Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
श्री सावट, <<<<'अहं
श्री सावट,
<<<<'अहं ब्रह्मास्मि'... .. असे साक्षिरुप 'आत्मज्ञान' झालेले असतानाही.. या मधला 'अहं' हा..श्रीभगवंतांच्या व्याख्ये नुसार 'विभक्त' च असतो... कारण 'मी आणि श्रीभगवंत' वेगळे आहेत असा भाव या स्थितीतही असतोच.>>>>
'अहं ब्रम्हास्मि' चा अर्थ मीच ब्रम्ह आहे असा मी आता पर्यंत समजत होते. हे चूक आहे काय?
नक्की अर्थ काय ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
मा. नितीनजी, धन्यवाद! सुनिता,
मा. नितीनजी,
धन्यवाद!
सुनिता, नमस्कार! कशा आहात?
>>>'अहं ब्रम्हास्मि' चा अर्थ मीच ब्रम्ह आहे असा मी आता पर्यंत समजत होते. हे चूक आहे काय?
नाही ते बरोबरच आहे. पण 'ब्रह्मवस्तू' वेगळेपणाने..त्या वस्तू पासून वेगळे राहून.. म्हणजेच द्वैतात असताना पुर्णत्वाने जाणली असे होत नाही. ब्रह्म हे स्वतः 'ब्रह्म' होऊनच जाणावे लागते. शास्त्रदृष्ट्या जो ''मी' ब्रह्म आहे' असे जो म्हणतो... त्याने काहीच जाणले नाही असे होते. कारण...
स्वतः वेगळा असणारा थेंब ('मी' देह आहे)... असे म्हणणारा थेंब... हा 'मी' समुद्र आहे असे जरी समजला तरिही अजून 'मी' जागृतच असतो...याला, त्याला झालेल्या ज्ञानाचा 'लेश'(राहीलेला भाग) असे म्हणतात. 'मी देह असे' म्हणने हे झाले 'अज्ञान' तर 'मी ब्रह्म आहे' हे झाले 'ज्ञान'. पण ब्रह्म हे 'ज्ञान आणि अज्ञान' याच्या पलीकडचे आहे...
आपल्याला 'प्रकाश(ज्ञान) आणि अंधार(अज्ञान)' याचा अनुभव येतो.. कारण सुर्य...त्याला अनुसरुन आपले सर्व व्यवहार.. कालमान चालते. पण आपण समजा सुर्यावरच आहोत तर.. या सगळ्याचा काहीच उपयोग होणार नाही... तिथे अंधार म्हणजे काय? असे विचारले जाईल.. ते जसे सांगता येणार नाही तसेच.. त्याच्या सापेक्ष असणारा 'प्रकाश' म्हणजे काय हे ही सांगता येणार नाही.
तसेच खरे 'आत्मज्ञान' हे त्या ज्ञानात पुर्णत्त्वाने मिसळूनच शक्य आहे... असे मिसळताना मी(वेग़ळा) ज्ञानी आहे.. हा 'ज्ञानी' असणारा आणि अजूनही 'मी' त्वाने स्वतःस वेगळा समजणारा(अज्ञानी).... लेश हा पासंगालाही उरला नाही पाहीजे... म्हणूनच या पुढच्या स्थितीला 'सर्व खल्विदं ब्रह्मा' असे वेगळे नाव आहे... !:)
धन्यवाद!
आपल्याला 'प्रकाश(ज्ञान) आणि
आपल्याला 'प्रकाश(ज्ञान) आणि अंधार(अज्ञान)' याचा अनुभव येतो.. कारण सुर्य...त्याला अनुसरुन आपले सर्व व्यवहार.. कालमान चालते. पण आपण समजा सुर्यावरच आहोत तर.. या सगळ्याचा काहीच उपयोग होणार नाही... तिथे अंधार म्हणजे काय? असे विचारले जाईल.. ते जसे सांगता येणार नाही तसेच.. त्याच्या सापेक्ष असणारा 'प्रकाश' म्हणजे काय हे ही सांगता येणार नाही.
>>> अगदी सोपे करुन सांगितलेत
तुम्ही काही पोस्टपुर्वी मला विचारलेला प्रश्न मी विसरले नाहिये. बरीच धावपळ सुरु असल्याने व्यवस्थीत उत्तर लिहिण्यासाठीची शांतता मिळाली की नक्की प्रयास करेन लिहीण्याचा
धन्यवाद सावटजी, समजले.
धन्यवाद सावटजी, समजले.
अश्विनी.. कृपया उत्तर देण्यात
अश्विनी.. कृपया उत्तर देण्यात गडबड करू नये.. किंबहुना त्यावर आपले.. सर्वांचे.. स्वतःचेच 'निखळ' चिंतन व्हावे हीच माफक अपेक्षा आहे... परमेश्वर सर्वांना सहजसाध्य आहे(सुलभसाध्य नाही. :)).. हे जाणणेच या मागचा हेतु आणि कारण ही आहे.
