Submitted by अजय जवादे on 19 February, 2012 - 00:56
आवडलेल्या टेड टॉकच्या संदर्भात चर्चेसाठी हा धागा.
टेड टॉकचे विडिओ इथे शेअर करा.
थोडा सारांश लिहीला तर आणखीच छान.
टेड टॉक संबधी अधिक माहितीसाठी : http://www.ted.com/pages/about
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला आवडलेला हा एक टॉक.
मला आवडलेला हा एक टॉक.
http://www.ted.com/talks/jamie_oliver.html
प्रत्येक लहान मुलाला बेसिक अन्नाविषयी शिकवा, मोठ्या होणार्या मुलाला किमान दहा सोप्या पाककृती आल्या तर तो पुढच्या जगात अन्नासाठी फक्त जंक / स्ट्रीट फूड / हॉटेल्स इ. वर अवलंबून न राहता स्वतःचे उदरभरण स्वतः करू शकेल, आरोग्य राखू शकेल, पैसे वाचवू शकेल व भविष्यात आरोग्यावर होणारा अतोनात खर्च नियंत्रित करू शकेल हे सांगत आहेत जेमी ऑलिव्हर. त्यांनी शाळांमध्ये व अन्य ठिकाणी अशा बेसिक पाककृती शिकविण्याचे उपक्रम आयोजित केले आहेत, जेणेकरून मुले फास्ट फूड/ जंक फूड यांच्या आहारी न जाता घरच्या घरी स्वहस्ते अन्न शिजवून खाऊ शकतील.
जगात प्रत्येक सज्ञ होऊ घातलेल्या मुलाने अगर मुलीने बेसिक पाककला शिकून घेतली तर त्याचा त्यांनाच जगाच्या पाठीवर कोठेही किंवा कशाही परिस्थितीत राहताना फायदा होणार आहे. सध्या लहान मुलांमध्ये व मोठ्यांत जंकफूड इ. मुळे दिसून येणार्या लठ्ठपणात यामुळे नक्कीच फरक पडेल हा जेमी ऑलिव्हरचा विश्वास आहे.
अरविंद गुप्ता - टाकाऊतून
अरविंद गुप्ता - टाकाऊतून टीकाऊ खेळणी करणारे. काही आयडीआज खरंच मस्त आहेत. मुलांना स्वत: करायला मजा येईल.. http://www.ted.com/talks/lang/en/arvind_gupta_turning_trash_into_toys_fo...
प्रणव मिस्त्रीचा हा टॉक पूर्वी पाहिलेला तेव्हा आवडला होता. http://www.ted.com/talks/lang/en/pranav_mistry_the_thrilling_potential_o...
बाकी, मस्त धागा. छान टॉक्स ऐकायला मिळतील. निवडक दहात.