इंस्टंट माहेर
गेल्या आठवड्यात अचानकच हार्टफर्डला भावाकडे जायचा योग आला. माझा अमेरिकेतला सर्वात जवळचा- अंतराने आणि मनाने- नातेवाईक. त्याने लग्नानंतर यंदा प्रथमच गणपती बसवला आहे. माझ्या वहिनीने अगदी दगडुशेठचे चित्र समोर ठेऊन घरी मूर्ती बनवली आहे. त्यांच्या गणपतीचे दर्शन घ्यायचेच होते. शिवाय माझा किडक्या दातांच्या बाईबरोबर सकाळी-सकाळी interview होता. मग आम्ही सगळेच आदल्या दिवशी हार्टफर्डला गेलो. संध्याकाळी निघतो म्हणेतो आठ वाजले निघायला. ९५ ची डागडुजी काढलीये, रात्रीचं काम सुरु होतं त्यामूळे दोन-तीन वेळा रहदारीत अडकलो. पोचायला बराच उशीर झाला. भावाला आणि वहिनीला जेऊन घ्या सांगितले होते.