एक सर इवलीशी

Submitted by रीया on 25 April, 2012 - 01:33

एक सर इवलीशी

एक सर इवलीशी
दावी रुपे किती किती
धागा गुंफते मनाचा
त्यात आठवांचे मोती

एक सर इवलीशी
गूज आईचे सांगते
मातीतच मिसळते
गंध मातीलाच देते

एक सर इवलीशी
रूप "बा"चे ती दावते
प्रेम बरसवे सारे
स्वत: होऊनिया रिते

एक सर इवलीशी
अशी मला बिलगते
जशी खट्याळ बहीण
माझ्या पदरी लपते

एक सर इवलीशी
सखीपरीस भासते
स्पर्शानेच शब्दाविन
सांगी अनेक गुपिते

एक सर इवलीशी
"त्या"च्या सारखी लबाड
येता आनंद पाझरे
जाता अश्रुंचे घबाड

एक सर इवलीशी
मेघ भरुन वाहते
येता सय माहेराची
तीच काळीज जाळते

- प्रियांका विकास उज्ज्वला फ़डणीस

गुलमोहर: 

Happy छान

मस्त मस्त! Happy

गुंज आईचे सांगते
गुंज म्हणजे?

(भाप्रः गूज म्हणायचंय का?)

स्मिता, स्मितुतै,बागु, टोकु, अनु ,jejo,अनिलजी : अनेक अनेक धन्स Happy

बागु तुला पेशल धन्स Happy

पजो तुला बर तेच आवडलं गं Wink
लोक्स हिच्याकडे लक्ष द्या Proud

नचिकेत धन्यवाद रे
चुकल होतं माझं Happy

टवाळ - तेवढ्यासाठीच धन्स Happy

प्रिय प्रिया,

आजवर मी कधी कवितेचे रसग्रहण करायच्या भानगडीत पडलो नव्हतो. की कधी या कविता विभागातही शिरलो नव्हतो. पण आज अगदीच राहावले नाही म्हणून सहज इथे आलो आणि नेमकी तुझीच कविता वर दिसली. मनापासून त्रास घेऊन अक्खी वाचलीही आणि चक्क आवडलीही. एवढेच नाही तर आता दिवसभरात मी इतरही सारया कविता वाचायचे ठरवले आहे आणि येत्या दोनचार दिवसात स्वताही तीनचार कविता करायच्या ठरवल्या आहेत.
तरी माझ्यात ही कवितेची आवड घुसवल्याबद्दल मनापासून धन्यवाद,

...तुमचा अभिषेक

अवांतर - "एक सर इवलीशी" हे वाक्य प्रत्येक कडव्याच्या सुरुवातीला वापरून तू प्रत्येक वेळी एक वाक्य रचायचे वाचवलेस, माझ्या सारख्या नवकवीसाठी ही एक टीप आहे, मी सुद्धा आता माझ्या येणार्या कवितांमध्ये हाच फंडा वापरेन. Happy

एक सर इवलीशी
रूप "बा"चे ती दावते
प्रेम बरसवे सारे
स्वत: होऊनच रिते

>>>
होऊनच ऐवजी होऊनिया केलं तर??

अभिषेकदादा :
आभार ! म्हणजे आता स्वतःचं लेखन टाकुन अजुन एक प्रांत हायजॅक करणार तर तू Proud
ते (अवांतर) बहिणाबाईंच्या कवितांमध्ये ही असतं की!

निंबु धन्स! माहितिये आधी मी तेच टाकलं होतं पण पुन्हा बदललं Happy
आता पुन्हा तेच टाकते Happy

हा हा.. नाही ग माझे बाय.. कविता मला स्वताला वाचायला आवडत नाही तर मी स्वता लिहून लोकांना का बोर करू.. पण बाकीचे जाणकार रसिक छान आहे बोलतात तर नक्कीच छानच लिहिली असशील.. एखादी लिहिल्यावर तुलाच आवडली तर सांग नक्की.. येईल इथे वाचायला.. Happy