमळ पूर्णपणे बाहेर काढतात.

सोड झणी वाग्बाणा, चला जोरात हाणा
ठोक हा बाफ रे ड्युआयड्या ||

५. काही असतात हेरगिरी करणारे ड्यु. हे मुद्दाम शत्रुपक्षात मित्र म्हणून घुसतात आणि जमेल तसे नेम धरून वार करतात.

सत्रांदा उड्डाणे मित्रांच्या सदनी
करी डळमळ मित्रमंडळ, वंगाळ बोलूनी |

६. काही ड्यु मिश्किल असतात. आपल्याच नेहमीच्या दोस्तांना वेगळ्या रुपात भेटून ते मजा करतात. अर्थात दोस्त लोकही ओरिजनल डॉक्युमेंटचा अभ्यास केलेले असल्याने अशा ड्युंचे पितळ लवकरच उघडे पडते.

You can cheat some people all the time
You can cheat all people some time ...but
You cannot cheat all people all time!

७. ड्युआयडी बरेचदा थोड्याच काळाकरता येतात. धुमकेतूसारखे उगवतात आणि अचानकच मावळतातही.

आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती
बाफांसी टाकिली मागे, गतीसी तुळणा नसे

८. जर एखादा कोणी बरेच आयडी मॅनेज करत असेल तर पासवर्डच काय पण सदस्यनाव देखिल लक्षात ठेवणे, त्या आयडीची लिहिण्याची पध्दत लक्षात ठेवणे आणि वर याची आपल्या स्वत्:च्या आयडीशी गल्लत होऊ न देणे ..... हे सगळं वाटतं तसं सोपं नाही.

कुणी म्हणे ही असेल चोरी
कुणा वाटते असे माजोरी
जन्मभरीच्या श्वासाइतुके आठवले कळीनाम* (कळीनाम=पासवर्ड)
फुक्कट वाढले काम, देवा माझे फुक्कट वाढले काम!

९. अनुकूल-प्रतिकूल प्रतिसादाशिवाय आणखी एक अतिशय खुबीचे कार्य ड्यु करतात. बाफ वर आणण्याचे. लोकांनी दिलेल्या सग्गळ्या सग्गळ्या प्रतिसादांना धन्यवाद देऊन झाल्यानंतर तिसर्‍या-चौथ्या पानावर गेलेला बाफ वर कसा आणणार? तर ड्युआयकरवी प्रतिसाद देऊन.

तुच माय बाप बंधु तुच प्राणसखा
खाली गेलेल्या बाफाचा तर, तुच पाठीराखा

१०. कधी कधी चर्चेला/कथेला वेगळे किंवा मनाजोगते वळण ड्युआय देऊ शकतात. अशा परिस्थितीत केवळ लोकाग्रहास्तव ही कथा असे असे वळण घेत आहे असे म्हणता येते.

अग अग म्हशी अन मला कुठे नेशी |

तर हे असे ड्युआय्डी. कोणी घेतात, कोणी बरे-वाईटपणे वापरतात तर कोणी ओळखतात.

तुम्हा तो ड्युआय सुखकर हो!!!

त.टी. : इथे कोणीतरी खराच 'डुआय' आहे त्यांना ड्युली आणि सन्मानपूर्वक वगळण्यात यावे. 'डुआय' सॉरी हं.

गुलमोहर: 

लाजो Biggrin बर्‍यापैकी ड्यु आयडींचा वावर आहे इथे. मामी काय गं राखीव चराईत क्षेत्र दिलं काय ड्यु आयडी सारख्या गुरांना चरायला अन त्यांच्या मालकांना वळायला. Proud

मला चक्क, सुषमा श्रेष्ठ चे गाणे आठवले.
झाडावरती गेंद लटकती, शेतामधुनी बॅटी
तिथल्या वेली गाणी गाती....

म्हणजे तिथली जागूतै, शुद्ध शाकाहारी असेल
तर बेफिकिर एका दिवशी एकच काहितरी लिहितील,
दिनेशदा, उगाच सगळ्यांना छान, सुंदर म्हणणार नाहीत,
जिप्सी चित्र काढेल, तर मार्को पोलो, रोज एक पोस्ट करेल,
एच्चेच प्रोफाईल मधे आपला फोटो टाकेल,
साधना वाडी, पारसिक आणि आंबोलीच्या बाहेरचे काहितरी लिहिल,
पक्का भटक्या, एका जागी स्थिर बसेल,
तर यो रॉक्स लावणी सोडून, माळकरी बुवा बनेल
वर्षू नील आणि सानी, सगळ्यांवर रागावून बोलतील,
लिंबू भाऊ झाले गेले विसरुन जातील.
दक्षिणा हेलनसारख्या चंट नट्यांवर न लिहिता, लिला चिटणीस वर लेख लिहिल..

काय पण स्वप्नरंजन ना !

दिनेशदा, झक्कास! Happy

हल्ली जरा जास्तच खुशमस्कर्‍या ड्युआयड्यांचे पीक आले आहे. या ड्युआयड्यांच्या प्रतिसादांना बिंदु मानले आणि जोडले तर तयार होणारा किरण सरळ एका दिशेकडे जाताना दिसेल.

