दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पद्मजा फाटकांना श्रद्धांजली.
त्यांचं 'आवजो' आणि संकलनात त्यांचाही सहभाग असलेलं 'बाप-लेकी' इतकंच वाचलंय. दोन्ही पुस्तकं चांगली आहेत.

मुंबईत क्रिकेटपटूचे मैदानातच निधन

मुंबई - क्रिकेट खेळताना चेंडू लागल्याने फिल ह्यूजचे निधन झाल्याच्या आठवणी ताज्या असतानाच मुंबईतील मैदानात याच प्रकारची दुर्घटना घडली. रत्नाकर मोरे (वय 33) असे या क्रिकेटपटूचे नाव आहे

लेखक श्री चंद्रकांत खोत यांचे बुधवारी (दि. १०/१२/२०१४) पहाटे चिंचपोकळी येथील साने गुरुजी मार्गावरील साईमंदिरात निधन. वल्ली व्यक्तिमत्व म्हणून ओळख. उभयान्वयी अव्यय, बिनधास्त, विषयांतर, अबकडई या दिवाळी अंकाचे संपादन. अशा अत्यंत हटके लिखाणातून अत्यंत वेगळ्या दिशेला लेखन. बिंब प्रतिबिंब हे विवेकानंदांवरचे पुस्तक ज्यात विवेकानंद स्वत: स्वत:ची आत्मकथा सांगताहेत असा आकृतिबंध. दोन डोळे शेजारी हा श्री शारदामाता (रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी) कथा सांगताहेत असा आकृतिबंध ज्यात त्या कोणत्याही क्रमाने आयुष्यातल्या घटना सांगत जातात तरीही पुस्तक वाचताना पूर्ण कालाक्रमाचा दुवा तुटत नाही. त्यानंतर भगिनी निवेदितांवर लिहिलेले संन्यास्याची सावली, अलख निरंजन हे नवनाथांवरचे पुस्तक, अनाथांचा नाथ हे श्री साईबाबांवरील आत्मनिवेदनात्मक पुस्तक आणि माझ्या माहितीप्रमाणे शेवटचे हम गया नही जिंदा है – हे स्वामी समर्थांच्या जीवनावरील कांदबरी.

श्री चंद्रकांत खोतांचे आयष्यही लिखाणाप्रमाणे झंझावाती होते. त्यांनी सिनेतारका पद्मा चव्हाण यांच्याशी आपला विवाह झाल्याचे जाहीर केले होते. १९९५ नंतर १५ वर्ष ते अज्ञातवासात होते.

दि. ११/१२/२०१४ च्या दै. लोकमतच्या अंकात श्री प्रवीण दवणेंनी अत्यंत वाचनीय श्रद्धांजलीपर “एका वादळाला घर हवं होतं......” या नावाने लेख लिहिला आहे. ही त्या लेखाची लिंक href="http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?edorsup=Sup&queryed=18&querypag..." title="Lokmat epaper">

श्री चंद्रकांत खोतांना भावपूर्ण श्रद्धांजली.

औरंगाबादमधल्या शारदा मंदिर प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका तारा मेढेकर यांचे निधन. मेढेकर बाईंना श्रद्धांजली.

पद्मजा फाटक म्हणजे हसरी किडनीच्या लेखिका का? ते पुस्तक मला फार आवडले होते.. Sad

मेढेकर बाईंना श्रद्धांजली. आम्हाला मराठी शिकवायच्या. अतिशय शांत आणि प्रसन्न व्यक्तिमत्व.

पेशावर मध्ये लहान मुलांची केलेली हत्या. अतिशय वाईट आहे हा धर्मांधपणा.

काय बोलावे समजत नाही.

अत्यंत संतापजनक आणि दु:खद घटना आहे. Sad

कोण्यामायबोलीकराने येथे त्यासंदर्भात दु:ख्ख प्रकट केले नाही याचे देखील नवल वाटते.

पेशावरची घटना ऐकून बधीर वाटते आहे...
एवहढ़या निष्पाप लहानग्यांना श्रद्धांजली तरी कसे म्हणणार....
सिडनी चे नाट्य संपते ना संपते तोच ही घटना घडली... मन अगदी सुन्न झाले आहे गेले दोन तीन दिवस...

पेशावर घटने मुळे मन इतकं उदास झालंय.. त्या लहान लहान पोरांची ,त्यांच्या कुटुंबियांची अवस्था बघून नुस्तं हेलावून गेलंय.. Sad Sad

खूप चिडचिड झाली , राग राग झाला.. !!! टू शॉकिंग!!!

वत्सला.. खरं बोललीस..काय बोलावे अन कसं तेच कळंत नाहीये..इथे सिडनीची जखम ताजी असतांना ही बातमी आली..खुप धक्कादायक ! Sad

The Smallest Coffins are the Heaviest...
अत्यंत निंदनीय, पाशवी कृत्य... पेशावर च्या दुर्दैवी मृतांना श्रद्धांजली Sad

पाकिस्तानला त्यांनी पोसलेला दहशतवदाचा भस्मासूर भोवतो आहे, हे आहे खरं..पण जी निष्पाप चिमुरडे जीव मारले गेले, त्यांनी कुणाला पोसले होते??? निव्वळ सून्न करणारी घटना.. निषेध Sad

पेशावर मधल्या घटनेवर काय बोलावे तेच कळत नाहीये. अतीव दु:ख, राग, कणव, सहानभूती सगळचं दाटुन आलयं

पेशावरच्या मुलांना आणि इतर कर्मचा-यांना श्रधांजली. खूपच निंदणीय घटना, लहान मुलांना टारगेट करुन असा भ्याड हल्ला केला. काय मिळविले त्या मुर्खांनी.
केवळ त्या ९ अतिरेक्यांना संपवून असे दहशतवाद संपणार नाहीत त्यांच्या मुळापर्यंत पाकिस्तान जाईल असे वाटत नाही.

सेनापती आधी हा धागा उघडण्या आधीच इतर घडामोडी आणी दुसर्‍या ( विशा) धाग्यावर निषेध करुन झाला होता.:अरेरे: ती घतनाच एवढी सुन्न करणारी आहे की कुठे काय प्रतिक्रीया द्यावी हेच कळत नाही. आपण नुसते निषेध व्यक्त करतो, पण जगातुन जेव्हा हा दहशतवाद कायमचा हद्दपार होईल तेव्हा ती खरी श्रद्धान्जली ठरेल.

Sad

केवढी विदारक घटना. शब्द सापडत नाही काही बोलायला. खूप भयाणक अमानुष अशी घटना. काय परिस्थिती असेल ती! कल्पना करवत नाही. छोटी छोटी मुले आणि केवढ्या संख्येने!

सन २०११ मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यानी इस्लामाबाद मीटिंग दरम्यान सडेतोडपणे पाकिस्तान प्रतिनिधी मंडळाला सुनावले होते, "...‘You can’t keep snakes in your backyard and expect them to only bite your neighbor’....

राजकारणाचा काडीचाही संबंध नसलेले ते दीडशे निष्पाप जीव एका विखाराचे बळी ठरले आहेत....सारे विश्वच हादरून गेल्याचे जाणवत आहे....यातून पाकिस्तान राज्यकर्त्यांचे डोळे उघडतील अशी आशा आहे....असे झाले तरच या कोवळ्या मुलांना खरी श्रद्धांजली ठरेल.

आज लेकीच्या शाळेत सर्व मुलांनी पेशावरच्या मुलांना आणि इतर कर्मचार्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Pages