सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?
१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.
ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अॅनॅलिसिस केला तर बर्याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.
दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.
उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.
पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.
पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.
* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.
केदार | 28 January, 2010 -
केदार | 28 January, 2010 - 17:46>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
केदार, आपण मांडलेली गणितं अगदी तंतोतंत जुळली आहेत, ह्या वर्षीचं गणित माडंलत तर बरे होईल.
मला खालील स्र्किप्ट मध्ये मार्गदर्शन कराल काय?
Gujarat NRE Coke
Sterlite Industries (India) Ltd.
Yes Bank
Larsen & Toubro Ltd.
ह्या चार कंपन्यांचा ६ ते ९ महिन्याचा रेट Calculate करायचा आहे. (तुमच्या गणिता प्रमाणे.... पण काही माहिती अपूर्ण आहे)
ग्रोथ गाइडन्स = ?
प्रोजेकटेड EPS = ?
केदार, सुरेश आणि इतर
केदार, सुरेश आणि इतर जाणकार,
मला लोन प्रीपेमेंटसाठी दर महीन्याला काही रक्कम बाजुला काढून ठेवायची आहे आणि वर्षाअखेरीस ती नाही लागली तर प्रीपेमेंटसाठी वापरायची आहे!
त्यासाठी साधारणत दर महीन्याला दहा हजार बाजूला काढून वर्षभरासाठी एसआयपी त गुंतवणे हा पर्याय योग्य आहे का?
असल्यास कोणत्या फंडची निवड करावी?
वर्षभरात एसआयपीतून अॅव्हरेज रिटर्न्स किती % मिळतात?
>>> त्यासाठी साधारणत दर
>>> त्यासाठी साधारणत दर महीन्याला दहा हजार बाजूला काढून वर्षभरासाठी एसआयपी त गुंतवणे हा पर्याय योग्य आहे का?
एसआयपीत भरलेला हप्ता ३ वर्षे लॉक असतो. त्या रकेमेचे युनिट्स ३ वर्षानंतरच विकता येतात. तुम्ही डिसेंबर २०१० मध्ये १०००० रू. एसआयपीत गुंतविले (म्हणजे तेवढ्या रकमेची युनिट्स तुमच्या खात्यात येतील), तर ती युनिट्स डिसेंबर २०१३ नंतरच विकता येतील. त्याचप्रमाणे जानेवारी २०११ मध्ये घेतलेली युनिट्स जानेवारी २०१४ मध्ये, . . . या प्रमाणेच विकता येतील. त्यामुळे एका वर्षाच्या गुंतवणुकीकरता एसआयपी हा पर्याय नाही.
>>> वर्षभरात एसआयपीतून अॅव्हरेज रिटर्न्स किती % मिळतात?
जरी एसआयपीची युनिट्स ३ वर्षांच्या आत विकता येत नसली तरी त्यावरचा डिव्हिडंड मिळतो. साधारणपणे एसआयपी फंड्स वर्षाला २० ते ४० टक्के डिव्हिडंड देतात. परंतु डिव्हिडंड देणे त्यांना बंधनकारक नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाची डिव्हिडंड हिस्टरी बघा.
ओह्ह.... पण मी अस ऐकल होत की
ओह्ह....
पण मी अस ऐकल होत की आता १ वर्षासाठी पण SIP सुरु झाले आहेत म्हणून....
असो.... माहीतीबद्दल धन्यवाद
सर्वांना नवे वर्ष सुखाचे व
सर्वांना नवे वर्ष सुखाचे व भरभराटीचे जावो.
एक रिस्कि ट्रेड. आज निफ्टी ६१३५ ला बंद झाला. सोमवारी मार्केट उघडल्यावर निफ्टीचा जानेवारीचा ६१०० चा कॉल विकत (buy call) घ्या. आज किंमत १३६. असे समजुया की तो १४० ला मार्केट वर ओपन झाल्याने मिळाला. लगेच तो ३०% टाकून म्हणजे १८२ ला विकायला ठेवा. जर सोमवारी ती किंमत आली नाही तर ते मंगळवारी रिपिट करा.येण्याची शक्यता ८०%. माझी पोझिशन असेल.
मास्तुरे< एसआयपी आणि ELSS
मास्तुरे< एसआयपी आणि ELSS मध्ये गल्लत होतेय असे वाटते!
टाटा मोटर्स डी वी आर सध्या
टाटा मोटर्स डी वी आर सध्या ७८० आहे.... एक महिन्यात ९०० + .. आपापल्या रिस्कवर घेणे..