मात्र या नवनवोन्मेषशालिनी ड्युआय्ड्यांचे शुध्दलेखन इतके वाईट असते, इतके वाईट असते की ते फारच उठून दिसते. संबंधितांनी याबाबत काळजी घ्यावी. Happy

तीन-चार व्यक्ती मिळून मायबोलीवर एकच आयडी घेण्याचीही शक्यता आहे का ? विविध क्षेत्रातील विविध विषयांवरचे एकाच आयडीने अधिकारवाणीने व कलात्मकतेने सादर केलेले पोस्ट वाचून/पा।हून कांही वेळा मी अवाक होतो, म्हणून ही शंका ! Wink

भाऊ, या विषयावर माझा अभ्यास नाही. मला वाटतं ही शक्यता तुम्हीच पहिल्यांदा मांडलीये. आपण यावर सखोल वाचन आणि मनन करून प्रकाश पाडावा ही विनंती. Happy

तीन-चार व्यक्ती मिळून मायबोलीवर एकच आयडी घेण्याचीही शक्यता आहे का ? >> हो आहे. मला असा एक आयडी माहीत आहे. पण इथे सांगणे ठिक होणार नाही. Happy
रच्याकने, त्या आयडीशी माझा संबंध नाही.

विविध क्षेत्रातील विविध विषयांवरचे एकाच आयडीने अधिकारवाणीने व कलात्मकतेने सादर केलेले पोस्ट वाचून/पा।हून कांही वेळा मी अवाक होतो,>>> अशा लोकांनी 'अच्युत गोडबोले' असा ड्युआयडी घ्यावा, शोभून दिसेल Proud

आगावा Biggrin Lol

मात्र या नवनवोन्मेषशालिनी ड्युआय्ड्यांचे शुध्दलेखन इतके वाईट असते, इतके वाईट असते की ते फारच उठून दिसते. संबंधितांनी याबाबत काळजी घ्यावी.
>>>>

Rofl ते हेतुपुरस्सरच असतं मामी......

बरेच दिवस मला "नायगावकर काका" व्हायची ईच्छा होतेय........ म्हणजे एक पोस्ट लिहून होईपर्यंत दोन चार पानं पुढे गेलेली असतील..... Proud

ते माहितेय रे भुंग्या. पण इतकं ऑब्वियस होतय की, विशेष सुचना देण्यावाचून राहवलं नाही. विशिष्ट बाफांवरचे 'ते' विशिष्ट आयडी आणि त्यांचे प्रतिसाद वाच. खुप करमणूक होते. आणि माणुस प्रसिध्दीकरता कुठल्या थराला जाऊ शकतो याचा तौलनिक मानसशास्त्रीय अभ्यास करता येतो.

Biggrin

तौलनिक मानसशास्त्रीय अभ्यास
>>>>

मामे, सकाळ सकाळ कसले ठेवणीतले शब्द काढतेयस...... Rofl

मामी, ड्युआयडी मोडमध्ये गेल्यावर इतर सगळे आयडी खुळे वाटू लागतात ग...... Wink

आगाऊ, गोडबोले साहेब एकट्याने लिहित नाहीत कधी, नेहमी कुणाकडून तरी लिहून घेतात आणि मग टिळा लावतात.
भाऊ, फारच शंकेखोर हो तूम्ही !

>>>>> लिंबू भाऊ झाले गेले विसरुन जातील. <<<<<
कस्च दिनेशदा? ते कस शक्यहे?
आत्म्याच्या जन्मपुनर्जन्माच्या बीबीवर तर मला याच काय, मागल्या काही जन्मातल्या घटनान्चा देखिल धान्दोळा घ्यावा लागणारे, कस काय काही विसरुन चालेल? Wink Proud

बायदिवे, मी अजुन "दारु" (दारु = मदिरा, फटाके नव्हेत) वर काहीच कस लिहील नाहीये इत्क्या वर्षात? Biggrin

दारू बद्दल म्हणजे वाईन बद्दल ना ? ती घरातल्या घरात कशी करायची, त्यातले रसायनशास्त्र, झालंच तर घरच्या घरी स्पार्कलींग वाईन कशी करायची, हे अगदी सविस्तररित्या इथे कुणी Dineshvs आयडीने लिहिले होते. माझा समज होता, कि ते लिंबूभाऊच !!

<<भाऊ, या विषयावर माझा अभ्यास नाही. मला वाटतं ही शक्यता तुम्हीच पहिल्यांदा मांडलीये. आपण यावर सखोल वाचन आणि मनन करून प्रकाश पाडावा ही विनंती. >> मामी, "सखोल वाचन आणि मनन" याचा माझा जरा वांदाच आहे म्हणून तर इथे शंका उपस्थित केली ! Wink
<<भाऊ, फारच शंकेखोर हो तूम्ही !>> दिनेशदा, कांही आयडींच्या बाबतीत वाटणारा आत्यंतिक आदर व्यक्त करण्यापलिकडे या शंकेमागे कसलाही हेतू नाही, हे तुमच्यातरी लक्षांत आलंच असेल !

Lol

भाऊ, पणशीकरांसारख "तोच मी" म्हणावसं वाटलं होतं खरं. मग वाटलं भाईना काय वाटेल ?

चेष्टा मोड ऑफ,
लहान आहे हो मी, वयाने, अनुभवाने सगळ्याच बाबतीत
चेष्टा मोड ऑन....

मला काही जुने डूआय आठवले... लाश, ममी, हडळ आणि काय काय... त्यांनी आपलं मन मोकळं केलं नाहीय अजून... मेलेले असले म्हणून काय झालं. त्यांनाही मन आहेच... Biggrin

दिनेशदा, समझनेवाले समझ गये, हे खूप झालं कीं ! [ आणि हो, कुणाचीही गुणवत्ता वयाची फूटपट्टी लावून मोजायचं वय मी तर केंव्हाच ओलांडलंय !]
<<मेलेले असले म्हणून काय झालं. त्यांनाही मन आहेच... >> खरंय. इथं यायला फक्त मन मेलेलं नसलं कीं झालं ! Wink

दिनेशदा, पुन्हा एकदा ______/\______

मस्त माहिती आणि रेसिप्या दिल्यायत तुम्ही. ही लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. आता डीटेलमध्ये वाचते.

Pages