म्हणूनच पुढचे प्रश्न... आणि उत्तरही.
>>>न लगे साधन संपन्नता | न लगे षट्शास्त्रचातुर्यता |
एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा ||श्रीसाईसच्चरित १९.७४ ||
"न लगे साधन संपन्नता", यात 'साधनच' नको असे सांगितले आहे की.. साधनाची संपन्नता नको असे सांगितले आहे?... जर समजण्यात चुक झाली ...तर मार्गच बदलतो... मग कितीही चालले तरी 'ध्येय' दूरच रहाते.
तसेच,
"न लगे षट्शास्त्रचातुर्यता", यात 'षटशास्त्रे' नकोत असे सांगितले आहे की.. त्यावर आधारलेले पोकळ पांडित्य नको असे सांगितले आहे?
"एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा"
'शास्त्र आणि साधन' दोन्हीही हवेच. पण 'मी' साधक आहे..साधना करतो.. असा संपन्नतेचा भ्रमात्मक अभिमान त्याचा घात करतो तसेच.. शास्त्रज्ञानाच्या बाबतीत आहे... ज्ञानाचा अभिमान कदापी नसावा.म्हणूनच खरे 'जाणते आणि दाविते' हे श्रीसद्गुरुच आहेत... खरा 'कर्ता'.. आपल्याकडून 'साधना' करवून घेणारा.. म्हणजेच शास्त्राला मान्य असणार 'योग' करवून घेणारा आणि ती साधना अनुसरत असताना.. साधनेच्या आड येणार्या संकटाचा नाश करणारा... 'हर्ता'.. म्हणजेच 'क्षेम' ही पहाणारा ही तोच आहे.. असा 'एक' म्हणजेच संशयरहीत 'विश्वास' असला पाहीजे. त्यानेच सर्व साध्य होते. :)(अन्यथा कदापी नाही.)
धन्यवाद!
काळजी घ्या... तुमच्या सोबत्यांची!
धन्यवाद सावट अगदी अगदी.
धन्यवाद सावट

अगदी अगदी. किती थोडक्यात पण परफेक्ट सांगितलंत ! हेच मी लिहायला बसले तर खूप फाफटपसारा लिहीत बसेन
'शास्त्र आणि साधन' दोन्हीही हवेच. पण 'मी' साधक आहे..साधना करतो.. असा संपन्नतेचा भ्रमात्मक अभिमान त्याचा घात करतो तसेच.. शास्त्रज्ञानाच्या बाबतीत आहे... ज्ञानाचा अभिमान कदापी नसावा.म्हणूनच खरे 'जाणते आणि दाविते' हे श्रीसद्गुरुच आहेत... खरा 'कर्ता'.. आपल्याकडून 'साधना' करवून घेणारा.. म्हणजेच शास्त्राला मान्य असणार 'योग' करवून घेणारा आणि ते साधना अनुसरत असताना साधनेच्या आड येणार्या संकटाचा नाश करणारा... 'हर्ता'.. म्हणजेच 'क्षेम' ही पहाणारा ही तोच आहे.. असा 'एक' म्हणजेच संशयरहीत 'विश्वास' असला पाहीजे. त्यानेच सर्व साध्य होते. (अन्यथा कदापी नाही.) >>> यावरुन दोन ओळी आठवल्या...
वीणा टाळ वाहून गेले भीमेच्या पाण्यात
सोनियाचा गरुडटका बैसलो निवांत
वीणा टाळ - साधन
वाहून गेले - संपन्नतेचा भ्रामक अभिमान नष्ट होणे
सोनियाचा गरुडटका - संपन्नतेचा भ्रामक अभिमान (की अजून काही?
)
बैसलो निवांत - <<<म्हणूनच खरे 'जाणते आणि दाविते' हे श्रीसद्गुरुच आहेत... खरा 'कर्ता'.. आपल्याकडून 'साधना' करवून घेणारा.. म्हणजेच शास्त्राला मान्य असणार 'योग' करवून घेणारा आणि ते साधना अनुसरत असताना साधनेच्या आड येणार्या संकटाचा नाश करणारा... 'हर्ता'.. म्हणजेच 'क्षेम' ही पहाणारा ही तोच आहे.. असा 'एक' म्हणजेच संशयरहीत 'विश्वास' असला पाहीजे. त्यानेच सर्व साध्य हो>>> या अढळ विश्वासामुळे येणारा निश्चिंतपणा. अढळ विश्वासाने आपले कर्मस्वातंत्र्य सद्गुरुंच्या चरणी समर्पित केले की ही निश्चिंतता येते.
----
काहीतरी मोडकं तोडकं लिहितेय झालं !
अश्विनी, >>>अढळ विश्वासाने
अश्विनी,
>>>अढळ विश्वासाने आपले कर्मस्वातंत्र्य सद्गुरुंच्या चरणी समर्पित केले की ही निश्चिंतता येते.
