बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या शुभमुहूर्तावर मा. सौ. रैना तैंनी अनिशातैंनी विचारलेल्या एका गहन प्रश्नाला उत्तरादाखल स्वयंपाक करण्याच्या विविध पातळ्यांचा सिलॅबस लिहीण्याचे महान कार्य केले आहे.. तो सिलॅबस सर्व तैंना तसेच दादांना उपयोगी पडावा म्हणून त्याचे संकलन करुन ठेवले आहे... तेच इथे सगळ्यांच्या संदर्भासाठी डकवत आहे..

त्यांनी शेवटच्या भागात काही विषेश टीप दिली आहे.. आणि त्याबद्दल सौ. पौर्णिमातैंनी सौ. रैनातैंचा पेशल गौरव केला आहे...

तर काहीसा संगीताच्या अंगाने जाणारा हा स्वयंपाकाच्या सिलॅबसचा नजराणा सर्वांसाठी...

रैना | 13 January, 2011 - 12:01

हे पा अनीशा तै

चहा, कॉफी, मॅगी, अंड उकडणे, खिचडी, पॉपकॉर्न वगैरे- एलिमेंटरी प्रथमा माय डियर. याला गॅस पेटविणे एवढेच करता येणे आवश्यक आहे. ही लोकं सर्वात जास्त बडबड करतात आणि पुरुष असतील तर समानतेच्या गप्पा मारतात. उपाखफा म्हणुन सोडुन द्यावे.

लिहु पुढचे?

रैना | 13 January, 2011 - 12:07

एलिमेंटरी लेव्हल द्वितिया
बेसिक फोडण्या- बेसिक म्हणजे काय? तर सगळ्यात आपले हिंगमोहरीहळद द्या ढकलुन. बरीवाईट कशीही चिरलेली भाजी चालते. कधीकधी भेंडीच्या भाजीत पाणी वगैरे जावईशोध लागतात पण दॅट इज ओके.
या लोकांना एव्हाना एकाच प्रकारच्या एडिबल भाज्या करता येतात. आणि हेही लोकं पुरुष असतील तर ज्योतिबाफुल्यांच्या थाटात गप्पा मारतात. बायका असतील तर मनातून खट्टु होत, आम्ही नै बै स्वयंपाकाच्या जंजाळात पडत अशा गप्पा मारतात.
तर..
इथे पोळ्या करिक्युलमला लागतात. बर्‍या वाईट चिवट कशाही चालतील. पोळीसदृश दिसणारे काहीही चालेल. मार्क्स प्रयत्नांना दिले जातील एंड प्रॉडक्टला नाही.

लिहु पुढे?

रैना | 13 January, 2011 - 12:12

एलिमेंटरी लेव्हल तृतिया
४० पदार्थ रोजच्या जेवणातले आले म्हणजे पुरे. जास्त अपेक्षा नाही.
रस्सा भाज्या, सुमारे २० मिनीटात होणारी कुठलीही पाकृ चालेल. फार घाट नको. पूर्वतयारी नको.

यानंतर जरा कुठे स्थिर सूर लागतील. बेसिक लय समजेल. मग वळुया बडाखयालाकडे.

रैना | 13 January, 2011 - 12:20 नवीन

इंटरमिडीयेट लेव्हल प्रथमा
आता जरा रियाज लागतो. कोमल सुरांवर मेहनत पाहीजे. गळ्यात खूप नाही तरी किंचीत फिरत आली पाहीजे.

ठेवणीतल्या पदार्थांकडे वळावे.
वेगवेगळ्या प्रकारचे लाडु
आणि काँम्प्लेक्स भाज्या. ओके?
दही, लोणी, तूप, चक्का, श्रीखंड, दुधाचे पदार्थ, बेसिक खीरि, पनीर वगैरे.. दुधाचे सर्व द्र्वआणिघन पदार्थ आले पाहीजेत.

पुरणपोळी इथे करीक्युलमला लावावी म्हणते. म्हणजे इथपावेतो बेसिक पोळी, फुलके, घडीची पोळी, पराठे यांवर हात चांगला बसला पाहीजे. पीठ घट्ट/ सैल म्हणजे काय ते (हाताला) कळले पाहीजे. हलक्या हाताने लाटणे म्हणजे काय हेही समजले पाहीजे. (इतरांची) कणीक चांगली तिंबता आली पाहीजे. ओके ?

रैना | 13 January, 2011 - 12:30 नवीन

नाऊ वी आर टॉकिंग एलिटीस्ट स्टफ. इथे गुरु लागतो. तो घरचाच (होमग्रोन यु नो) क्रिटिक नवरा/साबा असला की विशेष प्रावीण्य मिळते. त्यासाठी खुन्नस हा घटक अत्यावश्यक आहे.

इंटरमिडियेट लेव्हल द्वितीया साठी केल्या जाणारे पदार्थ
- वेळखाऊ आणि चिकट आणि शिवाय महाग. निव्वळ पोटभरीसाठी बर्‍यापैकी कुचकामी. पण चवीढवीरंगढंगासाठी ऑस्सम. (आर्ट फॉर आर्ट सेक. कलेसाठी कला) अशा स्वरूपाचे हवे. एकही पदार्थ एका तासाच्या आत होऊ नये याची काळजी टायमर लाऊन घ्यावी.
- ज्यांचे नाव घेता दडपण आलेच पाहीजे असे पदार्थ यात असतात. ते कधी जमतात, कधी बिघडतात. (बाजोंचे सापशीडीचे उदाहरण).
- सुशोभीकरणाला लै भाव राव.
- जिलबी, फराळाचे सर्व पदार्थ, गौरींसाठीचा सोवळ्यतला (यक. आय नो) स्वैंपाक, साठवणीतील पदार्थ, गूळपोळी वगैरे.
- इथे फिरंगी प्रभाव आपण मान्य केलेला आहे. तर चायनीज/लेबनीज/ कीनयन वाट्टेल त्या देशाचे वाट्टेल ते बेसिक पदार्थ वाचून करता आले पाहीजेत.
- प्रांतीय अ‍ॅटिट्युड ठेवू नये. भारतातील सर्व प्रांतातील पदार्थही करिक्युलमला आहेत.

ओके?

रैना | 13 January, 2011 - 12:55 नवीन

आता
इंटरमिडीएट लेव्हल ३ उर्फ विशारद.

इथे नवीन पदार्थ कमी आहेत अभ्यासक्रमात, पण कसंय की जे करताय ते हमखास 'सिक्स सिग्मा' लेव्हलचे जमले पाहीजेत.
म्हणजे कसं की या वर्षात माकाचु वर पोस्टी अज्याबात पडल्या नाय पायजेल. चकल्या हसल्या, अनारसे हसले, काऽय मीऽ कऽरू.. असे चालणार नाय. ओके?
मिश्र रागांसारखे अनवट पदार्थ न घाबरता ट्राय करायचे.
इथे स्पेश्यलायझेशन येते. म्हणजे कसं की अमकीच्या सुरळीच्या वड्या स्पेशल, तमकीचे नारळीपाकाचे लाडु स्पेशल तसे आपली सिग्नेचर डीश एक पायजेल. त्यावर स्वतःला आणि घरच्यांना भाव मारता आला इतकी ती चांगली पायजेल.
हात बसायला हवा. चित्रांप्रमाणे डोक्यात पदार्थांचा आराखडा तयार हवा.
नवीन रचनांनाही प्राधान्य दिले जाईल.
मोठ्या प्रमाणावर न घाबरता, दडपण न येता करण्यालाही जास्त गुण दिल्या जातील. मोठ्या प्रमाणावर करणे म्हणजे जेवळ गणिती गुणाकार किंवा कॅल्क्युलस नाही. तो अंदाज आणि प्रावीण्याचा खेळ आहे. हे इथवर आल्यावर लक्षात येईलच.

ओके?
ही फक्त पदवी परिक्षा. त्यामुळे फक्त डिग्री हातात येईल. खरी 'कला' त्यानंतरच. कुठल्याही रचनेत 'स्व' घातला कमीअधिक प्रमाणात की त्यात सौंदर्य गवसेल. पंचेंद्रियांना घटक पदार्थांचे सौंदर्य कळेल. कितीही कमी आणि कितीही जास्त घटक पदार्थात अनमोल सुंदर अश्या पाकरचना करता येतील. इतरांच्या रचना नुसत्या पाहुन, वासावरुन त्यातले घटक पदार्थ भाजलेत की वाटलेत हे हमखास ओळखता येईल.
मात्र रियाज पाहीजे. स्मित

बाकी डिग्री गेली खड्ड्यात. आपले आणि कुटुंबाचे पोट आनंदाने भरेल हाच खरा स्वैपाक. बाकी सब झूठ.
आणि हा करिक्युलम लिंगाधारीत नाही याची नोंद घ्यावी. कृपयाच.

रैना | 13 January, 2011 - 13:21

करिक्युलममधील अत्यावश्यक नोंदी आणि जीवनमुल्ये
- अपरिग्रहाची सुरवात आहारापासुन होते हे लक्षात ठेवावे. आपण देऊ तितकेच स्वैपाकाला महत्त्व. कोणी किती महत्त्व द्यावे हे व्यक्तिसापेक्ष आहे. आणि स्वैपाक आला नाही तरी चालेल पण हे लक्षात ठेवावे.
- ज्या असंख्य बायकांचे आयुष्यच 'रांधावाढाउष्टीकाढा' असे जाते त्यांचा याच स्वैपाकापायी संताप संताप होत असणार.
- रस्त्याच्या कडेला जो चारकाटक्यातून आणि तीन दगडातून स्वैपाक चालतो तोही सुंदरच असतो.
- अती तिथे मातीच होते. शेवटी ही कला आहे. विपुल विपुल आणि सुशोभीकरणाच्या भरात वहावत जाऊ नये. ३ इंची जिभेने चाखणार आणि ५ इंच रेडियसच्या पोटातच ते जाणार. प्रत्येकाचीच अन्ननलिकाच असते. त्यात तुच्छभाव शिरु देऊ नये.
- पैशाचे सोंग या कलेला आणता येत नाही. (तसे कुठल्याच कलेला). त्यामुळे उधळमाधळ पाकृपासुन सावध रहावे.
- पंक्तित दरवळणार्‍या सुवासाला भुलु नये. कोणीतरी अनामिक किंवा घरचीच माऊली तिथे राबली आहे हेही विसरू नये. पेटभर जेवताना नेहमी बायकांची पंगत शेवटी. त्यांना उरलं नाही तरी चालेल- असा अ‍ॅटिट्युड ठेवल्यास अन्नदेवता कोपते.
- आणि हो. विवाहसंस्थेचा आणि स्वैपाकातील प्राविण्याची cause & effect relationship आहे असे मानुन चालु नये. तलम सुती पोळ्या येणे हे वैवाहिक सौख्याचे लक्षणही मानायची गरज नाही.

टण्या | 13 January, 2011 - 14:07
पाकृ:

अर्धा कांदा व दोन-चार लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घ्याव्यात. अर्धा टोमॅटॉ बारीक फोडी. एक-दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून. मग फ्रीज उघडून त्यात दिसणार्‍या भाज्या बाहेर काढाव्यात. ह्यात फ्लॉवर-वांगे-कोबी इत्यादी चालतील. मग ह्या भाज्या व बटाटा ह्यांच्या फोडी कराव्यात. त्या नळाखाली धरून नळ सोडावा व स्वच्छ धुवून घेउन पाणी निथळत ठेवावे.
मग एका कढईत एक-दोन टिस्पून तेल टाकावे. ते गरम झाल्यावर त्यात मोहरी-हिंग-हळद घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा व लसूण टाकून झाकण ठेवावे. अर्ध्या-एक मिनिटाने झाकण काढून त्यावर धनेपूड घालावी. पुन्हा झाकण - अर्धा मिनिट. मग बारीक चिरलेला टोमॅटो टाकावा. पुन्हा झाकण घालावे. मग परत अर्ध्या मिनिटाने झाकण काढून त्यात ह्या सर्व भाज्यांचा कापलेल्या फोडी टाकाव्यात व थोडावेळ परतावे. मग लक्षात येईल की खोवलेले खोबरे पण आहे. तर ते पण मुठभर घालावे व पुन्हा परतत बसावे. मग एका पातेल्यात पाणी गरम करण्यास ठेवावे. ते उकळायला लागेस्तोवर भाजीत मीठ-लाल तिखट टाकावे. थोडीशी साखर पण. पुन्हा परतावे. उकळलेले पाणी त्यात ओतावे. गॅस बारीक करून पुस्तक उघडून बसावे. दोन-चार पाने वाचून झाल्यावर मसाला (थोडा रेडिमेड किचन किंग मसाला पण) टाकावा. पाणी थोडे आटवावे. जरा घट्टशी भाजी होउ द्यावी. मग ब्रेड भाजून घ्यावा. ब्रेड स्लाइस भाजून झाले की दोन्ही गॅस बंद करावे.
एक प्लेट घेउन त्यात ही भाजी वाढून घ्यावी. लिंबू पिळावे. मग त्या प्लेटमध्ये भाजीवरती भाजलेले ब्रेडचे स्लाइसेस ठेवावेत. पुन्हा टेबलवर पुस्तक उघडून एका हाताने ब्रेड तोडून - चमच्याने ब्रेड-भाजी खाण्याची कसरत सुरू करावी. मग एकदम लक्षात येईल की भाजी अतिशय सुंदर झाली आहे व हर्षानंदाने तुम्ही पुस्तक बाजूला ठेवाल व सर्व भाजी पटकन संपवून टाकाल. पुन्हा पुस्तक वाचन सुरू करावे.

प्रतिसाद ईबा | 13 January, 2011 - 14:31 नवीन
टण्या, ही काल्पनिक रूपककथा आहे का?

आता सत्यघटनेवर आधारित आवृत्ती :

१. फ्रीज उघडून बघावा. समोर दिसणार्‍या अर्धमेल्या आणि परस्परविसंगत भाज्या पाहून डोळ्यांत येणारे पाणी परतवावे. (इथे बॅक्ग्राऊंडला 'बाळ जातो दूरदेशी'ची धून वाजेल.)
डोळे मिटून हात फ्रीजमधे फिरवावा. मग डोळे उघडून आणि फ्रीज मिटून खाली पडलेल्या भाज्या उचलाव्यात आणि धुवून घ्याव्यात. यात मिरच्या कोथिंबीरही आली.
२. क्र. १ चीच कृती फडताळातल्या मसाल्यांच्या पाकिटांबाबत करावी. (फक्त मसाले धुवू नयेत.)
३. आता भाज्या चिराव्यात. ज्या साइजच्या चिरू त्यालाच बारीक असे म्हणावे.
४. कढईत तेल तापवावे. मिसळणाच्या डब्यात चमचा घालून साधारण क्र. १ च्याच जवळपासची कृती करावी, फक्त इथे मसाले खाली सांडवायचे नसून तापलेल्या तेलात सांडवावेत.
५. चिरलेल्या भाज्या आणि पाकिटांतले मसाले फोडणीवर परतावेत. ('परतोनि पाहे' कशाबद्दलचा धागा होता बरं.. हे आठवून पहावं.) क्रम महत्त्वाचा नाही, कन्टेन्ट महत्त्वाचा - असं स्वतःलाच ठणकावून बजावावं.
५. भाजीवर आधणाचे झाकण ठेवायला आपण विसरलो हे लक्षात आलं की दुसर्‍या पातेल्यात पाणी तापवावं. ते भाजीत घालावं. अशानेच भाजी चांगली शिजते असं स्वतःलाच...
६. मीठ.. मीठ... ते राहिलंच. घालावं.
७. पाणी आटलं की गॅस बंद करावा. भाजी शिजण्याशी गॅस बंद करायचा संबंध नाही असं स्वतःलाच....
८. भाजी प्लेटमधे काढून घ्यावी, ब्रेड भाजून घ्यावा.
९. क्र. ६ मधे घातलेल्या मिठाला जागलं पाहिजे असं स्वतःलाच....
१०. भाजी उत्तम झाल्याचा आव आणत पार्ल्यात पोष्टी पाडाव्यात. (पुन्हा मघाची 'बाळ जातो दूरदेशीवाली धून.)

प्रतिसाद सिंडरेला | 13 January, 2011 - 14:29 नवीन

प्रतिसाद सशल | 13 January, 2011 - 14:31 नवीन
स्वाती,

पण हे "स्वतःलाच ठणकावून बजावावं" मात्र अंतिम सत्य असावं (थोरामोठ्यांच्या बाबतीत) ..

प्रतिसाद फारएण्ड | 13 January, 2011 - 14:33 नवीन
हे हलवा कोठेतरी न वाहत्या बीबीत. बहरात.

रैना, लै भारी ___/\___ . आपापली पातळी ओळखून घ्यायला अतिशयच उपयोगी. माझी त बै 'इंटरमिडियेट लेव्हल प्रथमा' ... पण मी पुपो ऑप्शनला टाकलीये.

हिम्सकूल, धन्यवाद. हे वाचवल्याबद्दल. पण रैना, हे एक स्वतंत्र लिखाण म्हणून टाकावेस अशी सुचना करते. हा अमुल्य ठेवा असा झाकुन नका ठेऊ बाई!

ईबा, तुमच्या काल्पनीक सत्यघटनेला पीळ (आय मीन ट्विस्ट) नाही.
खरा शेवट "भाजी उत्तम ..." ऐवजी, शेवटी फोन करुन पिझा मागवावा असा होतो.

