दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फिलीप ह्यूजला श्रद्धांजली!

एका तरुण हरहुन्नरी खेळाडूचा दुर्दैवी अंत !

फिलीप ह्युज आणी नयनतारा दोघाना श्रद्धान्जली. काही माणसे चटका लावुन जातात.

नयनतारा गेल्या Sad
लक्ष्या आणि सुधीर जोशी यांच्याबरोबरीने "शांतेचं कार्ट" तोडीस तोड गाजवणार्‍या आवडत्या अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली !

नयनतारा यांना विनम्र श्रद्धांजली!!
शांतेचं कार्ट अत्यंत आवडीचं नाटक आहे... तिघेही गेले Sad Sad

फिलीप ह्युजच्या मृत्यूच्या धक्क्यातून क्रिकेटविश्व सावरत असतानाच क्रिकेटला दुसरा धक्का:

चेंडू लागून अंपायरचा मृत्यू

बाउंसर चेंडू डोक्यावर आदळल्याने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्युजचे निधन झाल्याच्या घटनेला काही दिवसही उलटत नाहीत तोच क्रिकेट सामन्यादरम्यान चेंडू लागल्याने इस्त्रायलमध्ये पंच हिलेल ऑस्‍कर यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ओह्ह्ह देवेन वर्मा... सॅड.. त्याची तरुणपणी देवर मधली आणि नंतर अंगुर मधली अशा दोन्ही भुमिका अविस्मरणीय...

अरे, श्याम पोन्क्षे म्हणजे शरद पोन्क्षेन्चे मोठे भाऊ ना? बहुतेक ते आता माझे मन तुझे झाले मध्ये होते.:अरेरे: त्याना आणी देवेन वर्माना श्रद्धान्जली.

देवेन वर्मा, किती सहज आणी सुन्दर भूमिका करायचे. नजरेसमोर पटकन येतात ते. कुणीच विसरु शकत नाही त्याना. गम्भीर असो वा विनोदी, दोन्ही भूमिका समरसुन करायचे ते. मिलन, चोरी मेरा काम, देवर वगैरे त्यान्चे गाजलेले चित्रपट. जरी यात धर्मेन्द्र आणी सुनील दत्त होते तरी यान्ची वेगळीच छाप होती.

वाईट बातम्या! देवेन वर्मा आणि श्याम पोंक्षे दोघांनाही मनःपुर्वक श्रद्धांजली Sad
देवेन वर्मांनी खुप आनंद दिला..

देवेन वर्मा Sad
निर्विकार-कोरा चेहरा, विनोदनिर्मितीसाठी आवश्यक तितकाच नेमका मुद्राभिनय ठेवून जबरा पंचेस मारायचे. आचरट/पाचकळ विनोद कधीच नसायचे. भावपूर्ण श्रद्धांजली...

देवेन वर्मा आणि शाम पोंक्षेंना श्रद्धांजली. दोघाचाही सहज अभिनय लक्षात राहिल. देवेन वर्मांचा 'अंगुर' आणि शाम पोंक्षेचं "एका लग्नाची गोष्ट" सदैव स्मरणात राहील.

अभिनेते देवेन वर्मा - माझे खूप आवडते Sad - श्रद्धांजली

अभिनेते श्याम पोंक्षे यांनाही श्रद्धांजली.

देवेन वर्मा व पोंक्षे - श्रद्धांजली Sad

अंगूरमधील देवेन वर्मांची भूमिक जबरदस्त

Pages