मला पश्चात्ताप झाला आहे

Submitted by वीरू on 29 October, 2013 - 23:39

ज्यांना प्राणाहून प्रिय मानले, ज्यांच्यासाठी माझे आयुष्य वेचले, मित्र तोडले, घरच्यांचा त्याग केला त्यांच्याबद्दल काही ऐकून घेताना त्रास होतोय. सुरुवातीला बदनामीची मोहीम म्हनून संताप संताप झाला. त्या सात्विक संतापाने माझं कोमल मन कोमेजून गेलं.

त्या कोवळ्या वयात दैवतांवर झालेले आघात सहन न झाल्याने मन कोळसा झालं. त्यातून जन्म घेतला एका ज्वलंत राष्ट्रवादी तरुणाने.

पण आज लक्षात येतय, कि आपला वापर झाला. आपण चुकीची लढाई लढत आहोत. काल ४५ मिनिटे ध्यानस्थ बसलो असताना अचानक ज्ञानप्राप्ती झाली आणि सर्व जग मिथ्या वाटू लागले. इथे चालला आहे वापर. फक्त वापर. माझ्यासारख्या अनेक निष्पाप तरुणांना राष्ट्रवादाचे उदात्त स्वप्प्न दाखवून वापरले जात आहे.

आता मी याच्या विरोधात उभा राहणार आहे. आजवरचे आयुष्य ज्यांची पाठराखण करण्यात गेले त्यांच्याविरोधात शड्डू फुंकले आहेत. कोवळ्या तरुणांना षडयंत्रातून बाहेर काढण्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढा देणार आहे. लढाई तर रक्तातच आहे. आजवर लढतच आलो. आता राष्ट्राला फेकूंपासून वाचवण्यासाठी लढणार. आता माझे विचारांतर आणि पक्षांतर झाले आहे.

फेकू हटाव ! देश बचाव !!

जय भारत ! जय महाराष्ट्र !! जय मायबोली !!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या मनाची स्पंदन समजू शकतो. अनेक संघटना पक्ष कल्ट मधील एखाद्या विचारपरिवर्तनाची संवेदनशीलता असलेल्याचे हे प्रातिनिधिक स्पंदन

तुमचे कोमल हृदय मूळातच फेकूच्या बाजून नाही याची पप्पूच्या बाफवरल्या पोष्टी वाचून कल्पना होतीच. Wink
उगी उगी.
निवडणूका जवळ आल्या की असे ट्रोजन हॉर्सेस सर्वत्र आढळताच.
परवा मी आपल्या त्या ह्यांना हेच सांगत होते.

फेकू हटाव ! देश बचाव !!>>>>>>>>>>>>>>>>तुमच्या ह्या उद्दात्त कार्यात तुम्हाला यश लाभो हीच देशातील जनतेची इच्छा असेल