रैना-
तो फळा ती धूळ
काय खूळ काय खूळ

ते कँपस ती पोरं
जणू गुराखी राखतोय ढोरं

ती परिक्षा ते पेपर
तपासताना येणारे ते फेफर

ऐसी शिक्षणाची गत
हमारी मारी गई मत

धीर्जिरा | 20 January, 2011 - 12:48
धन्यवाद वैनी, रैना आता घसा बराच बराय.
ऐसी शिक्षणाची गत, हमारी मारी गई मत >>>>>> आमचे व्यवसायाबद्दल असे अनकूल* उद्गारांबद्दल निषेध बाकी मराठी अनकूल नसल्याबद्दल अनुमोदन. प्राची, ऐसाजे मराठी हाण की..... बाजो, आत्मस्तुतिपरच आहे
* एक उकार राहिला वाटते!
मंजूडै, तुमचे पायावर पाय? म्हणजे तुम्हीच मीनाक्षुडी शेषाद्रुडी की काय! बाप्रे!!

रैना | 20 January, 2011 - 12:57
कधी 'पागल अनुकण' | कधी 'धीर्जिरा'
तरीबी आमचा | मुजरा मुजरा
टाकताती तर्‍हेतर्‍हेची | प्रिंकाची भित्तीचित्रे
वैनीलोकं सगळे | भित्रे भित्रे
असताती गायब| धुंडाळीती पुपु बखर
काय झाले आणिक| असते ती खबर

धीर्जिरा | 20 January, 2011 - 13:05
त्रैराशिक बाचप्रे! चिमहेश, उग्गीच नाय!
रैनातै, फार भारी काव्य. आम्हाला कविता काहीच वेळा सुचते. पण ती इथे देण्याइतकी भारी नसते. पर्वा कविता सुचायला लागल्यावर एका मित्राने आमचा फोटो काढला. तो इथे देतो - (यावरून आम्हाला काय सुचते याचा अंदाज येईल.)
रैना | 20 January, 2011 - 13:06
साजिर्‍यांचे पदरी | नांदती गुणीजन
राखती साजिरा| यथोचित मान
डुलकळा छापता| कविता त्या थोर
आम्हा येतसे| गहिवर, गहिवर

नीधप | 20 January, 2011 - 13:07
अरे देवा!!

रैना | 20 January, 2011 - 13:21
अहो सर सर| फोटु असे टाकु नये
रोहिणीच्या पोटावर | पाय असा देऊ नये
रोहिणीत लिहीलेकी |तरूण ते उद्योजक
रे अरभाटा| रहा रहा तू सजग
असे फोटु टाकिता| येता रोहिणीचा फोन
काय बरे सांगावे | सरांच्या अस्तित्वाचे कोन
दरडावूनी पुशिता| सरांची असली उमर
मग काय धरावे | सत्याचा तो दोर ?

बाळू जोशी. | 20 January, 2011 - 13:10
डुलकळा वाड रं दादा !
तुळे गुरगुंडा हुईल....
• प्रतिसाद
वैनी | 20 January, 2011 - 13:13
रैना सुटली आहेस! मस्त.
लोकाग्रहाचा मान राखलाय :प
• प्रतिसाद
हिम्सकूल | 20 January, 2011 - 13:17
लईच जबरी.... हातातली गुडगुडी झकास...
• प्रतिसाद

रैना | 20 January, 2011 - 13:25
वहिनींचा नचिकेत|रैनाची ती इरा
पुपुवरी प्रकट|जाहला साजिरा
साजिर्‍याच्या बाई | डुलकळा त्या थोर
समदे म्हणताती| वन्सं मोर वन्सं मोर

गजानन | 20 January, 2011 - 13:31 नवीन
रैना, जात्यावर बैसली आहेस वाटते <<<
• प्रतिसाद

रैना | 20 January, 2011 - 13:33 नवीन
धूड बाई धूड
बाजो की रॉहुड ?
रॉहुड की टोणग्या
धानियाच्या कणग्या

नीधप | 20 January, 2011 - 13:33
रैना,
आज काय खाऊन आलीयेस?

टण्या | 20 January, 2011 - 13:36
आले आले सर, घातला काव्यधुमाकुळ
शोधी उंट इन सहार, डोळे गेले पाठीवर
दावी हात काव्यबाफी, होई मोठे अवलक्षण
दावी प्रचि प्रिका-दळवी, मनी वसे पदुकोण
लॉगिन करती माबोवर, युजिंग डुआय खंडीभर
लिवती काव्ये महाथोर, पेस्टून वाहतो बहर
जाता उंच आकाशी विमान, उघडला बाफं काव्यथोर
काहून करता समिक्षण, सर, वाहे पाणी घड्यावर

रैना | 20 January, 2011 - 13:39
आला टण्या आला | असतो पार्लियातून डोकावत
तरी बरं हंगेरीत| असतो वारा घोंघावत
आला टण्या आला| मारिली बाजोंनी ही उडी
नेमाडेपेंडसे आणिक| खेळती साप शिडी
आला टण्या आला| घालती दारात मांडव
पुपुवरी मात्र|सारखा तांडव तांडव

बाळू जोशी. | 20 January, 2011 - 13:39
दरोगा बाबू पोचले त्या बाफवर...

बाळू जोशी. | 20 January, 2011 - 13:41
पेन्डसे याने के पेन्डसे गुरुजी?

धीर्जिरा | 20 January, 2011 - 13:54
रैना, टण्या
सरांच्या अस्तित्वाचे कोन >>>>>> दावी प्रचि प्रिका-दळवी, मनी वसे पदुकोण >>>>>>> सही!
हे बघा, असल्या अवस्थेत सुचलेली कविता. लोबागंटि थोर होते. त्यांच्या स्मृतीला स्मरून -
माणसाला कविता फुटतेच
आवेगाने मातीतून कोंब बाहेर यावा तशी
कविता रोरावत येते
कविता घोंघावत येते
कविता सरसरत येते, कविता गडगडत येते
कविता दाण्णकन् येते, कविता सटकन् येते
नाही म्हटले तरी च्यायला हट्टी
कविता हळूच येते, कविता दबकत हत्ती
भाषा योग्याकडे येते, कविता योग्य होते
भाषा भोग्याकडे येते, कविता भोग्य होते
कविता म्हणजे काय काय
भाषेच्या पोटातला पाय पाय
माणसाला कविता फुटतेच
खडकावर लाट फुटावी तशीसुद्धा
उधाणलेली, ओहोटलेली
घडवत जाते माणसाचा आकार
कधी फ्योर्डसारखा कातळ दातेरी
कधी गोलगुळगुळीत शुभ्र वाटोळी
फुटत फुटत सरत जाय
माणूस की कविता..... माहित नाय
कवितेची भाषा एक की अनेक?
मला ४ भाषा येतात
चारी भाषांना मात्र एकच मी
मला ४ भाषांमधून कविता होते
मला -४ भाषांमधून दु:ख होते
मग मी भाषेला पिळतो, कधी गिळतो
यमक-बिमक, छंद-स्वच्छंद
उगा आपला जरासा खेळतो
कितीही खेळलो, पिळलो, गिळलो तरी
कविता जाता जात नाही.......
माणूस जातो
कविता असतेच.
कधीकधी कवितेला माणूस फुटतो.
माणूस म्हणजे काय काय
कवितेला फुटलेला पाय पाय.
बाळू जोशी. | 20 January, 2011 - 13:57
या कवितेच्या प्रेताधिकाराचे काय?
धीर्जिरा | 20 January, 2011 - 13:58
आमच्याचकडे

रैना | 20 January, 2011 - 14:00
सर आले फॉरमात | ऐसा सुदिन हसरा
लावा गुढ्या तोरणे दारी | आजि दिवाळी दसरा
सर आले फॉरमात | लिहीती कविता दाणदाण
शिकवीती मेसोपोटेमिया | हेची महान महान
सर आले फॉरमात | सुदिन सुवेळ
पुपुवरी लगेचच | निस्तरा हास्यकल्लोळ

टण्या पदुकोण खरंच भारी. अँड सर तुमचे कवितापत्य नेहमीच भारी असते.

नीधप | 20 January, 2011 - 14:05
मला पेशव्याची कविता आठवतेय....
मलाच ज्ञानपीठ द्या ना धनी संदर्भाने....

मंजूडी | 20 January, 2011 - 14:05
रैना टण्या अरभाट __/\__

नीधप | 20 January, 2011 - 14:06
लोक्स सगळं वेळोवेळी बहरात हलवताय ना....

हिम्सकूल | 20 January, 2011 - 14:08
सर तुम्हास्नी दंडवत बरका...

श्यामली | 20 January, 2011 - 14:09
अरभाटा हे उगाच टाईप केलेल...असल भारी? मग कविता म्हणून तू काय लिहितोस?

रैना | 20 January, 2011 - 14:09
मुक्तंछंदाच्या नानाची | टांग ती बाई
ती म्हणे खरी | कविताच नाई?
कविता का होते | उपयोग तो काय ?
आसा ते उर | माहित नाही काय?
(आसाउर- आजचे साहित्य उद्याची रद्दी)
माहीत असूनही काय | करे कवी तो बापुडा
त्याचा बी नैलाज | बोले पब्लिक तेला येडा

नीधप | 20 January, 2011 - 14:11
-----
----
दिखावू भरले पण घेऊन
हिंदाळत नाही महासागर
हिंदोळणारा एक थेंबही जर
नसेल तुमच्या शरीरपेल्यात
तर दारावर
पावसाला बोलावू नका.
तुम्हाला भिजणे जमणार नाही..
त्याहूनही गडद ते उमजणार नाही...
-----
----
- पेशव्याच्या एका कवितेतील काही ओळी.

रैना | 20 January, 2011 - 14:12
छंदावरती जरतारीचा मुक्त मोर बाई हवा,
धनी मला द्या हो ज्ञानपीठ नवा ऽ

शरद | 20 January, 2011 - 14:16
आमच्या फिकरनॉट चा मनोरंजक धागा उडवून टाकला कित्ती मजा येत होती. सर्व्यांचे सर्वगुण बाहेर येत होते. पण लवकरच फिकरनॉट दुसरा धागा उघडतीलच.
• प्रतिसाद
नीधप | 20 January, 2011 - 14:17
मलाच ज्ञानपीठ द्या ना धनी - भाग २
असा?
• प्रतिसाद
प्राची | 20 January, 2011 - 14:20
रैना नक्की 'रैना'च आहे ना?
सुरेश रैनासारखी चौफेर चौकार्/षटकार हाण्तेय

रैना | 20 January, 2011 - 14:24
ज्ञानिया चे ते
पीठ राहिले नाही
कालच्या कवितेत
मीठ राहिले नाही
हा हन्त हन्त
म्हणिती अरभाट
आणिक लिहीती
कविता जबराट
कवितेचा प्रताधिकार
कोणाकडे बाई
माझ्याकडे नाई
माझ्याकडे नाई
खुशाल ती वापरा
माझे नाई ऑब्जेक्षन
तसेही भाषेला या
लावले ते ऑक्सिजन
धुगधुगी ती थोडी
भाषेत शिल्लक राही
तेवढीच पणती
तेवत राही माह्यी
तेवढी ती तेवत
राहु द्या हो मालक
अंतरीचा हेतू पहा
अटकावू नका बालक

डुआय | 20 January, 2011 - 14:25
लै च भारी शिकवणी घ्या ना हो रैना ताई
नीधप | 20 January, 2011 - 14:25
रैने, आयडी हॅक झाला की तुला कोण काही बोललं की काहीबाही खाण्यापिण्यात आलं? आज उधळते आहेस...
• प्रतिसाद
चिंगी | 20 January, 2011 - 14:27 नवीन
जबराट!

