अश्विनी खाडिलकर (अश्विनीमामी) यांना भेटण्यासाठी गटग - पुणे, २९ डिसेंबर, २०१०

Submitted by चिनूक्स on 21 December, 2010 - 22:47
ठिकाण/पत्ता: 
मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सजवळ, पुणे

लोकहो,

अश्विनी खाडिलकर, म्हणजे अश्विनीमामी, डिसेंबर अखेरीस पुण्यास येत आहेत. त्यांना भेटण्यासाठी २९ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजता गटग आयोजित केलं आहे.

तरी सर्वांनी उपस्थित राहावे, ही विनंती. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Wednesday, December 29, 2010 - 08:30 to 11:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाजो, (गाढवाऽऽऽ) ते तुझ्या समोरच तर बसले होते ना? बघितले नाहीस तरीही?

>>
अच्छा , ते होते होय सं. सा., हॅन्डसम गाय. जरा बावचळून गेल्यासारखे वाटले होते.

ओके, माझ्याबाजूचा आणि माझ्याबाजूने लघुवृत्तांत-
१) आम्ही पोचलो तोवर लोकांनी स्टार्टर आणि सूप निम्म्यावर संपवले होते Sad नेहेमीप्रमाणे चिन्मय खिंड लढवत होता.. लोकांची खाण्याची, बसण्याची व्यवस्था बघत होता. त्याला ह्या कामांची आत्तापर्यंत सवय झाली आहे Proud त्याचा हेल्पिंग हॅन्ड क्लासातच असल्यामुळे मी फचिनला कार्यानुभावासाठी पाठवायचा अयशस्वी प्रयत्न केला. फचिनने 'मी असलं काही करत नाही' म्हणून खांदे उडवले फक्त Sad

२) डायरीत पत्ता लिहा, अत्तराचा सुगंध मिळवा असा एकपात्री कार्यक्रम मामींनी पार पाडला. आशूचा मात्र पत्ता लागला नाही त्या डायरीत! Wink

३) सीएस नक्की काय करतात, ते आशूने विशद करून सांगितलं Proud ह्यावर देवाने कन्फ्यूज्ड आणि फचिनने 'अवघड आहे बाबा' चेहरे केले.

४) ऋयाम प्रचंड बोअर झाला होता. मीनु, नीरजा आणि पल्ली आजूबाजूला असल्यामुळे त्याचा चेहरा बघण्यालायक झाला होता, हे सांगणे न लगे! Proud

५) 'माहेर' फिरत होतं. साजिराला सगळ्यांनी डोळे भरून पाहून घेतलं Lol

६) टण्याचं लग्न ठरलं अशी बातमी फचिनला मिळाल्यानंतर त्याचे डोळे चमकले. शेजारीच लग्नही चालू होतं. इथेच 'दबंगी लग्न' उरकायचा त्याचा बेत होता. सगळी सामग्री होती, पण फक्त वधू नसल्यामुळे तो तडीस जाऊ शकला नाही.

७) सर आल्यानंतर नीरजा, पल्ली, आशू, स्वाती आणि मीनु ह्यांनी पांशाचे ट्रक रिकामे केले.

८) श्री. सं सा अतिशय पेशन्टली सगळीकडे बघत होते आणि एन्जॉय करत होते. नीरजाने(मुळे) ते एक उत्तम श्रोता होतील अशी व्यवस्था केलेली आहेच Proud

९) स्वातीची दुसरी इनिंग 'मुलाखतकार' म्हणून होऊ शकेल. दिसेल त्याला किमान १० प्रश्न विचारते ती.

१०) फचिन 'तुला हे कसं माहित?' आणि 'तुला हे माहित नाही?' असे नामोहरम करणारे प्रश्न पाच मिनिटात दहा वेळा विचारतो.

मी टेबलच्या एकाच बाजूला बसल्यामुळे माझ्याकडून एवढंच. ह्यातलं काहीही कपोलकल्पित नाही! Proud सर्वांनी दिवे घ्या Happy

फायनली, मामी उवाच- इतका मस्त गटग झाला आहे, आता न्यू इयर पार्टीची गरजच नाही! Happy अनुमोदन!

नेहेमीप्रमाणेच धमाल गटग! Happy

छान सुटसुटीत वृत्तांत. Happy

शैलजा तरी मी तुला सांगत होतो काहीतरी जुगाड कर म्हणुन. ऐकत नाहीस मोठ्या लोकांचे. Proud

Pages