४-५ लहान वांगी, १ मध्यम आकाराचा कांदा, एक वाटी कोथिंबीर, १ वाटी सोलाणे.
१ चमचा धणे पावडर, १ चमचा काळा मसाला, अर्धा चमचा तिखट, १ डाव तेल, मीठ, फोडणीसाठी हळद-हिंग-मोहरी.
वाटणः ३-४ लाल मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, २ टे स्पू तीळ, २ टे स्पू सुकं खोबरं.
तीळ, खोबरं कोरडच भाजून वाटणासाठी दिलेले इतर जिन्नस वापरुन कोरडेच वाटून घ्यावे. तिळातल्या तेलाने घट्ट गोळा तयार होतो.
कांदा, कोथिंबीर बाssssरीक चिरून घ्यावे. हरभर्याचे ताजे घाटे सोलून एक वाटी सोलाणे काढावेत. वांगी धुवून स्वच्छ पुसून नाकं काढून चार खाचा द्याव्यात. पसरट बुडाच्या कढईत तेल गरम करुन वांगी तळून (शॅलो फ्राय) घ्यावीत. त्याच तेलात हळ्द-हिंग-मोहरीची फोडणी करुन तेलात आधी तिखट घालावे आणि मग कांदा परतायला घालावा. कांदा नीट परतला गेला की त्यातच अर्धी कोथिंबीर, वाटण, धणे पावडर, काळा मसाला पण घालावा. छान खरपूस वास सुटेपर्यंत सगळे एकत्र परतावे. मग सोलाणे आणि वांगी घालून मसाला एकसारखा लागेल असे हलवून घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे. झाकण घालून अगदी मंद आचेवर एक वाफ काढावी. आता दाटसर रस्सा होइल इतपत कढत पाणी घालावे आणि उकळी काढावी. वरुन उरलेली कोथिंबीर घालावी. वांगी फार गाळ होउ देऊ नयेत.
बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा नुसत्या भाताबरोबर सुद्धा हा रस्सा अप्रतीम लागतो.
_शक्य असल्यास कांदा, खोबर्याच्या वाटीचा तुकडा हे चुलीत अथवा गॅसवर भाजून घ्यावे. तसे केल्यास कांदा परतायची गरज नाही.
_वाटी लहान असल्यास दीड ते दोन वाटी सोलाणे घ्यावेत.
_खोबरे न घालता तीळ एखाद चमचा जास्त घेतले तरी छान लागते.
_तीळ अजिबात न घालता नुसते खोबरे घातले तर ह्याच रश्शात वांगी आणि सोलाणे न घालता उकडलेली अंडी घालून एग करी होते.
_काळा मसाला नसल्यास गरम मसाला, द ते म, गोडा मसाला घाला. (चव तशी येत नाही पण आता नाहीच्चे म्हंटल्यावर काय करणार :फिदी:)
काय कमी जास्त घालायचं ते
काय कमी जास्त घालायचं ते सशलला विचारुन घाला सशल,
काय जबरदस्त दिसती आहे भाजी.
काय जबरदस्त दिसती आहे भाजी. करुन पहाणार. फोटो टाकिनच. पार्टीसाठी तर एकदम झकास भाजी आहे ही.
.
.
कसले सही फोटो आहेत सगळ्यांचे.
कसले सही फोटो आहेत सगळ्यांचे. मस्त रेसिपी सिंडरेला.
काल एडिसन मध्ये २-३ दुकानं फिरले त्या सोलाण्यांसाठी पण कुठ्ठे म्हणून मिळाले नाही आता पुढचे ४ महिने तरी जर्सी ट्रीप नाही. काय बरं घालावं सोलाण्यांच्या ऐवजी ? भाजी करून तर पाह्यचीच आहे.
सावनी, एडिसनमध्ये
सावनी, एडिसनमध्ये सुखाडियाच्या समोर जी मोठी सब्जी मंडी आहे तिथे मी पाहिले आहेत सोलाणे. पण काय कराय्चं माहित नाही म्हणून घेतले नव्हते आधी कधी.
वाल लिल्वा घालून येईल का तीच चव?
सायो/सावनी, काळे/चॉकलेटी
सायो/सावनी, काळे/चॉकलेटी हरभरे (घोडेवाले) भिजवलेले घालता येतील की ...
मटार घालता येतिल का? (पण,
मटार घालता येतिल का? (पण, नकोच गुळचट व्हायची भाजी!)
मी पण आणलेत सोलाणे आणि वांगी! भाजी करणार उद्या परवाकडे.
सगळे फोटो झकास तरी सिंडिचा माझ्यामते सगळ्यात बेस्ट.
अगं मी पाहिले तिथे पण सायो.
अगं मी पाहिले तिथे पण सायो. नाही मिळाले. मला पण एकदा वाटलं होतं की मटार घालावेत पण मटार अगदीच गोड गोड असतात म्हणून नको वाटतायेत. शँकी, हरभर्यांची आयडिया चांगलीये पण ते तरी मिळायला हवे नं.
वांगी आहेत, अगदी "दतेम" सुद्धा कधीचा घरात येऊन पडलाय पण सोलाणे नाहीत
सावनी, तुझ्या इथल्या इं.
