मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार

मी इथे नविन आहे.

कुबेरान्च एका तेलियचि कहानी आवडले. यावेळेस युध्द जिवान्चे घेणार होतो पण तेवढ्यात नजर बोर्डरुम वर गेली.

मी सध्या अच्युत गोडबोले यान्च बोर्डरुम वाचतोय.

पुस्तक छान आहे. ज्या लोकन्चे धडे management चा विद्यर्थि असताना वाचत होतो. त्यान्चे काहि काहि मजेदार किस्से पन दिले आहेत. वेगवेगळ्या success stories पण आहेत आणि एकन्दर management development, management theories, यान्चे सन्दर्भ पण आहेत.

Btw. पुण्यामधे चान्गली ग्रन्थालये कुठे आहेत?

घरपोच पुस्तके देणारी ग्रन्थालये आहेत का?

क्रुपया कोणाला माहिति असल्यास जरुर सान्गा.

धन्यवाद

घरपोच पुस्तके देणारी ग्रन्थालये आहेत का? >>
तुम्ही कुठल्या भागात रहाता? पुणे मराठी तर्फेही काहि सब सेंटर्स चालविली जातात..त्यात काहीजण घरपोच देतात पुस्तके..सिंहगड रोड परिसरात असाल तर काही नावे सांगु शकेन मी..

मन्जिरी,

मी त्यान्ना फोन केला होता. पण महिन्यातुन एकदाच त्यान्ची गाडि त्या त्या विभागात जाते. आणि वरुन आपण जी पुस्तके सान्गु ती मिळतीलच अस पण नाही म्हणे. आपण पाच पुस्तकान्ची नावे सान्गायची आणि त्यामधील तीन ते चार तरी मिळतील आणि ती पण महिण्यातुन फक्त एकदा. मला जर परत पुस्तक बदलायच असेल तर एक महिना थाम्बयच. शिवाय महत्वाच म्हणजे पुस्तकान्ची यादि पण नाहि त्यान्च्या कडे.
त्याना म्हणालो कि तुमचे केन्द्र देता का मला चालवायला? मी पुण्यात आणि पिन्परी चिन्चवड मधे जागा शोधू शकतो आरामात. त्यान्च्या सन्केतस्थळा वर तस लिहिल आहे त्यानी, तर फोन करतो म्हणाले.

मी वाशी ला होतो तेन्व्हा तिथे एक छान ग्रन्थालय होत. salony circulating library. फार छान सेवा होती त्यान्ची. त्यान्च्या चार शाखा आहेत नवी मुम्बई मधे. ५ ते ७ हजार पुस्तके आहेत.फक्त १५० रु महिना. अगदी रोज एक पुस्तक बदलल तरी चालत. शिवाय नविन चित्रपटान्च्या सीडी पण मिळायच्या भाड्याने.

पुण्यामधे औन्ध ला जस्ट बुक्स ची शाखा चालु झाली आहे. ह्यान्च्या भारता मधे बर्‍याच ठिकाणी शाखा आहेत. पन घरपोच सेवा फक्त ७ किमी मधे आहे आणि त्याला ४००० महिन्याला फि आहे.

जस्ट बुक्स आणि सलोनि या दोघान्च्याहि सन्केतस्थळा वर बरिच माहिती आहे. एकन्दर मराठी ग्रन्थालया पेक्षा जरा झाकपाक प्रकरण आहेत.

मृनिश,
पुणे मराठी च्या सन्केतस्थळावर सम्पर्का साठि काहिच कसे दिले नाही कि मला सापडत नाहिये.

धन्यवाद.

ता. क. :- आत्ता सापडला फोन क्र. त्यान्च्या पण चार शाखा आहेत. एक आठ्वडाभर आधी सान्गितल तर ते आणुन ठेवणार. घरपोच सेवा नाहीये. पण http://pmgranthalaya.org/granth.htm वर पुस्ताकान्ची सन्ख्या बघुन गुन्गच झालो. आणि शुल्क फक्त ३५ रु !!!!!!!!

दुसरी कोणती आहेत का ग्रन्थालये ?

पुणे मराठी च्या संकेतस्थळाच माहित नाही पण तिथे जाउन माहिती मिळेल..संकेतस्थळ, शाखा, विस्तार वगैरे बाबतीत जरा मागेच आहेत हे लोक....

हि लायब्ररी मॉल ची लिन्क छान आहे.

