च - च - च - च - च

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

पार्ले बाफवर शोनुने आज सांगितले- आपणच आपल्याला घातलेल्या सीमांबद्दल विचार करावा अन एकाचं तरी लंघन करावं. ह्यावर खूप म्हणजे खूप विचार केल्यावर मला असे जाणवले की कविता-बिविता माझा प्रांत नाही अशी जी मी माझ्या प्रतिभेला सीमा घातली आहे तिचे लंघन करायची हीच वेळ आहे. लगेच एक कविता पाडली सुद्धा. पहिलाच प्रयत्न आहे, समजून घ्या-

चकळेन चणालाहीको,
चळतातव चब्दश चसेऐ
चण्हतीक चदनाहीवे,
चषयाचीवि चही चरजग चहीना
चता चथा चथै चय्या !!!!

(च च्या भाषेची एक गम्मत नवर्‍याला सांगत असताना ही कल्पना सुचली. कृपया हलकेच घ्यावे)

विषय: 

हल्ली काम बरच कमी दिसतय.. Proud

पण भारी प्रयत्न बर्का.. Lol

हल्ली काम बरच कमी दिसतय >>>> आज एका विचारमंथन कार्यक्रमात टाकली ही कविता Wink

सगळच पोस्ट च च्या भाषेत लिहायचस Wink
मजा आली वाचुन!! Happy

कायच्या काय करायचं स्वतः अन नाव मात्र माझ्या पोस्टचं हां! हे काही बरोबर नव्हे Happy

जबरीच Lol
लंघन केलेस, आता तुझे औक्षवण करावे लागेल मग Happy

चकदमए चंडूफ Happy
नवर्‍याबरोबर विचारमंथन ? Uhoh

नवर्‍याबरोबर विचारमंथन >>>> हा विनोद आहे ? त्याच्याशी बोलताना कल्पना सुचली, विचारमंथनात झोपा काढण्यापेक्षा काहीतरी productive करावे म्हणून कविता लिहिली Wink

सर्वांचे प्रतिसाद वाचुन मला हुरुप आला आहे (ऍडमिन आता माझे रंगीबेरंगी पान काढुन घेतील बहुतेक Wink )

मस्तच!
मी आजच माझी सिग्नेचर लाइन बदलली.:)
हा चगायोगयोच म्हणायचा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चम्हांलातु चगतोसां चमी चकए चष्टगो...:)

लंघन नाही ते सीमा उल्लंघन असते.
उल्लंघन मात्र साध्य झाले आहे या नव कवितेद्वारा... Happy

चस्तम चंड्रेलासी.... Happy

हा हा हा < हसत गडाबडा लोळणारा स्माईली >

दे अशीच देणगी प्रतिभेची
व सुबुद्धीही दे की
निरनिराळया भकास विषयांवर किंवा
ना कुठल्याच विषयावर
दरवळु दे काव्यगंध, शक्यतो अनिर्बंध !!!!

शिंडे, याला आता काय म्हणावं?
न(व)कविता
नव(ल)कविता
च(व)कविता
न(व)च(व)कविता
च(ळवळ)कविता
च(वीला)कविता
च(वचाल)कविता
वा(चाळ)कविता
च-विताक
वचवच-कविता
चाव-कविता
काव-कविता
च्च्कविता
हुच्चकविता
हुश्शकविता
हुश्श...!!
Proud
--
आठवांच्या पारूंबीला, बांधू एक झुला गं..
माझा झुला तुला घे, तुझा झुला मला!!

साजिर्‍या, Lol Lol
तुझ्यातल्या नवकवीला पण धुमारे फुटले म्हणायचे!!! Wink

>>धुमारे फुटले म्हणायचे!!!

धुमारे कसले, पारुंब्या म्हण!! :d

आफताब, बरोबर आहे तुमचे.

GS, तुही मस्त पाडली आहे. "दरवळु दे काव्यगंध, शक्यतो अनिर्बंध" विषेश आवडले. माझ्यातर्फे १० गुण Wink

साजिर्‍या, मस्तच हहपुवा Happy

बाकी सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद Happy

हेहे ... Happy
संदीप खरेचं 'चमालातु चंगतोसा' आठवलं.

परागकण

चंड्रेलासि चवीदे
चपणआ चशीअ चविताक चरूनक चवीनन चयंडापा चडलापा चहेआ.

नवीन मायबोलीवरची म्हणे 'बोलणे सोपे टायपणे कठीण'..
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

"म्हाई हलान सअताना केअ षाभा लोबत सऊ. हबुकेत णुकालाच हाकीच ळकायचे हानी. गम ळाशेत राफच जम्मा यायची. मी णाई झामी केअ त्रैम्मिण म्हाई घोदी ही षाभा लोबायचो. इमी याक हिलिले णुकाला ळकले का? या षाभेतले केअ णागे ---
किंजू विंका रमू किंजू विंका रमू
णामुसकीच्या त्रशूगंसे धुय्य माउचे रुसू
किंजू विंका रमू किंजू विंका रमू ''
च च्या भाषेवरील मौलिक चर्चा वाचून मला लहानपणी आम्ही एक भाषा बोलत असू त्याची आठवण झाली.
वरील इन्व्हर्टेड कॉमामधील ओळींचे भाषांतर कोण करेल?

आम्ही लहान असताना एक भाषा बोलत असू. बहुतेक कुणालाच काहीच कळायचे नाही
मग शाळेत फारच मज्जा यायची. मी आणि माझी एक मैत्रिण आम्ही दोघी ही भाषा बोलायचो. मी काय लिहीले कुणाला कळले का? या भाषेतले एक गाणे...

जिंकू किंवा मरू
माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू
जिंकू किंवा मरू

जीएस तुला धा पैकी धा.
~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

पहिले अक्षर आणि दुसरे अक्षर यांच्या क्रमाची आणि वेलांटी/ऊकाराची अदलाबदल करायची आहे Happy

"म्हाई हलान सअताना केअ षाभा लोबत सऊ. हबुकेत णुकालाच हाकीच ळकायचे हानी. गम ळाशेत राफच जम्मा यायची. मी णाई झामी केअ त्रैम्मिण म्हाई घोदी ही षाभा लोबायचो. इमी याक हिलिले णुकाला ळकले का? या षाभेतले केअ णागे ---
किंजू विंका रमू किंजू विंका रमू
णामुसकीच्या त्रशूगंसे धुय्य माउचे रुसू
किंजू विंका रमू किंजू विंका रमू ''

आम्ही लहान असताना एक भाषा बोलत असू. बहुतेक कुणालाच काहीच कळायचे नाही. मग शाळेत फारच मज्जा यायची मी आणि माझी मैतीण आम्ही दोधी ही भाषा बोलायचो. मी काय लिहिले कुणाला कळले का? या भाषेतले एक गाणे-

जिंकू किंवा मरु जिंकू किंवा मरु
माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु
जिंकू किंवा मरु जिंकू किंवा मरु

Happy

आयटे, आम्ही अजुन सुद्धा घरी ही भाषा बोलतो.. उलटी... Happy

आय टी गर्ल , मीनू
छान वाटलं बर्‍याच जणांना ही भाषा माहिती आहे.

लय भारी..
"च" कवितांची कार्यशाळा कधी उघडताय..? Happy
का.शा.: हलके घ्या हो. Happy

Pages