व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

तडका - समाजात वावरताना

Submitted by vishal maske on 9 June, 2015 - 22:41

समाजात वावरताना,...

आपण काय करतो याची
आपण जान ठेवली पाहिजे
सदविचाराची आपल्यातही
विवेकी ज्योत तेवली पाहिजे

मनी दुर्विचार पोसणारांनीही
आता दक्षता घ्यायला हवी
मनाची तर नाहीच नाही पण
जनाची तरी बाळगायला हवी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - करिअरच्या पाऊलखुणा

Submitted by vishal maske on 8 June, 2015 - 11:01

करिअरच्या पाऊलखुणा

विध्यार्थ्यांच्या भविष्याचे
निकालातच मंथन असते
यशस्वीतांचे अभिनंदन तर
अयशस्वींचे सांत्वन असते

कुणाचे आनंद फुलून येतात
कुणाचे आनंद ग्रासुन जातात
मात्र करिअरच्या पाऊलखुणा
निकालातुनच दिसुन येतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सवय दोन मिनिटांची

Submitted by vishal maske on 6 June, 2015 - 23:00

सवय दोन मिनिटांची

नवरा म्हणाला बायकोला
तु अशी का फुगली आहे
दोन मिनिटात खायला कर
जाम भुक लागली आहे

मग बायको म्हणाली नवर्‍याला
म्यागीची हौस अजुन का भरली नाही,.?
दोन मिनिटाच्या नाष्ट्याची
माझ्यात हिंमत उरली नाही

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - अंधश्रध्दा

Submitted by vishal maske on 4 June, 2015 - 13:38

अंधश्रध्दा

जिथे श्रध्दा जोपासली जाते
तिथे अंधश्रध्दा पोसत असते
अन् नको-नको त्या समस्यांनी
जनता इथली ग्रासत असते

कितीही प्रबोधन करा कुणीही
जनतेला फरक ना पडतो आहे
अन् दिवसें-दिवस अंधश्रध्देचा
कळस वर-वरतीच चढतो आहे,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - वास्तव वाढदिवसांचे

Submitted by vishal maske on 1 June, 2015 - 10:32

वास्तव वाढदिवसांचे

लहाना पासुन थोरांपर्यंत
जणू भुषण झाली आहे
वाढदिवस साजरा करण्याची
इथे फँशन आली आहे

चढत्या वयाचे वाढदिवस
आनंदाने मन नाचवु लागतात
मात्र उतरत्या वयाचे वाढदिवस
वयाचा धाक दाखवु लागतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मोठेपणाचे सत्य

Submitted by vishal maske on 31 May, 2015 - 10:50

मोठेपणाचे सत्य

मला मोठं म्हणा म्हणून
कुणी मोठं म्हणत नसतं
कुणी मोठं म्हटल्यानंही
कुणी मोठं होत नसतं

मोठं व्हायचं असेल तर
कर्तृत्व मोठं करावं लागतं
अन् आपण केलेलं कर्तृत्व
इतरांनीही स्मरावं लागतं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर

Submitted by गणेश पावले on 28 May, 2015 - 00:56

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती

सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे सावरकर
ज्यांची लेखणी माझ्यासाठी नेहमीच आदरणीय, आणि वंदनीय.
असामान्य व्यक्तिमत्व, आणि कर्तुत्ववान देशभक्त
आपल्या विविध पैलूंनी आपली प्रतिभा प्रकट करणारे
प्रगाड बुद्धिवादी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानाचा मुजरा

तडका - रिझल्ट ऑनलाइन

Submitted by vishal maske on 26 May, 2015 - 22:07

रिझल्ट ऑनलाइन

निकालाची तारीख जवळ येता
मनातील उत्सुकता वाढत असते
पण उत्सुकलेल्या मनातही मात्र
निकालाची आशा धडधड असते

होणार्या अत्यल्प विलंबालाही
मन कदापीही राजी नसते
म्हणूनच मोबाईल अन् कँफेवरील
निकालाची वेबसाइट बीझी असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सवयीचे सत्य

Submitted by vishal maske on 25 May, 2015 - 21:53

सवयीचे सत्य

जशा सवयी लावाव्यात
तशा सवयी लागल्या जातात
जस-जशी वेळ येईल तशा
या सवयी जागल्या जातात

सवयीचे गुलाम बणून
कित्तेक लोक हूकून घेतात
अन् चहा पोळलेले माणसं
सरबत सुध्दा फूकुन पेतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - रविवार

Submitted by vishal maske on 23 May, 2015 - 23:17

रविवार

आठवडाभर कित्तेकांचे
रविवारवर लक्ष असते
होऊन गेलेला रविवार
येणार्याची साक्ष असते

कुणासाठी हौस असतो
कुणासाठी नवस असतो
वेग-वेगळ्या अपेक्षांचा
रविवारचा दिवस असतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - व्यक्तिमत्व