दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आबा चांगला माणूस होता. फक्त तंबाखू खात असत व त्यामुळेच बहुतेक तोंडाचे कॅन्सर झाले असावे.

आत्म्याला शांती लाभो.

---
मला ही बातमी सकाळीच कळली होती. पण बातमी देणारा एका आमदाराचा ड्रायव्हर असल्यामुळे फोडली नाही.

तंबाखूवर बंदी घालण्याची वेळ आली आहे.
पवारांच्या पत्नीने वेळीच धोका ओळखून गुटखा हद्दपार करायला लावले होते म्हणून पवार बचावले.
आता आबाच्या पत्नीने तंबाखूवर बंदीची मागणी करावी.

आबा पाटलांना श्रद्धांजली!

राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकमेव निष्कलंक चारित्र्याचा माणूस गेल!!

आर. आर. आबांना श्रद्धांजली ! Sad
असा कार्यकर्ता आणि नेता दुर्मिळच.

मुंढेंच्या प्रमाणेच महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंतच्या प्रश्नांची उत्तम जाण असणारे, खुप चांगला लोकसंपर्क असणारे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अती महत्वाच्या पदांवर राहून देखील मायेत न अडकलेले असे एक चांगले व्यक्तिमत्व होते आबा.

बाळासाहेब, महाजन, विलासराव, मुंढे आणि आबा असे महत्वाचे लोक एका मागोमाग एक अस्ताला गेले.
तसे तर नवीन कार्यकर्ते, नेते हे येतच असतात, काळ थांबत नसतो. पण तरी या लोकांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे, ती सहजी भरून येणे नाही.

Sad

अरेरे.. एक अत्यंत अभ्यासू कार्यकर्त्याची भ्याड हत्या झाली. पानसरेंनी वेळोवेळी वर्तमानपत्रातून लिहिलेले लेख वाचनीय, अभ्यासू होते.
सर्व वर्तमानपत्रे, टीव्ही प्रसारमाध्यमातून 'अँटी-टोल टॅक्स चळवळीचे नेते' असे कॉ. पानसर्‍यांचे ओळख करून दिली जात आहे. ती त्यांच्या जवळपास अर्ध शतकाच्या सामाजिक आयुष्यातील एक छोटीशी घटना आहे. त्यांचे काम, साम्यवादावरील निष्ठा, सामाजिक प्रश्नांचा अभ्यास अशा अनेक पैलूंचा हा माणूस होता.
'शिवाजी कोण होता' हे पानसर्‍यांचे अतिशय छोटेखानी पण सुलभ-थेट पुस्तक महाराष्ट्रातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला वाचायला दिले पाहिजे.

खूप आशा होती....कॉम्रेड गोविंद पानसरे त्या ऑपरेशननंतर पुन्हा बिंदू चौकात हसतमुखाने सर्वांशी वार्तालाप करताना दिसणार. देवावर विश्वास असो वा नसो, पण असे व्हावे यासाठी देवाला नमस्कार करणारे अनेक कार्यकर्ते कोल्हापूरतच नव्हे तर सार्‍या राज्यात दिसले असतील....पण नाही झाले तसे.

सलाम कॉम्रेड गोविंद पानसरे याना....

गोविंदराव पानसरेंना आदरांजली!

आणि त्यांच्यावर भ्याड हल्ला करणार्‍यांचा तीव्र निषेध!
तुम्ही मानवी शरीर संपवू शकता, पण विचार नाही!

गोविंदरावांच्या विचारसरणीचा विरोधक या नात्याने माझ्यातर्फे त्यांच्या हत्येचा कडकडीत निषेध. अपराध्यांना शासन झालंच पाहिजे. Angry
-गा.पै.

कुछ तुम कहो, कुछ हम कहे, हम आपके दिलमें रहते है इ. - डी राम नायडू - श्रद्धांजली

कॉम्रेड गोविंदराव पानसरेंना भावपुर्ण श्रध्दांजली!

त्यांच्यावर भ्याड हल्ला करणार्‍या व्यक्ती आणि प्रवृत्तींचा तीव्र निषेध.

भयंकर वासाची, भयानक चवीची, गिळल्यानंतरही घशात कडूशार आवंढे आणत रहाणारी अँटीबायोटिक गिळल्यासारखं फिलींग आलंय! आत खदखदणारे जंतू नष्ट करायला जहाल प्रतिजैविकंच लागतात नाहीतरी!

मूग गिळणे हा शब्दप्रयोग वापरातून हद्दपार केला पाहिजे आता. त्या मुगांमुळं आतले संवेदनेचे जंतू उलटे पोसले जातात. अँटीबायोटिक गिळणे असाच प्रयोग केला पाहिजे.

XX धड शिव्यासुद्धा येत नाहीत मला द्यायला! आणि देता येत असत्या तरी त्या मनसोक्त हासडता येणार नाहीत अशा समाजात रहाते मी.. कुणाकडं बोटं दाखवायची? माझेच दात आणि माझेच ओठ की सगळे!

श्रद्धांजली तरी कुठल्या तोंडानं वहायची? माळावर जाऊन खुप मोठ्यानं ओरडावंसं वाटतंय!

Pages