सोलाणे घालून वांग्याची रस्साभाजी

Submitted by तृप्ती आवटी on 22 November, 2010 - 13:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४-५ लहान वांगी, १ मध्यम आकाराचा कांदा, एक वाटी कोथिंबीर, १ वाटी सोलाणे.

१ चमचा धणे पावडर, १ चमचा काळा मसाला, अर्धा चमचा तिखट, १ डाव तेल, मीठ, फोडणीसाठी हळद-हिंग-मोहरी.

वाटणः ३-४ लाल मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, २ टे स्पू तीळ, २ टे स्पू सुकं खोबरं.

क्रमवार पाककृती: 

तीळ, खोबरं कोरडच भाजून वाटणासाठी दिलेले इतर जिन्नस वापरुन कोरडेच वाटून घ्यावे. तिळातल्या तेलाने घट्ट गोळा तयार होतो.

कांदा, कोथिंबीर बाssssरीक चिरून घ्यावे. हरभर्‍याचे ताजे घाटे सोलून एक वाटी सोलाणे काढावेत. वांगी धुवून स्वच्छ पुसून नाकं काढून चार खाचा द्याव्यात. पसरट बुडाच्या कढईत तेल गरम करुन वांगी तळून (शॅलो फ्राय) घ्यावीत. त्याच तेलात हळ्द-हिंग-मोहरीची फोडणी करुन तेलात आधी तिखट घालावे आणि मग कांदा परतायला घालावा. कांदा नीट परतला गेला की त्यातच अर्धी कोथिंबीर, वाटण, धणे पावडर, काळा मसाला पण घालावा. छान खरपूस वास सुटेपर्यंत सगळे एकत्र परतावे. मग सोलाणे आणि वांगी घालून मसाला एकसारखा लागेल असे हलवून घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे. झाकण घालून अगदी मंद आचेवर एक वाफ काढावी. आता दाटसर रस्सा होइल इतपत कढत पाणी घालावे आणि उकळी काढावी. वरुन उरलेली कोथिंबीर घालावी. वांगी फार गाळ होउ देऊ नयेत.

बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा नुसत्या भाताबरोबर सुद्धा हा रस्सा अप्रतीम लागतो.

vaangee.JPG

वाढणी/प्रमाण: 
दोन जणं
अधिक टिपा: 

_शक्य असल्यास कांदा, खोबर्‍याच्या वाटीचा तुकडा हे चुलीत अथवा गॅसवर भाजून घ्यावे. तसे केल्यास कांदा परतायची गरज नाही.
_वाटी लहान असल्यास दीड ते दोन वाटी सोलाणे घ्यावेत.
_खोबरे न घालता तीळ एखाद चमचा जास्त घेतले तरी छान लागते.
_तीळ अजिबात न घालता नुसते खोबरे घातले तर ह्याच रश्शात वांगी आणि सोलाणे न घालता उकडलेली अंडी घालून एग करी होते.
_काळा मसाला नसल्यास गरम मसाला, द ते म, गोडा मसाला घाला. (चव तशी येत नाही पण आता नाहीच्चे म्हंटल्यावर काय करणार :फिदी:)

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शँकी, कर्रेक्ट!! पण तुझा णिषेध!!
अशी भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लसणीचं तिखट, मुगाच्या डाळीची खिचडी, हुरडा आणि गुळाचा खडा मला पायजे आत्ताच्या आत्ता Sad

सोलाणे नसतील तर हिरवे वाटाणे घाला Happy

माझ्या आठवणी प्रमाणे भारतात हरभर्‍याची आत्ताशी पेरणी होत असेल किंवा झाली असेल. जान/फेब मध्ये मिळतील सोलाणे. इथे कधी पण काय पण मिळतं. भुईमुगाच्या शेंगा पण मिळताएत सध्या.

अरे वा!
सिंड्रेला मस्तच रेसिपी.
गावाकडचिच आठ्वन झालि . आम्हि मस्त शेतात जाऊन खायचो हे सोले.
धमाल होति नुसति Happy याचि आमटि हि खूप छान लागते.

आपुनका सोलाणा... Happy

मार्केटात सोलाणे काही मिळाले नाही. म्हणून वाळवलेले हिरवे हरभरे रात्री भिजत टाकले आणि सकाळी कुकरच्या एका शिट्टीत काढले. कुकरमधीलच अर्कयुक्त पाणी चवीसाठी रश्श्यात घातले. खुशबू ही खुशबू...! :-p

कट रवाळ होण्यासाठी कांदा+लसूण मिक्सरमधून काढले. बाकी सगळे रेशिपीत दिल्यापर्माने!

धन्यवाद!

ता.क. :- मागच्या वेळी सोलाणे मिळाले नव्हते. आता सोलाणे मार्केटात मिळाले म्हणून पुन्हा केली. नवीन फोटो डकवत आहे.

सॉरी, पण जित्याची खोड तसला प्रकार आहे असं समजून दुर्लक्ष केलंत तरी हरकत नाही पण ,

वांगी, (उजव्या बाजूचं वांगं प्रकर्षाने) कमी शिजलंय का हो? आणि खोबर्‍याचं प्रमाण पण कमी आहे का? रस्सा मिळून आल्यासारखा वाटत नाहीये .. मला सिंडरेला चा फोटो जास्त आवडला .. बित्तुबंगा, तुम्हालाही गुरू भेटला तर! Happy Light 1

वांगी कृष्णाकाठची ना?