हे पुढचं थोडं

( मधलं मिस झालं असावं कदाचित )

बाजो बाजो
क्रॅकिंग फालतू जोक्स?
वैनी वैनी
फटकाविंग लोक्स

टण्या टण्या
सारखे वाचिंग पुस्तक
रैना रैना
सारखे पेनिंग मस्तक

मंजू मंजू
मेकिंग खूप केक्स ?
चिंगी चिंगी
म्हणते बोरिंग बेक्स

आशू आशू
ऑफिसात लै काम?
लिंबू लिंबू
रीडींग लै पाम

प्राची प्राची
फाउंड अ घर
मामी मामी
सेंन्स ऑफ ह्युमर

(उद्या पुपुवरील तिनाक्षरी नावांवर कविता करुन देईन हाँ. ओके? नीरजा/ चिनूक्स/ केश्विनी/ अनीशा/साजिरा/शरद तयार रहा)

संस्कृत महान होता

प्रतिसाद प्राची | 20 January, 2011 - 05:53 नवीन
रैना, आणि मी ग???

प्रतिसाद रैना | 20 January, 2011 - 05:57 नवीन
अरेच्चा. तू कशी काय राह्यलीस? थांब यमक शोधते
हाँ अ‍ॅडले अता तुला.

प्रतिसाद डुआय | 20 January, 2011 - 05:59 नवीन
मैने क्या पाप किया है ?

प्रतिसाद अश्विनी के | 20 January, 2011 - 05:59 नवीन
रैना, होऊन जाउदे !

प्रतिसाद रैना | 20 January, 2011 - 06:01 नवीन
४ अक्षरं रे. कु ल दी प. मेरेको ४ अक्षर कविता आता नै. तू / अरभाट/ त्रिविक्रमाक्रा/ हिम्सकूल सगळे ऑप्शनला.
क्षमस्व

प्रतिसाद प्राची | 20 January, 2011 - 06:02 नवीन
रैना

प्रतिसाद चिंगी | 20 January, 2011 - 06:03 नवीन
रैना झाडपाल्याचं औषध घेउन आलीस की कॉय?

शिंगापुरी वास्तव्य करुन असलेल्या श्रमाता यांनी 'यादें' बघण्यात वेळ न दवडिता परत एकदा(आधी बघितला नसल्यास) 'आयेशा' बघुन एक विनोदप्रचुर, खुसखुशीत, मुक्तछंदाचा सढळ वापर असेलेला पण काव्याची फोडणी नसलेला ललित लेख टाकावा अशी मंडळ त्यांना विनंती करत आहे.. या महान कार्याबद्दल मंडळ त्यांना 'सिनेमापीठ' या पुरस्काराने सन्मानित करेल.
(टीपः सिनेमापीठ व ज्ञानपीठाचा काहीही संबंध नाही. संबंध जोडण्याचा यत्न करु नये!)

प्रतिसाद limbutimbu | 20 January, 2011 - 06:03 नवीन
लई भारी रैना.... मला अगदी इटिन्ग इटिन्ग शुगर की काय ती कविता आठवली
बर, आज सकाळी पहिल्यान्दा कुणाचे तोन्ड बघितले होतेस? काय खाल्ले होतेस? तुझी रास कोणती? नक्ष्त्र कोणते?

प्रतिसाद डुआय | 20 January, 2011 - 06:03 नवीन
डुआय वर कर की मग

प्रतिसाद अरूण | 20 January, 2011 - 06:13 नवीन
उद्या पुपुवरील तिनाक्षरी नावांवर कविता करुन देईन हाँ. ओके? नीरजा/ चिनूक्स/ केश्विनी/ अनीशा/साजिरा/शरद तयार रहा >>>>>>>> आणि मी???????????

प्रतिसाद बाळू जोशी. | 20 January, 2011 - 06:15 नवीन
आपला तर ४ अक्षरे असून लागला बुवा नम्बर शॉर्ट फॉर्म करून का होइना

प्रतिसाद अरूण | 20 January, 2011 - 06:15 नवीन
रैना रैना
कविता कर
डुआय डुआय
वाट बघ ..............

चला आता मी माझी ४० पानी उघडतोच ............
रैनातैंकडून मला स्फुर्ती मिळाली आहे ............

प्रतिसाद शरद | 20 January, 2011 - 06:18 नवीन
रैना रैना, केलीस दैना..
तू जणू मैना,
है ना? है ना?

प्रतिसाद रैना | 20 January, 2011 - 06:21 नवीन
मैना काय शरदकाका
काय म्हणतील लोक ?
शिंग मोडुन वासरात शिरली
होती गाय योक

आरूणाजोबा उघडा उघडा वही. काय्को घाबरताय? माझ्या कविता आणि डुलकळा याहून भयंकर ते काय असणार ४० पानी वहीत ?

प्रतिसाद प्राची | 20 January, 2011 - 06:21 नवीन
रैनातैंकडून मला स्फुर्ती मिळाली आहे ............ हाहा>>>>
अरे देवाऽऽऽऽ प ऽऽळा प ऽऽऽळा

प्रतिसाद मीन्वा | 20 January, 2011 - 06:24 नवीन
मला का नै घेतलं आजच्या दोनाक्षरीत रैना हे बरोबर नैना

प्रतिसाद प्राची | 20 January, 2011 - 06:26 नवीन
मीन्वाज्जी तुमचा नंबर उद्या

बादवे, कालच्या लिंकवर साड्या मस्त होत्या.

प्रतिसाद रैना | 20 January, 2011 - 06:56 नवीन
लिंबू- सकाळ हा प्रश्न विचारुन खपलीखालची जखम भळाभळा वाहू लागली.

इरीटीरी उठते आणि
रोज पसरते भोंगा
आज शाळेत नक्को जाऊ?
म्हणते आत्ता सांगा

इरीटीरीची आई हताश
पाहुनी तो दंगा
होते हापिसात पसार
घेईल कोणाशी पंगा ?

इरीटीरीचा बाबा मग
रोजचे करी उपाय
चिऊकाऊमैनावाघ
कित्ती गोष्टी ऐकशील माय?

