आरोग्य

अन्नभेसळ, अन्नसुरक्षा आणि आपण

0

नुकताच मी खाद्य पदार्थांशी निगडीत व्यवसाय सुरु केला ! (त्याची निगडी प्राधिकरणात शाखा पण आहे!स्मित) खरे तर अपघातानेच. माझा एक मित्र एम. एस्सी. नंतर ग्लेनमार्क कंपनी मध्ये संशोधक म्हणुन नोकरी करत होता. पण ५ वर्षांचा नोकरी नंतर त्याला रुटीन कामाचा कंटाळा आल्याने तो नोकरी सोडुन गावी शेती करु लागला. मी भारतात परतल्यावर त्याची भेट घेतली तेंव्हा त्याने "नैसर्गिक्-सेंद्रिय शेती" (सेंद्रिय अन्न म्हणजे इंग्रजीत ऑर्गॅनिक फुड) बद्दल सांगितले. तो अन त्याचे सोबतचे शेतकरी असे जवळपास ३०० शेतकरी एका अध्यात्मिक गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. त्यांना पुरक म्हणुन श्री.

रक्तदाब मोजण्याचं यंत्र : माहिती हवी आहे

0

नमस्कार,

मला रक्तदाब मोजण्यासाठी घरगुती डिजिटल यंत्र घ्यायचं आहं. फ्लिपकार्टवर बरेच पर्याय दिसले. कोणत्या कंपनीचं यंत्र अचूक वाचन दाखवणारं आणि टिकाऊ असते, याची कृपया माहिती द्या. धन्यवाद.

पंच महाभुत व हिंदू धारणा

0

पंच महाभुत,

आपण पंचमहाभुतां बद्द्ल ऐकतो की सर्व सजिव व नि र्जिवांचे अधिष्ठान ही पंचमहाभुत आहेत.
ह्या विषयाला ईतके पदर आहेत की एकच पदर उलगडत न्यायलाच आयुष्य पुरणार नाही.
हस्तमुद्रा ही भारताची खुप प्राचिन व सर्वात महत्वाची देणगी आहे व ह्या हस्तमुद्रा ही पंचमहाभुता वर आधारीत असतात.

आज आपण पंच महाभुताचे हाताच्या बोटातील आधिष्ठान बघू !
हाताच्या पाच बोटा पैकी प्रत्येक बोटाला एका पंच महाभुताचे आधिष्ठान असते.
उदा. हाताचा आंगठा म्हणजे अग्नी महाभुत, प्रथमा म्हणजे वायु.

अग्निहोत्र : शेतीसाठी समृद्ध वरदान!

0

मध्यंतरी एका परिचितांच्या ओळखीतील शेतावर जायचा योग आला. हिरवेगार शिवार, डोलणारी पिके, रसरशीत फळे - भाज्या पाहून मन प्रसन्न झाले. शेतमालकांनी आपल्या शेतीत आपण अग्निहोत्राचा दैनंदिन प्रयोग रोज करत असल्याचे व तेव्हापासून पिकाला खूप फायदा झाल्याचे आवर्जून सांगितले. ह्या अगोदरही मी अग्निहोत्र कसे करतात, का करतात, त्याचे वातावरणासाठी - शेतीसाठी व आरोग्यासाठी उपयोग इत्यादींविषयीची मार्गदर्शक भाषणे व प्रात्यक्षिके पाहिली होती. परंतु ज्या शेतजमीनीत असे अग्निहोत्र अनेक महिने नित्यनियमाने होत आहे असे शेत बघण्याचा योग बऱ्याच काळानंतर जुळून आला.

ग्रामीण महिलांचे आरोग्य-बचत गट-नवी संधी

सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या सर्वांना एक विनंती.

कृपया खालील लिन्क पहाव्यात आणि आप आपल्या भागातील महिला बचत गटांना ह्या कामी पुढाकार घेण्यास उद्युक्त करावे, सहकार्य करावे. मी माझ्या परिसरातील अन संपर्कातील सर्वांना माहिती देतो आहे.

धन्यवाद.

http://business.rediff.com/slide-show/2010/aug/10/slide-show-1-how-a-sch...

http://www.newinventions.in/

muruganantham_in@yahoo.com

मराठी चर्चा: http://mr.upakram.org/node/2756

पदार्थांचे गुणधर्मः उष्ण-शीत

0

गुण म्हणजे पदार्थाचा अंगभूत गुणधर्म. मग तो चांगला (शरीराला उपकारक) असो की वाईट (शरीराला हानिकारक), त्याला "गुण" च म्हटले जाते. आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय पदार्थविज्ञान शास्त्रांमध्ये पदार्थांचे वीस गुण सांगितले आहेत. त्यापैकी महत्वाचे दोन म्हणजे उष्ण-शीत. उष्ण म्हणजे बोलीभाषेत गरम आणि शीत म्हणजे थंड. (इथे पदार्थ स्पर्शाला म्हणजे हात लावुन पाहिल्यावर गार/गरम लागतो याचा काही संबंध नाही.)

एखादा पदार्थ उष्ण की शीत हे कसे ठरते?

अमेरिकेत ऐतिहासिक आरोग्य विधेयक संमत

0

http://epaper.esakal.com/esakal/20100322/5509504158478656796.htm

न्यूयॉर्क - आरोग्य विम्याचे संरक्षण नसलेल्या लाखो अमेरिकी नागरिकांना आरोग्यसेवेच्या छत्राखाली आणत विमा कंपन्यांच्या पिळवणुकीला चाप लावणारे ऐतिहासिक आरोग्यसेवा सुधारणा विधेयक "हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हज' ने आज (ता.२२) सकाळी संमत केले. त्यासाठी अध्यक्ष बराक ओबामांनी आपले अध्यक्षपद पणाला लावले होते. तसेच ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियाचा दौरा रद्द करत देशांतच थांबणे पसंत केले होते. त्यामुळे हा त्यांच्या राजकीय विजय मानला जात आहे. ओबामांच्या डेमोक्रॅटिक पक्षाने दशकभर उराशी बाळगलेले ध्येय हे विधेयक संमत झाल्याने पूर्ण झाले आहे.

ग्रीन टी?

0

ग्रीन टी बद्दल कोणाला काही माहीती आहे का? कोणी मायबोलीकर घेतात का? - म्हणजे ग्रीन टीबद्दल विचारतीय मी..

नेटवर वाचल्यावर अगदी सोन्याची खाण सापडल्यासारखे वाटतेय. अ‍ॅन्टीऑक्सिडंट, मेटॅबॉलिझम सुधारते, चेहरा क्लीन होतो, स्लिम वगैरे होतो. कॅन्सर अन अल्झायमर आणि काय ते वेगळंच!

हे सगळं खरंच होतं की फॅड आहे !?
(फॅड नसावं असं जॅपनीज व चायनीज मुलींकडे पाहून वाटते. फिदीफिदी )

(मी वाचलेल्या काही लिंक्स.. )
http://chinesefood.about.com/library/weekly/aa011400a.htm
http://www.umm.edu/altmed/articles/green-tea-000255.htm
http://www.greenweightlosstea.com/