सावनी, तुझ्या इथल्या इं. ग्रोसरीत अशोकाचे फ्रोझन 'काला चना' आहे का बघ. तेच घोडेवाले हरभरे.
शँकी, सोलाणे नाही मिळाले तर नक्की घालून बघेन हरभरे.
हे "दतेम" काय आहे ते सांगा
हे "दतेम" काय आहे ते सांगा बुवा एकदाचं!! कसला तरि मसाला आहे हे कळलं पण दते म्हणजे काय??
दगडू तेली मसाला.
दगडू तेली मसाला.
>>दगडू तेली मसाला. हे नाव
>>दगडू तेली मसाला.
हे नाव ऐकले नाही कधी! उसगाव स्पेशल ब्रँड आहे काय?? इथे मिळतो का??
आज करून पाहिली गोडा मसाला
आज करून पाहिली गोडा मसाला घालून .. छान झाली होती ..
(फोटो काढणं काही झालं नाही .. पुढच्या वेळी आठवणीने काढेन .. पण रस्सा मिळून आला, वांगी शिजली आणि चवही छान होती म्हणजे मी (माझ्याच :p) परिक्षेत पास!)
लेकासाठी फार तिखट, मसालेदार केली नव्हती मुद्दाम .. तर माझं मत असं की फार मसालेदार नको असेल तर आलं लसूण वगळून थोडा गूळ हवा (हे म्हणजे अगदी टिपीकल ब्राह्मणी पद्धत झाली पण आदत से मजबूर!) ..
पण आहे तशा रेसिपीने करायची असेल तर चांगली मसालेदार आणि तिखट हवी .. थंडी पळून जाईल अशी आणि भाकरी बरोबर छान लागेल अशी .. गूळ वगैरे अजिबात नको आणि गोडा मसालाही नको!
फोटो फारच टेंप्टींग आहे.
फोटो फारच टेंप्टींग आहे. तोंपासु.
सशल हरभर्याच्या शेंगा
सशल
हरभर्याच्या शेंगा पहिल्यांदा इकडे बघितल्या तेव्हा खुप मस्त वाटलं होतं .. >>>>
हरभर्याच्या- "शेंगा" नसतात, त्यांना मराठी जनता "हरभर्याचे घाटे" असं म्हणते !
वॉव्..सिंडे..तोंपासु.. नक्की
वॉव्..सिंडे..तोंपासु.. नक्की ट्राय करणार
सावनी एखादं एशियन मार्केट आहे
सावनी एखादं एशियन मार्केट आहे का जवळपास? आमच्या ईथे एच मार्ट म्हणून आहे तिथे पाहिलेत मी हे सोलाणे.
तो पा सुं
तो पा सुं
मस्त रेसिपी, फोटो सगळे
मस्त रेसिपी, फोटो सगळे तोंपासु
सोलाणे कधी मिळतील याची वाट बघतेय ...
आज ह्याच मसाल्यात जरा जास्त
आज ह्याच मसाल्यात जरा जास्त पाणी घालून शेवग्याच्या शेंगांची आमटी केलीये यम यम
आत्ताच या पद्धतीने भाजी करुन
आत्ताच या पद्धतीने भाजी करुन खाल्ली. यम्मी!!! एकदम हिट रेसिपी आहे. धन्यवाद सिंडरेला!
कालच ही भाजी केली होती. एक्दम
कालच ही भाजी केली होती. एक्दम यम झालेली !! जरा जास्तच केली. दुसर्या दिवशी मसाला मुरल्यावर आणखी छान लागत होती. एकदिवस भाताबरोबर आणि १ दिवस पोळीबरोबर ओरपली!! धन्स रेसीपीबद्दल!!!
काल केली होती ही भाजी. झकास
काल केली होती ही भाजी. झकास झाली होती.
सिंडे, काकुंना थँक्यु सांग.
आधी मला थँक्यु म्हण रेसिपी
आधी मला थँक्यु म्हण रेसिपी इथे दिल्याबद्दल
आज सोलाणे आणि छोटी वांगी
आज सोलाणे आणि छोटी वांगी मिळालित. बाकीचे सामानही आहे घरी. आज दूपारी किंवा रात्रीसाठी ही भाजी नक्की. खूप दिवसांपासून सोलाणे मिळायची वाट बघत होते.
मी बनवलेले तुर्वांग तुरीचे
मी बनवलेले तुर्वांग
तुरीचे दाणे घालून वांगं
डॅफो, रंग जबरी आलाय, किलर
डॅफो, रंग जबरी आलाय, किलर अगदी
सिंडे, आज रात्रीसाठी बनवलिये
सिंडे, आज रात्रीसाठी बनवलिये भाजी. बघूनच भुक चाळवली जातेय.
फोटो पण टाकते थोड्यावेळानी.
हा आज केलेल्या भाजीचा फोटो.
हा आज केलेल्या भाजीचा फोटो. आज फक्त बाजरीच्या भाकर्यांची कमी आहे. बाकी ठेचा, पुलाव वैगरे आहे भाजीच्या सोबतीला.
धन्स गं सिंडे. योजाटाकलिये
धन्स गं सिंडे. योजाटाकलिये
Pages