मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करकरे म्हणे ग्रेनेड स्फोटात गेले... Sad

कार्यालयांचं काहीच सांगितलं नाही..
ताजच्या अनेक खिडक्यांत लोक उभे आहेत.. भयानक दृश्य आहे.. Sad

आयटी, तू म्हणतेस तेही एक कारण आहेच ना. संजय दत्तचंच उदाहरण घे. ९३च्या हल्ल्यात त्याने मदत केलेली असूनही त्याला शिक्षा होत नाही. उजळ माथ्याने सगळीकडे फिरायला, शूटींग करायला मोकळा आहे तो. परत लोकांचाही आवडता.

एकदा ९/११ झाले तर अमेरिकेने सगळ्या देशांना विमानतळावरील सुरक्षा कडक करायला भाग पाडले. इतकेदा हल्ले झाल्यावर भारताने निदान पाकीस्तान नि बांगलादेशच्या सीमांना बंद करायला पाहिजे!
माझ्या मते हे हल्लेखोर एरवी आपल्या समाजात अगदी मिळून मिसळून व्यवहार करत असावेत, त्यांची शंका सामान्य माणसाला कशी यावी? काही पुरावा असल्याखेरीज त्यांच्यावर पाळत ठेवणे, घराची, धंद्याच्या जागेची झडति घेणे हे कसे शक्य आहे? त्यातून त्यातले काही लोक जर राजकीय व्यक्तींना आर्थिक 'मदत' करत असतील (म्हणजे त्यांना जनतेची सेवा नीट करता यावी म्हणून हो!) तर अश्या संशयाला कुणीच पाठिंबा देणार नाही!

आगीच्या ज्वाळात लपेटलेलं ताज बघून काटा आला अंगावर. प्रश्नही पडला की ती आग लवकरात लवकर विझवून नुकसान आणि प्राण वाचवायला लागणारी सुसज्ज यंत्रणा आहे का आपल्यापाशी? मगाशी टि.व्हीवर सांगत होते की भारताने मदतीची हाक दिली तर अमेरिका आपली सुसज्ज पथकं पाठवू शकेल मदतीला.

माझी एक मैत्रिण आज संध्याकाळी ताजमध्ये होती.. तिचा काहीच पत्ता नाहीये अजून.. मला आत्ताच कळलं..

.

Trident म्हणजेच ओबेरॉय.

माझ्या मते हे हल्लेखोर एरवी आपल्या समाजात अगदी मिळून मिसळून व्यवहार करत असावेत, त्यांची शंका सामान्य माणसाला कशी यावी? >>>

झक्की अगदी योग्य. आजकाल तर कोणीही दहशतवादी असन्याची शक्यता निर्मान झालीय. एजुकेटेड, प्राध्यापक वैगरे लोक तर आपण पाहीलेच. मागे जे लोक पकडले ते भारतीयच होते. त्यामूळे ते बाहेरचे असतील असे नाही तर आपलेच भारतीय नागरिक असन्याचीच जास्त शक्यता आहे.

इथल्या चॅनेल वर आत्ता एक ऍनॅलिस्ट ने सांगीतले की इस्लामिक संघटना "भारताला पध्दतशिर पणे इस्लामीक सोसायटी करन्यासाठी हे करत आहेत." हं.

ऐटीस ला ईंटेल नाही मिळत का? हा प्रश्न मला पडला आहे.

सी.एन.एन वर सांगत होते की गेल्या आठवड्यापर्यंत ताजमध्ये कडक(?)सुरक्षा व्यवस्था होती. या आठवड्यात ती शिथील करण्यात आली आणि लगेच हे असं झालं. म्हणजे व्यवस्थित पाळत ठेवून हे हल्ले झालेले आहेत.
झक्की, बरोबर आहे तुमचं. आपण सगळेच म्हणतो की काहीतरी करायलाच हवं पण सामान्य माणूस काय करु शकेल ह्यात तेच सुचत नाहीये मला. Sad

ते ओलीस (१५?) धरले त्यांची सोडवणुक झाली कां?

