दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ho, sathenchi batami dhakkadayak hoti. pratyek veli TiMaVi t gele ki bhet whayachich. Farasa samabandh nasunahi atishay manmokalya gappa whayachya. Satat utsahane rasrasun kam karnare vyaktimatv...

Shraddhanjali

लोकहो इथे लिहीणे योग्य नसेलही, पण अनेक कलाकार, परिचयातली, आणि जवळच्या नात्यातली मंडळी खूप कमी वयात हृदयविकारादी रोगांनी जाताना पाहिली आहेत. नियमित व्यायाम करा, योग्य आहार घ्या आणि त्या मार्गाने तब्येत चांगली राखा ही विनंती.

अरेरे वारले का ते सद्गृहस्थ? मनःपूर्वक श्रद्धांजली. Sad

अलिकडेच त्यांना सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता 'झी मराठी' अ‍ॅवार्ड्स' मधे...

http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-jai-malhar-fame-atul-abhyank...

खुप वाइट बातमी... श्रद्धांजली.
आम्ही कीर्ती कॉलेजला असताना आन्तर्महाविध्यालयीन स्पर्धामधे एकत्र काम केले होते..खुप मनमिळाऊ आणि हसरे व्यक्तिमत्व.
अतुलच्या अचानक एक्झिटने एक प्रसन्ग आठवला... आम्हा ज्युनिअर्सची शोकाकुल अभिनयाची इफेक्टिव्ह प्रॅक्टिस व्हावी म्हणुन, याने आणि आमचा दिग्दर्शक अमर आमले या दोघानी अमरच्या अचानक निधनाची अफवा उठवली होती... ज्युनिअर-सिनिअरचा पूर्ण ग्रुप सुन्न झाला होता.
आताही तु सुन्न करून गेलास मित्रा. Sad

'द बिग बँग थिअरी'मध्ये मिसेस वॉलोविट़्झ यांचा आवाज असणार्‍या कॅरल अ‍ॅन सुसी यांचं कर्करोगाने निधन. Sad

http://comicbook.com/2014/11/12/carol-ann-susi-who-played-mrs-wolowitz-o...

दूरदर्शनवरील 'महाभारत' आणि 'द बर्निंग ट्रेन', 'जमीर', 'मजदूर', 'बागबान' हे चित्रपट दिग्दर्शित करणार्‍या रवी चोपडा यांचं निधन.

ऑ! अतुल अभ्यन्कर गेले?:अरेरे: कशाने गेले? त्याना श्रद्धान्जली.:अरेरे:

विष्णुची भूमिका किती समरसुन आणी मिश्कील पणे सादर करायचे ते.

रवि चोपडा याना श्रद्धान्जली. काय एकेक व्यक्तीमत्व जायला लागलीत आपल्यातुन.:अरेरे:

अतुल अभ्यंकरना श्रद्धांजली.
बकाल दवाखाना आणि जागेच्या कमीमुळे पोस्ट-ऑप रिकव्हरी न पाळल्यामुळे संतती नियमन शस्त्रक्रियेनंतर प्राण गमावलेल्या त्या स्त्रियांना श्रद्धांजली.डोक्याला मुंग्या येतात अशा बातम्या वाचून.
http://edition.cnn.com/2013/02/08/world/asia/india-women-outside/

श्रद्धांजली Sad
रश्मी, हो गं! काल जय मल्हार बघताना मला फार वाईट वाटत होतं.
मल्हारच्या तोंडी एक वाक्य होत काल - आम्हाला अर्ध्या वाटेत सोडून तुम्ही असे जाऊ शकत नाही.
मनात आलं की हे शूटिंग करताना त्यांना वाटलं तरी असेल का की हे वाक्य लवकरच खर होणार आहे Sad

Sad

कालची राजकीय घडामोड बघुन कुणाला श्रध्दांजली व्हावी कळत नाहीये.
.... मला पण कळत नाही!

शेकडो प्राण वाचविणारा पोलिसांचा ‘प्रिन्स’ गेला!
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई पोलीस दलातील बॉम्बशोधक आणि नाशक पथकातून नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या प्रिन्स या कुत्र्याचे परळ येथील साखराबाई पेटीट रुग्णालयात हृदयविकाराने आणि किडनीच्या आजाराने निधन झाले.

प्रिन्सची कामगिरी
- २००७ च्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोटात माटुंगा ते बोरिवली स्थानकांदरम्यान महत्त्वाचे धागेदोरे शोधले.
- वांद्रे येथील हॉटेल सिरॉकमध्ये आईस्क्रीम बॉलमधील बॉम्ब शोधला.
- ‘२६/११’ च्या मुंबईवरील हल्ल्यादरम्यान चार जिवंत बॉम्ब आणि १७ हॅण्ड ग्रेनेड शोधले.

Pages