आनंदाचे डोही
Submitted by सई केसकर on 11 October, 2013 - 03:26
"तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे हे शोधून काढायचं असेल तर तुमचं मन वारंवार कुठे भरकटत जातं याकडे लक्ष दिलं पाहिजे", या अर्थाचा सुविचार/सल्ला मी आंतरजालावर वाचला होता. आजूबाजूला बघितलं तर हे बहुतांशी खरं वाटतं. कधी कधी आपल्या क्षेत्रातील कामातही आपल्याला खूप अवडणारं एखादं काम असतच. आणि ते आपल्याला करायला मिळेलच याची हमी देत येत नाही. पण या सगळ्या चिंता सोडून आपण पळून जातो तेव्हा कुठे जातो हे बघणे महत्वाचे आहे. आठ तास संगणकासमोर बसलेले लोक पूर्ण वेळ काम करत नाहीत हे मी आत्मविश्वासाने सांगू शकते (स्टॅटकाऊंटर जिंदाबाद).
विषय: