संयुक्ता

स्त्री आरोग्य - आवश्यक वार्षिक आरोग्य चाचण्या.

Submitted by संपदा on 13 February, 2015 - 01:30

इंटरनेट विश्वात होणार्‍या चर्चा असोत किंवा लोकलमधल्या लेडिज डब्यातल्या चर्चा, ऑफिसमध्ये लंच टाईमला घडणार्‍या चर्चा असोत किंवा किटी पार्टीमधल्या चर्चा. हल्लीच्या स्त्रिया स्त्रीवाद, मुलांचे संगोपन, गर्भारपणातला आहार विहार, नोकरी-व्यवसाय, मेकअप, कपडे, साड्या, शूज, दागिने या व्यतिरिक्त स्वतःचे वाढते घटते वजन , व्यायाम, पोषक आहार अशा आरोग्याशी निगडित चर्चा करताना दिसतात. ही आरोग्य सजगता उल्लेखनीय आहे. मात्र अजूनही कित्येक घरांतील स्त्रिया घरातील सदस्यांच्या आहाराबद्दल, शुश्रुषेबद्दल काळजी करताना स्वतःच्या तब्येतीकडे बरेचदा दुर्लक्ष करतात, दुखणी अंगावर काढतात.

विषय: 

राजकारणातील माझ्या आवडत्या स्त्री नेत्या (सार्वजनिक धागा)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 14 August, 2014 - 03:35

world women leaders2.jpg

छायाचित्र - विकीपिडियावरून साभार.

छायाचित्रातील स्त्री नेत्या डावीकडून उजवीकडे - हेलेन थॉर्निंग श्मिड्ट (डेन्मार्कच्या प्रेसिडेन्ट), इंदिरा गांधी, मिशेल बाशेलेट (चिलीच्या प्रेसिडेन्ट ) , चंद्रिका कुमारतुंगा , सिरिमाओ बंदरनायके, हिलरी क्लिंटन, गोल्डा मायर, विवेका एरिकसन, अँजेला मेर्कल.

उद्या भारताचा ६८ वा स्वातंत्र्यदिन. ह्या निमित्ताने संयुक्तातर्फे तुमच्या समोर एक नवीन विषय चर्चेसाठी आणला आहे. "राजकारणातील माझ्या आवडत्या स्त्री नेत्या".

विषय: 

संयुक्ता पाऊल "पळते" पुढे - एक अनोखं गटग (सार्वजनिक धागा)

Submitted by मंजिरी on 30 March, 2014 - 09:29

२०१३ च्या जानेवारी महिन्यापासून मी आणि आऊटडोअर्सने आपापल्या देशात नियमित रनिंग करायला सुरुवात केली. आम्ही एकमेकींना आमच्या रोजच्या रनिंगचे अपडेट्स देत होतो, प्रोत्साहन देत होतो, नवनवीन टार्गेट्स देत होतो. सहा महिने प्रॅक्टिस झाल्यानंतर एक दिवस दोघींना वाटलं की आपापल्याच देशात म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी का होईना, पण एकाच वेळी धावलो तर ....? दोघींच्या टाईमझोनमध्ये ५ तासांचा फरक असूनसुध्दा हे जमवलं. आऊटडोअर्सने तिच्या सकाळी ६.०० वाजता घरातुन ट्रॅककडे निघताना मला पिंग केलं आणि मी पण त्याचवेळी घरातुन बाहेर पडले.

चाळीशीतली वाटचाल - सार्वजनिक धागा

Submitted by मामी on 6 December, 2012 - 22:14

'संयुक्ता'ने माहिती संकलन, विचारमंथन आणि समाजसेवा हे तीन उद्देश समोर ठेवून आजवर धागे प्रकाशित केले आहेत. 'संयुक्ता'मध्ये चर्चेस घेतले जाणारे विषय सर्वंकश असावेत हे पथ्य संयुक्ता व्यवस्थापन तसेच संयुक्ता सदस्य कटाक्षाने पाळत आल्या आहेत. ह्यातले अनेक विषय केवळ स्त्रियांपुरते मर्यादित नसतात किंवा 'संयुक्ता'पुरते ठेवल्याने केवळ एकच बाजू समोर येते असे लक्षात आल्याने काही धागे सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता उदा: प्रोफेशनल नेटवर्किंग. 'चाळिशीतली वाटचाल' हा असाच एक विषय जो स्त्री-पुरुष दोघांनाही समसमान महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा. ह्याच कारणासाठी हा धागा सार्वजनिक आहे.

