एक सर इवलीशी

एक सर इवलीशी

Submitted by रीया on 25 April, 2012 - 01:33

एक सर इवलीशी

एक सर इवलीशी
दावी रुपे किती किती
धागा गुंफते मनाचा
त्यात आठवांचे मोती

एक सर इवलीशी
गूज आईचे सांगते
मातीतच मिसळते
गंध मातीलाच देते

एक सर इवलीशी
रूप "बा"चे ती दावते
प्रेम बरसवे सारे
स्वत: होऊनिया रिते

एक सर इवलीशी
अशी मला बिलगते
जशी खट्याळ बहीण
माझ्या पदरी लपते

एक सर इवलीशी
सखीपरीस भासते
स्पर्शानेच शब्दाविन
सांगी अनेक गुपिते

एक सर इवलीशी
"त्या"च्या सारखी लबाड
येता आनंद पाझरे
जाता अश्रुंचे घबाड

गुलमोहर: 
Subscribe to RSS - एक सर इवलीशी