मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शॉर्टिंग करणार कशात? निफ्टी नाही तर थराविक शेअरचे फ्युचरमध्ये किंवा ऑपशनमध्ये.. इतर शेअरमध्ये शॉर्ट करता येत नाही..

टेक्निकल अ‍ॅनॅलिसस चार्ट साठी कोणते चांगले सॉफ्टवेअर / डेटाबेस कुणाला माहिती आहे का? http://www.buzzingstocks.com/ , moneycontrol , google finance वर चार्ट आहेत पण ट्रेन्ड लाईन्स / टार्गेट्स लाईन्स काढणे थोडे कठिण आहे.

मास्तुरे
मी नुकतेच वाचले की, जो शेअरमार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग करतो किंवा खूप फ्रिक्वेंटली ट्रांझॅक्शन्स करतो, त्याला आयकर विभाग गुंतवणूकदार न समजता ट्रेडर समजते व अशा व्यक्तीला लॉंगटर्म कॅपिटल गेनवर सुध्दा टॅक्स भरावा लागतो.>>>>

ते बरोबर आहे. मला जी माहीती आहे ती अशी.
१. F & O मधले ट्रेडींग हे बिझनेस मधे गणले जाते व त्याला बिझनेस चे रूल लागू होतात.

२. शेअर बाबत किती ट्रानझ्याक्शन केली कि ट्रेडर ह्याला काही नंबर नाही. जर एखादा इनव्हेस्टर म्हणूनच दाखवत असेल व आयकर विभागाला हा नंबर जास्त वाटला तर ते त्याला ट्रेडर मानू शकतात. तसे केले तर तो बिझनेस होतो व बिझनेस ऑडीट करावे लागते व टॅक्सही (३०%) त्या प्रमाणात भरावा लागतो. अशावेळी काही शेअर १ वर्षाने विकले तरी त्यावर कॅपिटल गेन ३०% भरावा लागतो. कारण ते बिझनेसचे अंग रहाते. (नक्की टॅक्सची रक्कम म्हणजे स्लॅब प्रमाणे का ३०% ते विचारायला लागेल.)
ह्यातून MF, पर्सनल वेल्थ च्या रूपाने बाजूला काढता येतात पण त्याची वेगळी बॅलन्स शिट करायला लागते.

३. जर शेअरची फाइनानशिअल वर्षातली उलाढाल (खरेदी + विक्री) ४० लाख वा त्याच्या वर गेली तर मात्र तो ट्रेडर धरला जातो.

धन्यवाद सुरेश. ही खूप महत्वाची माहिती आहे.

>>> ३. जर शेअरची फाइनानशिअल वर्षातली उलाढाल (खरेदी + विक्री) ४० लाख वा त्याच्या वर गेली तर मात्र तो ट्रेडर धरला जातो.

शेअर खरेदी-विक्रीचा बिझनेस म्हणून विचार केला तर ४० लाख ही फारच मामुली रक्कम वाटते. असो.

साक्षी
मजजवळ ओनजिसी आहेत. आता अजुन अव्हरेज कधि करु>>

ओऩजिसीचे ५% शेअर सरकार निर्गुंतवणुकीद्वारा मार्चपर्यंत विकणार आहे. शिवाय शेअरचे विभाजनही केले जाणार आहे.......... निर्गुंतवणूक जाहीर होइपर्यंत खरेदी करु नये. संदर्भः पटवर्धन, सकाळ साप्ताहिक १२ फेब्रुवारी.
मी ग्राफ पाहीलेले नाहीत.

खाद्य महागाई दर १७ वरुन १४ वर आला...

उद्या आता राइस प्लेट २ रु स्वस्त होनार आणि इन्फोसिस २० रु वाढणार Happy

मार्केट सकाळी घसरल्यावर ५२२० रेंज मध्ये परत आले. ५२२० बद्दल मी वरही दोनदा लिहिले, तिथे जर कन्फर्म होत असेल तर ४ थ्या लेगसाठी तयारी करायला पाहिजे! (सध्याच्या लेवलच्या अजुन खाली एका रिलीफ रॅली नंतर)

मी शॉर्ट होतो. त्या मार्केट परत वर आल्यावर (लिहिताना +४ ) कव्हर केल्या. गेले पूर्ण आठवडा मार्केट सेकंड हाफ मध्ये फर्स्ट हाफच्या विरुद्ध दिशेला जाते. त्या ट्रेन्डला धरुन आज वर जाईल का? असे झाले तर मग मायनर ट्रेन्ड बदलून परत अजुन एक मायनर ट्रेन्ड ( लेग ४) साठी तयार होऊ शकतो. आज वर गेले तर मग सोमवारपासून पुढे ५४०० ह्या रेसिस्टन्सची वाट पाहायची अन्यथा आजचा दिवस फसवा होता हा विचार करुन परत शॉर्ट करायला पाहिजे.

एडीट :

निफ्टी चक्क १२ च्या प्रिमियम मध्ये?? १४ लाखाचा OI आणि मार्केट २६ ने वर! साउंड्स लाईड कालचा आणि आजचा OI मिळून एक रॅली!

चौथा लेग म्हणजे नेमकं काय आहे?जरा डिटेल मध्ये लिहाल का? मार्केट २६ने वर म्हणजे नेमकं काय्-सेन्सेक्स का निफ्ती?

निफ्टी. २६ ने वर मी जेंव्हा दुकान बंद केले तेंव्हा होते त्यानंतर एकदम ५३००!. त्या आधीच्या प्यार्‍यात दुपारच्या सत्रात ट्रेन्ड रिव्हर्सल होऊ शकते (OI आणि प्रिमियम) असा अंदाज वर्तवला होता तो खरा ठरला. ५४०० ची आता वाट पाहणे. दुपारी मार्केट झिग झॅग बिहेव्हियर (त्यालाच ट्रेन्डचे लेग म्हणू) कसे असते ते निफ्टीच्या चार्टवर दाखवेल.

nifty_1.jpg

मार्केट हे कायम एका ट्रेन्ड मध्ये असते. ट्रेन्ड वापस आणू पाहणारे मग मार्केट वर नेतात (किंवा दुसर्‍याबाजूवाले पाडतात) त्याचे पॅटर्न तयार होतात.
उदा निफ्टी ची धाव समजा २५ ते १०० अशी आहे.
१. तर निफ्टी ४० हाय
२. निफ्टी ३५ पर्यंत खाली.
३. निफ्टी ६० हाय
४. निफ्टी ५० पर्यंत खाली
५ निफ्टी ८० हाय

ह्या सर्वात आधीचा उच्चांक मोडला गेला पण आधीचा निच्चांक मोडला गेला नाही. ह्याची झिकझॅक लाईन काढली तर हे पाँईट म्हणजे १,२,३,४,५ वगैरे. आता ह्यावर कधीकधी निच्चांक मोडला जातो पण तरीही मुख्य ट्रेन्ड कायम राहतो हे पण असू शकते. थोडक्यात ते पाहायला आणखी कालावधी द्यावा लागतो.

दरवेळी २५ पासून १०० पर्यंत जाताना अनेकदा निफ्टी जर एका ठिकाणी थांबला तर तिथे सपोर्ट ( व त्याचाच नंतर रेसिस्टन्स) फॉर्म होतो. तिथे ट्रेड रिव्हर्स करता येतो. हे समजावून घेण्यासाठी निफ्टीचा चार्ट बघा. तिथे मायनर ट्रेन्ड मध्ये हे झिकझॅक कसे झाले आहे व पहिल्या ५४०० ला आपण सगळ्यांनी कसे मिसरीड केले ते दिसेल. ती खरेतर डाऊन ट्रेन्ड मधील एक अप रॅली होती. आता येत्या सेशन्स मध्ये जर निफ्टीने ५४०० (जिथे रेसिस्टन्स निर्मान झाला आहे तो भेदला तरच मार्केट परत अप ट्रेन्ड मध्ये जाण्याची शक्यता वर्तविता येईल, अन्यथा तो एक रिलिफ पाँईट असेल परत खाली जायला. Happy

आता येत्या सेशन्स मध्ये जर निफ्टीने ५४०० (जिथे रेसिस्टन्स निर्मान झाला आहे तो भेदला तरच मार्केट परत अप ट्रेन्ड मध्ये जाण्याची शक्यता वर्तविता येईल, अन्यथा तो एक रिलिफ पाँईट असेल परत खाली जायला. >>>>>>> त्या वेळेस (निफ्टीने ५४०० पासून खाली यायला सुरु केल्यावर) कोठे शॉर्ट पोझीशन करता येतील काय?
म्हणजे काही स्टॉक स्पेसिफिक ......... जे टेक्निकली, चार्ट वर खूपच बेअरिश वाटतात........ काही सुचवले तर बरे होईल.

