आयुर्वेद

पंच महाभुत व हिंदू धारणा

0

पंच महाभुत,

आपण पंचमहाभुतां बद्द्ल ऐकतो की सर्व सजिव व नि र्जिवांचे अधिष्ठान ही पंचमहाभुत आहेत.
ह्या विषयाला ईतके पदर आहेत की एकच पदर उलगडत न्यायलाच आयुष्य पुरणार नाही.
हस्तमुद्रा ही भारताची खुप प्राचिन व सर्वात महत्वाची देणगी आहे व ह्या हस्तमुद्रा ही पंचमहाभुता वर आधारीत असतात.

आज आपण पंच महाभुताचे हाताच्या बोटातील आधिष्ठान बघू !
हाताच्या पाच बोटा पैकी प्रत्येक बोटाला एका पंच महाभुताचे आधिष्ठान असते.
उदा. हाताचा आंगठा म्हणजे अग्नी महाभुत, प्रथमा म्हणजे वायु.

पदार्थांचे गुणधर्मः उष्ण-शीत

0

गुण म्हणजे पदार्थाचा अंगभूत गुणधर्म. मग तो चांगला (शरीराला उपकारक) असो की वाईट (शरीराला हानिकारक), त्याला "गुण" च म्हटले जाते. आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय पदार्थविज्ञान शास्त्रांमध्ये पदार्थांचे वीस गुण सांगितले आहेत. त्यापैकी महत्वाचे दोन म्हणजे उष्ण-शीत. उष्ण म्हणजे बोलीभाषेत गरम आणि शीत म्हणजे थंड. (इथे पदार्थ स्पर्शाला म्हणजे हात लावुन पाहिल्यावर गार/गरम लागतो याचा काही संबंध नाही.)

एखादा पदार्थ उष्ण की शीत हे कसे ठरते?