Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 6 March, 2013 - 07:16
रेवा तीरावर l संपावे जीवन
पापाचे क्षालन l व्हावे सार्या ll १ ll
नर्मदा हरच्या l घोषात चालून
दयावी उडवून l भवचिंता ll २ ll
तप:पूत मन l तप:पूत तन
अवघे होवून l जावे तेथे ll ३ ll
माईच्या प्रेमाने l भिजुनिया चिंब
पात्रातील थेंब l तिच्या व्हावे ll ४ ll
सोडुनिया भिती l काळजी उद्याची
जगावी रोजची l सुख दु:ख ll ५ ll
तीरावर उभे l संतांचे आशीष
तयाने जीवास l मार्ग लाभ ll ६ ll
कितीदा ऐकली l माईची ती माया
जीव तिच्या पाया l जडलासे ll ७ ll
साद घालतसे l युगे युगे वाहे
चल लवलाहे l आता तिथे ll ८ ll
जावे परीक्रमे l तिये दर्शनासी
उतावळी ऐसी l होय मना ll ९ ll
विक्रांत प्रभाकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जगन्नाथ कुंटे ,भारती
जगन्नाथ कुंटे ,भारती ठाकूर,श्री लिमये आणि अमृतलाल वेगड़ या नर्मदा भक्तांना हि माझी कविता अर्पण .यांच्या पुस्तकांनी जीवन उजळून निघाले .
वाह सुंदर, छानच !
वाह सुंदर, छानच !
एका गोदावरीवेड्याचे (कवी
एका गोदावरीवेड्याचे (कवी चंद्रशेखर ?) गोदा गौरवाचे काही शब्द आठवले..
''तुज हृदयंगम *रवे विहंगम भाट सकाळी आळवती
तरु तीरीचे तुजवर वल्ली पल्लव चामर चाळवती
तुझ्या प्रवाही कुमकुम वाही बालरवी जणू अरुणकरी
जय संजीवनी! जननी पयो-दे ! श्रीगोदे भवताप हरी
अवयव थिजले शरीर भिजले उठती रोम तृणांकुरसे
सद्गद कंठी गद्गद करते वचन घटोन्मुख नीर जसे
त्वल्लीलेमधि तल्लीन न हो कल्लोलिनी कवी कवण तरी
जय संजीवनी! जननी पयो-दे ! श्रीगोदे भवताप हरी ..''
(* रवे-आवाजात )
सुंदर नर्मदास्तवन,विक्रांत.
सुंदर नर्मदास्तवन,विक्रांत.
सुंदर नर्मदास्तवन,विक्रांत. >>> +१००...
नर्मदा-विराणी खूप आवडली.
नर्मदा-विराणी खूप आवडली. भारती ठाकूर यांचे पुस्तक वाचल्यापासून परीक्रमेची ओढ आहेच. ती ओढ तुमच्या रचनेत तंतोतंत उतरली आहे.
सोडुनिया भिती l काळजी उद्याची
जगावी रोजची l सुख दु:ख ll ५ ll >> हे खासच.
पहिल्या कडव्यात 'सार्या' करणार का? shift+r+y+A याने 'र्या ' येइल.
मी जनार्दन कुंटेंच पुस्तक आधी
मी जनार्दन कुंटेंच पुस्तक आधी वाचलं होत ,भारती ठाकूर यांच पुस्तक, परवाच वाचून झालं. आणि श्री व सौ. चितळे यांची नर्मदा परिक्रमेची सीडी पाहिली व ऐकली. छान आहे.

माधव माझीही तशी इच्छा आहे. पाहू कधी जमतय ते. नर्मदे हर!
आवडली !
आवडली !
धन्यवाद
धन्यवाद ,महेशजी,भारतीताई,शशांक,माधवजी,शोभाजी ,मुक्तेश्वरजी .
भारतीताई मी हे गोदागौरव वाचले आहे ,फारच छान आहे.
माधवजी सुचणे बद्दल पुन्हा धन्यवाद ,आवश्यक बदल केले आहे,.
शोभाजी ,श्री व सौ.चितळे यांच्या सीडी बद्दल मी ऐकून आहे.ठाण्यात कुठे मिळू शकेल का?

नर्मदे हर!
शोभाजी ,श्री व सौ.चितळे
शोभाजी ,श्री व सौ.चितळे यांच्या सीडी बद्दल मी ऐकून आहे.ठाण्यात कुठे मिळू शकेल का? >>>>>>>>>>>>मी त्यांचा फ़ोन नंबर तुम्हाला देते. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. ते बहुदा कुरिअर करून किंवा पुण्यात जवळ्पास असेल तर स्वत; भेटुन सीडी देतात.
श्री. विश्राम चितळे : ९७६४९९५५२२.
http://www.maayboli.com/node/34002 : हा धागा पहा.
सुन्दर स्तवन जनार्दन कुंटे
सुन्दर स्तवन
जनार्दन कुंटे ,भारती ठाकूर,श्री लिमये आणि अमृतलाल वेगड़ या नर्मदा भक्तांना हि माझी कविता अर्पण .यांच्या पुस्तकांनी जीवन उजळून निघाले>>>>>
जगन्नाथ कुंटे (अवधूतानन्द) बद्दल बोलत आहात बहूतेक आपंण
श्रीवल्लभजी ,चूक लक्षात आणून
श्रीवल्लभजी ,चूक लक्षात आणून दिल्या बद्दल धन्यवाद,दुरुस्ती केले आहे .अभिप्राय बद्दलही धन्यवाद .