इरीटीरीचा बाबा शेवटी
हलकेच देतो फटका
मोजतो शाळेत जाईस्तोवर
पळे अन घटका

(सत्याचा अंश दिसल्यास आपुन जवाबदार नाय)

मीन्वाजी- माफी. आता तुम्हाला मीन्वाजी म्हणून तीनाक्षरीत टाकेन हाँ

रैना, Rofl

ही बे एरिया बीबी वरची महागुरूंची कविता. जीटीजी झाल्यापासून तो बीबी भरभरून बहरत असतोय .

महागुरु | 19 January, 2011 - 18:08 नवीन
.........गॉगल गाय .......
===============
गुगल म्हणजे गुगल असते,
तुमचे आमचे सेम असते.

अरे भाय,
सांगतो काय..
खायची होती साय,
म्हणुन सर्च केली गाय..
पण गावली नाय.
फटके पडायच्या आत
म्हणतो सर्वांना बाय !

ह्या कवितेत यमक वगैरे आहेच . गाय ही विश्वाची माता आणि गुगलने संपुर्ण आंतरजालावर काहीहि शोधता येते म्हणजे दुहेरी वैश्विक साहित्य म्हणायला हरकत नाही. वृत्त वगैरे असेलच , नसेल तर बनवु एखादे ... हाकानाका.
ह्या कवितेत कोणाला सौंदर्यस्थळे नाही सापडली तर गुगल वापरुन शोधा. शेवटी तुमचे आणि आमचे गुगल सेमच आहे.

......

>> मला ४ भाषा येतात
चारी भाषांना मात्र एकच मी
मला ४ भाषांमधून कविता होते
मला -४ भाषांमधून दु:ख होते
Lol

>> कवितेचा प्रताधिकार
कोणाकडे बाई
माझ्याकडे नाई
माझ्याकडे नाई

Rofl

रैना, रैना ओ रैना !
कविता सही है ना !
ढापल्या तर नै ना ! (:दिवा:)
हसून झाली दैना !

ऑफिसात बसतो ..
फिदी फिदी हसतो ..
बॉस ला मी दिसतो...
बॉस मग रुसतो...
कुजकट हसतो..
काय झाले पुसतो..
सापावाणी डसतो..
बिच्चारा मी फसतो...

आमचे पण योगदान .. Proud

श्रद्धा | 10 March, 2011 - 13:39
'कंस अकेला' या महास्फोटक आणि महाप्रक्षोभक कादंबरीबद्दल मी 'प्रौढ साक्षरवार्ता' लिहिले होते. या कादंबरीने पुढे अग्निशामक उपकरणांच्या खपाचे सर्व उच्चांक मोडले. लोकांनी कादंबरी ठेवण्यासाठी फ्रीज विकत घेतले. त्यानंतर बराच काळ त्या तोलामोलाची कादंबरी मराठी साहित्यजगतात झळकलीच नाही.

पण..

आज तो दिवस आला आहे. 'कंस अकेला'ची पाने टाईप करताना वापरलेले हातमोजे मी कपाटातून पुन्हा बाहेर काढले आहेत. सर्व ज्वालाग्राही वस्तूंची घराबाहेर रवानगी केली आहे. आजही मला कुणी टंकलेखन साहाय्य करू धजावणार नाही. कारण कादंबरी तशीच महास्फोटक, महाप्रक्षोभक आहे. कंसासारखाच दुसरा महानायक 'सर' यांची बिनधास्त, बेधडक जीवनकहाणी..

"नातिसरामि"...

साक्षरवार्तेकडे लक्ष ठेवा. वाचण्यासाठी वयाचा दाखला आवश्यक...

श्रद्धा | 10 March, 2011 - 15:35
यावेळेस एक अनोखी गोष्ट घडली आहे. मी हे साक्षरवार्तेचे उदात्त कार्य हाती घेतले त्याला हातभार म्हणून अनीशेने टंकलेखन साहाय्य करायची तयारी दर्शवली. मी तिच्या ऋणात राहू इच्छिते (पण व्याजदर कमी असावा!). तसेच पुपुने आम्हां दोघींची प्रतिभा पहिल्यांदा ओळखली म्हणून पुस्तकातला काही भाग पहिल्यांदा वाचण्याचा मान पुपुचा...
जय पुपु...
__________________________________
खाली घरंगळलेली वस्त्रे सावरताना तिची चाललेली धडपड बघून सरांच्या कपाळावर आठी उमटली, क्षणभरच. गुरुत्वाकर्षणाचा साधा नियमही कळू नये हिला, छे! अजून किती वेळ वाट बघायला लावणार आहेस प्रियंके? तुझ्या सात खुनांसाठी थांबलो. सात जन्मांसाठी नको थांबवूस. याच विचारात असताना लक्षात आलं की हातातली चैतन्यकांडी संपलीये. पुढचीची शोधाशोध करताना खिशात तिच्याच आठवणीने जपून ठेवलेलं दोस्तानाचं तिकीट सापडलं. तेव्हाच पहिल्या नजरेत *********** *********** ********************************** ********************************* *******
नजर वळवून सरांनी तिच्याकडे पाहिले. ती आधी वाळत घालताना घरंगळलेली वस्त्रे पुन्हा झटकून दोरीवर वाळत घालत होती.

टीप: जास्त प्रक्षोभक उल्लेखांसाठी नेहमीप्रमाणे * वापरले आहेत.
___________________________________

'चला दळण दळु' ह्या हाकेला मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद ओवीरुपाने आपल्यासमोर सादर करण्यात अत्यानंद होत आहे.

