हॅरी पॉटर

रोलिंगचं चुकलं का? काय चुकलं?

Submitted by भास्कराचार्य on 10 January, 2022 - 15:30
जे के रोलिंग

हॅरी पॉटर चित्रपटसृष्टीला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'हॉगवार्ट्स रियुनियन' नावाची विशेष डॉक्युमेंटरी नुकतीच स्ट्रीम व्हायला लागली, आणि अनेकांना त्यातून पुन्हा बालपणीचा नाहीतर तरूणपणीचा काळ सुखाचा अनुभवायला मिळाला. अनेक आठवणींनी भरलेल्या‌ ह्या जगात जे के रोलिंग या हॅरीच्या लेखिकेला मात्र महत्त्वाचं स्थान मुद्दाम दिलं नाही की काय, असं अनेकांना वाटलं. तिच्या रीळाला मुद्दाम २०१९ची तारीख दाखवली गेली. का बरं असेल असं?

हॅरी पॉटर - भाग सहा

Submitted by राधानिशा on 11 October, 2019 - 10:34

जेम्स आणि लिलीची हत्या झाली तेव्हा पीटरने विश्वासघात केला ही गोष्ट सिरियसच्या लक्षात आली . जेम्सवर त्याचं भावापेक्षाही अधिक प्रेम होतं . तो संतप्त अवस्थेत पीटरला ठार मारण्याच्या हेतूने त्याच्यामागे गेला . त्यांची गाठ अनेक मगल लोक असलेल्या रस्त्यावर पडली . मात्र सिरियसपेक्षा पीटर चपळ ठरला . " तू लिली आणि जेम्सचा विश्वासघात केलास " असं मोठ्याने ओरडून पीटरने एक मोठा जादुई स्फोट घडवून आणला , या स्फोटात 12 मगल लोक मृत्युमुखी पडले . याचवेळी आपलं एक बोट पीटरने कापलं आणि क्षणार्धात उंदराच्या रुपात परिवर्तीत होऊन तिथून पळून गेला .

हॅरी पॉटर - भाग चार

Submitted by राधानिशा on 9 October, 2019 - 04:46

हॉगवार्ट्सच्या संस्थापकानंतर महत्वाची पात्रं पुढीलप्रमाणे -

१ - एल्बस डम्बलडोर

एल्बस डम्बलडोर हे हॉगवॉर्ट्सचे वर्तमान मुख्याध्यापक . त्यांच्या काळातील सर्वात शक्तिमान जादूगार म्हणून हे प्रसिद्ध आहेत . शालेय जीवनात , हॉगवॉर्ट्स मध्ये विद्यार्थी असताना सातही वर्षे त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभेची चमक दाखवली , संशोधने करून जादुई जगताला उपयोगी ठरतील असे अनेक शोध लावले ...

दूरदर्शीपणा , माणसं ओळखण्याचं कसब , लोकांच्या मनात आधाराची विश्वासाची भावना निर्माण करेल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे ..

हॅरी पॉटर - भाग तीन

Submitted by राधानिशा on 5 October, 2019 - 13:23

हॉगवर्ट्स मध्ये जादूच्या अनेक शाखांचं शिक्षण दिलं जातं . त्यातले काही महत्त्वाचे विषय म्हणजे -

१ . ट्रान्सफिगरेशन / रूपांतरण ,

२ . चार्म्स / मंत्रविद्या ३ . पोशन्स / काढेशास्त्र

४ . हिस्ट्री ऑफ मॅजिक / जादूचा इतिहास ( यात जादूगार समाजाच्या इतिहासात घडून गेलेल्या घटनांचा समावेश होतो )

५ . ऍस्ट्रॉनॉमी / खगोलशास्त्र .

६ . हर्बॉलॉजी / वनस्पती शास्त्र

७ . डिफेन्स अगेन्स् डार्क आर्ट्स / गुप्त कलांपासून
संरक्षण

आणि

8. फ्लाईंग लेसन्स / जादुई झाडुवरून उडणे

शब्दखुणा: 

हॅरी पॉटर - भाग दोन

Submitted by राधानिशा on 2 October, 2019 - 13:38

हॅरी पॉटरच्या जगातले जादुई प्राणी

या जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जादुई प्राणी / जादुई जीव आहेत . त्यातले कथेच्या दृष्टीने महत्वाचे आणि विविधतेची साधारण कल्पना येईल असे काही पुढीलप्रमाणे -

१ . हाऊस एल्फ्स -

शब्दखुणा: 

गेलर्ट ग्रींडलवाल्ड पात्रासाठी जॉनी डेपची निवड

Submitted by टीना on 8 December, 2017 - 04:18

'फँटॅस्टीक बीस्ट अँड व्हेअर टू फाईंड देम' यामधील गेलर्ट ग्रींडलवाल्ड पात्रासाठी जॉनी डेपची निवड केल्याबद्दल फॅन्सचा जो गदारोळ चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटत या चर्चेसाठी हा धागा.

हॅरी पॉटर फ्रंचायझीचा हा नवा चित्रपट जेव्हा रिलीझ झाला तेव्हाच जॉनी डेप च्या बायकोने अम्बर हर्डने त्याच्याविरुद्ध कौटूंबिक हिंसाचाराची केस दाखल केली आणि त्यावर उतारा म्हणुन पैशांची मागणी केली.

हॅरी पॉटर ट्रिविया क्विज

Submitted by वैद्यबुवा on 1 February, 2013 - 11:31

हॅरी पॉटर नीलम-गेम खेळत असताना ही कल्पना सुचली. नीलम गेम मध्ये पुढचं कनेक्शन जोडताना पुष्कळ स्वातंत्र्य आहे त्यामुळे गेम आविरत सुरु राहतो खरं पण मला वाटतं हॅरी पॉटर ट्रिवियाची खरी मजा पुस्तकातल्या बारिक बारिक डिटेल्सची उजळणी करण्यात आहे.

विषय: 

हॅरी पॉटर: नीलम खेळ

Submitted by YOU KNOW WHO on 28 January, 2013 - 01:34

नमस्कार मंडळी!

प्रतिसृष्टीच आहे तर इथं का नको हा खेळ? Proud

तर नीलम गेम तुम्हाला माहीतच असेल. एकाने एक शब्द लिहायचा आणि पुढच्याने त्यासंबंधीत दुसरा शब्द लिहायचा.

शब्द लिहिताना हे लक्षात ठेवा:

  • तसं (मगल्सच्या दृष्टीनं) बघितलं तर हॅरी पॉटरमधले कोणतेही दोन शब्द हे या खेळात ग्राह्य धरायला पाहिजेत.
    म्हणजे, 'हॅरी --> वॉण्ड' हे ग्राह्य धरायला पाहिजे. पण इथं हे ग्राह्य धरता येणार नाही कारण हे फारच जनरलाईझ्ड होईल.
    म्हणजे कसं तर 'अजय गल्लेवाले --> की-बोर्ड' हे किती जनरलाईझ्ड होईल तसं.
    त्या शब्दांचा फार निकट संबंध असायला पाहिजे.
    I hope I made my point clear.
विषय: 

Pages

Subscribe to RSS - हॅरी पॉटर