सी एन एन वर ९०० लोक जखमी झाल्याचे सांगीतलय.
ताज मधुन १०० लोकांना सोडवले. अजुन आत किती आहेत माहित नाही.
विलासराव देशमुख यांचे नवीन स्टेटमेंट - परिस्थीती अजुनही हाताबाहेरच आहे. Sad

परिस्थीती अजुनही हाताबाहेरच आहे.
--- अजुनही? Sad Sad Angry Angry

अतिशय उद्वेगजनक आहे हे सगळ. एकाच वेळि ९ ठिकाणि बाँबस्फोट???? केवळ पोलइसांना दोष देण्यात उपयोग नाहि, राजकारणि लोक एवढ्यांना पाठिशि घालतात कि त्यांना काम करण अशक्य व्हाव. एवढि प्रचंड लोकसंख्या असताना एरव्हिहि त्यांना काम करण अशक्य व्हाव. सामान्य लोक तरि काय करणार? त्यांना तर कोणि वालिच नाहिये.

पण सरकारचि मात्र कमाल वाटते, बँगलोर बॉम्बहल्ल्याच्या वेळेपासुन सातत्याने मुम्बैला धोका असल्याच सांगितल जात होत तरिहि सुरक्षा काढुन घेतलि गेलि? आणि आता इथे वाचल कि आपले आदरणिय इ. इ. गृहमंत्रि धड्पणे बोलुहि शकत नाहित? भर चौकात जाब विचारला जायला हवा अश्या नालायकांना.

सी एन एन वर आज पहिल्यांदा मी काश्मिरि फुटिरतावादि (सेपरेटिस्ट) असा उल्लेख ऐकला एरव्हि कायम इंडियन ऑक्युपाइड काश्मिर्च ऐकलेल.

इतकी प्रचंड भयानक परिस्थिती आहे तरीही आणखी सेनेला का बोलवलेलं नाही?? जे काय आर्म्ड फोर्सेस चे लोक काम करताहेत फायर ब्रिगेडबरोबर ते नक्कीच पुरेसे दिसंत नाहीत. कमांडोज आणि इतर कुणी आणखी संखेत का नाहीत?

<<कमांडोज आणि इतर कुणी आणखी संखेत का नाहीत?>>
सगळ्या मंत्र्यांच्या सुरक्षतेत आधी वाढ झाली असेल, बाकी सामान्य जनतेच काहिका होइना Sad

ज्यांना पकडले त्यांची ताबडतोब सुटका करा असे म्हणणारे अजून पुढे आले की नाही? मुलायम सिंग? कुमार केतकर काय म्हणतात? राज ठाकरे यांनी 'हे सर्व बिहारी लोकांमुळे झाले' असे जाहीर केले की नाही? इथे तर रश लिंबॉ नि शॉन हॅनिडी यांनी लगेच सांगितले की ओबामा निवडून आला म्हणून असे झाले. 'हे लिबरल डेमोक्रॅट्स म्हणजे ..'

फॉक्स चॅनेलने लगेच सांगितले की हे हल्ले भयानक आहेत कारण अमेरिकन माणसाला होस्टेज धरले आहे (नाहीतर त्यात काही भयानक नाही).

अजून तरी पंतप्रधानांनी हल्लेखोरांचा कडक शब्दात निषेध करणारे पत्रक काढले की नाही? सुरक्षा मंत्र्यांनी 'आम्ही हे हल्ले कदापीहि सहन करणार नाही नि त्याचा कडक बंदोबस्त करू असे सांगितले की नाही? तसे झाले की मग सगळे विसरून जायला आपण मोकळे.

मला एक कळत नाही टीव्हीवर जे काही पोलीस दिसताहेत सगळीकडे त्यातले खूप जण काहीही हत्याराशिवाय दिसताहेत आणि जे गोळीबार करताहेत त्यातल्या बर्‍याच जणांच्या हातात साध्या पिस्तुला सारख्या बंदुकीने हल्ला परतवतांना दिसले. सगळ्या पोलीसांना कधी सगळ्या सुविधा आणि चांगली सामग्री मिळणार?
आणि यांना सेना बाहेरुन मागवावी लागते, मुंबईत इतक्या वेळा स्फोट झालेत तरी शासनाला सेनेची एक मोठी तुकडी कायम मुंबईत ठेवावी असे वाटत नाही Angry

अजून तरी पंतप्रधानांनी हल्लेखोरांचा कडक शब्दात निषेध करणारे पत्रक काढले की नाही?
--- रात्रीची झोप हवी की नको? निषेधाचे पत्र तयार होते आहे. आता हा आघात/ हल्ला अगदी वेगळ्या प्रकारचा आहे, त्यामुळे आधीचे पत्र केवळ तारिख/स्थळ बदल करुन चालणार नाही. अतिरेकी त्यांचे डावपेच बदलतात, त्यामुळे हा विलंब होतो आहे.

विलासराव देशमुखांची पत्रकार परीषद दाखवतायत ibn लोकमत वर. मुख्यमंत्री हा माणूस, अन त्याला किती पोलीस आत्तापर्यंत गेले ह्याची कल्पना नाही

negotiators पण नाहीयेत ताज/ओबेरॉय मधे

तीच बघतेय मीपण. 'डिटेल्स मेरे पास नही हैं' असं सांगतोय देशमुख. हे खरंच लाइव्ह दाखवताहेत का?

अग रुनी विलासराव देशमुख परिस्थिती नुसती हाताबाहेर असं न म्हणता नाजुकही म्हणताहेत. Angry
प्रत्येक चॅनलला वेगळे आकडे सांगताहेत. एकीकडे २०० जखमी तर एकीकडे ९००, एकीकडे ७ हॉस्टेजेस तर एकीकडे १५. विश्वास कुणावर ठेवायचा?

मृतांच्या आत्म्यांना शांती लाभो असं तरी कसं म्हणायचं? अर्ध्यावरच डाव सोडून गेलेल्या त्या निरपराध्यांच्या आत्म्यांना कशी शांती मिळणार! उलट त्यांच्या अतृप्त आत्म्यांना शांती न लाभो आणि त्यांची भुतं बनून त्यांनी सूड घेवोत...आपलं जिवंत(?!) माणसांचं (?!) सरकार काही करत नाही....निदान ही भुतं तरी करतील

गृहमंत्री शिवराज पाटील म्हणे मुंबईत यायला निघालेत.
त्यांची रेस्क्यु प्रोसेस मधे मदत होणारे अस सांगत आहेत.
त्यांना वाटाघाटी करण्यासाठी बोलावलय कि काय?

फॉक्स चॅनेलने लगेच सांगितले की हे हल्ले भयानक आहेत कारण अमेरिकन माणसाला होस्टेज धरले आहे (नाहीतर त्यात काही भयानक नाही).>>>

अगदी हेच लिहिणार होते. एव्हढे कव्हरेज इथल्या वाहिन्या का देत आहेत? अमेरीकन / ब्रिटिश लोकांना लक्ष केले असे वृत्त आले म्हणून?
आपल्या आदरणीय नेत्यांबद्दल काय बोलावे? मी पोलीसांना दोष देणार नाही. राजकारणी लोकांनी हस्तक्षेप केले नाही तर आठवड्यात अतिरेक्यांच्या मुसक्या आवळू शकतील इतपत त्यांची क्षमता आहे.

वांझोटा राग, चीड, असहायता, frustration ....

सहमत अंजली. हेच चाललंय केव्हापासून.
अग आपल्या देशात माणसांच्या जीवाची काहीही किंमत नाहीये पण बाकीच्या देशांना आहे ना त्यांच्या नागरिकांची पर्वा. चांगलंय.
मागे इंडियन एअरलाईन्सचं फ्लाईट हायजॅक करुन कंदहारला नेऊन प्रवाशांना ओलीस ठेवून त्याबदल्यात जे अतिरेकी सोडवले तसाच काही प्लॅन असेल आत्ताही.

<<<<वांझोटा राग, चीड, असहायता, frustration >>>
अनुमोदन

काय लिहायचं तेच सुचत नाही. राजकारणी लोकांना कशाचीच लाज उरली नाहिये... व्होट बँक पुढे बाकीचा देश उध्वस्त झाला तरी चालेल...
आणि एटीएस चे मुख्य अधिकारी, एकदम चार जणं शहीद झाले? त्यांच्यासाठी काही सुरक्षेची साधनं नव्हती का?

अजून hostage situation आहेच? Sad

Pages