आला आला सूर्य वर | चला चला कट्ट्यावर |
भाजणी गं जात्यावर | केश्विनीच्या ||

एक एक मुठ घालू | एक चाली तळी लावू |
तुझी माझी ओवी गावू | नीरजाबाई ||

कट्ट्यावर दळण रंगे | सार्‍या कट्टरांच्या संगे |
कधी कधी होती दंगे | उगीचचे||

दळण हे कसे दळण | जिभेला नाही काही वळण |
उडते लोकांची गाळण | कट्ट्यावरी ||

खुंटा घट्ट धरलं गं | काटकुळं घसरलं |
पीठ सारं पसरलं | योडीमाईचं ||

उनाडक्या योडी करी | मंजात्या काठी मारी |
तिचा जाच भारी | पोरीसोरींना ||

रिकामीच कासंडी | ताकाने गं भरी ||
ओव्यांचीही विडंबनं | वर्षामाय करी ||

पसरल्या पिठामंदी | सांडली ती बासुंदी |
रावणाची मंदी | स्वैपाक करी ||

भाकरीच्या जोडीला | शेपूची गं भाजी |
खानावळ चालवी | ललीबाय माझी ||

अश्वी, नीरजा ओव्या पाडी | संकलित करी योडी
दळणाची मात्र गाडी | मंदावली ||

कोळश्याच्या शेगडीवर | मक्याचा गो भुट्टा |
दिस रात हादरवी | विन्याचा हा कट्टा ||

शेपूचीच हवी भाजी | मागतसे दक्षीआजी |
नी म्हणे माझी | चांगली होतसे ||

खोपीच्या गं समोर | तुळशीची कुंडी |
भर उन्हाळ्यात बाई | थंड घाली बंडी ||

काय सांगु माझ्या | कट्टेकरांची ख्याती |
खोड त्यांची काढावया | शेजारी न धजती ||

केश्वी बाई आमची साधी | शेपूची भाजी रांधी |
वेड्या ओव्या सांगा आधी | काय असती ||

जेव्हा हवी तेव्हा | मिळत नाही लीव्ह |
दुपारीच उगवून | चिमण करे चिव चिव ||

चिंचवडातला दिप्या | कट्ट्यावर आला
ओवी पाहूनी वदला | चालुच्चे अजूनी?

चिव चिव चिव चिव | कट्यावरची देवघेव |
काव काव काव काव | करू नये ||

अबुधाबी इजिप्ताचा | रोज करी घोष |
तंवर धुणी भांडी करी | आमचा आशुतोष ||

मेधी दोन हजार दोन | म्हणे ओवी छान |
कट्टेकर महान | रचनाकार ||

नाथा पुरे आता | घे मिटूनी डोळे |

वाचता वाचता | बुब्बुळे बाहेर खेळती ||

कट्टेकरी दळणात | नियमांची लावती वाट |
पहिले तीन यमकात | चौथा कुठेही||

कट्ट्यावर येती जाती | पाहुणेही डोकावती |
कट्ट्याची ही महती | सांगु किती ||

गोजिरी कालवड | आली तांबू विता |
रोज नवी जन्मते | नवर्‍यांची कविता ||

नियमात बसवा रे | कट्ट्याख्यान आपुले रे
नका याला हिणवू रे | काकाक म्हणूनी ||

कट्ट्यावर भरते शाळा | काढती कुणीही गळा |
असे आपलाच गोतावळा | चालवुनी घ्यावे ||

एकूणपन्नास एक्याऐशी | कट्ट्याची ख्याती ऐशी |

वाकुडपणाची ऐशीतैशी | कट्ट्यावरी ||

समोरची चंद्री | झाली आहे ढब्बी |
रोज दळण दळत जा | म्हणे तिला गुब्बी ||

म्हणु नका कामात | रहा सदा रोमात |
कट्टा चाले जोमात | सांगते वर्षामाई ||

नाक्यावरचा वासू | आहे भारी चम्या |
मधूनच डोकावतो | रानड्यांचा सम्या ||

मैत्रिण गायबली | अश्विनी बिझली

गति मंद झाली | दळणाची ||

केले केक भरमसाठ | किती रेसिप्या पाठ
जेवायला चांदीचे ताट | लाजोने आणले ||

झाले प्रवचन थोर | घाबरला आता चोर |
नका करु आणखी बोअर | घ्या हि 'दक्षिणा' ||

दुकानाच्या समोर | रॉकेलाच्या लाईनी |
किती प्रश्न विचारते | मनिषावैनी ||

गुरांचा तो बाजार | वळण्याचा त्यांना भार |
'नी' चिडते फारफार | त्यांच्या अल्पमतीवर ||

अखेरची माझी ओवी | अखेरीस मीच गावी |
पान अखेरी मिटवी | आजसाठी ||

ढगाळी वातवरण | मृदुल दुलई |
गायब झाला जणू | सुर्यकिरण ||

लागता भुक आठवला | हॉटेलात पाठवला |
पंचपक्वान्न घेउन आला | वैभव आयरे ||

सकाळच्या प्रहरी | लोकांना द्याया न्याहरी |
आयर्‍यांचा वैभव भारी | तयारीत असे ||

टाइमपास झाला खास | म्हणे आता बास |
बॉस काढीत वास | येइल कधीही ||

आले महाराज| कट्ट्यावर यांचे राज|
सगळे करती मुजरा | स्मिसान ||

करा बंद बटण आता | योडी नामक बाहुलीचे |
म्हणे रजनीकांतने दिले | टेंडर दळणाचे ||

होता जपानात | भावनायाच्या स्वप्नात |
झाला का परका | जोश्यांचा केदार ||

टाकतो पोस्टी मोठ्या | कधी ना बाता खोट्या |
सर्वांना मान देई | मल्लीनाथ हा ||

केसांचे आरोग्य | नामे एक ग्रंथ |
लिहिला भक्तार्थ | मंजूडीने ||

ड्युआय्ड्यांची लक्षणे | शक्कल ती नामी |
चोविसाचा पाढा | म्हणतसे मामी ||

काजूची उसळ | रटरटे चुलीवर |
वाढीयली पानावर | शैलजेने ||

चाले झपाझप हात| पडे बहरात पीठ |
मायेचा ग तूप्-भात | भरवी केशवी ||

--आद्य ओवीकार नीरजा, अश्विनी के, शुभांगी कुलकर्णी, मंजिरी सोमण, वर्षा_म, मामी, नादखुळा, दिप्स यांच्या सौजन्याने..

Pages