पहिल्या ५४०० ला आपण सगळ्यांनी कसे मिसरीड केले ते दिसेल. ती खरेतर डाऊन ट्रेन्ड मधील एक अप रॅली होती

तोच तर खरा प्रॉब्लेम आहे... हे मिस रीड झाले हे आधी समजत नाही... घडून गेल्यावरच समजते!

मौका सभी को मिलता है!

-निफ्टीहृदयसम्राट

>>
एक बॉलपे दो चौके, और एक जिन्दगीमे दो मौके; कभी नहीं मिलते !! Proud

Happy

इंडस्ट्रियल प्रोडक्शनचे नोव्ह डिस चे आकडे कमी आले आहेत, म्हणून मार्केट पडले म्हणे.. ( आता यावर्षीपासून दिवाळी आणि ख्रिस्मसच्या सुट्ट्या रद्द करायला हव्यात म्हणजे हे आकडे इथुन पुढे तरी चांगले येतील . Proud )

आज पेप्रात एक जाहिरात आहे. सॉफ्ट्वेअर ९५ % अक्युरसी देते म्हणुन.. काही अनुभव?>>>
हे कुठले ते मला माहीत नाही. मध्ये मी अशाच एका फ्री सेमिनार ला गेलो होतो. तेथे ज्याने सॉफ्टवेअर दाखवले त्याने सांगीतले कि सॉफ्टवेअर रन केले की आपोआप तुम्हाला कुठले शेअर कुठल्या किंमतीला घ्या व कुठल्या किंमतीला विका ते कळेल. तुम्हाला बाकी काही करता येणार नाही. ४० वेगवेगळ्या queries मधून गेल्यावर ते शेअर व किमती बाहेर येतात असे त्याने सांगीतले. ह्याचे रिझल्टस कसे आहेत ते मला माहीत नाही. जे नुकतेच मार्केट मध्ये प्रवेश करतायत व अजुन खुप प्रवास करायचाय त्यांना एक सांगावेसे वाटते. शॉर्टकट न घेता प्रथम स्वःता अभ्यास करून fundamental va technical हे क्लियर करून घ्या. ते केल्यावर अशा गोष्टी गायडन्स म्हणून वापरा. नाहीतर त्या कुबड्या ठरतील. थोडक्यात टिपस घेवू नका तर द्यायला शीका.
Cheers.

आज पेप्रात एक जाहिरात आहे. सॉफ्ट्वेअर ९५ % अक्युरसी देते म्हणुन.. काही अनुभव?>>
मी ह्या वर लिहीताना कोणालाही दुखवायचे मनात नव्हते. गैर समज नसावेत.

सुरेश, अगदी योग्य सल्ला दिलात. Happy
तुम्ही सांगितले तसं नाही केलं तर बाकी काही नाही तर शेअरांना मार्केटात १२ चा भाव नक्कीच मिळेल.

आज पेप्रात एक जाहिरात आहे. सॉफ्ट्वेअर ९५ % अक्युरसी देते म्हणुन.. काही अनुभव? >>. सुरेजींच्या मतास अनुमोदन. सॉफ्टवेअर कितीही चांगले असले तरी इंटरप्रिट करायला मेहनत आणि अभ्यास लागतो. शिवाय सर्व इंडिकेटर्स वरून ट्रेड करत असले तर सर्वच श्रीमंत झाले असते.

सेटप लावणारे (म्हणजे आपल्याल्या हवे ते इंडिकेटर्सवर हव्या त्या लेवल्स लावून ठेवूने वगैरे) अनेक सॉफ्टवेअर बाजारात उपलब्ध आहेत. पण सेटप लावन्यासाठी अभ्यास जरूरी आहे.