सौ. वीणाताई श्रीकांत सहस्रबुद्धे (थर्ड आय असोसिएशनच्या संचालिका) यांच्या कार्याशी ओळख: संयुक्ता मुलाखत

Submitted by dhaaraa on 25 March, 2012 - 21:26

नशिबाने जरी जग दाखवणे नाकारले तरी आपल्या मनःचक्षूंनी जग पाहू इच्छिणार्‍या दृष्टीहीनांसाठी तिसर्‍या डोळ्याच्या रुपात आपुलकीने मदतीचा हात पुढे करण्यार्‍या नाशिकच्या 'थर्ड आय असोसिएशन' (पुर्वाश्रमीची थर्ड आय फाऊंडेशन) या दृष्टीहीनांसाठी, विशेषतः दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी कार्यरत असलेल्या संस्थेची, आणि संस्थेच्या कामाची ओळख मायबोलीकरांना करून देण्याचा हा माझा प्रयत्न! गेली १४ वर्षे विविध अडचणींवर मात करून नेटाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणार्‍या या संस्थेच्या संचालिका आहेत - सौ. वीणा श्रीकांत सहस्रबुद्धे!

२०१२ महिला दिन उपक्रम : घोषणा

Submitted by संयोजक_संयुक्ता on 18 January, 2012 - 11:46

नमस्कार मंडळी,
दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने संयुक्तातर्फे काही उपक्रम राबवले जातात. यावर्षी संयुक्ताने एका महत्वाच्या विषयाला धरून परिसंवाद करायचे ठरवले आहे.

आज जगात वावरताना कामाच्या ठिकाणी, शिक्षणाच्या ठिकाणी वेगवेगळ्या स्त्री-पुरूषांशी आपला संपर्क येतो. या सगळ्यांशी वागताना समोरची व्यक्ती स्त्री की पुरूष आहे यावर आपल्या बर्‍याच प्रतिक्रिया अवलंबून असतात. हेच मैत्रीतही होते. पण कधी कधी असं होतं की समोरची व्यक्ती आणि आपण स्वतःही स्त्री वा पुरूष आहोत हा केवळ एक तपशील असतो. कामाच्या संदर्भाने, मैत्रीच्या संदर्भाने हा तपशील बिनमहत्वाचा होतो. कधीकधी होतही नाही.

विषय: 

Survey Report: Section - Marriage and marriage as an institution

Submitted by संयोजक_संयुक्ता on 6 March, 2011 - 16:13

Marriage and marriage as an institution

In this section, we set out to test the general assumption that ‘Marriage is the most important decision in an Indian woman’s life’. Only 3 questions in this section were mandatory, but we have received open and honest responses for every question in this section. This may have been because most respondents were married.

  1. Relationship status and age at the time of marriage:

    natestiti.jpg

विषय: 

Survey Report: Section - Education

Submitted by संयोजक_संयुक्ता on 6 March, 2011 - 15:28

Education:

The scenario of women's education in India is undergoing a lot of changes. Education is the fundamental right of every child and equal opportunity for education is the fundamental right of every woman. Keeping in mind the importance of education, all the questions in this section were mandatory in nature. The responses depict an overall image of highly qualified women. Was ‘high educational qualification’ an influencing factor for the rest of the responses to the survey? Let’s find out…

विषय: 

मातृदिन (मदर्स डे, ९ मे २०१०) आईच्या कलाकृती

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 May, 2010 - 23:22

mother_child_resin.jpg
'गुलमोहोर'मध्ये फक्त स्वतः लिहिलेले साहित्य पोस्ट करणे अपेक्षित असल्याने तुम्हाला तुमच्या आईने लिहिलेली कविता, कथा, लेख, प्रकाशचित्र प्रकाशित करायचे असेल तर या धाग्यावर पोस्ट करा. तुमचे रंगीबेरंगी पान असेल तर तेही वापरु शकता.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - संयुक्ता