पुण्यात घर घ्यायचय?

Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33

ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्‍यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाळु,

पॉइंट आहे..जिथे डायनींग एरीयाच फक्त असायला हवा तिथे "ते" आहे. त्यानी "ते" पहिल्या बेडरुमला अट्टॅच केले असते तर हे टळले असते कदाचित.

यावर काही उपायः
१. दरवाजा "साउंड प्रूफ" करणे,
२. त्यात ग्लेडचा साठा करुन ठेवणे आणि ते २४ तास ऑन ठेवणे.
३. सगळ्यात बेस्ट -- राहुल पार्क मधे परत न जाणे Happy

बिलिव मी बुवा, किचन जवळ टॉयलेट नाहीये राहुलपार्क मधे.
यावर काय म्हणायचे आहे नानबा...?बिल्डरांबद्दल फार प्रशस्तीपत्रक देण्याची सोय नाही...

मुळात दोन्ही बेडरूम्सना किचनमधून प्रवेश हाच मोठा विनोद आहे. मी सध्या ज्या घरात भाड्याने राहतो त्यात नेमके हेच दोष आहेत दोन्ही बेडरूममध्ये किचन मधून प्रवेश . एकच टॉयलेट आणि तेही अस्सेच किचनमध्ये...

थँक्यू ग प्राची! Happy बाळू जोशी, घराचा फ्लोअर प्लॅन काढून देण्याइतका वेळ नाहीये सध्या माझ्याकडे..
निदान माझ्या घरात तरी किचन समोर डायनिंग, त्याच्या मधून पॅसेज आणि मग ड्रायबाल्कनी, मग पहिलं बाथरूम आणि मग बेडरूम्स आहेत.. Happy

होय, तुम्ही दिलेला प्लॅन अत्यंत विचित्र आहे!

ही सगळी बिल्डिंगच अशी आहे. मोठ्या उत्साहाने गेलेओ होतो बघायला येताना काट मारूनच आलो...किम्मत ५० लाखादरम्यान.

हम्म्म.. पिंपळे सौदागरमध्ये लुंकड बिल्डर्सच्या निसर्ग निर्मिती नावाच्या प्रोजेक्टमधल्या प्लॅटचा प्लॅन पण असाच आहे... मैत्रिणीकडे गेलेले तेव्हा असंच विचित्र वाटलं होतं.. Uhoh

नानबा, घाबरून तिकडे नवर्‍याला नक्की खात्री करुन बघायला पिटाळलस की नाही? Lol
तुझं माहीत नाही, माझ्या बायकोनी मात्र नक्की पिटाळलं असतं मला (स्वतः एकदा स्वतःच्या डोळ्यानी फ्लॅट बघितलेला असून सुद्धा). Proud
:

I totally disagree with "Chingi" about Nisarg Nirmiti.

When you come out of guest toilet you are in the passage and not in the kitchen. I m talking about 3bedroom flat.
There is dining area in front (attached) to kitchen and not the toilet as in the floor plan of rahul park.

पुण्यातले फ्लॅटचे दर ३०-४० टक्के कमी होनार आहेत म्हणे? जाणकारांचे काय मत...

http://www.indianrealestateforum.com/pune/t-pune-price-may-fall-soon-upt...

या मताबद्दल तुमचे काय मत?

आता पुणेरी बिल्डरनी टेरेसची किम्मत १०० % लावायला सुरुवात केली आहे. काहीही बांधकाम नसलेले एरियल प्रोजेक्शनची. कमाल आहे. एका प्लानमध्ये फ्लॅत इतकेच टेरेसचा एरिया दाखवला होता . नुसती लूट चाललीय

मंडळी,
नमस्कार !
पुण्यात सध्या घराचे हे रेट पाहुन जर सध्या १५-२० लाखात फ्लैट घेण्याचे ऐपत नसेल तर इतर कोणते पर्याय आहेत,जसे की ...
भाड्याने राहणे परवडेबल/योग्य आहे का ?
शहरापासुन २५-३० किमी. वर (७-८ लाखात) फ्लैट घेण्याचा प्रयत्न करुन पाहिला तर ?
आणखी कोणता उपाय आहे ..
याबद्दलच्या तुमच्या कोणत्याही सल्ल्याची मी वाट पाहातोय ...
Happy

नमस्कार,
कालच dsk vishwa चि site पाहिलि...३ bhk around 42 lacks आहे. आप्ल्या कोणाला महिति आहे का. Please अभिप्राय क़ळवावा. आम्हि second home mhanun book करण्याच्या विचरात आहोत.

नुकतेच तळेगावचा दौरा केला. हिंजवडीपासुन फारतर ३० मिनिटे अंतरावर आहे. तिथे २२००-२५०० रेट आहे. पण रो हाउसेस आणि अपार्टमेंट बर्‍यापैकी ठीक किमतीत उपलब्ध आहेत असे दिसतेय. बांधकामही ठीकठाक दिसतेय.
निगेटीव्हः रोज ४ तास लोडशेडींग असते. आणि स्वतःचे वाहन असणे गरजेचे आहे.
हा पर्यायही कन्सिडर करायला हरकत नाही असे वाटते.

माझ्या ताई कडच्यांनी तळेगावात २३०० च्या रेट ने २ BHK (९०० Sq. Ft, 1 मजला) बुक केला पण अजुन निर्णय फायनल केलेला नाही, ताईला(आम्हाला) तळेगावा बद्दल माहिती नाही आणी ताई कडच्यांनाही नाही.

हाय वे वरचा प्रोजेक्ट, पुणे ३५-४० कि.मी., हिंजवडी २५-३० कि.मी, चिंचवड (डी मार्ट, बिग बजार वै.) गाडीने २०-३० मीं केवळ ह्या बाबी लक्षात घेऊन घर बुक केलय.

ताईने (आम्ही) पण एकदा घर पाहिल, ताईला आणी आम्हाला खालच्या शंका आहेत

बिल्डिंग ला लीफ्ट नाही (म्हणुन पहिल्या मजल्याचा मीळाला/शील्लक होता तो फ्लॅट घेतला, दुसर्‍या, तीसर्‍या मजल्या वर फ्लॅट available असुन). लिफ्ट ला केवढा प्रेफरन्स द्यायला हवा?

लिवींग रुमलाच तेवढी बाल्कनी (गॅलरी, टेरेस) आहे (किचनला ड्राय बाल्कनी नाही) Sad

बाल्कनी आणी बेड च्या खीडक्यातुन हाय वे दिसतो (पहिला मजला, हाय वे कडच्या खीडक्या, बाल्कनी ह्याने गाड्यांच्या आवाजाचा (मुख्यता रात्री )त्रास होऊ शकतो का?)

टेरेस आणी बेड च्या खीडक्यातुन प्रोजेक्ट च्या आतल्या बाजुचा View गार्डन, देऊळ, रो हाऊसेस आणि टाऊन शीप च्या ईतर बिल्डींग कि बाहेरच्या बाजुचा View हाय वे, हाय वे लगत ची झाड, आणी डोंगर चांगला?

एंटरन्स जवळच्या बिल्डींग मधल्या फ्लॅट मध्ये Security चा प्रॉब्लेम तर येणार नाही ना? शीवाय हे मेन एंटरन्स असल तरी हाय वे च्या बाजुला असल्याने भाजी, किराणा वै. च्या दुकाणा मागच्या एंटरन्स मधुन (जे टाऊन शीप च्या एंड ला आहे) बाहेर जाऊन पुढे येतात,

जीम, पुल वै अ‍ॅमिनिटिस हि मागच्या एंटरन्स च्या जवळ आहेत

वरच्या पोस्टस वाचुन तळेगावात पाणी आणी लोड शेडींग चा प्रॉब्लेम आहे हे प्रथमच समजल Sad

ताईने फ्लॅट फायनल करावा का? २३०० चा रेट योग्य आहे का? तुम्हाला काय वाटत?

शीवाय कॉमन टॉयलेट बाथरुम अटॅच्ड आहे (कमोड आहे) पण आमच्या कडे सगळेच अटॅच ला नाक मुरडतात, बेड मधल अटॅच्ड ठीक वाटत पण निदान एक बाथ आणी टॉयलेट तरी वेग-वेगळ हव ना?

आमच्या कडे गॅस गीझर वापरतात आणी सीलेंडर सकट ती सगळी यंत्रणा बाथरुम मध्येत स्थीतप्रग्य आहे पण ताईच्या फ्लॅट मधल्या अटॅच्ड प्रकारात सीलेंडर ठेवला तर आत अंघोळीला उभ रहायला हि जागा रहाणार नाही (ताईला हे खुपच नडतय). अश्या एकत्रीत टॉयलेट बाथ मधे गॅस गीझर कसा वापरायचा?

ताईकडचे आणी आम्ही असा जॉईन्ट वेन्चर करुन ताई साठी फ्लॅट घ्यायचा विचार सुरु आहे, वरच्या २ पोस्ट मधल्या बाबी वाचुन तुम्हाला काय वाटत? हा फ्लॅट घेण योग्य राहील का?

समु -

हाय वे वरचा प्रोजेक्ट, पुणे ३५-४० कि.मी., हिंजवडी २५-३० कि.मी, चिंचवड (डी मार्ट, बिग बजार वै.) गाडीने २०-३० मीं केवळ ह्या बाबी लक्षात घेऊन घर बुक केलय. >> हे विचारत घेता २३०० रेट थोडा जास्त वाट्तो.

बाल्कनी आणी बेड च्या खीडक्यातुन हाय वे दिसतो (पहिला मजला, हाय वे कडच्या खीडक्या, बाल्कनी ह्याने गाड्यांच्या आवाजाचा (मुख्यता रात्री )त्रास होऊ शकतो का?) >> हाय वे कीती अंतरावर आहे हे पाहिले पाहिजे, पण जवळ आसेल तर खरच खुप त्रास होतो, रात्री च्या वेळी तर हमखास ...
लोड शेडींग चा प्रॉब्लेम उन्हाळ्यात हैराण करेल, खालिल मजल्या वर घर असल्याने वारा पण जास्त येणार नाही.

किचनला ड्राय बाल्कनी नाही >> आताच्या काळात ड्राय बाल्कनी ईज मस्ट, नाही तर एक बाथरुम अड्कुन राहाते ...

शीवाय कॉमन टॉयलेट बाथरुम अटॅच्ड आहे (कमोड आहे) >> मोस्ट्ली सगळी कडे आजकल अटॅच्ड असते, you can put some partition, various options avialabel for it.

This are my view points, they can vary person to person.

थँक्यु सचिन बिल्डर रेट कमी करत नाही Sad

पहिल्या मजल्यावर वारा कमी येईल पण घरातली वयस्क माणस आणी पुढचा विचार करुन खालचा मजला प्रेफर केलाय, खरतर वरच्या मजल्या वरुन View पण जास्त चांगला आहे, पहिल्या मजल्याच्या बाल्कनीतुन View तसा नाहीच पण लीफ्ट नाही

बर्‍याच गोष्टी आहेत पण बहुदा हे घर फायनल होईलच!

घरातली वयस्क माणस आणी पुढचा विचार करुन खालचा मजला प्रेफर केलाय >> येस, हे खरच महत्वाचे आहे, लिफ्ट असुनही जर लोड शेडींग असेल तर वरच्या मजल्यावर च्या वयस्क माणसांना त्रास होतो.
लोड शेडींग साठी एक चांगला इनव्हरटर बसवुन घ्या (५-६ तास चालणारा).
हाय वे आवाजाचा खुपच त्रास जाणवला तर त्या बाजुच्या खिड्क्या साउंड प्रुफ करुन घ्याय्च्या ...

बहुदा हे घर फायनल होईलच >> फायनल करणार आहात तर छान आहे ... प्रत्येक ठिकाणी काही प्लस, मायनस असतातच .... मायनस सठी काही उपाय करुन घ्यायचे .... Happy

मी पुण्यात घर घेण्यासाठी मेव्ह्ण्याच्या नावे power of attorney करु ईच्छितो, पण असे कळते कि, नविन कायद्यानुसार, फक्त स्वतःच्या नातेवाईकानाच (blood relatives), अशी power देता येते. बायकोच्या नातेवाईकाला देता येत नाहि, जरि घर नवरा बायको दोघान्च्या नावे असले तरिहि...., कोणाला काहि महिति/ अनुभव असेल तर कळवणे. नविन कायदा गेल्या काहि महिन्यात आला आहे म्हणे....
नवरा बायको दोघेहि एकाच माणसाला (बायकोच्या भावाला) power of attorney देवु ईच्छीतात, तरिहि problem आहे , कारण बायकोचा भाऊ हा नवर्याचा blood relative नाहि. क्रुपया आपले अनुभव कळवावे...

एक रिटायर्ड कर्नल आहेत. योगायोगाने ते रिअल एस्टेटच्या धंद्यात आले. आर्मीच्या लोकांसाठी त्यांनी कोरेगाव पार्काच्या पुढे (मुंढवा रोड) बंगलो प्लॉटस ची स्कीम केलेली होती. खूप वर्ष झाली त्याला. या स्कीमशेजारीच सुभाष घईंचा बंगला आहे. लोकांना स्वस्तात पडले होते प्लॉटस. आज काय भाव आहे..

तर या कर्नलसाहेबांनी रिंग रोड ला लागून वडगाव शिंदे येथे ११० एकर जागा संपादन करून ठेवलेली आहे. टाऊन शिपची परवानगी देखील घेऊन ठेवलेली आहे. ते माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. शेजारी इंजिनियरिंग कॉलेज, मागे नदी , बाजूलाच मेगा सिटीचा प्रोजेक्ट, शेजारी एक मेडिकल आणि एक इंजिनिअरिंग कॉलेज, वैकफिल्डचा हाऊसिंग प्रोजेक्ट, पुढे ४०० एकरमधली प्राईड सिटी आणि शरद पवार इंटरनॅशनल स्कूल आणि कॉलेज असा शेजार असलेला हा भाग विमानतळापासून जवळ आहे. रिंग रोड झाल्यावर हिंजवडी २० मिनिटाच्या अंतरावर येईल.

स्कीम चालू होण्याआधी मी माझ्या मित्रांबरोबर त्यांच्याशी वाटाघाटी चालवल्या आहेत. कदाचित आमच्या मनासारखे होईल असं वाटतंय.
आम्ही असं प्रपोजल दिलंय

जागेचा भाव २०० रू स्क्वे फूट.
बांधकामाचा खर्च १४०० रू
टाऊनशिपमधील सोयी - २०० रू

असं १८०० रू त आम्ही घर मागतोय. त्यांनी २८०० रू दर काढला होता. आता ग्रूप बुकिंग म्हटल्यावर २४०० पर्यंत सरळ खाली आलेत.
आम्ही २००० ला तडजोड करू शकतो. २२०० सुद्धा काय वाईट आहे ?

याच पद्धतीने कुणाला करायुच असेल तर आमचे अनुभव आम्ही शेअर करू शकतो. कर्नलसाहेबांनाही बोलवता येईल किंवा त्यांच्याकडे आपण जाऊ शकतो.

समु

रेट योग्य वाटतोय. पण राहण्यासाठी फ्लॅट घेणार असाल तर

तळेगावातलं लोड शेडींग आणि पाण्याचा या प्रश्नांवर तोडगा काढायला हवा. १० - १२ तास वीज नसते.

लिफ्ट : ज्या स्कीममधे मेंटेनन्स साठीकंपब्नी बनवली आहे तिथे लिफ्टस उत्तम प्रकारे चालू आहेत. अन्य काही प्रोजेक्टसमधे ही चालू आहेत. पण खूपशा ठिकाणी बिल्डर ने अंग काढून घेतल्यावर लिफ्ट खराब होत शेवटी बंद पडल्या आहेत. स्विमिंग पूल आणि लिफ्ट यांचा मेंन्टेनन्स काही काही सोसायट्यांनी मात्र खूप चांगला केलाय. पण त्या कमी आहेत. स्विमिंग पूल तर खूप ठिकाणी बंद झालेले दिसतात..

या सुविधांसाठी घेतलेले पैसे (सुपर बिल्ट अप + वन टाईम मेन्टेनन्स ) वाया जातात मग. तेव्हा नंतरची व्यवस्था नीट माहीती करून घ्या.

चौक्स, तुम्ही म्हणता तो नियम बरोबर आहे.ह्या परिस्थितीत तुम्ही तुमच्या नावाची POA तुमचे रक्ताचे नातेवाईक (आई,वडिल्,भाऊ,बहिण) ह्यांना देऊ शकता आणि तुमची पत्नी तिच्या रक्ताच्या नातेवाईकांना देऊ शकते. घराचे रजिस्ट्रेशन वगैरे कामांच्या वेळी ह्या दोन व्यक्ती तुमच्या दोघांच्यावतिने सह्या करु शकतील.
ते शक्य नसेल तर घर एकाच्या नावावर करावे.जसे कि तुमची पत्नी.त्या भावाला POA देऊन व्यवहार करु शकतील.
तुमच्या बिल्डरच्या वकिलाशी ह्या संदर्भात चर्चा करा.

स्टँप ड्युटी आणी रेजीस्ट्रेशन चार्जेस कमी लागण्या साठी बिल्डरला काही रक्क्म कॅश देण हे तुम्हाला योग्य वाटत का? ताई कडचे Minimum Agreement अस काही तरी सांगत होते. तळेगाव साठी निदान कोणत्या रकमेची Agreement करावी लागेल ह्याची माहिती कुठे मीळेल ह्याची विचारपुस पण सुरु आहे. आमच्या कडे अस करायच कि नाही हा विचार सुरु आहे, कुणाला ह्या बद्दल माहिती आहे का?

बिल्डर "कॉर्पस" रक्कम पण घेतोय.

Development Charges च पॅकेज आहे त्या मध्ये MSEB, Parking etc चार्जेस आहेत पण MSEB, Parking शीवाय नेमक्या कोणत्या, कुठल्या, किती सुविधां साठी आणी किती पैसे आकारलेत ते डिटेल्स बिल्डरने दिलेले नाहीत. (जे आज काल कोणीच देत अस बिल्डर ने सांगीतल)

सचिन, अनिल थँक्यु

हो रहण्यासाठी घर घेण्याच चाललय.

अनिल लीफ्ट आणी स्विमींग पुल बद्दल आमचे पण विचार तुमच्या सारखेच आहेत ह्या गोष्टि पुढे मेनेटेन झाल्या नाही तर? मग ऊगाच कशाला लीफ्ट ची बिल्डींग हवी (पण रेट मात्र लीफ्ट च्या बिल्डींग ईतकाच आहे)

तळेगावात ४०० रू पासून जागेचे भाव आहेत. हायवेला अंदाजे ६०० रू धरा. ( नक्की माहीत नाही. उदाहरण देतोय..टाऊनशिप च्या बांधकामाचा खर्च १२०० ते १४०० धरा.म्हणजेच २००० रू पर्यंत तुमच्या फ्लँटचा दर येतो. (बिल्ट अपला ). आता पुन्हा सुपर बिल्ट अप च्या नावाखाली १००० स्क्वे फूट म्हणून बिल्डर हातात ८५० स्क्वे फू देणार असेल तर १५० रू ने दर वाढला...!! खरं तर गणित केलं तर जास्तच.

टाऊनशिप मधे ओपन स्पेस, अ‍ॅमेनिटीज, हॉस्पिटल वगैरे सगळं आलं. या १४०० वर जाहीरात, गाडीघोडा वगैरे १०० धरले तरी २२०० (बिल्ट अप ) म्हणजे डोक्यावरून पाणी. वरून असुविधा...

Pages