दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवेन वर्मा, श्याम पोंक्षे यांना श्रद्धांजली.

अंतुलेसाहेबांना श्रद्धांजली. वाईट दिवस आहे आजचा.

बेफिकीर, हो खरी आहे. एबीपी माझावर दाखवले ते.
माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांना श्रद्धांजली. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

लहानपणी एस.टी.ने गावी जाताना त्यांचा बंगला आम्हाला आवर्जून दाखवला जायचा त्याची इथे आठवण झाली. आजही त्या पुलावरुन जाताना डोळे आपोआप त्यांचा बंगला शोधू लागतात.

काय चाललंय हे Sad
अंतुले आणि पोंक्षेंना ही श्रद्धांजली...
यमदेव जणू यावर्षाचा कोटा शेवटच्या महिन्यात पूर्ण करताहेत Sad

बापरे! Sad

अभिनेते देवेन वर्मा, शाम पोंक्षे, आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. Sad Sad
Sad

चौदा हुतात्म्यांना श्रद्धांजली.

देवेन वर्मा यांना श्रद्धांजली. अंगूर आठवला. Sad

श्याम पोंक्षे यांच्याबद्दल माहीत नाही. अनाम श्रद्धांजली. Sad

अंतुले गेले. बेळगाव सीमाप्रश्नावर महाराष्ट्राची बाजू धडाडीने मांडणारा खंदा वीर हरपला. आज बेळगावातल्या मराठी माणसाने (आणि आपणही) एक अभ्यासू हितचिंतक गमावला आहे. श्रद्धांजली. Sad

सर्वांना शांती लाभो!

-गा.पै.

देवेन वर्मा Sad Sad Sad श्रद्धांजली.
पोंक्षे आणि ए.आर.अंतुले यांना श्रद्धांजली !

देवेन वर्मा यांनी मराठी चित्रपटात देखील भुमिका केली होती (दोस्त असावा तर असा) "घ्या करा हिशोब"

श्रद्धांजली.

देवेन वर्मांनी विनोदी भूमिका जास्त गाजवल्या असल्या तरी देवर चित्रपटातील त्यांचा अभिनय मला सगळ्यात आवडला होता. ग्रे शेड्स असलेली ही भूमिका त्यांनी मस्त केली होती. बघितला नसल्यास जरूर बघा. त्यांच्याबरोबर शर्मिला टागोर, धर्मेन्द्र आणि शशिकला होते (अनुपमाचीच सगळी टीम या चित्रपटात परत एकत्र आली होती). चित्रपटही खूप वेगळा आणि चांगला होता.शर्मिलाही कधी नव्हे ते या चित्रपटात खूप आवडली होती.

मायबोलीवर लिहणारे आद्य लेखक डॉ. मधुकर जोशी यांचे दीर्घ आजारानंतर वयाच्या ७६ वर्षी दु:खद निधन झाले. (कुटुंबीयांच्या विनंतीला मान देऊन ही बातमी या आधी लिहली नाही). न्यू इंग्लंड मराठी मंडळाचे ते पहिले अध्यक्ष होते.

हितगुज सुरु होण्याच्याही अगोदर त्यांचे लेखन मायबोलीवर प्रकाशित झाले आहे. मायबोलीवर मराठी लिहता येण्याची सुविधा सुरु होण्याच्याही अगोदरचे हे लेखन आहे. हे लेखन इंग्रजीत असून मुख्यत्वे परदेशात वाढलेल्या मराठी मुलांसाठी आहे. माननीय श्री बाबासाहेब पुरंदरे यांनी तपशीलात काही चुका नाही हे तपासून त्याचे कौतुक केले होते. लेखातली चित्रेही त्यांच्या परवानगीनेच मायबोलीवर प्रकाशीत झाली आहेत.
Relevance of Shivaji at the Dawn of 21st Century
http://www.maayboli.com/arch/1/shivaji/shivaji1.shtml

पद्मजा फाटक गेल्या. त्यांनी आणि माधव नेरुरकरांनी लिहिलेले ''बाराला दहा कमी'' हे माझ्यासाठी दुसरे महयुद्ध म्हनजे काय होते हे जाणवण्याची सुरूवात होती. श्रद्धांजली त्यांना.

पद्मजा फाटक ह्यांचे साहित्य मला फार आवडायचे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

मधुकर जोशींना श्रद्धांजली.

Pages