९९ रु मधे पुस्तक घरपोच. सध्या फक्त निगडी मधे आहे म्हणे लवकरच म्हणजे मार्च मधे पुण्या मधे चालु करत आहेत. पुस्तके पण १०,००० आहेत. काहि काळजी नाहि, माझी आताची पुस्तके वाचुन होइ पर्यन्त येतील ते लोक पुण्यात.

हि व्यवस्था छान आहे.

ती जस्ट बुक्स ची शोरुम पण छान आहे आणि पुस्तकान्ची वैविध्यता पण आहे. अगदी self development ची पण पुस्तके आहेत.

लायब्ररी मॉल जर ९९ मधे घरपोच सेवा देत असेल तर छानच आहे. घरातल्या लहान मुलाना पण जरा वाचनाची आवड लावता येइल.

>>सिंहगड रोड परिसरात असाल तर काही नावे सांगु शकेन मी..
मृनिश, मी सिंह्गड रोड वरच्या एका चांगल्या लायब्ररीच्या शोधात आहे.... अगदी घरपोच नसली तरी चालेल पण पुस्तके लेटेस्ट हवी आहेत.... तीच तीच जुनी नकोत!
तुम्ही सुचवू शकाल का काही?

9422348993 दाणी... यांची घरपोच लायब्ररी आहे..महिना १०० रु आणि वर्षाचे एकदम भरले तर ५००..पुस्तके एकदम अगदी नवीन नसतात..पण अगदी जुनाट ही नसतात..
अजुन एक आहे आनंद नगर मध्ये समर्थ पार्क जवळ..बहुधा समर्थच नाव आहे..

आणि एक आनंद नगर च्या लेन मध्ये शेवटी म्हणजे अरविंद सोसा. वगैरे आहे ना तिथे एक आनंद लायब्ररी म्हणुन आहे..

आणि पुणे मराठी ची शाखा पुर्वी तरी हिंगणे च्या मेन लेन मध्ये होती..आणि त्यांची घरपोच सेवा ही होती..
विठठलवाडी चे सुजाता मस्तानी आहे ना ..त्याच्याच शेजारी अगदी एक छोटे खोकडे आहे आतल्या बाजुला.. एक मेन्स टेलर आहे..त्याचा मुलगा करायचा हे काम (पुणे मराठी घरपोच)
आता करतो काहि नक्कि खात्री नाहि..त्या दुकानात चौकशी करु शकता..

श्री ना पेंड्सेंचं तुंबाड चे खोत कोणी वाचलं आहे का ?

मला तरी पहिल्या खंडाची सुरुवातीची काहि पाने वाचुनच वाटलं होतं काहि राम नाहि पण तरी आणलं आहे म्हणुन वाचुन पुर्ण केलं. दुसरा खंड आणायची काही ईच्छा नाही झाली. काही विशेष असेल असं वाटत नाही.

सध्या मिलिंद बोकील यांचं शाळा. दोघं तिघं म्हणाले छान आहे.

सुभाष अवचटांचे 'स्टुडियो' आणि उर्मिला पवारांचे ' आयदान' वाचले. वाचल्याचे चीज झाले.
अतिशय सुरेख पुस्तकं.
आयदान वरती सविस्तरच लिहायला हवे एकदा कधीतरी.

आनंद यादवांचे ..नागरणी, घरभिंती .. वाचले.. झोंबी आधीच वाचले होते.. त्यांची जीवन गाथा तर आहेच ह्यात पण पुस्तकात त्या काळातले आजू बाजूचे सामाजिक, राजकीय बदल पण येत जातात .स्वातंत्रोत्तर काळात खेड्यातले, गावातले उद्योग कसे बंद पडत गेले.. शहर कशी आर्थिक केंद्र बनली हे नव्यानेच कळले..
ह्या विषयांवर कुठल्या पुस्तकात सविस्तर वाचायला मिळेल .. माहिती असल्यास नक्की सांगा..

कमलनयन बजाज हॉल आणि आर्ट गॅलरीमध्ये (नरिमन पॉइन्ट, मुंबई, आयनॉक्सच्या समोर) ११ जानेवारी-२४, १०-८, आशिष बुक सेन्टरचं पुस्तक प्रदर्शन आहे.

सध्या मिलिंद बोकील यांचं शाळा.
>>
वाच. छान आहे पुस्तक.

मी सध्या माधवी कुंटे यांचं 'महाद्वार उघडताना' वाचतेय. मृत्युच्या वेगवेगळ्या छटा मांडल्यात प्रत्येक कथेत.

शाळा वाचुन झाल.
पुस्तक खरच आवडलं. अगदि शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या. सगळं अगदी डोळ्या समोर येत होतं पुस्तक वाचताना.
फक्त एक खटकलं कुठे कुठे कुठे काही तपशिल/ वाक्ये अश्लिल वाटली, तेवढी टाळायला पहिजे होती.

सध्या इथे कुठे तरी वाचलं होतं म्हणुन युध्द जिवांचे आणलं आहे.
खरचं रंगाशेठ ने इथे लिहिल्याप्रमाणे सत्यस्थिति खुप भयानक आहे.

आवर्जुन वाचावं असं पुस्तक आहे.
आणि शिवाय कुबेर यांची पुस्तके वाचताना मला एक प्रश्न कायम पडतो इतका गुप्त तपशिल यांना मिळाला तरी कुठे ???

आज फेसबुकवर जयंत जोशी यांनी एका पुस्तकाबद्दल सांगितलंय. कुणी वाचलंय का?
हे घ्या तपशील
God Bless You, Dr. Kevorkian,

by Kurt Vonnegut: A posthumous collection of imaginary interviews Vonnegut produced for public radio. The cast of characters includes Hitler, Shakespeare and Isaac Newton. Now in paperback.

पुण्यात लेक आंद्रे अगासीचं "ओपन" वाचत होता. मीही चाळलं...मस्तच वाटलं! खूप सुंदर, ओघवती भाषा आहे, अगदी मनाची पकड घेणारी! त्याचं झालं की वाचीन म्हणते!
कुणी वाचलंय का?

मला मराठ्यांचा समग्र ईतिहास वाचायचा आहे महाराजांपासून ते अगदी मराठेशाही अस्ताला गेली तिथे पर्यंत.

कोणाला चांगले पुस्तक माहित आहे का या विषयी ???

इंदिरा संत यांची कविता एक आकलन हे सुनिता जोशी यांच पुस्तक मिळालंय अधाशासारख वाचल. इंदिरा संतांच्या चाहत्यांनी नक्की वाचावं असच आहे. सुनिता जोशी यांचा प्रबंध त्यांच्या यजमानांनी पुस्तक रुपानी छापला आहे, प्रस्तावना विजया राजाध्यक्ष यांची ( मार्गदर्शक होत्या) आणि राजहंस प्रकाशन.

अभिजीत२५
त्यासाठी इथल्या केदार या आयडीला संपर्क साधा, त्यांच्याकडे तुम्हाला इतिहासासंबंधी पुस्तकांची यादी मिळेल

"मास्तरांची सावली" हे पुस्तक वाचून झालं..इथे या पुस्तकाचा उल्लेख आला आहेच. छान आहे पुस्तक क्रुष्णाबाईंनी त्यांचा व मास्तरांचा जीवनपट जिवंतपणे सादर केलाय. हॅट्स ऑफ टू हर.

अभिजीत, कुबेरांनी माहिती मिळाली आहेत त्या पुस्तकांचे अथवा वेबसाइट्स चे संदर्भ दिले आहेत. पण हे नक्की मलाही हा प्रश्न पडतोकी त्यांना ही अफाट माहिती कुठून मिळते? Happy

सध्या अरुण साधू यांनी लिहीलेले 'चे, फिडेल आणि क्रांती' वाचत आहे, पाल्हाळ न लावता केलेलं लिखाण आवडलं.

सिडनी शेल्डनचे "इफ टुमॉरो कमज" वाचुन झाले आजच खुपच इंटरेस्टींग आहे. Happy
मराठी पुस्तकांचे डाउनलोड वर्जन कुठे मिळेल मला?

नाशिकरोड ला कांदबरी............लाईब्रारी कुठे आहे.............

मलाही देवळाली/नाशिकरोड परिसरात मराठी वाचनालय असल्यास पत्ता हवा आहे. घरपोच पुस्तके देणारे असले तर उत्तमच. Happy

शान्ता शेळक्यांच्या निवडक कवितांचा संग्रह 'किनारे मनाचे' अचानक मिळाला. डॉ प्रभा गणोरकर यांचे संकलन आणि प्रस्तावना. त्यांनी शान्ताबाईंच्या काव्यप्रवासाचा आलेख अतिशय सुंदर मांडलाय. प्रस्तावना वाचताना मला शान्ताबाईंच्या कविता जास्त का आवडतात हे स्पष्ट होत गेलं! त्यांचे जुने संग्रह उपलब्ध नसल्याने संग्रहात येत नव्हते त्याची रुखरुखही कमी झाली.

Pages