बित्तूची वांगी जांभळी जर्द आहेत, म्हणजे मिठीकाठची असावीत Proud Light 1

सिंडी, मस्त आलाय फोटो. किंक्रांतीला पावटा, हरबरा घालून अशी भाजी करतात वांग्याची. मस्त होते, त्या दिवसात एकदम चविष्टही लागते Happy बरोबर अर्थातच लोणी-बाजरीची तीळ लावून भाकरी.

ही पाककृती पाहिल्यापासून बायकोचे हात नुसते शिवशिवत होते - भाजी करण्यासाठी. आज इंग्रो मधून सोलाणे आणण्यात आले (मी सोलून दिले) आणि भाजी तय्यार! बदल एवढाच की लसूण आणि आले नाही आणि कांदा फक्त पावच.

अशी फर्मास झाली आहे. वा:, सिंडी आणि बायको, दोघांनाही ए +IMG_4954_C.jpg

सही कृती आहे. फोटो तर एकदम किलर आहेत सगळे.
सिंडी पुढच्या गटगला ही भाजी करून आणणे - हुक्मावरुन

एबाबा, तुमची बायको सुग्रण आहेच मुळी.
मलाही करायची आहे ही भाजी पण माझ्या इंग्रोमध्ये सोलाणे बिलाणे मिळणं ही अशक्य गोष्ट आहे म्हणून एडिसनला कधी जाता येईल ह्याची वाट बघतेय.

रुनीला मोदक. सिंडीची भाजी, स्वातीच्या भाकर्‍या, लालूचं चिकन वगैरे म्हणजे मज्जाच नुसती Proud

सही झालीये भाजी एबाबा आणि बित्तुबंगा दोघांची पण.

सशल, जौ दे तू वांगी नीट शिजव आणि खोबरं पण पुरेसं घाल Happy

रुनी, सप्रमाण कृती माहिती आहे त्यामुळे गटगला ही भाजी आणायला हरकत नाही. मीठ-बिठ कमी पडलं तर तुम्ही घालून घ्या. वांगी मात्र एखाद्या बाराकरालाच आणून परतून ठेवावी लागतील. आमच्या इथे मिळतीलच ह्याची ग्यारंटी नसते.

त्या दिवसात एकदम चविष्टही लागते >>>> हे बरीक खरं.

खरच जर कधितरी भाज्यांकरता थोडासा काळा मसाला करायचा असेल तर कृती आणी प्रमाण देणार का?
म्हणजे अगदि वरच्या सारखी भाजी करुन बघता येइल.

काय एकेक फोटो. आता सोलाणे आणावेच लागणार असं दिसतंय.
बित्तुबंगा, मलाही वांगी कच्ची राहिली आहेत असं वाटलं Happy

काळा मसाला म्हणजेच गोडा मसाला + तळून मिरच्या. काळ्या मसाल्यात मिरच्या चांगल्या खरपूस तळून घेउन घालतात. गोड्या मसाल्यात नाही. काळा मसाला नसेल तर गोडा मसाला + तिखट घातलं तर काळ्या मसाल्याच्या बर्‍याच जवळ जाणारी चव येते.

मला आत्याकडून मिळाला आहे काळा मसाला. अंजली म्हणतेय तसा असु शकेल. माहिती नाही. घरी विचारुन सांगते.

आईला आत्ताच विचारले काळा मसाला आणि गोडा मसालातला फरक, अंजलीने लिहीलय तेच सांगितले आईने.
थोडक्यात काळा मसाला = गोडा मसाला + तेलात भाजून/परतुन काळपट केलेल्या मिर्च्या.
त्यामुळे काळा मसाला जास्त झणझणीत लागतो गोड्या मसाला पेक्षा.

ह्म्म्म करुन बघेन,
थोड्या मिरच्या परतुन घेऊन गोड्या मसाल्यात घालुन बघते.
पण सुक्या मिरच्या की ओल्या (खरचं कळत नाहिये Sad )

काळ्या मसाल्यात वाळवलेला कांदा तळून घालतात मिरच्यांबरोबर.>>> मग तो 'कांदा-लसूण' मसाला होतो. काळ्या मसाल्यात कांदा घालत नाहीत.
अनु ३, साधं तिखट घातलस तरी चालेल. छान चव येते.

अगो जामच तोंपासु दिसतोय ग. Happy

सगळ्याच भाज्या झक्कस दिसतायत अस वाट्तय ,
आता तांदुळाच्या भाकरी बरोबर गट्टम कराव्यात सगळ्या Happy

फोटो खरच तोंपासु आहेत सगळे. करतेच उद्या. तुम्हाला तिकडे बरी मीळतील इतकी वाईट वांगी मिळतात इथे Sad पण तरी करतेच ...

झकास दिसत्ये रेस्पी. नक्की करणार. Happy
(आलं नाही घालणार. वांग्यांना नुसत्या कांदा-लसणीचीच चव आवडते मला. कांदालसूण मसालाही मस्त लागेल यात.)
(आणि तेल इत्कं नै बै घालणार! :P)

Pages