हे पहाताना अजून एक लक्षात घ्यावे लागते... ते म्हणजे जन्माला(जन्म-मरण चक्र) कारण हे 'कर्म' नाहीच आहे.. तर ते 'कर्म' करण्यामागचा 'हेतु' आहे. हे कळाले म्हणजे निम्मे काम झाल्यासारखे आहे.
>>>काहीतरी मोडकं तोडकं लिहितेय झालं !
हे महत्त्वाचे आहे... कारण लिहीताना 'विचार'(चिंतन) करावा लागतो.. तो विवेकाच्या अनुषंगाने झाला म्हणजे झाले... आणि हा 'सद-विवेक' दाता श्रीसद्गुरु आहेत हे कळाले म्हणजे... मग अजुन काय हवे?
धन्यवाद!
हे पहाताना अजून एक लक्षात
हे पहाताना अजून एक लक्षात घ्यावे लागते... ते म्हणजे जन्माला(जन्म-मरण चक्र) कारण हे 'कर्म' नाहीच आहे.. तर ते 'कर्म' करण्यामागचा 'हेतु' आहे. हे कळाले म्हणजे निम्मे काम झाल्यासारखे आहे. >>>
अगदी अगदी. एखादी आई मुलाच्या खर्या भल्यासाठी त्याने न कुरकुरता शाळेत जावे म्हणून धपाटा घालून "मेल्या, शाळेत गेला नाहीस तर जेवायला घालणार नाही" वगैरे बोलते तेव्हा जेवायला न घालण्याची धमकी / वांड मूल असेल तर खरोखर एखाद्या वेळेस उपाशी ठेवणे हे कर्म वरकरणी वाईट दिसेल. पण त्या मागचा हेतू हा त्या बाळाच्या आयुष्याचे भले व्हावे हाच असतो. त्या उलट एखादी सावत्र आई (सगळ्याच सावत्र आया वाईट असतात असे म्हणायचे नाही मला) जर मुलाला "बाळा, नाही का तुला शाळेत जायचं? कंटाळा येतो तर नकोच जाऊस. बाहेर खेळायला जा" म्हणत असेल तर त्या मुलाला आपली आई किती चांगली आहे असे वाटेल पण तिचा खरा हेतू हाच असेल की त्या मुलाचे कधीही भले होऊ नये, तो उनाड व्हावा आणि वाया जावा.
असो, माझ्या 'कर्मस्वातंत्र्य सद्गुरुंच्या चरणी अर्पण करणे' या म्हणण्याचा अर्थ असा की, पुर्वी म्हटल्याप्रमाणे "हा देहच नाही जेथे अपुला, एकदा जो साईचरणी वाहिला | मग तयाच्या चलनवलनाला, काय अपुला अधिकार ||" (काही शब्द इकडे तिकडे झाले असतील).
मा. नितीनजी, आपण..'श्रीगजानन
मा. नितीनजी,
आपण..'श्रीगजानन विजय' या सद्ग्रंथातील...अध्याय सहाव्यामधील ... श्लोक क्रमांक ५७ ते ७२ कृपया येथे लिहू शकाल काय?
मा. नितीनजी, >>>भगवंताच्या
मा. नितीनजी,
>>>भगवंताच्या मनातला योग हा " समत्व प्राप्ती " असे असावे.
'असावे' असे म्हणण्यात अजूनही निश्चितता दिसत नाही... तुमच्या पोष्ट्च्या अगोदरच्या पोष्टमध्येच याचे उत्तर आले आहे.. ते कृपया पहावे. आणि...
'समत्त्व' कशाचे हे जाणनेही महत्त्वाचे आहे.
असो.
महेश, >>>थेंबाने पुर्ण समुद्र
महेश,
>>>थेंबाने पुर्ण समुद्र जाणण्याचा प्रयत्न करणे कितपत शक्य आहे ?
जाणण्यापेक्षा अनुभवणे आणि त्यात विलीन होऊन जाणे याचसाठी अनेक उपासना मार्ग आहेत.
ज्ञान, प्रेम, भक्ती, कर्म, इ. योग आहेत. सर्वसामान्य लोकांना आकलन होण्यास सोपे जावे यासाठी परमतत्वाची सगुण साकार रूपे अस्तित्वात आली. त्यायोगे सर्वत्र विखुरलेल्या चित्तवृत्ती एकत्र करून परम तत्वात विलीन करून टाकणे हेच सर्व ध्यान धारणा, उपासना मार्गांचे अंतिम ध्येय आहे.
चित्तवृत्ती एकत्र करायच्या म्हणजे नेमके काय करायचे?
'वृत्ती' म्हणजे काय?
>>>सर्वसामान्य लोकांना आकलन होण्यास सोपे जावे यासाठी परमतत्वाची सगुण साकार रूपे अस्तित्वात आली.
'सर्वसामान्य' म्हणजे काय अभिप्रेत आहे? हे कसे ठरवायचे?
गौरी, >>>तो जर महाकाय सागर
गौरी,
>>>तो जर महाकाय सागर आहे तर मी त्या सागरातल्या पाण्याचा एक थेंब, मग मी नक्की प्रार्थना कोणाला करते आणि ती त्याच्यापर्यंत पोचते कशी?
>>>मग हे असे वाईट कर्म पटकन संपवता येईल, ह्या साठी भक्ती-उपासनेची काहि विशिष्ट पद्धत आहे का?
परमार्थात ही मागणी - पुरवठा तत्त्व चालते म्हणुन हा प्रश्न विचारायचे धाडस केले आहे.
'भक्ति-उपासनेची पद्धत' सोडून वरचे बाकीचे लक्षात आले काय?:)
माधव, >>>>>>प.पू श्री गजानन
माधव,
>>>>>>प.पू श्री गजानन महाराजांनी 'कशापासून जग झाले' याचे मनन करायला सांगितले आहे.
हे कुठल्या प्रसंगात ... केव्हां आणि का सांगितले आहे ..याविषयी ही कृपया सांगावे.
धन्यवाद!
अश्विनी, >>> न लगे साधन
अश्विनी,
>>>
न लगे साधन संपन्नता | न लगे षट्शास्त्रचातुर्यता |
एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा ||श्रीसाईसच्चरित १९.७४ ||
हे वरचे सांगणे... उपदेश हा 'साधक' अवस्था ठळकपणे दर्शवितो... यात साधना कशी असावी... हे सांगितले आहे. यातला साधक हा साधनारत आहे.. पण सिद्धावस्था अजूनही न मिळालेला आहे.. तर...
>>>
वीणा टाळ वाहून गेले भीमेच्या पाण्यात
सोनियाचा गरुडटका बैसलो निवांत
ही अवस्था ही 'सिद्धावस्था' दर्शविते. साधकावस्थेत करायला पाहीजे अशी साधने-आलंबने ही वीणा, टाळ याने दर्शविली आहेत... तसेच साधनारत असताना साधकाला आतून प्रकटलेला 'अनाहत-नाद' हा वीणा-टाळ यांच्या नादाने दर्शविला आहे. भीमानदी म्हणजे 'सुषुम्ना' नाडी... 'पाणी' म्हणजे प्राणासहीत असणारी 'शक्ती'... ह्या शक्तीचेचालन जेव्हा 'अनाहतचक्र' भेदून पुढे जाते त्यावेळी हा 'नाद' ही शमतो.. शक्तीत विलीन होतो... पाण्यात वाहून जातो... !
यानंतरची अवस्था 'सोनियाचा गरुडटका बैसलो निवांत' याने दर्शविली आहे... ! हा निवांतपणा हा मनाचाही लय झाल्याने मिळालेला आहे.( त्याच्याअगोदरचा नाही.!:))
म्हणूनच
प.पू श्री ब्रह्मचैतन्यमहाराज म्हणतात त्यानुसार..
...."आपण जे मिळविले आहे ते स्वतःच्या प्रयत्नाने मिळाले, ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही....!"
वर सांगितलेला 'निवांतपणा' म्हणजे 'देह' प्रारब्धावर टा़कणे होय.:)
आता......
>>>असो, माझ्या 'कर्मस्वातंत्र्य सद्गुरुंच्या चरणी अर्पण करणे' या म्हणण्याचा अर्थ असा की, पुर्वी म्हटल्याप्रमाणे "हा देहच नाही जेथे अपुला, एकदा जो साईचरणी वाहिला | मग तयाच्या चलनवलनाला, काय अपुला अधिकार ||" (काही शब्द इकडे तिकडे झाले असतील).
याचाही अर्थ लागेल..!:)
धन्यवाद!
मा. नितीनजी, >>>जाणकार
मा. नितीनजी,
>>>जाणकार योगी-गुरु यांच्यामते योग आणि हटयोग यात अंतर आहे.
"हटप्रदिपीका" हा मार्गदर्शक ग्रंथ हटयोगाबाबत विस्तृत मार्गदर्शन करतो.
हटयोगतल्या बर्याच क्रिया या अभ्यासुचे अरोग्य चांगले रहावे यासाठीच्या आहेत. हटयोगात दिर्घायुष्य आणि अरोग्य याची प्रार्थमिकता असते.
'योग' हा शब्द ..शास्त्रात बहुअंगाने वापरला जातो. म्हणून संदर्भ पाहून त्याचा अर्थ घ्यावा लागतो.
'योग' याचा अर्थ एखाद्या गोष्टीशी जोडले जाणे... सलंघ्न होणे..मिसळून जाणे..संयोग होणे.. स्वरुपात बदल होणे इ. अर्थाने पाहीला जातो,
अध्यातमिकतेने पाहील्यास.... आत्म्याचा योग परम्यात्म्याशी... जीवाचा योग शिवाशी... अपेक्षीत आहे.
हे समजावून घेण्याकरीता... 'लाकूड' आणि त्यात स्वाभाविकपणे असणारा.. पण स्वाभविकपणे प्रकट नसणारा 'अग्नि' यांचे उदाहरण घेऊयात. लाकूड म्हणजे 'जीव'... तर 'अग्नि' म्हणजे 'शिव'. शिवत्त्वाच्या प्रकटणासाठी... दोन लाकूडे एकमेकावर घासायला लागतात... या करिता अगोदर 'शक्ती' लागते.. म्हणजे शक्तीचे प्रकटण होणे अगोदर होते.. त्यामूळे अग्नि प्रकटतो आणि त्याच्या संयोगामूळे लाकडाचे स्वरुप बदलते. ही प्रक्रिया 'योगा' मूळे शक्य होते... योगशास्त्रानुसार याला, चित्तवृत्तीचा निरोध असे म्हणतात.
योगशास्त्रानुसार...यात चार प्रकार-विभागणी असते... मंत्रयोग,हठयोग, लययोग आणि राजयोग.
धन्यवाद!
ही अवस्था ही 'सिद्धावस्था'
ही अवस्था ही 'सिद्धावस्था' दर्शविते. साधकावस्थेत करायला पाहीजे अशी साधने-आलंबने ही वीणा, टाळ याने दर्शविली आहेत... तसेच साधनारत असताना साधकाला आतून प्रकटलेला 'अनाहत-नाद' हा वीणा-टाळ यांच्या नादाने दर्शविला आहे. भीमानदी म्हणजे 'सुषुम्ना' नाडी... 'पाणी' म्हणजे प्राणासहीत असणारी 'शक्ती'... ह्या शक्तीचेचालन जेव्हा 'अनाहतचक्र' भेदून पुढे जाते त्यावेळी हा 'नाद' ही शमतो.. शक्तीत विलीन होतो... पाण्यात वाहून जातो... !
यानंतरची अवस्था 'सोनियाचा गरुडटका बैसलो निवांत' याने दर्शविली आहे... ! हा निवांतपणा हा मनाचाही लय झाल्याने मिळालेला आहे.( त्याच्याअगोदरचा नाही.!)
>>>>
अव्वा ! जबरदस्त हो
धन्यवाद.
धन्यवाद सावटजी, मी फक्त
धन्यवाद सावटजी,
मी फक्त स्वामी विवेकानंदांचा " राजयोग " हा ग्रंथ वाचला आहे. तो योगसुत्रावर आधारीत असल्याने योगसुत्र याचे विवेचन आणखी दोन लेखकांचे वाचले.
१) डॉ. प.वि, वर्तक
२) माझे गुरु - श्री विश्वास मंडलीक
३) श्री कोल्हटकर - ग्रंथ संग्रही आहे अद्याप वाचन अपुर्ण.
'योग' हा शब्द ..शास्त्रात बहुअंगाने वापरला जातो. म्हणून संदर्भ पाहून त्याचा अर्थ घ्यावा लागतो.
'योग' याचा अर्थ एखाद्या गोष्टीशी जोडले जाणे... सलंघ्न होणे..मिसळून जाणे..संयोग होणे.. स्वरुपात बदल होणे इ. अर्थाने पाहीला जातो,
सहमत आहे.
कुतुहल म्हणुन विचारतो. मंत्रयोग, लययोग याबाबत कोठे वाचावयास मिळेल ?
प.पू श्री गजानन महाराजांनी
प.पू श्री गजानन महाराजांनी 'कशापासून जग झाले' याचे मनन करायला सांगितले आहे. हे कुठल्या प्रसंगात ... केव्हां आणि का सांगितले आहे >>
महाराजांच्या जेवणानंतर दामोदरपंत त्यांच्यासाठी माठातले वाळा घातलेले पाणी घेऊन आले पण ते यायच्या आधीच महाराज जवळच गुरांकरता असलेल्या ओहोळाकडे गेले आणि त्याचे पाणी पीऊ लागले. थंडगार, सुवासीत पाणी आणि गढूळ पाणी ही रुपे दिसायला जरी अगदी भीन्न असली तरी आहेत ती शेवटी पाण्याचीच रुपे. आणि पाणी हे पण एक रुपच आहे की. ही सगळी रुपे कशापासून निर्माण झाली याचे मनन करायला महाराजांनी सांगितले आहे. का?
माझ्यासारखा माणूस एक तर गढूळ पाणी पीऊच शकणार नाही आणि 'उसने अवसान' आणून प्यायलाच तर हमखास आजारी पडेल. पण जेंव्हा जग कशापासून झाले हे अगदी तळापासून आकळते तेंव्हा सर्वांगाला मधमाशा चाऊनही त्याचा काहीच परीणाम होत नाही कारण मी आणि तो माशीरुप सच्चिदानंद एकच आहोत हे मला पूर्ण कळले असते. अग्नी मला जाळू शकत नाही कारण अग्नी आणि मी वेगळे नहीच आहोत हे मी जाणले असते. - हे महाराजांनी पुढे दाखवून दिले आहे.
माधवजी, फारच छान !!!
माधवजी, फारच छान !!!
नितीनजी, वेगवेगळे 'योग'
नितीनजी,
वेगवेगळे 'योग' पहाण्याअगोदर, 'योग' कशासाठी लागतो.. हे समाजावून घेतले पाहीजे.. म्हणूनच..
श्रीपतंजली महामुनींनी जी 'योगसुत्रे' सांगितली आहेत... त्यानुसार..
प्रथमपाद आहे समाधीपाद... त्यातील काही सुत्रे पाहू...
योगः चित्तवृत्तिनिरोधः || श्री प.यो. १.२ ||
'योग' याचा अर्थ.. चित्तवृतींचा निरोध करणे-होणे असा आहे. हा निरोध होणे का गरजेचे आहे... असा निरोध, करणे आणि होणे, यात काय फरक आहे... जर निरोध नाही झाला तर 'चित्त' काय करते.. हे सर्व समजावून घेण्याकरीता पुढची 'सुत्रे' पहावी लागतील....
तदा द्रष्टुः स्वरूपेऽवस्थानम् || ३ ||
असा 'निरोध' जर झाला तरच... तेव्हाच 'द्रष्टा'(पहाणारा-आत्मा) स्वस्वरूप पहातो...आत्मसाक्षात्कार होतो... 'मी' म्हणजे कोण.. याचा उलगडा होतो.
वृत्तिसारूप्यम् इतरत्र || ४ ||
जर चित्तात 'वृत्ती' असतील.. जर चित्तवृत्तींचा निरोध झाला नाही.. तर 'आत्मा'.. 'स्व' स्वरुप सोडून...दृष्यात अडकतो.
म्हणजेच अंतःकरण शुद्धी करण्यासाठी 'योग' जरूरी आहे... अशा शुद्ध झालेल्या अंतःकरणातच 'आत्मसाक्षात्कार' होऊ शकतो.(अन्यथा कदापि नाही.)
बस्स... हे एकदा कळाले की ही 'शुद्धी' कशी करायची हा प्रश्न शिल्लक रहातो... ही एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे... तर हा झाला 'योग'.
पण त्याच बरोबर 'बोध' ही लागतो... म्हणजेच अंतःकरण शुद्धीचे 'साधन' मिळाले.. पण अंतःकरण म्हणजे काय हेही समजावून घेतले पाहीजे.. त्याकरीताच 'शास्त्र-बोध' ही पाहीजे.
म्हणजेच 'योग आणि बोध' दोन्हीही पाहीजेच... म्हणूनच 'कशापासून जग झाले' हे पाहिले पाहीजे..त्याचे मनन केले पाहिजे.. त्याकरिताच 'तत्त्वज्ञान' झाले पाहिजे.. आणि त्याचबरोबर साधन म्हणजेच 'योग' ही पाहीजे (म्हणजेच काय करायचे? आणि का करायचे? हे दोन्हीही पहायचे).. तरच आत्म्याच अंतःकरणात पडलेल मलीनप्रतिबिंब... मूळ शुद्ध स्वरुपात दिसेल.
धन्यवाद!
नितीनजी, म्हणूनच... आपण..'श्र
नितीनजी,
म्हणूनच...
आपण..'श्रीगजानन विजय' या सद्ग्रंथातील...अध्याय सहाव्यामधील ... श्लोक क्रमांक ५७ ते ७२ कृपया येथे लिहू शकाल काय?
धन्यवाद!
जर 'बोध' नसेल आणि नुसताच
जर 'बोध' नसेल आणि नुसताच 'योग' आचरावयास गेले तर ...याचे वर्णन प.पू.श्री समर्थ फार सुरेख करतात...
ते म्हणतात...
फळश्रुतीवीण प्रयोग| ज्ञानेंवीण नुस्ता योग |
उगाच शरीरें भोगिजे भोग| या नांव भ्रम || श्री दासबोध १०.६.३३||
'तत्त्वज्ञान' न पहाता जर नुसताच 'योग' आचरला ... तर तो फळश्रुतीशिवाय केलेला प्र-'योग' ठरेल.. म्हणजे त्याला 'योगाचे' फळ.. अंतःकरण शुद्धी हे न होता...असा योग(प्रयोग) हा शरीराचे 'भोग' वाढवणाराच होईल.. म्हणजेच याने अंतःकरण अजूनच अशुद्ध होईल... ! आणि मग, 'मी 'योगा' करतो' हा नुसताच भ्रम ठरेल.
धन्यवाद!