एस आय पी आणि ई एल एस एस हे
एस आय पी आणि ई एल एस एस हे एकच आहेत अशी माझी समजूत आहे. जाणकारांनी खुलासा करावा.
हा ई-मेल माझ्याकडे आलाय. जे
हा ई-मेल माझ्याकडे आलाय. जे नव्याने शेअर बाजारात उतरू इच्छितात किंवा ज्यांना याबाबत शंका आहेत अशांसाठि शेअर बाजारासंबंधीची ही व्याख्याने उपयुक्त आहेत.
5th January 2011
Dear Sir / Madam
Sakal newspaper, CDSL, Bombay Stock Exchange and Reliance Securities Ltd have jointly organized my 598th FREE Investor Awareness Program on Share Market in Solapur on Sunday, 9th January 2011 at 6.00 p.m. at Dr. Kirloskar Sabhagruh, above H.N.Ampi Theatre, Hirachand Nemchand Vachanalay Sankul, Solapur at 6.00 p.m. Prior to this event my program in Pune is scheduled on Saturday 8th January 2011 at 5.30 p.m. at Maratha Chamber of Commerce hall, Tilak road, near Swargate, Pune
You are cordially invited in this program. My sincere request to concerned entities is as under :-
Banks may kindly advise their respective branches in Solapur to inform their staff / customers to attend this program.
Colleges may please advise students to take benefit of this program
Brokers / DPs may please attend this program so that in future similar program can be conducted jointly with them
Individuals may inform their friends/relatives to attend this program which will be very informative.
Regards
Chandrashekhar Thakur
Head-Investor Education
CDSL
Tel: 9820389051 csthakur@cdslindia.com
ट्रेडिंग साठी "रेलीगेअर" कशी
ट्रेडिंग साठी "रेलीगेअर" कशी आहे?
कुणाचे काही अनुभव?
दुसरी एखादी चांगली ब्रोकर फर्म असली तरी सांगा.
रेलीगर चांगले आहे.. त्यांच्या
रेलीगर चांगले आहे.. त्यांच्या टिप्स चांगल्या असतात.. ( पण बर्याचदा त्यांचे लोक अॅग्रेसिवली ट्रेडिंग करतात.. आपल्या कन्फर्मेशनशिवाय ट्रेडिंग करणे- विशेष्तः इन्ट्रा डे , आपण घेतलेले शेअर्स परस्परच विकणे आणि तयंच्या टिप्सनुसार काहीतरी घेणे असले उद्योग करतात.. आधीच हे मुद्दे क्लिअर करुन घ्यावे. लॉस झाले तर आपला होतो, प्रॉफिट झाले तर त्याना काहीतरी द्यावे लागत असणार, कल्पना नाही.) एस एम सी कडेही मला असाच अनुभव आलेला आहे.. ( असाच म्हणजे कंसात लिहिलेला अनुभव
)
सातवाहन इस्पात ५५... टार्गेट
सातवाहन इस्पात ५५... टार्गेट १००
धन्यवाद जामोप्या!
धन्यवाद जामोप्या!
icicidirect चांगले वाटते.
icicidirect चांगले वाटते. Axis bank ची नवीन साइट आली का? कुणी त्याची चौकशी केली आहे का
निफ्टी गडगडले..... अजुन किती
निफ्टी गडगडले..... अजुन किती गडगडणार? १५जानेवारीला रिजर्व बँक्ककाहीतरी डिक्लेअर करणार आहे म्हणे.. ते नेमकं काय आहे.. ? कुणीतरी इथे लिहाल का ?
टाटा मोटर डी वी आर ७४० झाला
टाटा मोटर डी वी आर ७४० झाला आहे.. आता घ्यायला आणखीनच चांगला आहे..
सातवाहन इस्पात ५५... टार्गेट
सातवाहन इस्पात ५५... टार्गेट १०० >> किती दिवस थांबावे लागेल? वाढेल असं वाटतं त्याची कारणं काय आहेत?
SIP= Systematic Investment
SIP= Systematic Investment Plan
म्युचुअल फन्डामध्ये एकरकमी गुंतवणूक न करता महिन्याला किंवा ठराविक कालावधीने जी गुंतवणूक केली जाते ती म्हणजे SIP! हि गुंतवणूक Tax Exemption (like 80CCC) साठिइ धरली जात नाही.
ELSS=Equity Linked Savings Scheme
जे म्युचुअल फन्ड टॅक्स सेव्हर म्हणुन असतात ते म्हणजे ELSS!
याला Lock-in period असतो कारण सध्याच्या एक लाखाच्या मर्यादेत ते टेक्स एक्झम्प्शन स्लॅब मध्ये येतात.ELSS मध्ये SIP ने सुद्धा गुंतवणूक करता येते. त्यामुळे ELSS च्या SIP ला ELSS चे सगळे नियम लागू होतात.
ELSS हे एक प्रॉडक्ट आहे तर SIP हा गुंतवणूकीचा एक मार्ग आहे.
सातवाहन इस्पातचे एक नवीन
सातवाहन इस्पातचे एक नवीन फर्नेस सुरु होणार आहे या वर्षी... या टार्गेटला ६-१२ महिने लागतीलअसा अंदाज आहे. इथे अजुन काही माहिती आहे.. http://www.indiainfoline.com/Markets/News/Sathavahana-Ispat-strengthens-...
३०% कॉल निफ्टी ओपशन फेल गेला.
३०% कॉल निफ्टी ओपशन फेल गेला. ४०% लॉस घेवून बाहेर पडलो. त्याआधी ३६ महिन्याचे चार्ट बघितले होते. त्यात ३० वेळा ३०% दिले होते. गेले ४ महिने ३०% आल्यामुळे माबो वर जानेवारी साठी टाकला होता. असो.
पुढील ३ महिन्यासाठि निफ्टी लोवर टार्गेट ५८०३ व वरचे टार्गेट ६४५८ दाखवत आहे.
थोडे थांबा. एकही पैसा नका
थोडे थांबा. एकही पैसा नका टाकू. दुसरी फेज आहे. परत थोडे वर जाऊन आणखी खाली येईल. रिमेम्बर जानेवारी?? होल्ड ऑन.
जर्व बँक्ककाहीतरी डिक्लेअर करणार आहे म्हणे.. ते नेमकं काय आहे.. >>.
इन्फ्लेशन काबूत आणन्यासाठी ( व वर लिक्विडीटी वाढविण्या / कमी करण्यासाठी) आरबिआय बरेच वेळेस पॉलिसी मध्ये बदला, विविध रेट चेंजेंस व रेपो रेटस मध्ये बदलाव आणते. त्यामुळे मार्केटकडे वळणारा पैसा कमी / जास्त होतो. सध्या इन्फ्लेशन ७.५ % वर आहे जे खूप वर आहे. डिसे ते मार्च मध्ये साधारण ६ टक्के होईल असे RBI ला वाटत आहे. पण ते आयडियली ३.५ ते ४% च्या आसपास असावे. त्यासाठी RBI पॉलीसी मध्ये थोडा बदल करेल. त्यामुळे मार्केटची दिशा कुठेही वळू शकेल. ( बातमी कशी घेईल ह्या सेंटिमेंटप्रमाणे)
(हे अगदी थोडक्यात. इन्फ्लेशनचा मार्केटच्या दिशेवर मोठा प्रभाव असतो.)
मार्केट जरा खाली आलय. मला
मार्केट जरा खाली आलय. मला भेल, एल & टी, इन्फोसिस, टीसीएस, सारख्या ब्ल्यू चिप्स मधे मोठी गुंतवणूक दीर्घ मुदती साठी (किमान दोन वर्षे)करायसाठी ही योग्य वेळ आहे का? असल्यास तुम्ही कोणते ब्ल्यु चिप्स किती किमतीस घ्यावे असे सुचवाल? या धाग्या वर बरेच जाणकार लोक दिसतात . सर्वानाच विनंती व आभार.
केदार, अगदी अगदी.. आता ह्या
केदार, अगदी अगदी.. आता ह्या बाफला एक वर्ष होईल.. सुरुवातीच्या पोस्ट मध्येच तू म्हटलयस की गेले काही वर्ष मार्केट जानेवारी मध्ये पडतय म्हणून.. ह्यावर्षी त्याचीच वाट बघतोय आणि अपेक्षेप्रमाणे व्यवस्थित पडतेय मार्केट.. खरेदी साठी तयारी करतोय, इथे बघत राहीनच कधी आणि काय उचलायच ते.. साधारण ३१ जाने पर्यंत थांबून मार्केट कसं जातय हे बघून मग टप्प्या टप्प्यात खरेदी करावी म्हणतोय. शक्यतो ब्लू चिप्स वरच भर आहे..
इन्फ्लेशन हे सगळ्यात मोठे
इन्फ्लेशन हे सगळ्यात मोठे पार्टी क्रॅशर आहे. रीझर्व बँकेला रेट वाढविण्याशिवाय पर्याय नाही. रेटची वाढ मार्केटला कधिही चांगली नसते.
दुसरी गोष्ट, अमेरिकन इकॉनॉमी आता जरा सावरत चालली आहे. अॅसेट अलोकेशन मधे जर एफायाय नी बदल केला तर इथे टाकायचे फंड ते अमेरिकेकडे वळवण्याचा संभव आहे.
आणि गेल्या दोन वर्षातली रॅली ही एफ आय आय नी टाकलेल्या पैशांची आहे. घरचे डीआयआय हे सहभागी झाले नव्हते.
एका अॅनालिस्टने म्हटले होते "एफ आय आय जब पैसा लगाते हैं तो हिसाब नही रखते और निकालते हैं तो लिहाज नही करते." आणि तो अनुभव आधी आलाच आहे आपल्याला एकदा. त्यामुळे केदारने सांगितल्याप्रमाणे थांबा.
क्लीअर अपट्रेंड दिसल्याशिवाय पैसे न टाकणेच उत्तम.
केदार, मार्केट परत खाली
केदार, मार्केट परत खाली उतरलंय. एल अॅन्ड टी, एसीसी खाली आहेत. घ्यावेत कां? केवळ हेच नाहीत तर आणखीन कोणते शेअर्स सुचवशील?
मेटल सेक्टर, फर्टिलायजर
मेटल सेक्टर, फर्टिलायजर सेक्टर आणि बँकिंग सेक्टर बद्दल काय मत आहे? यंदाच्या बजेट वर पण थोडफार मार्केटची दिशा कळून येइल काय?
रंगाशेट डिटेल्स लिहितो. सध्या
रंगाशेट डिटेल्स लिहितो. सध्या इन्फ्रा सुरू केले आहे.
माझ्यामते २०११ हे वर्ष पण इन्फ्रा कंपन्यांना चांगले जाणार आहे. इन्फ्लेशन हा फॅक्टर सध्या जोरात असला तरी इकॉनॉमी ही अजुन काही वर्षे ग्रोथ मोड मध्ये राहणार त्यामुळे इन्फ्रा स्टॉक्स चांगला परतावा देणार. शिवाय ग्लोबलायझेशनचा फायदा थोडाफार भारतीय इन्फ्रा कंपन्यांना होत आहे. ( मिडल इस्ट मध्ये भारतीय इन्फ्रा कंपन्या जोरात आहेत.) एकूण २०११ देखील फायद्याचे ठरेल हे नक्की.
IVRCL : गेल्या तिमाहीत २३ करोड रू चा पॅट IVRCL ने कमवला. २००९ ते २०१० पॅट मध्ये (YonY) ४९ % जास्त नफा २०१० च्या शेवटच्या तिमाहीत होता. FY11 चे ऑर्डर बुक साधारण ३२,००० करोड रू वर आहे. बरेच मोठे प्रोजेक्ट पूर्ण होत आहेत व सौदी मध्ये १८,००० करोड रू. एक प्रोजेक्ट मिळालेला आहे. येत्या वर्षात २० टक्के विक्री ही आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याच्या कंपनीचा मनोदय आहे. आज हा समभाग साधारण ११४ रूं ना मिळत आहे. माझे ९ ते १२ महिन्याचे टारगेट १७५ आहे. साधारण ५५ टक्के नफा हा समभाग येत्या वर्षात देईल असे माझे मत आहे.
IVRCL : स्ट्राँग बाय
नवीन लोकांसाठी - ही माझी मते आहेत, जी चुकीची असू शकतात. पण गेल्या वर्षभरात ज्या शेअर्सवर मी बेट लावल्या आहेत त्या सर्वांनी खूप मोठा परतावा दिला आहे. (उदा टाटा मोटर्स, १००% , लुपीन ५०%, लार्सन ६१% ओरियन्टल ४५% इत्यादी इत्यादी ) त्यामुळे पैसे हे स्वतःच्या रिस्क वर लावावेत.
त्यामुळे पैसे हे स्वतःच्या
त्यामुळे पैसे हे स्वतःच्या रिस्क वर लावावेत. >>> धन्यवाद केदार
>>IVRCL : स्ट्राँग बाय मग
>>IVRCL : स्ट्राँग बाय
मग घ्यायलाच पाहिजे. धन्यवाद केदार
केदार, IRB, Unitech आणि IDFC
केदार,
IRB, Unitech आणि IDFC ह्या इन्फ्रा कंपन्याचे शेअर्स सध्या घ्यावेत का?
Pages