विकली निफ्टी केंव्हा?? >> लिहू लिहू म्हणून सुरूवात होत नाही, इथेच लेवल्स लिहितोय.

४० वेगवेगळ्या queries मधून गेल्यावर ते शेअर व किमती बाहेर येतात असे त्याने सांगीतले

मी त्याच सॉफ्टवेअर बाबत बोलतोय.. Happy

५४५० निफ्टी ( निफ्टी खाली जाताना आलेखात लेग तयार होतात.. आता वर जाताना आर्म तयार झाले का? Happy )

आता वर जाताना आर्म तयार झाले का? >> दुर्दैवाने वर जातानाही लेगच तयार होतात. Happy

आधीच लिहिल्यासारखे ५४०० ची वाट पाहणे उरले होते. आता ५४०० चा रेसिस्टन्स टेस्ट झाला व मार्केट ५४५६ पर्यंत गेले. तुम्ही वरचा चार्ट पाहिलात तर आता मार्केटने ५५४४ ची लाईन भेदली तरच परत लेग्स काढणे आले. तो पर्यंत हेच (५५४४ ची लाईन भेदे पर्यंत) ट्रेन्ड बाबत काहीही सांगता येत नाही.
दोन दिवस ३०० पाँईन्टसनी वर आहे पण वर जाताना सलग चढले, मध्ये पडून नाही त्यामुळे कुठलेही पॅटर्न्स तयार झाले नाहीत. फार तर ह्या दोन्ही कॅन्डल्सना बुलीश इन्गल्फिंग पॅटर्नच्या कँडल्स म्हणता येईल.

http://nseindia.com/ इथे जाऊन कालचा इन्ट्रा डे चार्ट पाहा. त्यावर देखील ५४५० ला गेल्यावर मार्केट थांबले व परत खाली आले. खाली येऊन परत ५४५० भेदला. ह्या खाली येऊन वर जाण्याच्या पद्धतीवरून a,b,c पॅटर्न्स ओळखले जातात.. काल तसे फॉर्म नाही झाले पण ५४५० ची पूर्ण रेंज लक्ष देउन पाहा ५४५०, ५४२५ परत ५४४७ ( डबल टॉप ) परत रिट्रेस टू ५४३७ पण तिथे न थांबता लगेच वर अजुन एक हाय. थोडक्यात ५४५० ला आल्यावर मार्केटला थांबन्याची गरज वाटली. आणि जर आपण मार्केट मध्ये नसू (पोझिशन) तर त्या कधी घ्यायच्या ते अशा लेग्स वरून (मग इन्ट्राडे ते इन्ट्रा इयर ) ठरवता येते. अनुभव व अभ्यासावरून लाईव्ह डेटा
( इन्ट्राडे मध्ये) पण हे पॅटर्न्स कळतात.

निफ्टी १६ फेब स्ट्रॅटेजी

५४६४ च्या वर ओपन झाले तर लाँग - टारगेट ५५२२, स्टॉपलॉस ५४२४ S2 ५३६७

बँक निफ्टी जोरदार बुलीश दिसत आहे. डेफिनेट लाँग. कारण बँकींग सेक्टर गेले तीन दिवस मस्त परफॉर्म करत आहेत, अजुन एक दोन दिवस चांगलेच जाणार.

आज लिहिलेली पोझिशन :
BNIFTY.jpg

सहसा असे मी टाकत नाही, पण बरेच दिवस झाले. (जे इथे लिहितो ते मी करतो सुद्धा ) Happy

बाय करताना पिव्होट पाँईटला बाय केले १०९०० दिवसभरात कधीतरी स्वेअर ऑफ करेन. Happy

केदार, माझा कडे mastek (१८०/-), shirpur gold( १५१/-) आहेत, परत या रेजला येतील का? का काढुन टाकू.

केदार,
मी आज ३१०० साठी शेअर्स घेणार व २७४९ अप्पर लेवल व्हॉल्युम ने ब्रेक झाला तर फ्युचर्स पण घेणार>>>>>>>
९ फेब्रु. ............ आता काय?

Pages