दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

बेबी शकुंतला नावाने ओळखल्या गेलेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उमादेवी नाडगोंडे यांचे वयाच्या ८२व्या वर्षी निधन

Baby Shakuntala passes away at 82

Noted Marathi film actress Umadevi Nadgonde, better known as Baby Shakuntala, breathed her last at a hospital in Kolhapur on Sunday, Jan 18, 2015.

The actress made her onscreen debut at a very young age of six with the Marathi movie 'Daha Vajata', which was made by the famous Prabhat Film Company. In an era when acting as a profession was frowned upon, Umadevi carved a niche for herself after appearing in nearly 20 Marathi and 40 Hindi films (20 out of which were Silver Jubilee hits).

[पूर्ण बातमी वर दिलेल्या दुव्यावर टीचकी मारून वाचता येईल]

लोकसत्ता:
अभिनेत्री बेबी शकुंतला यांचे निधन

सीडीएसएसचे संस्थापण आणि राज्यशास्त्र-समाजशास्त्राच्या अभ्यासातील पितामह रजनी कोठारींचे वृद्धापकाळाने निधन. भारतीय लोकशाहीचा कुठल्याही चश्म्यातून न पाहता अ‍ॅनालिसिस त्यांनी केला, अनेक पुस्तके लिहिली. सेमिनारमध्ये त्यांनी लिहिलेले लेख तर एक मोठा ठेवा आहे.

ज्या दिवशी बेबी शकुंतला यांचे निधन झाले त्याच दिवशी पुण्यातले प्रसिद्ध चार्टर्ड अकौंटंट आणि लेखक मिलिंद संगोराम याचे फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन झाले. Sad त्यांच्या 'बखर प्राप्तिकराची' या पुस्तकाला राज्य पुरस्कार मिळाला होता. दैनिक सकाळ आणि व्यापारी मित्र मासिकात ते सतत लेख लिहायचे!

ईश्वर मृतात्म्यास शांती देवो!

मिलिंद संगोराम ------ चे निधन ही धक्का दायक बातमी होती ....
बेबी शकुंतला , मिलिंद संगोराम , रजनी कोठारीं----सगळेच आपापल्या क्शेत्रात दिग्गज होते
सगळ्याना श्रद्धांजली

तिघांनाही मनःपुर्वक श्रद्धांजली..
मिलिंद संगोरामांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. त्यांचे माहितीपूर्ण लेख वाचलेले आहेत वर्तमानपत्रातून.

आज आकाशवाणीवर बेबी शकुंतलांची मुलाखत लागली होती. गोड स्वच्छ आवाजातलं न अडखळणारं सुंदर मराठी ऐकायला मिळालं. ठळक आठवत होतं त्यांना बोलताना. मराठी चित्रपटांबद्दल, मराठीतल्या दिग्गजांबद्दल, मधुबाला, किशोरकुमार, दादामुनी, या सहका-यांबद्दल, हिंदी चित्रपटांतले तेव्हाचे किस्से, सगळं अगदी साधेपणानं सांगत होत्या. स्वतःचा चित्रपटप्रवेशाचा प्रसंगही काही घडलंच नाही अशा टोनमधे सांगितला. हे मुद्दाम जाणवायचं कारण सहसा चंदेरी दुनियेतल्या माजी कलाकारांच्या बोलण्यात मी सोनेरी दिवस पाहिले ह्याचं कुठेतरी प्रतिबिंब असतंच. आणि का असू नये हेही खरंच. पण बेबी शकुंतलांच्या बोलण्यात मात्र एक निर्व्याज निरागसता, आदब जाणवली. गतकाळात केलेल्या नोकरीबद्दल बोलणा-या एखाद्या गृहिणीप्रमाणे वाटलं ते, निर्लेप. यजमानांचा आदरपूर्वक उल्लेख, चित्रपटसृष्टीच्या संपर्कात असल्याचे वर्तमानकाळातले संदर्भ या सगळ्याचं कौतुक वाटलं.
नंतर मग 'दोन घडीचा डाव' आधीपासून ओळखीचं असूनही नव्यानं ओळख झाल्यासारखं वाटलं Happy

