चिडका - एक सद्गदित कविता

Submitted by अमेय२८०८०७ on 12 July, 2015 - 03:20

तुम्ही सगळे दुष्ट आहात, छान छान "डका"र मारता आणि भूक नसतानापण आमाला खावे वाटते.
प्रेरणास्रोताचरणी सादर अर्पण!!
------------------------------------------

एका फोडणीतून फुटणारा
कुठे तडका कुठे भडका आहे
आपल्या लेखनाच्या कॉप्या पाहून
मूळ कवी (?) मात्र चिडका आहे

ट्रॅजेडी लिहिता लिहिता कॉमेडी
आपसूक दणादण बहरते आहे
तडका - भडका - व्होडका चर्चेने
अख्खी मायबोली गहिवरते(!) आहे

-- हिं.ग. कोथमीरे

(तंबाखू, बाळंतशोपा आणि ओव्याचे व्यापारी.
पहिल्या दोन बाळंतविड्यांसाठी सरकारी अनुदानातून खास सवलत.
विड्यांवर (धूरवाल्या) सवलत नाही)

पत्ता:-
"लाल धागा" महल
तांबूल गल्ली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिमॅच्युर डिलेवरीसाठी बालाजी तांबेंचा पिचू ठेवा दुकानात.....केतकावळेत काजू आणी ईंग्लंडात बाळणशेपा......जय गुरुदेव(म्हस्के सायेब)

@हिं.ग. कोथमीरे

तंबाखू, बाळंतशोपा आणि ओव्याचे व्यापारी.
पहिल्या दोन बाळंतविड्यांसाठी
सरकारी अनुदानातून खास सवलत.>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif