अश्विनी खाडिलकर (अश्विनीमामी) यांना भेटण्यासाठी गटग - पुणे, २९ डिसेंबर, २०१०

Submitted by चिनूक्स on 21 December, 2010 - 22:47
ठिकाण/पत्ता: 
मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सजवळ, पुणे

लोकहो,

अश्विनी खाडिलकर, म्हणजे अश्विनीमामी, डिसेंबर अखेरीस पुण्यास येत आहेत. त्यांना भेटण्यासाठी २९ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजता गटग आयोजित केलं आहे.

तरी सर्वांनी उपस्थित राहावे, ही विनंती. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Wednesday, December 29, 2010 - 08:30 to 11:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे.. सगळी गटग मल्टीस्पाईसमध्येच काय करता ? व्हेन्यू बदला की जरा.. Happy

ललिता, मंजू.. मी अजून एकदाही गेलो नाहिये तिथे.. त्यामुळे मला चालेल ते.. पण मी तुमच्यासाठी म्हणतोय... !
ज्याचं करावं भलं.. का काय म्हणतात तेच खरं.. Proud

आम्ही व्हेन्यू बघत नाही, व्यक्ती बघतो Wink

मल्टीस्पाईसवालेच मायबोलीकरांना सहन करत असावेत.

मी मोस्टली येईनच (अगदीच १% आपत्कालिन राखुन ठेवतोय)
मामे, अत्तरे आण तिकडची! (बाहेरदेशातुन येणार अस्तीस तर चिल्लर आणायला सान्गितले अस्ते) Happy
[२९ डिसेम्बर म्हन्जे अगदीच बुधवार ठरवलाय की, का बरे? Proud ]
अन ते मल्टिस्पाईस नेमक कुठे? कुठून कस जायच? म्याप कुठाय? २९ ला हवामानखात्याचा थन्डीचा अन्दाज काये?
मामी हैद्राबादेहून येणार म्हण्जे कदाचित "गोषात" अस्ल्या तर ओळखायच्या कशा? Proud
सन्योजक कोणे?

बघ बघ नीरजे, नेमका मी येणार अस्तो तेव्हाच तू नस्तेस!
आली अस्तीस तर अकरामारुतीकोपरा/चिन्चेचीतालिम/शिन्देआळी/बदामीहौद वगैरे परिसरकरान्चा कम्पु बनवला अस्ता की! Lol

मी पण येईन. Happy मल्टीस्पाईस चिनुक्षाला फारच आवडलेले दिसत आहे हं. पराग तुला अनुमोदक. जरा व्हेन्यु बदला राव.

वर दिलेली वेळ ८.३० आहे ती पण बदला.

चिनुक्सा.... मामी टांगमारु आहेत, मागे एकदा हैद्राबाद गटग ला त्यानी टांग मारली होती.. तेंव्हा आधी त्यांचे येणे कन्फर्म कर.. Proud
रच्याकने.. गटग नंतर मल्टीस्पाईस समोर जायचे असेल तर मी कन्फर्म... Proud

अन ते मल्टिस्पाईस नेमक कुठे? कुठून कस जायच?>> लिंबूटिंबू,
मल्टिस्पाईस : कर्वे रस्त्यावरून नळ स्टॉप ला म्हात्रे पुलाकडे जायला वळायचे,म्हात्रे पुलाच्या जस्ट अलिकडे उजवीकडे मोठा रस्ता लागतो. त्या रस्त्यावरच हे हॉटेल आहे. सिध्दी गार्डन्स, हार्वेस्ट क्लबच्या समोरच.
फक्त कर्वे रोडने येताना तिथे उजवी कडे वळता येत नाही म्हणून म्हात्रे पुलावर जाउन, मग उलटे वळून यावे लागेल.

जरा व्हेन्यु बदला राव. >>>> नेक्स्ट टाईम प्लीज, अगदीच जवळ आहे त्यामुळे यायला बर पडेल Proud

केपी,
तुझे वेळेचे सेटिंग बदलले की तुला योग्य ती वेळ दिसेल Happy वर ७ - ९३० अशीच वेळ दिली आहे.

मल्टिस्पाइसला टेबल राखून ठेवतात आणि तिथे बराच वेळ बसता येतं, म्हणून ते ठिकाण ठरवलं आहे. तुला अजून एखादं चांगलं ठिकाण माहीत असल्यास सुचव. Happy

अजुन एक सोप्प रस्ता, नळस्टॉप वरून मेहेंदळे ग्यारेज वरुन कमिन्स च्या चौकात डाव्या हाताला वळायच, सरळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्, यायच मग ८० फीट रोड लागेल तिथे डावी कडे वळायच तिथुन परत सरळ २/५ मिनीटावर आहे, म्हण्जे म्हात्रे पुलाला प्रदक्षिणा घातली नाही तरी चालेल

लिंब्या ही घे त्यांची साईट. इथे असेल पत्ता. http://www.multispice.co.in/

सोयीचे पडत असेल तर ठिक आहे मल्टीस्पाईस फक्त रामरावांसारख्या लोकांची गैरसोय होते. Proud

okke kaandya, got it. thanks!
cancelled post [ओक्के आशूडी, फक्त म्हात्रेपुलाअलिकडील त्या रस्त्यावर वळलो की पुढे जाताना ते हॉटेल, रस्त्याच्या उजवीकडे की डावीकडे नदीकाठाला बघत जायचे???]

आणि अजून एक. मामी अत्तरांचा व्यवसाय करतात. उगाच त्यांना २५-३० जणांसाठी अत्तर आणण्यासाठी दडपण नको. मामी, तुम्ही नुसत्या या, मल्टीस्पाईसचा पाहुणचार घ्यायला Happy

अरे मी दिल्ली मद्रास करून येणार आहे. सर्वांना भेटायचेच आहेच. लैच. ग्रेट. इतनी खुषी इतनी खुषी. ( संदर्भः
पार्टनर मधील गोविंदा Happy )

उजवीकडे आहे रे हॉटेल. सिध्दी गार्डनच्या समोर.

२५-३० जणांसाठी अत्तर आणण्यासाठी दडपण >>>
पूनम काय सही आयडीया आहे तुझी. Proud

Pages