(हि कविता नाही
केवळ काल महिला दिना निमित्त सुचलेल्या काही ओळी आहेत)
मला देवत्व देवु नका
मला मखरात बसवु नका
पण मला हिणवु देखिल नका
मला अबला, असहाय्य समजु नका
मला फ़क्त माणुस म्हणुन जगु द्या
अगदी तुमच्या सारखच
(हि कविता नाही
केवळ काल महिला दिना निमित्त सुचलेल्या काही ओळी आहेत)
मला देवत्व देवु नका
मला मखरात बसवु नका
पण मला हिणवु देखिल नका
मला अबला, असहाय्य समजु नका
मला फ़क्त माणुस म्हणुन जगु द्या
अगदी तुमच्या सारखच
भोंडला,हादगा : भुलाबाईची गाणी
बालपणीच्या अशा फ़ारच कमी आठवणी असतात ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाला कितीही रंग बदलू देत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात. एका अर्थाने ह्या आठवणी माणसाला "डोळस दृष्टी" प्राप्त करून देत असतात. आज महिला दिनाच्या निमित्ताने झालेली अशीच एक आठवण.
मायबोलीवर स्त्रियांचाच असा एक ग्रूप असावा आणि त्यांनी एकत्र येऊन काही उपक्रम करावेत अशी कल्पना पूर्वी मायबोली प्रशासनाने मांडली होती. नवीन मायबोलीच्या स्वरुपामुळे असा एक ग्रूप तयार करणं शक्य झालं आणि म्हणता म्हणता ग्रूपनं चांगलंच बाळसंही धरलं. 'संयुक्ता' नावानं ग्रूप मायबोलीवर दोन वर्षांपूर्वी सुरु करण्यात आला आणि आजवर अनेक उपक्रम राबवत ग्रूपचा पसाराही वाढत चालला आहे. मायबोली प्रशासनाचे ह्या कल्पनेबद्दल पुन्हा एकदा आभार.