श्री म. द. हातकणंगलेकर ह्यांच्या आत्म्यास शांती लाभो. मी त्यांचे जी. ए. वरचे समीक्षण वाचले आहे आणि मला ते फार आवडले. त्यानंतर त्यांच्या इतर कुठल्याच साहित्याशी माझी ओळख झाली नाही.
सई, तू खूप सुंदर लिहितेस. तुला वाचले की मन निर्मळ होऊन जाते बघ Happy

अरेरे, म.द. वारले Sad उत्तम समिक्षक, एक अतिशय उत्तम शिक्षक. कित्य्के पुस्तकांना मदंनी प्रस्तावना लिहिलेली आहे जी बरेचदा त्या पुस्तकाच्या तोडीची तर कधी कधी काकणभर सरसच आहे.
जीएंच्या पैलपाखरे आणि पानवलकरांच्या कथांचे संकलन या दोन पुस्तकांची प्रस्तावन झटकन डोळ्यासमोर येते.

हातकणंगलेकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
सर आम्हाला कॉलेजात इंग्रजी शिकवायचे. ते बोलत असले की ऐकत रहावसं वाटायचं. पण त्याच वेळी असंही वाटायचं की प्रत्येक शब्द लिहून घेतला पाहिजे. अश्या त्यांच्या शब्दांनी भरलेल्या कित्येक वह्या कित्येक दिवस जवळ ठेवल्या होत्या.
पण अजूनही त्यांनी तपासलेला आणि "सी मी इन द ऑफिस" असा शेरा मारलेला एक इंग्रजीची उत्तरपत्रिका अजूनही माझ्या जवळ आहे. ( हा एक किस्सा आहे!!) त्यांचं माझं जिव्हाळ्याचं नातं होतं.
इथे (नगरला) काही प्रोग्रॅमसाठी आलेले असताना मला त्यांनी फोन करून भेटायला बोलावलं होतं. खूप गप्पा मारल्या होत्या तेव्हा त्यांचयाशी.
त्यांचं स्मरणपत्रे हे पुस्तक वाचल्यावर त्यांना एक पत्र लिहून ठेवलं होतं. सांगलीला जाणं होईल तेव्हा भेटू आणि देऊ म्हणून. पण उशीर झाला. Sad खूप वाईट वाटलं. हाडाचे शिक्षक संपूर्ण आयुष्यावर सकारात्मक परिणाम करतात. आणि हे आयुष्याच्या उत्तरार्धात जास्त प्रकर्षाने जाणवते.
त्यांनी रोमिओ ज्युलिएट शिकवलेलं कधीच विसरू शकत नाही.

http://zeenews.india.com/marathi/news/maharashtra/eminent-cartoonist-rk-...

पुणे: ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचं पुण्यात निधन झालंय. ते ९४ वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

---------------

श्रध्दांजली Sad

Arey Deva. Kiti loka Sad

Saglyanna shraddhanjali

म द हातकणंगलेकर यांचे समीक्षा लेखन खूप काही शिकवून गेले आहे. Catcher in the Rye आणि कोसला यांचा तौलनिक अभ्यास करणारा लेख अजून स्मरणात आहे. साम्यस्थळे उलगडतानाच कोसलाचे स्वतंत्र व्यक्तिमत्वही त्यांनी तितक्याच समर्थपणे विशद केले होते.

आर के लक्ष्मण यांच्याविषयी काय लिहावे! सामान्य माणसाच्या नजरेतून विसंगती टिपण्याची असामान्य हातोटी लाभलेला रेषाप्रभू. न कळत्या वयापासून मटा आणि टाईम्सची चौकट पाहायची सवय लागली, आणि पुढे विचार समजू लागल्यावर समृद्धी वाढली. ब्रशच्या सहज फटकाऱ्यानी रेखलेले एकेक व्यक्तिविशेष पाहणे ह्यात अपूर्व मजा होती. म टा मध्ये काम करत असणाऱ्या नातेवाईकांनी एकदा दुरुन त्यांचे दर्शन करवले होते त्यानेही थरारुन गेलो होतो.

विनम्र श्रद्धांजली.

मानुषीताई नशीबवान अहात तुम्ही.

आर. के. लक्ष्मण ह्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

आज सामान्य माणूस नक्कीच हळहळला असेल! Sad
राशिपुरम कृष्णास्वामी लक्ष्मण यांना शांती लाभो!
-गा.पै.

Pages