लवासा पुस्तकावरुन जी चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये, एक मायबोलीकर परेश लिमये, ह्यांनी खुद्द निळू दामल्यांशी लवासासंबंधित चर्चा आयोजित करण्याची जबाबदारी घ्यायची तयारी दाखवली होती. त्याप्रमाणे २८ नोव्हेंबर २०१० ह्या दिवशी, निळू दामल्यांशी ह्या विषयासंबंधित चर्चेची संधी आपल्याला मिळत आहे. वेळ साधारण सकाळी ११:०० ते २:३० दुपार.
निळू दामले ह्यांच्याबरोबर ग्रंथालीचे धनंजय गांगल व मौजेचे संजय भागवत हे देखील उपस्थित असतील.
मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०१०बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ
Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution
---------------------------------
नमस्कार मायबोलीकर रसिकहो,
हितगुज दिवाळी अंक-२०१०च्या संपादकमंडळातर्फे आपणां सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी आणि येणारे नवीन वर्ष आपणासाठी सुखसमृद्धी, भरभराट घेऊन येवो.
दिवाळीच्या दिवशी उटणी, अभ्यंगस्नान, फराळ, फटाके, आप्तेष्टांच्या/इष्टमित्रांच्या भेटीगाठी या सर्वांच्या बरोबरीने आपण उत्सुकतेने ज्याची वाट पाहता, तो 'हितगुज दिवाळी अंक' आपल्यापुढे सहर्ष सादर करत आहोत.
हितगुज दिवाळी अंक - २०१०
स्नेहांकित,
संपादक मंडळ,
हितगुज दिवाळी अंक - २०१०.
यंदा मायबोली टीशर्ट विक्रीतून जमा झालेला निधी (रु. १५,०००/-) सहकारनगर, पुणे येथील 'एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास' या संस्थेकडे देणगीच्या स्वरूपात सुपूर्द करण्यात आला.
----------------------------------------
----------------------------------------
संस्थेकडून मिळालेली त्याची पावती :

----------------------------------------
संस्थेच्या अध्यक्षा रेणू गावस्कर यांच्याकडून आलेले हे पत्र :
नांव : आदित्य आंबोळे
वय : ११ वर्षे
माध्यम : क्रेयॉन्स
मदत : जुजबी - कुठल्या हातात काय इ. सांगणे, आयफोनने फोटो काढून त्याला बॉर्डर आखणे.

गणपती बाप्पा मोरया !
नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे अकरावे वर्ष! गणेशोत्सव २०१० सोहळा पहाण्यासाठी
या दुव्यावर जा!
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
नमस्कार,
कुठलंही पुस्तक, दिवाळी अंक हाती घेतला की आधी सामोरं येतं ते त्याचं मुखपृष्ठ! ते जितकं लक्षणीय, जितकं चपखल तितकं चटकन वाचकांचं लक्ष त्याकडे आकृष्ट होणार. मुखपृष्ठ म्हणजेच अंकाचं ’फर्स्ट इम्प्रेशन’. ऑनलाईन अंक असला तरी मायबोली दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ हे याला अपवाद कसं असेल?
दिवाळी वा अंकाच्या संकल्पनेला अनुलक्षून आतापर्यंत, पणत्या-गेंदेदार झेंडूची फुलं ते निसर्गातल्या हिरवाईचा ताजेपणा मिरवणारं जलरंगातलं चित्र, सुलेखन अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींनी मुखपृष्ठावर हजेरी लावून अंकाची शोभा वाढवली आहे.