मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम

Submitted by रैना on 5 January, 2011 - 23:48
ठिकाण/पत्ता: 
लोकमान्य साहित्य सेवा संघ. विलेपार्ले पूर्व

मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शन- पार्ले

लेखिका कविता महाजन यांच्या मुलाखतीने कार्यक्रमांचे उद्घाटन होणार असून स्नेहा अवसरीकर आणि पत्रकार मुकुंद कुळे त्यांची मुलाखत घेतील. ८ जानेवारी रोजी विजय केंकरे हे ‘रंगभूमी, छोटा पडदा ते मोठा पडदा’ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांची मुलाखत घेणार आहेत. ९ जानेवारी रोजी द्वारकानाथ संझगिरी हे उद्योजक किशोर अवर्सेकर आणि रवींद्र प्रभुदेसाई यांची मुलाखत घेतील, तर १० जानेवारी मुकुंद टाकसाळे हे गीतकार स्वानंद किरकिरे यांची मुलाखत घेणार आहेत. ११ जानेवारी रोजी ‘गे आणि लिव्ह इन रिलेशनशिप’ या विषयावर परिसंवाद होणार असून चिन्मय केळकर, उज्ज्वला कद्रेकर आणि अनिल कदम हे त्यात सहभागी होणार आहेत. १२ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’चे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेमार आहेत. तर १३ जानेवारी रोजी ‘भाषा बदलते आहे’ या परिसंवादात प्रवीण दवणे, ‘लोकसत्ता’च्या वरिष्ठ सहसंपादक शुभदा चौकर, प्रदीप भिडे, मनस्विनी लता रवींद्र आपले विचार मांडतील. १४ जानेवारी रोजी ‘बदलती जीवनशैली आणि आरोग्य’ या विषयावर मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांची सुचित्रा इनामदार या मुलाखत घेणार आहेत. १५ जानेवारी रोजी ‘क्रिकेट, वल्र्डकप आणि भारत’ या चर्चासत्रात द्वारकानाथ संझगिरी, प्रवीण आमरे आणि विनोद कांबळी सहभागी होणार आहेत. १६ जानेवारी रोजी आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या मुलाखतीने ‘मॅजेस्टिक’ गप्पांची सांगता होणार आहे. याशिवाय सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

लोकसत्तेतील बातमी.

माहितीचा स्रोत: 
वर्तमानपत्र, इतर
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Thursday, January 6, 2011 - 21:00 to शनिवार, January 15, 2011 - 21:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या मुंबईत चालू असलेले कार्यक्रम

  1. स्ट्रँन्डचे पुस्तकप्रदर्शन. कोणाकडे बातमी असेल तर दुवाद्या कृपया. सुंदराबाई हॉल. चर्चगेट
  2. नाबार्डचे 'महालक्ष्मी सरस' हस्तकला प्रदर्शन- ३ फेब्रुवारी २०११ पर्यंत. लीलावती रुग्णालया समोरील मैदानावर. बान्द्रा
  3. राष्ट्रीय हातमाग प्रदर्शन. ९ फेब्रुवारी २०११ पर्यंत. लीलावती रुग्णालयासमोरील मैदानावर. बान्द्रा
  4. Queer Azaadi Mumbai Pride March 29 Jan 2011 http://queerazaadi.wordpress.com/2011/01/13/queer-azaadi-mumbai-march-2011/

अरे हा धागा फक्त मॅजेस्टिक गप्पा गटग करता आहे का? बाफच्या प्रस्तावनेपरून तसे वाटतय. असल्यास मी माझी पोस्ट उडवतो.

नाही माधव. राहू द्या इथेच. आधी मॅजेस्टिक गप्पांसाठी काढला होता. पण आता नाव बदलले आणि इथेच सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती टाकते आहे.

स्ट्रँड्च्या दुव्याबद्दल धन्यवाद. Happy

साधनाने 'निसर्गाच्या गप्पां'वर दिलेली बातमी ...

http://www.bnhs.org/

इथे Brunch with Birds at Navi Mumbai ह्या कार्यक्रमाला मी जाणार आहे. असाच ठाण्यालाही कार्यक्रम आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा..

चतुरंग, सवाई एकांकीका. कालीदास नाट्यगृह, मुलुंड, मुंबई.
२५ जानेवारी २०११ रात्रौ २०.२५ ते २६ जानेवारी पहाटेपर्यंत.
गेल्या २४ वर्षांपासून चतुरंगतर्फे हा कार्यक्रम होत असतो.
यावर्षी राज्यभरातील सात सर्वोतकृष्ठ एकांकीका आहेत. इच्छुकांनी लाभ घ्यावा..
(अर्थात टिकीटे मिळण्याबाबत शंकाच आहेत, प्रयत्न करून पाहणे)

http://www.google.co.in/url?sa=t&source=web&cd=1&sqi=2&ved=0CBYQFjAA&url...

मला हा धागा आजच दिसला.. इतके दिवस दडून होता का? आणि मॅजेस्टिक गप्पांच्या निमित्ताने गटग पण होते का?
मॅजेस्टिकच्या बरोबरीने बोरिवलीत शब्द गप्पा होत्या, पुस्तक प्रदर्शनही होते.
श्रुती सडोलीकर काटकर , सिंधुताई सपकाळ, डॉ नंदू लाड, नव्या जाणिवेच्या कथाकार (प्रज्ञा दया पवार, प्रतिमा जोशी, मोनिका गजेंद्रगडकर), डॉ सुरेखा दळवी आणि उल्का महाजन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुलाखती होत्या. सोशल नेटवर्किंग, इच्छामरणाचा कायदा, पाठ्यपुस्तकांचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम याविषयांवर परिसंवाद होते.
कार्यक्रमाला नाही गेलो, पण प्रदर्शनाला जाऊन पुस्तके लुटून (संक्रातीचे दिवस आहेत म्हणून) आलो. त्यानिमित्त अचानक एक छोटंस चौकोनी गटगही झालं!

नव्या मुंबईत नमुमपातर्फे फळाफुलांचे प्रदर्शन भरले आहे. स्थळ - ऑर्बीटमॉलसमोरचे एक्ष्हिबिशन ग्राऊंड, वाशी. फेब ५ आणि ६ (आज शेवटचा दिवस) रात्री १० पर्यंत.

कोणी काळा घोडा महोत्सवाला येणार आहे का ह्या विकांताला? ५ जरी लोकांनी इथे पोस्ट टाकल्या तरी कार्यक्रमाचा धागा काढुयात.

मला शनिवारी/रविवारी ४ वाजेपासून कधीही - ही वेळ सोयीची आहे. अगदीच जमणार नसेल तर शनिवारी दुपारीही चालू शकेल.

मलाही शनिवारी-रविवारी कधीही जमू शकेल. शनिवारी दुपारी असेल तर मी तासभर येऊ शकेन, संध्याकाळी ६ नंतर कितीही वेळ, रविवारी कुठल्याही वेळी कितीही वेळ येऊ शकेन. Happy

हो कारे? Sad
बरं तसं करुयात. पण पब्लिक आहे कुठे. तिघीत (माया, मंजू आणि मी) मिळुन काय पाचतीनदोन खेळायचाय का तिथे? Proud

तू येणारेस का?
भ्रमर, योरॉक्स, नीलू, छत्रेकाकु, नीधप, शर्मिलाफडके,सुजा,मन्या,बित्तु,पाटील,मयुरेश,योडी कोणी येणार आहे का ?

आमच्या घरचे कदाचित येणार आहेत रविवारी पण मी नाही....

गेलात तर sheepstop.com च्या टी-शर्ट स्टॉलला नक्की भेट द्या रे.. तिथले सगळे टी-शर्ट आमच्या वर्कशॉपमधे प्रिंट केलेले आहेत...

शनिवार कधिही चालेल पण संध्याकाळी उशिरा खुपच जास्त गर्दी होते. तसेच मी या लिस्ट मधल्या कुणालाच प्रत्यक्षात भेटलो नाहिये , शक्य असेल तर जो कुणी कोऑर्डीनेट करणार असेल त्याचा मोबाईल नं संपर्कातुन प्लीज द्या.

पाटिल ज्या गर्दीतून हास्याचे फवारे उडताना दिसतील तीच मायबोलीची टोळी समजावी Wink

भ्रमा नाही येणार आणि योरॉक्स नाही आला तर माझ रद्द होणार Sad

योरॉक्स नाही आला तर>>>> त्याच्या झेरॉक्सला घेऊन ये... हा.का.ना.का.

तुमच्या अशा टांगारूपणामुळे मला हे असे फा.जो. सुचताहेत Angry

>>भ्रमा नाही येणार आणि योरॉक्स नाही आला तर माझ रद्द होणार >> माणसाणं सरळ सांगावं मला जमत नाही ते.
माझं ५०-५०.
हो रैना दुपारनंतर प्रचंड गर्दी असते. मी गेल्या रविवारी जाऊन आले पण संध्याकाळी तेव्हा पाहिले. आपटतात माणसं एकमेकांवर Happy
हिरकू तो स्टॉल तुमचा का? मस्त होता. Happy
अजून एक मराठी ग्राफिटी टी शर्टचा पण स्टॉल तोही जाम आवडला.

रैना, आयडिया मस्तय!
मी आधीच दोनदा जाऊन आलोय. वीकान्ताला मी बाहेरगावी जाईन कदाचित!
फेश्टिव्हलची १३ तरीख लाश्ट आहे असे ऐकले.
मी मुंबईत असेन तर नक्की येण्याचा प्रयत्न करेन.
धन्यवाद!

त्याच्या झेरॉक्सला घेऊन ये... हा.का.ना.का. >>> जल्ला मंग माझी का.कॉ. पाठवून दिली तर नाही का चालणार :p
काय शेपटांची गाठ मारलीय की काय दोघांच्या >>> Lol

बित्तू... चेक मेल.

माझी सध्या लंच मधे रोजच काला घोडा फेस्ट. वारी चालू आहे. बहुतेक गोष्टी महाग आहेत (माझं मत). मी लेकीसाठी पतंगाच्या शेप मधली सॅक घेतली. कल्पक आणि वाजवी वाटली

मी उद्याच जाणारे मोस्टली. विकेंडला गेले होते गेल्यावर्षी आणि वैतागून आले. आणि बहुतेक माझा विकेंड पुण्यात असणारे. म्हणून विकडे आणि दुपार ठरवतेय. पण काही बदल झाला तर मी येईन मग सगळ्यांबरोबर.

Pages