दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

untitled.JPG

आरके Sad

भारतीताई, तुमचा वरचा संदेश अगदी समर्पक आहे. समज समृद्ध करणे हे कमालीचं चपखल वर्णन आहे. हा दु:खद घटनेचा धागा असला तरी अचूक शब्दयोजनेची प्रशंसा केल्यावाचून राहवत नाही.
आ.न.,
-गा.पै.

ज्येष्ठ अभिनेते व नाट्यकर्मी आत्माराम भेंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

संस्कार मालिकेचे शुटिंग आमच्या शाळेत झाले होते. त्यावेळी आत्मारामजींना भेटायचा योग आला होता. एकदम हसतमुख व्यक्तीमत्व, भेटायला येणार्‍या विद्यार्थ्यांची आपुलकीने चौकशी करायचे.

आत्माराम भेंडेंना भावपूर्ण श्रद्धांजली Sad

लोकसत्तामधे किशोर प्रधान, दिलीप प्रभावळकर आणि अशोक सराफ यांच्या शब्दातली भेंडेंना आदरांजली
लिंक :http://www.loksatta.com/vishesh-news/kishore-pradhan-on-actor-atmaram-bh...

आत्माराम भेंड्यांना श्रद्धांजली.

सुनेला जाळून हुंडाबळी घेणाऱ्या सासूसासऱ्यांची भूमिका खूप लक्षात राहिलीये. मराठी मालिकेचं नाव आठवत नाही.

-गा.पै.

>>>आर. आर पाटील यांचे निधन <<<
अरेरे, डान्सबार बंदीसारखे निर्णय घेणारा धडाडीचा नेता गेला.
श्रद्धांजली..

Pages