पश्चात्ताप

पश्चात्ताप

Submitted by Asu on 31 July, 2018 - 23:45

पश्चात्ताप

चाहूल तव पदस्पर्शाची
लावी वेड माझ्या मना
अंतरीच्या तुझ्या वेदना
एकांती मज सांग ना

झाले गेले विसरून जाऊ
प्रेमाचे नित गीत गाऊ
झाल्या माझ्या चुका बहु
विसरून सारे पुढे पाहू

झाडे गाळुनि पाती पाती
वसंत येता पुन्हा बहरती
युगायुगांचे आपुले नाते
क्षणात एका का मिटते

जगणे माझे मिटणे झाले
तुझ्या विना झुरणे आले
अंधारी मी प्रकाशण्याची
वाट पहातो तव स्पर्शाची

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)

शब्दखुणा: 

पश्चात्ताप

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 20 August, 2015 - 03:18

कॉलेजच्या मखमली दिवसात त्याने आणि त्याच्या टवाळक्या ग्रुपने "तिला" पाहिलं.. त्यांचा ग्रुप सेकंड इयरचा. ती नव्यानेच कॉलेजला आलेली. अगदी साधी सरळ.. खालची जमिन न्याहाळत चालणारी. तेल लावलेले केस आणि त्यांची कंबरेपर्यंत बांधलेली वेणी. पंजाबी ड्रेस. कपाळावर टिकली. डोळ्यावर चष्मा. पाठीवर पुस्तकांनी भरलेली ब्याग. हे तीच रूप कॉलेजला येऊनही पहिल्या सहा महिन्यात बदलल नव्हत. अगदी अभ्यासू किडा. "मी भली आणि माझा अभ्यास भला" तरीही आजूबाजूला मुलींच्या चर्चा तिच्या कानी पडायच्याच. हा ग्रुप असा फ़ेमस तर तो ग्रुप तसा फ़ेमस. तिच्या मोजून २-३ मैत्रिणी, पण तिच्यासारख्या त्या नव्हत्या.. कॉलेज म्हणजे मस्तीचे दिवस..

विषय: 
शब्दखुणा: 

मला पश्चात्ताप झाला आहे

Submitted by वीरू on 29 October, 2013 - 23:39

ज्यांना प्राणाहून प्रिय मानले, ज्यांच्यासाठी माझे आयुष्य वेचले, मित्र तोडले, घरच्यांचा त्याग केला त्यांच्याबद्दल काही ऐकून घेताना त्रास होतोय. सुरुवातीला बदनामीची मोहीम म्हनून संताप संताप झाला. त्या सात्विक संतापाने माझं कोमल मन कोमेजून गेलं.

त्या कोवळ्या वयात दैवतांवर झालेले आघात सहन न झाल्याने मन कोळसा झालं. त्यातून जन्म घेतला एका ज्वलंत राष्ट्रवादी तरुणाने.

विषय: 
शब्दखुणा: 

उ:शाप

Submitted by मंदार-जोशी on 20 November, 2011 - 04:57

एका फसव्या क्षणी
क्रोधाचे गुलाम झालेल्या
माझ्या संमोहित शब्दांनी
तुझ्या नाजुक भावनांचा
वेध घेतला

अन्...

माझं निष्पाप प्रेम,
ते जादुई क्षण,
वचनं....शपथा,
हे सारं विसरून
तू लक्षात ठेवलेस
फक्त माझे अर्थहीन शब्द
अन् झिडकारून निघून गेलीस

तेव्हा पासून
अहिल्येसारखं
शिळेचं आयुष्य जगत
नसांनसांत भिनलेल्या
तुला जगवतोय

अहिल्येसारखा मलाही उ:शाप आहे
...की माझ्याही भाळी लिहीलंय
अश्वत्थाम्यासारखं वणवण भटकणं ?

गुलमोहर: 
Subscribe to RSS - पश्चात्ताप