त्याकरिताच 'तत्त्वज्ञान' झाले
त्याकरिताच 'तत्त्वज्ञान' झाले पाहिजे.. आणि त्याचबरोबर साधन म्हणजेच 'योग' ही पाहीजे (म्हणजेच काय करायचे? आणि का करायचे? हे दोन्हीही पहायचे) >> सावट, एकदम सोप्या भाषेत इतके सहज समजावून सांगितलेत. पण यावरुन सद्गुरु काय करू शकतात याची झलकच बघायला मिळाली. अनेकांना एवढे कळायला अनेक वर्ष लागू शकतात पण तुमच्यासारखा गुरु असल्याने या बाफच्या वाचकांना ही गोष्ट सहज आणि पटकन समजेल. एकदा समजली की खूप साधी वाटते पण जो पर्यंत कळत नाही तो पर्यंत खूप घुमावे लागते.
गुरुचरित्र पारायणासंदर्भात
गुरुचरित्र पारायणासंदर्भात कुणी माहिती देऊ शकेल का?
रात्र काळी, घागर काळी, यमुना
रात्र काळी, घागर काळी, यमुना जळे काळी ओ माय
गुंथ काळी, बिलवर काळी, गळा मोती एकावली काळी ओ माय ||
काय सांगायचय यातनं नामदेव महाराजांना?
व्वा, माधवा... धन्यवाद! रात्र
व्वा,
माधवा... धन्यवाद! रात्र काळी आहेच... आणि पण घागर ही काळीच आहे हे कळण महत्त्वाचे.. व्वा! छानच विचारल आहे... प.पू. श्री गजानन महाराजांनी जे 'मनन' करण्यास सांगितले आहे त्याला हे अनुसरूनच आहे. धन्यवाद!:)
नाहीतर आपले काय होते... परमात्मा मूळातच निर्गुण आहे...आणि दुर्गुणी आपण आहोत... हे आपण लक्षात घेत नाही.म्हणूनच सगळे सोपस्कार करायला लागतात...! कारण काय होते .. 'आजार' आपल्याला झालाय हेच आपण लक्षात घेत नाही... आणि 'वैद्य' हे जाणून औषधाची उपाययोजना करतो.. पण आपण म्हणतो.. अरे वैद्य कुठे हे औषध घेतो..तो 'पथ्य' ही पाळत नाही..मग मीच औषध का घेऊ किंवा पथ्य का पाळू? म्हणजेच देवाला सगळे चालते... मग मी का सगळे पाळू..?
परमार्थात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे जरूरी आहे... आपल्या मनास आवडते-पटते म्हणून कसाही परमार्थ करून चालत नाही... कोणत्याही श्रीसंतसद्गुरुंनी तसे कधीही सांगितले नाही...तर आपण समजावून घ्यावयास कमी पडतो... आपण आपल्या तथाकथित बुद्धीची धाव असते..त्यात सगळ्या गोष्टी बसतील-आपल्याला पटतील या बेताने सगळ्या गोष्टीचा मेळ घालायचा प्रयत्न करतो आणि भलतीच समजूत करून घेतो! अर्थात हे चुकीचे आहे असे अजिबात नाही..आपण विचार.. चिंतन करतोय हेच महत्त्वाचे.
इथे प्रश्न परमेश्वराला काय आवडते.. नावडते हा नाहीच आहे...! आपण आपल्या आवडी-निवडी परमेश्वरावर लादतो... पण ती गरच आपली असते... परमेश्वराची कधीही नाही! शास्त्र तसे कधीही सांगत नाही... शास्त्राने जे सांगितले ते आपल्याकरिता आहे..परमेश्वरासाठी नाही.. कारण 'रोग' आपल्याला झाला आहे... परमेश्वर सदा-निरोगी म्हणून सदा सुप्रसिद्धआहे.:)
म्हणूनच 'बोध' म्हणजे आपण जे करतोय.. त्याचे ज्ञान-ओळख(निर्गुणाची ओळख.. म्हणजेच 'जगत कसे झाले' याचे मनन
) असणे गरजेचे आहे.
असो...!
माधव 'काळीचा' अर्थही श्रीसद्गुरुकृपेने पाहूयात...:) आपल्या मननाची दिशा योग्यच आहे.
धन्यवाद!
सावट, नमस्कार. मी आपल्याला
सावट, नमस्कार. मी आपल्याला विपू केलेली आहे, पाहून प्लीज उत्तर द्याल का?
शैलजा, नमस्कार! अवश्य
शैलजा,
नमस्कार!
अवश्य विचारावे... इथेच विचारलेत तर जास्त बरे होईल..म्हणजे आपल्या सगळ्यांच्या चर्चेत 'योग्य' उत्तर आपोआप मिळेल...!
"माझ्या विषयी अनन्यभावाने चर्चा(भजन) करणारे... मला खूप आवडतात", असे श्रीभगवंताचे स्वतःचे वक्तव्य आहे..... म्हणजे श्रीभगवंतानाही 'आवड-निवड' आहे तर!
धन्यवाद!
सावट, धन्यवाद. हा बाफ मी वाचत
सावट, धन्यवाद. हा बाफ मी वाचत असते.
खूप छान चर्चा सुरु असते आणि बरेच शिकायला मिळते.
अतिशय प्रामाणिक अशी माझी एक शंका आहे.
मागच्या काही पोस्टी वाचताना गुरुचरित्र स्त्रियांनी वाचू नये असे वाचले. त्याविषयी काही स्पष्टीकरणेही वाचलेली आहेत. माझा प्रश्न असा की सर्वाभूतीं एकच आत्मा असेल, आणि शेवटी प्रत्येक जीवाची मोक्षाप्रती वाटचाल (ज्याच्यात्याच्या कुवतीप्रमाणे) सुरु असेल, तर ही मनाई कशासाठी?
रेड्यामुखी वेद वदवण्याच्या कथेतून काहीच शिकण्यासारखे नाही का?
व्वा ...शैलजा धन्यवाद!
व्वा ...शैलजा धन्यवाद!
माधवा.. मनन योग्य दिशेने होण्याकरिता अजून एक 'महत्त्वाची' पोष्ट आली बघा...!
शैलजा परत एकदा धन्यवाद!
>>>
माझा प्रश्न असा की सर्वाभूतीं एकच आत्मा असेल, आणि शेवटी प्रत्येक जीवाची मोक्षाप्रती वाटचाल (ज्याच्यात्याच्या कुवतीप्रमाणे) सुरु असेल, तर ही मनाई कशासाठी?
'सर्वाभूती' एकच आत्मा आहे हे 'सत्य' आहे... मग हे जर स्वअनुभवाने-स्वप्रचितीने त्या 'जीवाने' जाणले असेल.. तर जीवाची मोक्षाकरीता वाटचाल करण्याची गरजच उरणार नाही... कारण हे जाणणे म्हणजेच 'मोक्ष' आहे.
'आपली वाटचाल अजून चालू आहे', असे आपण ज्यावेळी म्हणतो..कबूल करतो... त्यावेळी उदाहरणही (श्रीसंतज्ञानेश्वर) ज्यांनी ही वाटचाल पुर्ण केली आहे त्यांचे पाहून चालणार नाही!.. तर ते उदाहरण आपली आता वाटचाल चालू आहे त्याला अनुसरूनच असले पाहीजे...!
>>>रेड्यामुखी वेद वदवण्याच्या कथेतून काहीच शिकण्यासारखे नाही का>>>
'श्रीवेद' प्रकट करण्याचे सामर्थ्य प.पू.श्रीज्ञानेश्वरांचे आहे... रेड्याचे नाही. ही गोष्ट नाकारून चालणार नाही. 'आत्मा' म्हणजे श्रीज्ञानेश्वर असे मानले तर... 'जीव रुपी रेडा' म्हणजे 'मी' आहे.
माणसातली 'बुद्धी' जर वगळली तर... 'माणूस आणि प्राणी' यात फरक काहीच नाही. रेड्या सारख्या प्राण्यात जर 'बुद्धी' असेल तर त्यालाही माणसाचा दर्जा मिळेल... आणि माणसाने त्याला लाभलेल्या बुद्धीचे महत्त्व जाणून.. तीचा उपयोग करून जर 'आत्मा' म्हणजे काय हे जाणले नाही तर.. तो माणूस म्हणजे अजून एक 'प्राणीच'... दुसरे काही नाही.
परमेश्वर(परमात्मा)...ईश्वर्(आंतरात्मा)..जीव(जीवात्मा) आणि जगत यांचा परस्पर संबंध कळला पाहीजे.
जसे रेड्याला आपणहून 'श्रीगुरुचरित्र' वाचता येणार नाही...तसेच फक्त 'कन्नड' जाणाणार्या एखाद्या कानडी माणसालाही हे मराठीत असणारे श्रीगुरुचरित्र वाचता येणार नाही. पण म्हणून त्याची मोक्षाची वाटचाल थांबेल.. असे कसे म्हणता येईल? आणि एखादा नुसताच 'श्रीवेदाचा' उच्चार करतोय म्हणजे त्याला 'मोक्ष' मिळेल असेही कुठे लिहलेले नाही. म्हणूनच 'मोक्ष' मिळणे म्हणजे काय? हे अगोदर पाहीले पाहीजे.
आपले 'साध्य' श्रीमहासिद्ध श्रीगुरुचरित्र वाचणे.. किंवा श्रीवेद वाचणे हे नाही आहे.. तर 'मोक्ष' मिळवणे हे आहे. मग त्याकरिता लागणारे 'साधन' जसे कन्नड माणसाला ...कानडीतच लागेल.. तसेच मराठी जाणानारे शरीर असले तरिही.. शरीर वेगळे असल्यामूळे 'साधन' ही त्या शरीराला अनुसरूनच पाहीजे.... नाही काय?
धन्यवाद!
Pages