नोकरी-व्यवसाय

ट्रोल माझा

Submitted by भरत. on 2 March, 2016 - 23:31

चालू घडामोडींपासून प्रेरणा घेऊन सुरेश भटांच्या 'दु:ख माझे' ही कविता माझ्यासाठी आणि माझ्यासारख्याच अन्य काहींसाठी थोडी बदलून

ट्रोल माझा
माझियामागे असू दे !

तो बिचारा एकटा जाईल कोठे?
मी असोनी का अनाथासारखे त्याने फिरावे?

माझियावाचून** त्याला
आसरा आहे कुणाचा?

जन्मला* तेव्हापुनी
श्वानापरी
माझ्याच मागे राहिला तो!

ट्रोल माझा
माझियामागे असू दे!

सब फार्मर्स अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड : दुध व दुग्धजन्य पदार्थ

Submitted by चंपक on 27 January, 2016 - 05:17

मुळ लेखः चंप्या दुधवाला....! http://www.maayboli.com/node/12638

सब फार्मर्स अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी लि. नेवासा तर्फे पुणे येथे एस बी आय बॅंकेसमोर, ससानेनगर ला २५ डिसेंबर २०१५ पासुन सुरुवात झाली आहे. स्टेट बॅन्क ऑफ इंडिया, ससाने नगर शाखेसमोर दुध व पनीर विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे.

शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री सेवा उपलब्ध असल्याने निर्भेळ, शुद्ध दुध उपलब्ध आहे. ५०० मिली पाऊच रु. २०/-

पनीरः प्रती १०० ग्राम : रु. २५/-

लवकरच खवा (मावा) उप्लब्ध केला जाईल.

सदर कंपनी शेतकर्‍यांची शेतकर्‍यांसाठी आहे!

उत्पादन नव्हे, अनुभूती विका!!(पूर्ण)

Submitted by mi_anu on 23 January, 2016 - 02:23

ऑडीटोरीयम:
"आपण उत्पादने नाही, अनुभूती विकणार आहोत ग्राहकाला.यापुढे मनाशी निश्चय करा.सुंदर ताज महाल आपले प्रतीस्पर्धी विकतात. आपण गिर्‍हाईकाला ताज महाल नाही विकायचा, त्याला 'मी ताज महाल, लिबर्टीबाईचा पुतळा, माचू पिचू, पिरॅमिड,बुर्ज खलिफा बनवू शकतो' हा आत्मविश्वास, ही अनुभूती विकायची आहे.गिर्‍हाईकाचा खिसा कोणीही टॉम डिक हॅरी जिंकतो. आपल्याला त्या खिश्याच्या खालचे त्याचे हृदय जिंकायचे आहे."

वझीर.. खेल खेल मे..!!

Submitted by उदय८२ on 11 January, 2016 - 08:46

खेल खेल मे
खेल खेल के
खेल खेल ये आ जायेगा.

बुद्धीबळ हा एक असा खेळ आहे. जो खेळतात तर दोन जण परंतू दोघेही दोन्हींकडून खेळत असतात. उत्तम बुध्दीबळपटू तो असतो जो स्वतःची चाल खेळून समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे एक विशिष्ट चाल खेळायला भाग पाडेल. या पार्श्वभुमीवर चित्रपट आधारीत आहे. एक एक चाल सावधपणे खेळून वजीरला कसे नेस्तनाबूत करून बादशाहाला मात देणे हे बघणे उत्सुक्तेचे आहे.

शब्दखुणा: 

बोट - चाचेगिरी

Submitted by स्वीट टॉकर on 31 December, 2015 - 04:28

समुद्रावरील वादळांप्रमाणे चाचेगिरी हा देखील कुतूहलाचा विषय.

निसर्गाशी हातमिळवणी असो अथवा दोन हात करणं असो, त्यात एक प्रकारचा रोमांच असतो कारण निसर्ग अफाट ताकदवान असला तरी नेहमीच नियमबद्ध वागतो. मात्र असं काही चाचेगिरीबद्दल म्हणता येत नाही.

भर समुद्रात चाचेगिरी चालते – याचं आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाही. खरं तर मधल्या काळात चाचेगिरी बंद का झाली होती? याचंच आश्चर्य वाटायला हवं.

तडका - ग्राहकांची खेचा-खेची

Submitted by vishal maske on 27 December, 2015 - 19:51

ग्राहकांची खेचा-खेची

जेवढी पब्लिसिटी जास्त
तेवढा बिझनेस जास्त
पब्लिसिटीला कमी तर
जणू बिझनेसचाच अस्त

म्हणूनच तर शोधतात की
कशात असेल रूची
ऑफर्सने करतात सदा
ग्राहकांची खेचा-खेची

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

परदेशात जाताना उपयोगी बेसिक टिप्स

Submitted by मुग्धा केदार on 3 December, 2015 - 05:25

प्रथमच परदेशात जाताना (भटकंती वगळता कामासाठी )बरेच काही प्रश्न, शंका, कुशंका मनात असतात. त्यासाठी अर्थातच खुप तयारी करावी लागते. जिथे जायचे आहे तिथल्या हवामानानुसार थोडा फार फरक पडत असतो. ही तयारी करत असताना नवशिक्याना उपयोगी पडतील अश्या टिप्स, आणि अनुभव या धाग्यावर माबोकरांनी कृपया शेअर कराव्यात. काही दिवसांपुर्वी हा धागा काढण्याविषयी चर्चा झाली होती त्याची लिंक
http://www.maayboli.com/node/46521?page=66

हिंजवडी फेज१-प्रवास आणि प्रेक्षणीय स्थळे

Submitted by mi_anu on 29 November, 2015 - 03:19

नमस्कार!!
आपण जाणार आहोत एका छोट्या सहलीला. सहल छोटी, माहिती मोठी!!
सहल टप्पा: 'कुठूनही' ते हिंजवडी फेज १
लागणारा वेळः हा एका शब्दात उत्तर देण्याचा प्रश्न नाहीय. या प्रश्नाचं उत्तर मिळण्या साठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: कोणत्या वारी निघणार?कोणत्या ठिकाणाहून निघणार?कोणत्या वेळी निघणार?कोणत्या वाहनाने निघणार?'कोण' निघणार? त्याप्रमाणे उत्तर २० मिनीटे/४५ मिनीटे/१ तास/१.५ तास असे बदलू शकते.

तुम्ही कार ने किंवा दुचाकी ने येत असाल तर हे कॅलेंडर लक्षात ठेवा:
तारीख १ ते २५:

घरगुती मसाले व्यवसायासाठी मार्गदर्शन हवे आहे

Submitted by आकांशा on 26 November, 2015 - 04:05

मी सध्या एका प्रायवेट कंपनी मध्ये नोकरी करतेय. २-३ महिन्यापासुन मी घरगुती मसाले व चटण्या तयार करु लागले. घराजवळ्च्या, ओळखीच्या लो़कांच्या ऑर्डर येतात. पण मला आता हाच व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालु करायचा आहे.
तरी कृपया मार्केटिंग आणि सेल कसा करावा या संबधित मार्गदर्शन करावे.

Pages

Subscribe to RSS - नोकरी-व्यवसाय